कारगिल सेक्टर च्या माधोमध एक जागा. एका दगडावर मी सुन्न पण शांत बसलो होतो. रिज कॅप्चर झाली होती अन शेजारी माझी राइफल पड़ली होती. तिच्यातही बेटी एकच गोळी उरली होती. तासाभरापूर्वी तुंबळ रणकंदन माजले होते इथे, आरडाओरडा विरश्रीयुक्त युद्धघोष सगळ्याचीच रेलचेल. जरासे बधीर वाटत होते, तरीही शांतता अन त्या शांततेत कानात घुमणारा कुईंsssss असा आवाज लक्षात येत होता. कदाचित मी त्या आर पी जी अन गोळ्यांच्या आवाजाने बधीर झालो होतो, असेल बुआ, ह्या धामधुमीत माझे लाडके मार्लबोरो लाइट्स चे पाकीट कुठे पडले कोणास ठाऊक! त्या परिस्थितीत सुद्धा मी ते जपून सेल्फ राशनिंग करून वाचवले होते. मरू दे आता जायचेच आहे न तेव्हा बायको न दिलेली लिस्ट घ्यायचीच आहे पठानकोट कैंटीन मधुन तेव्हा घेऊ.
अरे वा रेंफोर्समेंट आली वाटते, बारीक डोळे बारकी चण, अरेच्या ही तर आमचीच 3 गोरखा ओहो!!! सख्खे भाऊ दिसावे तसला आनंद. हा पहा थोडा वयस्करसा सूबेदार मेजर शिवसिंह छेत्री, ह्याला साक्षात "इनसाइक्लोपीडिया ऑफ़ बैटल" म्हणायला हरकत नाही बरका. त्याच्या मागे कोण हा तर वीरकुमार थापा अजुन कोण लेफ्टनंट मनोज नायडू, जिवंत वाचलाच बेट्या! असो चला आता लिंकअप करावे म्हणुन मी राइफल ला हात घातला तर उचलताच येईना राइफल! अंगात विलक्षण ग्लानी होती! ओरडावे म्हणले तर आवाज फूटत नव्हता. युद्धज्वर ओसरला की होते असे शरीर सुन्न पड़ते. आमचा टाइगर काय बरे गमतीशीर म्हणायचा ह्या अवस्थेला ? हा "पोस्ट बैटल ऑर्गैस्मिक फेज" हा हा हा हा . पण आता उठायला हवे होते.
ज़रा उठून उभा राहिलो, हात पाय ताणले ते बरे वाटत होते अन मुख्य म्हणजे बॅगपॅक चा काही भार जाणवत नव्हता! मागच्या 2 महिन्यात ती पाठीवरुन उतरली नव्हती, सवय झाली असेल. मी आता उभा राहून आजुबाजुला पाहिले ते 9 प्रेत पडलेली, पाय थरथरायला लागले तसे मी मटकन बसलो, अहो मी ही माणुसच न! कालवर सोबत लढणार पोरे अशी दिसली की कशी होणार अवस्था? समोर पाहता जवान एक एक पार्थिव उचलायला लागले ओह हा कोण? अरे रे जंगबहादुर लिंबु, देवा देवा हा तर तुषार गुरुंग लेकाचा नकला मस्त करायचा आता संध्याकाळ टाइगर च्या गप्पा ऐकत मेस ला बोरिंग होणार साला फौजी वर्दी जितकी चांगली तितका हा वियोग वाईट असतो, पलीकडे कोण आहे बरे? ओह हा तर अमरपाल तमांग ह्याच्या हातचे मटन मोमो म्हणजे वाह!!.
"हरामखोरहो, का रे का सोडताय मला! यु ब्लडी फूल! ओ.आर. अपने साबजी को अकेला छोड़ कर के जा रहे हो मकरो" माझ्या डोळ्यामधुन धारा सुरु झाल्या. सैनिक रडत नसतो. मिथ आहे साली, आम्ही क्वचित रडतो अन बहुतकरून असे साथी सोडुन गेल्यावर धायमोकलुन ही रडतो उशीत तोंड खुपसुन. अजुन कोण कोण आहे पहावे म्हणून सूबेदार मेजर च्या मागोमाग गेलो तर त्याने एक ओणवे पडलेले शरीर पाहताच तो थांबला अन ओरडला "सिपाही विष्णु जंग और लांस नायक कमलेश भूटिया इधर आओ"
ते प्रेत सुलटे करता करता त्यांना काय दिसले माहिती नाही पण ती विशीतली दोन पोरे टपटप आसवे गाळु लागली, अन गलितगात्र होऊन रडु लागली, म्हणून कुतुहला ने मी समोर गेलो ते मलाच धक्का बसला
नाव : लेफ्टनंट "क्ष"
तो मीच होतो....
सुन्न पडलेले डोके मला आवरता येत नव्हते, अरे मी मी मेलोय कुठे! मला दिसते आहे की सगळे; पण शरीर मा...झेच आ आ आहे की हे. थोड्यावेळात धक्का ओसरता मी सावरलो अन मनात विचार केला "च्यायला नेमकी कुठे काशी झाली?"
रडत रडत मला(!) पोरे स्ट्रैचर वर ठेवत होती, विष्णु तर सतत रडत होता "मेरे साब मेरे साब, अब मैं क्या मुह दिखाऊंगा आंटी जी को भाभीजी को" हळू हळू पुर्ण कैंटर बॉडी न भरला तेव्हा मी एकटा मैदानात राहिलो म्हणून मी सुद्धा कैंटर मधे शिरलो अन माझ्याच बॉडी वर बसुन राहिलो, आमची वरात बेस ला येताच पुर्ण बेस अन साक्षात् कोर कमांडर कैंटर ला एस्कॉर्ट करत सलूट करत होता, अवघड़लो न राव मी, 71 मधे झेंडे गाडलेला माझा बॉस मला माझ्या कलेवराला सलूट करत होता.
मग माझे शरीर साग्रसंगीत कास्केट मधे ठेवले गेले, माझ्या शेजारी माझे 8 भाऊ! चंडीगढ़ एयर बेस ला येताच आम्हाला विमानात बसवले इल्युशियन 76 होते बहुतेक! मरू दे आपल्याला काय बिन एयरहॉस्टेस ची फ्लाइट! मजल दर मजल करता करता आमचा कैंटर शेवटी गावाजवळ पोचला माझ्या. तसे तो थांबवला गेला त्याला लोकांनी झेंडूच्या फुलांनी सजवला होता, समोर बॅनर वगैरे जय्यत एकदम, हळूहळू मी घरी पोचलो अन कारगिल ला होतो तितकाच गलितगात्र झालो.
अनामिका माझी प्रियतमा अनामिका भकास चेहर्याने बसलेली होती, बाबा बाहेर खुर्चीत बसले होते, आई च्या डोळ्याला खळ नव्हती अन तिच्या मांडीवर असलेला माझा विश्वास, बाहेर अनामिकेच्या ऑफिस मधले सहकारी अन धाकट्या भावाची मित्रमंडळी उभी होती अन हजारो हजार अनोळखी माणसे, भाऊ वडिलांच्या मागे उभा. होता होता तयारी झाली अन माझ्या शरीरावर तिरंगा पसरला गेला, अहाहा विलक्षण उबदार होता तो!. मुक्तिधाम ला पोचलो तेव्हा मी तिथेच घुटमळत होतो थोडा अस्वस्थ होतो, आता काय होणार माझे? पुढे शरीरावरचा तिरंगा काढला तसे अजुन चूळबुळ व्हायला लागली माझी, भावाने अन वडिलांनी अग्नी दिला. हवेत मोजून 21 राउंड्स सुटले अन बिगुल वाजू लागला.
बिगुल ची धुन "लास्ट पोस्ट" कॉमनवेल्थ देशांत शहीद शिपायाच्या अंत्यसंस्कारात वाजवतात ती, लास्ट पोस्ट चा अर्थ? "डेड कॉमरेड, तू शरीराने वारला आहेस मनाने नाही तुझा आत्मा अजुन ड्यूटी ला आहे. तुझी ड्यूटी तुला साद घालते आहे. चल उठ, अन आपली पोस्ट कायम ची सांभाळ. तुला स्वर्गात जायचे असले तर तुझ्या स्वर्गात जा" माझा स्वर्ग? काय आहे काय माझा स्वर्ग? माझा स्वर्ग पॉइंट 1234 कारगिल सेक्टर नॉर्थन कमांड इंडियन आर्मी हा होता.
लास्ट पोस्ट चा बिगुल संपला तसे confusion संपले होते, अंगावर नवी वर्दी जाणवत होती, मला पिंडदान मुक्ति सप्तस्वर्ग नको होता ते श्रद्धेचा भाग म्हणुन घरचे करू देत. लास्ट पोस्ट च्या पोस्टिंग ऑर्डर्स घेऊन मी मात्र निघालो होतो.
कारगिल 1234 पोस्ट ला मी आहे आजही! कायम सतत अहोरात्र उभा, कारण तोच आहे माझा स्वर्ग
तीच आहे माझी
लास्ट पोस्ट.
सोन्याबापु, तुमचे नाव ऐकुनच
सोन्याबापु, तुमचे नाव ऐकुनच धागा उघडला आणि अंगावर काटाच आला.
या लिखाणाला सुरेख तरी कसे म्हणावे.
हृद्याला पिळवटुन टाकणारे लिहिले आहे.....
अजुन लिहित चला
अंगावर काटा आला. अश्विनी +१.
अंगावर काटा आला.
अश्विनी +१.
काय लिहीलय.. शब्दच नाहीत..
काय लिहीलय.. शब्दच नाहीत..
फक्त salute....दुसर काहीच
फक्त salute....दुसर काहीच नाही.
अश्विनी के ताई, अहो we are as
अश्विनी के ताई,
अहो we are as humans as rest of u only that we are groomed in a disciplined environment. आमच्यासाठी काही करायला आम्ही खरेच काही अतिभव्य वगैरे नाही करत हो, we just tend to do our duties deligently. तरीही, जर आपण म्हणत असाल की आम्ही तुमच्यासाठी काय करावे? तर फ़क्त आपापली कामे आनंद घेत पुर्ण इंटीग्रिटी ने अन ड्यूटी ला सर्वस्व मानत करत चला, त्याच्या इतकी मोठी मदत अन मोठे satisfaction आम्हाला अन आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला कधीच नसेल. अजुन काय सांगू! Stay blessed and Hail the Motherland. _/\_
नि:शब्द !!
नि:शब्द !!
लेख वाचून नि:शब्दच! तुमची
लेख वाचून नि:शब्दच!
तुमची वरची प्रतिक्रिया मात्र अंतर्मुख करणारी आहे.
सलाम!
खरच तुम्ही अगदी वेगळीच लोकं.
खरच तुम्ही अगदी वेगळीच लोकं. तेथे कर माझे जुळती!
सोन्याबापू _/\_
सोन्याबापू _/\_
अप्रतिम!! तुमचे लेखन मस्तच
अप्रतिम!! तुमचे लेखन मस्तच असते. कुठलाही लेख वाचला की जवानंबद्दलची श्रध्दा आणखी उंचावते. अभिमान वाटतो आम्हाला तुमचा व तुमच्या सारख्या हजारो लाखो जवानांचा. परत एकदा हॅट्स ऑफ टु यु!!
सेल्यूट खूप आवडल
सेल्यूट खूप आवडल
SALUTE . __/\__
SALUTE . __/\__
खूप छान लिहिले. आमच्या घरात
खूप छान लिहिले.
आमच्या घरात सगळे पुरुष पोलिस खात्यात होते.. अजून काही आहेत. माझे आजोब ईंगजाच्यावेळी जमादार होते. माझे बाबा, तीन काकाही जमादार होते. माझा भाऊ ईन्स्पेक्टर होता. माझे चुलत भाऊ पोलिस कॉन्स्टेबल आणि ट्राफीक पोलिस आहेत. मी अनिकटमधे पोलिसांच्या घरात वाढलो. हे बिगुल, सलामी खूप परिचयाचे शब्द आहेत. मला वाईट वाटत की मी ह्या अभियांत्रिकी लाईनमधे आलो. तेंव्हा भुषण वाटायचे पण आता माझ्या घरातील इतर मंडळीनी देशसेवा केली ती मी केली नाही.
निःशब्द !!!
निःशब्द !!!
सोन्याबापू _/\_
सोन्याबापू _/\_
काय बोलू...सुन्न झालोय...शब्द
काय बोलू...सुन्न झालोय...शब्द सुचत नाहीयेत....
तुम्हा सर्वांना एक जबरदस्त सॅल्युट
बाप रे!
बाप रे!
खरंय - कधी तो कॅप्टन बत्रा
खरंय - कधी तो कॅप्टन बत्रा असतो. कधी मेजर संदीप असतो .. तर कधी नाव माहिती नसलेला कुणी तरी !!
फार सुरेख लिहून गेलात बापू तुम्ही !
सोन्याबापू लैच जबरान लिहिलाय
सोन्याबापू
लैच जबरान लिहिलाय राव...
सोन्याबापू _/\_
सोन्याबापू _/\_
सुंदर लिहलेय!!! आवडली कथा.
सुंदर लिहलेय!!! आवडली कथा.
सुपर. बोन चिलिंग म्हणतात तसच
सुपर. बोन चिलिंग म्हणतात तसच झालय हे लेखन.
नि:शब्द! अप्रतिम!! तुमचे
नि:शब्द!
अप्रतिम!! तुमचे लेखन मस्तच असते. कुठलाही लेख वाचला की जवानंबद्दलची श्रध्दा आणखी उंचावते. अभिमान वाटतो आम्हाला तुमचा व तुमच्या सारख्या हजारो लाखो जवानांचा. परत एकदा हॅट्स ऑफ टु यु!! >>++
_/\__/\__/\_
_/\__/\__/\_
सरसरुन काटा आला अंगावर..
सरसरुन काटा आला अंगावर..
डोळ्यांत पाणी... 
__/\__
__/\__
काळजाला भिडणारं लिहीलयं.डोळे
काळजाला भिडणारं लिहीलयं.डोळे पाणावले. आन्खि काहि लिहुच शकत नाहि मझे एक नात्यात्लेबाओर्डरवर शहिद झाले त्यन्चा २ लाहान मुलि आहेत केवल ३ आनि ५ वर्शाचि तुम्चा लेख वचुन त्यान्चि आथवन झालि
अप्रतिम!
अप्रतिम!
बापरे ! अंगावर आलं लिखाण
बापरे ! अंगावर आलं लिखाण एकदम.
नि:शब्द!!..
नि:शब्द!!..
Pages