अष्टविनायक दर्शन : श्री सिद्धिविनायक

Submitted by पल्ली on 25 August, 2009 - 01:30

siddhatek.jpgश्री सिद्धीविनायक- सिद्धटेक, जि. अहमदनगर

मार्ग- पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर बोरीब्याल स्थानकावर उतरणे. तिथून ११ कि.मी. वर भीमा नदीच्या पैलतीरी सिद्धटेकचे गणेशमंदिर आहे. श्रीगोंद्याहून बसने ४८ कि.मी., दौंडहून १९ कि.मी.

यात्रा- भाद्रपद शु. चतुर्थी व माघ शु. चतुर्थी.

मूर्ती- स्वयंभू मूर्ती. गजमुख. उजव्या सोंडेची. भोवती पितळी मखर. आसन पाषाणाचे.

मंदिर- उत्तराभिमुख. गाभारा मोठा. जवळच विष्णू, शिवाई व शंकर यांची देवळे. नदीवर सुरेख घाट बांधलेला आहे.

इतिहास
- चिंचवडच्या मोरया गोसाव्यांनी गणेशकृपेसाठी इथे तप केले होते. इथून पुढे ते मोरगावी गेले. केडगावच्या नारायण महाराजांना इथेच सिद्धी प्राप्त झाली. देवालयाचा गाभारा अहल्याबाई होळकर यांनी बांधला. पेशवाईत हरिपंत फडके यांनी या देवाची सेवा केली आणि त्यांना पुनश्च सेनापतीपद मिळाले असे म्हणतात. काकासाहेब गाडगीळ यांनी आपल्या मातु:श्रींच्या स्मरणार्थ इथे एक धर्मशाळा बांधली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है ! ते स्टोन टेक्स्चर क्लासच जमलेय तुला!
अष्टविनायक दर्शनाचा तुझा हा उपक्रम अगदी वंद्य आहे.
गणपती बाप्पा मोरया ! Happy