पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/54837
इलेगुआ डोळे विस्फारून बघत होता. त्याच्यासमोर एक वेगळेच जग होते. क्षणाक्षणाला ते जग बदलत होते. हे असे का होत आहे? आत्ता या झाडाला त्रिकोणी पाने होती, नाही आता वर्तुळ आणि या आकाराला काय म्हणतात ते मला माहित पण नाही. अशी पाने असतात?
"नीट बघ, पाने नाही झाड बदलत आहे." इलेगुआच्या कानात आवाज घुमला.
"कोण आहे?" इलेगुआ चमकला खरा पण ठाम स्वरात त्याने प्रश्न केला. "समोर का येत नाहीस?"
एक गडगडाटी हास्य करत तो आवाज पुन्हा म्हणाला - "तू २०व्या शतकाच्याही आधीच्या काळातून आला आहेस नाही का? तुला User Interface काय कळणार? असो. उम्म, evaluating environment variables, execute intro_situation3683954837. मी युरुगु देवाचा देवदूत बोलत आहे. आम्हाला मनुष्यांसमोर यायची परवानगी नाही कारण आम्हाला जो कोणी जिवंत व्यक्ती पाहतो तो जळून खाक होतो."
इलेगुआची भीड चेपली होती, मुळातच तो कोणाला घाबरत नसल्याने त्याला कशानेच फरक पडत नसे.
"मग युरुगु देवांनी तुम्हाला पाठवले आहे तर. मी या जगात प्रवेश करू शकतो का?"
"होय. तुझे युरुगुच्या पुस्तकात स्वागत आहे."
**********
"काय समजले?" इलेगुआने गोरोला विचारले. ते दोघे आता कोलोसियममध्ये ग्लॅडिएटर्स बनून लढत होते. सगळे आभासी प्रेक्षक एका लयीत त्यांना प्रोत्साहन देत होते.
"काहीच नाही" गोरो उत्तरला.
"अर्रे!!! आपल्या भाषेत पुस्तकाला वेगळा असा शब्दच नव्हता. जेव्हा आपल्या पूर्वजांचा मिस्रशी संबंध आला तेव्हा आपण पपायरसवरची पुस्तके पाहिली. ते वेगळे जग होते आपल्या पूर्वजांसाठी. मग अडूर्नो हाच शब्द आपण तिकडे फिरवला. अरे वेड्या युरुगुचे पुस्तक केवळ एक पुस्तक नाही आहे. It is a different world with its own set of rules altogether! आणि मी बनवलेले युरुगुचे पुस्तक हे या जगाचे प्रवेशद्वार आहे."
~*~*~*~*~*~
किलर आपल्या नव्या खेळण्याकडे पाहत होता. होय खेळणेच ते!
१ + ४/७ + ९/४९ + १६/३४३ + २५/२४०१ + ३६/१६८०७ ............... अपटू इन्फिनिटी!
ओके लेट द सीरिज बी क्ष, मग ६/७ क्ष आधी काढा. देन सब्ट्रॅक्ट १/७ ऑफ दॅट फ्रॉम इट..... अॅन्ड द आन्सर शूड बी ४९/२७. त्याने लगेच याचे उत्तर व्हॉट्सअॅप करून टाकले. गुड रेस्पाईट फ्रॉम गँगस्टर लाईफ! विद्यार्थ्यांचे अडलेले प्रश्न सोडवून द्यायचे पण कोणालाच माहित नाही कि हे सोडवणारा व्यक्ती एका गँगमध्ये आहे. सहज डावीकडे बघितल्यावर खिडकीच्या काचेत त्याचे प्रतिबिंब त्याला दिसले. क्षणभर आपण अँड्र्यु स्कॉटसारखे दिसत आहोत असा त्याला भास झाला आणि एक ओझरते हसू त्याच्या ओठांवर आले. मग त्याने शेजारी बेडवर झोपलेल्या जॉनीकडे पाहिले. आणि त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा तो घटनाक्रम तरळला.......
.........................
.........................
जॉनी जरा बदल म्हणून ऑयकर खेळत होता. जॉनीचा तो अदृश्य कोल्हा त्याच्या बाजूलाच होता. किलरला आता या गोष्टीचे नवल वाटणे बंद झाले होते कि जॉनी वगळता फक्त तो त्या कोल्ह्याला पाहू शकतो. अर्थात त्याने ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती, अगदी रसूलला देखील नाही. पण आज तो कोल्हा काहीसा वेगळा वाटत होता. नेहमी त्याचे डोळे कोणा ना कोणावर रोखलेले असत. आज मात्र तो काहीसा झिंगलेला वाटत होता. कधी नव्हे तो जॉनीच्या शेजारी असण्यापेक्षा थोडा दूरवर लोळत होता. आज जॉनी देखील थोडा वेगळा वागत होता. आज तो ओळीने ५ डाव जिंकला होता आणि फक्त एकच पेग रिचवला होता. काहीतरी बिनसले आहे हे किलरने ताडले. त्याने जॉनीला विश्रांती घेण्यास सुचवले पण जॉनी खेळतच राहिला आणि जिंकत राहिला. त्याने कधी नव्हे ते एक कॅपचिनो मागवली. नवीन डाव सुरु करण्यासाठी पत्ते पिसत असताना त्याने कॉफीचा पहिला घोट घेतला आणि त्याच्या हातून मग खाली पडला. त्याच्या सर्वांगाला थरथर सुटली होती. त्याने आपल्या दोन्ही हात छातीशी घेतले आणि त्याची बोटे वेडीवाकडी मुडपली होती. अचानक तो टेबलवर ओकला, तो रक्त ओकला. पुढचे काही तास त्याच्या रक्ताच्या उलट्या अशाच सुरु राहणार होत्या. त्याच क्षणी दूर कुठेतरी लाने आपली क्रिया यशस्वी झाल्याचे 'त्या'ला कळवले. पण एक गोष्ट फक्त किलरच्या लक्षात आली होती. तो कोल्हा आता झिंगलेला वागत नव्हता पण पूर्वीप्रमाणे तो कोणाकडे रोखूनही बघत नव्हता. त्याने खिडकीची काच फोडून बाहेर उडी मारली आणि तो दिसेनासा झाला. किलर खिडकीकडे धावला पण तो काचेला धडकला. काच तशीच होती कोल्हा फक्त आरपार झाला होता.
.......................
......................
आनंदने तो रस्त्यावर फिरणारा कोल्हा पकडला होता. करडा रंग, अगदी आपल्याला हवा तसा कोल्हा आहे. का ना अंडरवर्ल्ड ब्रोकर्स कडून मिळाला असे म्हणून स्वामींकडे न्यावा आणि निश्चितानंदाकडून मिळालेला पैसा गडप करावा. अशा रीतिने तो कोल्हा निश्चितानंदाकडे गेला. अर्थात हे कोणालाच तेव्हा कळले नाही.
.......................
.......................
"हा सर्व दारूचा परिणाम आहे. आत्ता तो वाचला आहे पण त्याचं लिव्हर अशाने कायमचे निकामी होईल." आलेला डॉक्टर रसूलला जॉनीला एखाद्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला देत होता. रसूल यावर विचार करत होता. भले जॉनी किरकोळ गुंड असला तरी आता तो त्याच्या गँगचा सदस्य होता. त्याला असे उघड हॉस्पिटलमध्ये हलवणे कितपत चांगले यावर त्याने किलरचा सल्ला घेण्याचे ठरवले. इकडे किलर सावकाश त्याच्या सर्वात आवडत्या खेळण्याच्या केसांमधून हात फिरवत होता. हे खेळणे मोडले आहे पण दुरुस्त होण्याच्या पलीकडे गेलेले नाही.
~*~*~*~*~*~
"पण मग तू या जगात कसा काय आलास?" गोरोने विचारले. त्यांचा विश्रांतीचा वेळ चालू होता. ते दोघे आता एका बीचवर होते. वाळूत पडल्या पडल्या इलेगुआने हवेत हात फिरवला. त्याच्या हाताच्या हालचालीबरोबर निळसर आकाश काळे होत गेले आणि या नव्या स्क्रीनवर पुढची गोष्ट सुरु झाली.
********
इलेगुआ एकटाच जंगलात भटकत होता. जंगलात बालपण गेलेल्या मुलाला हे आयुष्य काही फारसे अडचणीचे वाटत नव्हते फक्त त्याला आपल्या कबिल्यापासून दूर राहायचे होते. जर तो दूर नाही राहिला तर आपले वडील युरुगुची उपासना केल्याबद्दल काय शिक्षा देतील याबाबत त्याच्या मनात अजिबात शंका नव्हती. आता कोणा मानसतज्ञाने विचार केला तर असे आयुष्य तुमच्या मानसिकतेवर अतिशय वाईट परिणाम करू शकते. अर्धवट वयात आलेल्या मुलावर याचे काय परिणाम झाले असतील..........
("ए मोनोलॉग बंद कर!!!" गोरोने वळून इलेगुआकडे पाहिले. त्याने फक्त खांदे उडवून आपल्याकडे वेळ नसल्याचे स्पष्ट केले.)
त्याला अजूनही कळले नव्हते कि युरुगुची उपासना केल्याने काय बिघडतं! इतर कबिल्यांशी जेव्हा त्याचा संबंध आला तेव्हा त्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि त्याचा कबिला एक प्रकारे सर्व जगापासून वेगळा पडत चालला आहे. जुन्या प्रथांचे पालन करणे वेगळे आणि त्यांनी पछाडले जाणे वेगळे. त्याच्या कबिल्याविषयक एक प्रकारची भीतिच जणू बसली होती इतरांमध्ये! अशा परिस्थितीत त्याला काही बदल घडवायचे होते पण........... हा पणच अनेकदा महत्त्वाचा असतो. आपला राग सरदार ओझावर भागवणार हे त्याला कळून चुकले होते. त्याच्या आईने त्याला ३-३दा बजावून सांगितले होते कि काही दिवस लपून राहा, परिस्थिती बघून मी तुला परत आणेन. इलेगुआच्या मनात मात्र आता परत जाणे नव्हते. त्याला आता आपला स्वतंत्र मार्ग शोधायचा होता. त्याला काही कल्पना नव्हती कि तो हे कसे करणार होता पण तो त्याच्या तंत्रानेच वागणार याची खूणगाठ त्याने बांधली होती.
तो भटकतच राहिला आणि भटकतच राहिला आणि भटकतच राहिला. किती दिवस, आठवडे, महिने होऊन गेले, आता वेळेचा ताळमेळ राहिला नव्हता. तो कोणत्या जंगलात, कोणत्या कबिल्याच्या भागात आला होता हे आता सांगणे अशक्य होते. सूर्य उगवतो, आपण उठतो, दिशाहीन पायपीट करतो, मावळला कि विश्रांतीची जागा बघून झोपतो; बस्स एवढेच आयुष्य राहिले होते. भूक लागली कि शिकार करावी, भाजून खावी. पण त्याच्याही नकळत तो एका अत्यंत कठोर वातावरणात आला होता जिथे शिकार मिळणे सोपे नव्हते. एखादा सरडा किंवा मासा एवढीच शिकार तो करू शकायचा. एकदा त्याने तरसांनी मारलेले हरीण हिसकावण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातून तो मरता मरता वाचला. कुठलीही पाने, फुले खायलाही त्याने सुरुवात केली. याच काळात त्याला कोणी दिसू लागला. तो त्याचा भ्रम होता कि सत्य हे सांगता येणे केवळ अशक्य होते. दोहोंची शक्यता ०.५ होती. अखेरीस कधी तरी इलेगुआने त्याला विचारलेच
"अखेरीस तू आहेस कोण? का माझ्यामागे फिरत आहेस?"
"तुझ्यामागे फिरायला काही कारण किंवा कोणाची परवानगी लागते काय? तुझी हालत बघता तू मला घालवून देण्याऐवजी माझ्याकडून मदत मागायला हवी होती पण तू नाही मागितलीस. बाकी तू कोण आणि इथे काय करत आहेस हे मला सगळे माहित आहे आणि मी लवकरच तुला सांगेनही कि मी तुझ्याबरोबर का फिरत आहे."
"पण तू आहेस तरी कोण?"
"मी? मी कोण हा प्रश्न मलाही पडला आहे. फक्त युरुगुच कदाचित सांगू शकतो कि मी कोण आहे ते. सध्या तू मला गेनासेयरा म्हणू शकतोस."
युरुगुचे नाव ऐकल्यावर इलेगुआही चमकून त्याच्याकडे बघत राहिला. हीच होती गेनासेयरा आणि इलेगुआची पहिली भेट आणि युरुगुच्या पुस्तकाची सुरुवात!
~*~*~*~*~*~
पाशवी भावना, पशुतुल्य असे जड जड शब्द काय आणि "पूरा जंगली है ये तो, एकदम जानवर का माफिक" असले हिंदीसदृश भाषेतील शब्द काय एकच भावना आपण व्यक्त करत असतो - हे वागणे माणसाला शोभणारे नाही. पण........ पण अखेरीस मानवी वागणूक म्हणजे तरी काय? आपणच ठरवलेल्या काही नियमांनुसार वागणे! जर मचाक मचाक आवाज करत खाल्ले तर तुम्ही डुकरासारखे खात आहात अशी प्रतिक्रिया अगदी सहज येऊ शकते. मग तुम्ही हा नियम डोक्यात साठवता. उष्मागतिकीशास्त्राच्या दुसर्या नियमानुसार तुम्ही एखाद्या व्यवस्थेला जितके अधिक नियमित करू बघता तेवढी ती अधिक अनियमित होत जाते. एका तर्हेने हा नियम शक्याशक्यतेच्या खेळाला चालू ठेवण्यास मदतच करतो. या सर्व नियमातही एक वर्तन आपण अधिकाधिक मानवेतर प्राण्यांबरोबर जोडतो - अत्यंत क्रूरपणे केलेली हत्या. गंमत म्हणजे इतर प्राणी सहसा कधीच विनाकारण हत्या करत नाहीत आणि निसर्गाने त्यांच्या पद्धती मुळातच भक्ष्याला शक्यतो लगेच मृत्यु प्राप्त व्हावा अशाच बनवल्या आहेत. तरी हा नियम आपण बनवून आपल्या जगात एक प्रकारची अनियमितताच आणली आहे. एकंदरीत दुसरा नियम खराच आहे म्हणायचा!! जे हॅन्स आत्ता करत होता ते नक्कीच या 'पाशवी' प्रकारात मोडणारे होते. सिस्टर क्लेअर काहीही करू शकत नव्हती. हॅन्स मधला राक्षस पाहून तिच्या तोंडातून फक्त तीनच शब्द बाहेर पडले "लॉर्ड, सेव्ह अस!!"
***********
xxxx तो आठवडा xxxx
सिस्टर क्लेअरची डायरी
दिवस १ :
आजचा दिवस सुरु छान झाली. सर्वांनी प्रेयर मन लावून म्हटली. अजूनही काही मुले अळंटळं करतात पण प्रेयर इज इंपॉर्टंट! असो बाकी दिवस देखरेख आणि डॉक्युमेंटेशन मध्येच गेला. हॅन्सला जायला अजून १ आठवडा आहे पण आधीच जर तयारी गेली तर इट वुड बी स्मूथ नो! आज हॅन्स खुश होता. तसा तो अबोलच आहे पण का कोण जाणे इथल्या कुत्र्याशी त्याचं कधीच पटत नाही. आज पुन्हा एकदा तो कुत्रा गायब झाला. गेल्या २ महिन्यात हे ३री वेळ आहे. आता तर इतर नन्स म्हणायला लागल्या आहेत कि धिस प्लेस इज कंज्युअर्ड, बट नॉट फॉर ह्युमन्स फॉर डॉग्ज. समथिंग इज अ मिस दो. एकदा हॅन्स गेला कि निवांत याचा शोध घेईन. ओह गॉड हू स्क्रीम्ड अॅट धिस टाईम इन द नाईट! डियर डायरी, उद्याच्या दिवसाबरोबर या इन्सिडन्सची पण नोंद करेन. बाय.
दिवस २ :
येस्टरडे नाईट वॉज हॉरिबल! सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे इट वॉज नॉट अ चाईल्ड दॅट स्क्रीम्ड! अॅग्नेसची किंचाळी होती ती. अॅग्नेसने सांगितलेली हकिगत अशी - ती नेहमीप्रमाणे प्रेयर करून झोपण्याची तयारी करू लागली. तेवढ्यात तिला कोणीतरी तिच्या खोलीच्या खिडकीबाहेर असल्याची चाहूल लागली. तिच्या खिडकीशी कोणाची तरी सावली होती आणि त्या व्यक्तिच्या हातात एक सुरा होता. ते पाहून ती किंचाळली आणि तीच किंकाळी ऐकून मला जावे लागले होते. वी सर्च्ड फॉर द एन्टायर नाईट. कोणीही सापडले नाही. आश्चर्य म्हणजे अॅग्नेस खरे सांगत होती कारण तिच्या खोलीबाहेर सकाळी आम्हाला रक्ताचे ट्रेसेस दिसले. छोटेसेच, पण वाळलेले रक्ताचे ठिपके. आज मी पोलिसांच्या कानावर सगळा प्रकार घालून आले. उद्यापासून एक कॉन्स्टेबल पाठवणार म्हणत आहेत. अॅग्नेस अजूनही खूप घाबरलेली आहे. मला तर काही समजत नाहीये कि काय करू आणि काय नाही! डियर डायरी हेल्प मी!
दिवस ३ :
आज कॉन्स्टेबल येऊन गेला. होय गेला, कारण दॅट फूल थिंक्स इट इज अ प्रँक बाय वन ऑफ द चिल्ड्रेन! दॅट निन्कम्पूप, फरगिव्ह माय सोल फॉर दीज बॅड माऊथ्ड रिमार्क्स पण त्याची वागणूकच तशी होती. कामचोर कुठचा! अॅग्नेस अजूनही घाबरलेलीच आहे. आज तिने मला जे विश्वसात घेऊन सांगितले ते मात्र थोडे डिस्टर्बिंग होते. तिच्या म्हणण्यानुसार ती व्यक्ति कुत्सित हसत होती आणि तो हसण्याचा आवाज थोराड नक्कीच नव्हता पण खूप नाजूकही नव्हता. तिला वाटतंय कि इट वॉज अ चिल्ड्रेन्स व्हॉईस! त्या कॉन्स्टेबलचं मी समजू शकते पण अॅग्नेस सुद्धा! त्या रक्तांच्या ठशांचा माग काढायचा मी ठरवले आहे. ते शेजारच्या वाढलेल्या झाडाझुडपांमध्ये कुठेतरी जात होते. आता त्यांचा कितपत मागमूस राहिला असेल माहित नाहे पण प्रयत्न करायलाच हवा.
नोट : हॅन्सच्या होऊ घातलेल्या डॅडींचा फोन आला होता. त्यांना कुठलेही डॉक्युमेंटेशन टाळायचे आहे कारण दे डोन्ट वॉन्ट एनी एव्हिडन्स कि हॅन्स इज नॉट हिज बायोलॉजिकल सन. गॉड सेज कि कधी कधी चांगल्या गोष्टीसाठी थोडं खोटं बोललं तर दॅट इज फरगिव्ह्ड. तसेही आय डोन्ट हॅव द टाईम टू फिनिश इट.
दिवस ४ :
ओह डियर डियर काय चालू आहे नक्की? मी कधीच आम्ही आडबाजूला आहोत, आमच्या बिल्डिंगजवळ खूप झाडी वाढली आहे या गोष्टींचा विचार केला नव्हता. मी काल रात्रभर नीट झोपू शकले नाही. ती झाडी म्हणजे आता जंगल झाले आहे. गॉड व्हाय डिड आय नॉट पे अटेंशन टू इट बिफोर? अॅग्नेसने रात्री ज्याला कोणाला पाहिले तो कितीतरी दिवसांपासून त्या रानात असला पाहिजे. आता मला कळले कि सर्व कुत्रे कुठे गायब होत होते. अॅग्नेसने त्याच्या हातात पाहिलेला सुरा नक्की कुत्र्याचे तुकडे करायला वापरले असणार. हा कोण जंगली आहे जो कुत्रा खातो. पोलिसही माझं नीट ऐकून घेत नाहीत. त्यांना वाटतं अनाथालयावर कोण पाळत ठेवून असेल, कशाला कोण जाईल इकडे. जर हे सर्व असेच चालू राहिले तर एक दिवस मी वेडी होईन. गॉड प्लीज हेल्प मी, हेल्प अस.
दिवस ५ :
पोलिस येऊन पाहून गेले. त्यांच्या मते त्या दिवशी एखादा चोर आला असेल, त्याची आणि कुत्र्याची झटापट झाली असेल, मग मृत कुत्र्याला झाडीत टाकून तो पळाला असावा. किमान आता ते बाहेरून कोणी व्यक्ति आत आली होती एवढे तरी मान्य करत आहेत हेही कमी नाही. मी तर आशाच सोडली होती कि काही पुढे होईल, मदत मिळेल. जर तो चोरच असला तर ठीक आहे, परत यायचा नाही. पण जर नसला तर....... अॅग्नेसच्या म्हणण्यानुसार तो कोणी टीनएजर होता......... या कुत्र्याला चोराने मारले पण मग बाकी कुत्र्यांच्या प्रेतांचे काय? खूप प्रश्न आणि सर्वच्या सर्व अनुत्तरित!!
दिवस ६ :
आज काही घडले नाही. हो, काही म्हणजे काही नाही. सर्वजण एकमेकांकडे बघत होते, एकमेकांना खुणावत होते. आज काय होणार? एव्हाना आजूबाजूच्या परिसरात पण थोडी फार कुजबुज सुरु झाली आहे, २-३ दिवसात विसरूनही जातील कदाचित. आजची रात्र काढली कि सर्व नन्स आणि चिल्ड्रेनपण होतील शांत. कदाचित चोरच होता तो आणि अॅग्नेसला भ्रमही झाला असेल. कदाचित तो कोणी पुअर होमलेस असेल. हूएव्हर ही वॉज गॉड सेव्ह हिज सोल!
दिवस ७ :
अंदाजापेक्षा सगळं लवकर पुन्हा नेहमीसारखे झाले आहे. कदाचित तो चोरच होता ही ठाम समजूत पसरल्यामुळे असेल. मला अजूनही खात्री वाटत नाहीये कि हे सगळं इतके सहज निस्तरले जात आहे आणि मी मुद्दामच काही मुलांना खोदून खोदून विचारले आणि .......... त्यांना पण अशी व्यक्ती पूर्वी दिसलेली आहे. एकाने तर त्या व्यक्तीला कुत्रा उचलून नेताना पाहिलेले आहे. ओह लॉर्ड, व्हाय डिड दे नॉट टेल मी धिस बिफोर? आम्ही आधीपासूनच या अज्ञाताच्या सावलीत जगत होतो आणि हा आठवडा सर्वांसमोर आणणारा ट्रिगर ठरला आहे. पण जर तो खरेच चोर असला तर.... नाही नाही आजची रात्र महत्त्वाची आहे. आज काय होईल ते
नोंद : उद्या हॅन्सला त्याच्या पालकांकडे सोपवायची जबाबदारी सिस्टर मिरियाकडे सोपविली. आता मी उद्याची चिंता न करता रात्रभर तपास करू शकते.
...................
...................
सिस्टर क्लेअरने डायरी मिटली आणि हातात कंदिल घेतला. खोलीतील दिवा मालवून ती बाहेर पडली. आज रात्री या प्रकरणाचा सोक्षामोक्ष लागलाच पाहिजे. मनाशी ठाम निर्धार करून तिने क्रोशेकामाची सुई आपल्या झग्यात लपवली आणि ती बाहेर पडली. ती थोडे अंतर गेली असेल न असेल तेवढ्यात तिला अॅग्नेस दिसली. अॅग्नेस इतक्या रात्रीची काय करत असेल? ती पाठीमागच्या जंगल्यासारख्या झाडीत शिरली. क्लेअरही तिचा पाठलाग करू लागली. अॅग्नेस खूप घाईघाईत चालत असल्यासारखी दिसत होती. क्लेअरला लवकरच लक्षात आले कि ते जंगल आपल्याला वाटले त्यापेक्षा पुष्कळच मोठे आणि दाट आहे. ती थोडी घाबरली पण तिने पाठलाग तसाच चालू ठेवला. तिच्या लवकरच लक्षात आले कि हा पाठलाग तिहेरी आहे; अॅग्नेसही कुणाच्या तरी मागावर आहे. अंधाराचे नीट दिसत नसल्याने तो किंवा ती नक्की कोण आहे ते कळून येत नव्हते पण ते जे कोणी होते, अतिशय चपळ होते. अॅग्नेसला आपला नाईटगाऊन सांभाळत काट्याकुट्यातून चालताना अडचणी येत होत्या. थोड्याच वेळात अॅग्नेसला तो दिसेनासा झाला. अॅग्नेस थांबलेली पाहून थोड्या अंतरावर क्लेअरही थांबली. क्लेअरला क्षणभर वाटले कि आपण जाऊन अॅग्नेसला आवाज द्यावा पण का कोणास ठाऊक तिने तो मोह आवरला व त्याऐवजी अॅग्नेस काय करत आहे याचे निरीक्षण करायचे ठरवले.
अॅग्नेस इकडे तिकडे पाहू लागली. जंगलातून चालणे सोपे नसते हे जंगलात चालल्याशिवाय समजून येत नाही. त्यात मऊ सपाता घालून चालल्यामुळे तिच्या पायांना काटे बोचले होते आणि ते चांगलेच ठणकत होते. पण तिला खिडकीत पुन्हा एकदी ती सावली दिसल्यावर राहावले नाही आणि होती तशीच त्याच्या मागे मागे जंगलात आली. आता मात्र तिला आपण काय वेडे धाडस केले आहे याची जाणीव झाली होती. रातकिड्यांची किरकिर वातावरण अधिकच भयाण करत होते. वार्यामुळे होणारी पानांची सळसळही आता असह्य वाटत होती. त्यातच हवेतला गारवा कधी गारठ्यात बदलला हे कळलेच नाही आणि अॅग्नेसला चांगलीच हुडहुडी भरली. अशा अवस्थेत तिच्या मानेवरून एक घामाचा थेंब ओघळला आणि ती चमकून थरथर कापू लागली. आजूबाजूला सगळीकडेच धुरकट हवा पसरली होती. तिने आपली नजर हळू हळू फिरवली आणि तिला एक विचित्र अनुभव आला. आपल्या डोळ्यांच्या कोपर्यातून आपल्याला वाटते त्यापेक्षा कितीतरी अधिक दिसत असते फक्त आपण त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करीत नाही. जशी जशी तिने नजर फिरवायला सुरुवात केली तिला डाव्या डोळ्यांच्या कोपर्यातून धुके थोडेसे हटत आहे असे जाणवले. जशी जशी ती नजर फिरवत गेली तसे तसे तिला कळत गेले कि धुके हटत नसून धुक्यातून एक वस्तु आपल्या दिशेने येत आहे. तिच्या शरीराने आपली सर्वोत्कृष्ट प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया दिली पण काही उपयोग झाला नाही. तिची नजर जेव्हा त्या वस्तु - त्या फेकलेल्या दगडाच्या रेषेत आली तोवर उशीर झाला होता आणि तो दगड तिच्या नाकावर आदळला. ती तोल जाऊन मागे पडली आणि तशीच एका उताराच्या कडेला आली तिचे तिलाच कळले नाही. तिच्या डोक्याला एका जाडजूड फांदीचा अडसर मध्ये आला आणि ती त्या फटक्याने उतारावर पडली आणि घसरत क्लेअरला दिसेनाशी झाली.
क्लेअरला पटकन कळलेच नाही काय झाले. या सर्व घटना इतक्या वेगाने घडत होत्या कि कोणताही मनुष्य हतबुद्ध होऊन बघत राहिल. जे काही घडले ते सुधरत आहे तोवर क्लेअरला तो दगड फेकणारा दिसला. तो खरंच कोणीतरी मुलगा होता, अंगकाठीने १३-१४ वर्षांचा असावा. तिला त्याचा चेहरा नीट दिसला नाही पण अॅग्नेस खरेच सांगत होती हे तिला आता पटले. तिचे डोके आता थोडे थोडे काम करू लागले तरी तिच्या शरीर अजून धक्क्यातून सावरले नव्हते. तिला हवी तशी हालचाल तिच्या हातापायांनी केली नाही आणि ती फक्त असहायपणे त्या मुलाला उतारावरून अॅग्नेस ज्या दिशेला फेकली गेली तिकडे उड्या मारत जाताना पाहिले. हे पाहून मात्र क्लेअरच्या मनावर असलेली सर्व बंधने तुटली. ती जोरात धावत सुटली आणि ठेचकाळत ती कशी तरी त्या उताराच्या कडेला पोचली आणि खाली चंद्रप्रकाशात पाहिलेले दृश्य क्लेअरच्या मनावर कायमचे कोरले गेले.
मानवी शरीरदेखील किती कमकुवत असते. क्लेअरला स्वतःला सावरायला जेवढा वेळ लागला तेवढ्या वेळात बरेच काही झाले होते. त्या मुलाने अॅग्नेसला न जाणे किती वेळा भोसकले पण त्याला हे कळायला वेळ लागला कि अॅग्नेस त्या फांदीच्या फटक्याने आधीच गतप्राण झाली होती. जंगलात राहून 'तो' शिकला होता कि मृत प्राण्यांची शिकार करायची नसते. त्याच्या मनात क्षणभरच विचार आला कि मी सिंहासारखे वागून हिला सोडून देऊ कि गिधाडासारखे वागू? पण त्याच्या डोक्यातला राग या सर्व वैचारिक गोंधळाला दूर सारून तिला भोसकतच राहिला. क्लेअर जेव्हा पोचली तेव्हा तो तिच्या पोटातून एक तुकडा कापून घेत होता. त्यालाही क्लेअरच्या अस्तित्त्वाची जाणीव झाली आणि त्याने तिच्याकडे पाहिले.
"हॅन्स!!!!!!!" क्लेअर मटकन जागेवरच बसली.
~*~*~*~*~*~
प्रज्ञा, कुणाल आणि आलोक एकत्र बसले होते.
"हॉस्पिटल मधून कोणीतरी गुप्तपणे उपचार करायला जायला खूप काही गोष्टी कराव्या लागतील. इतके सोपे नाही आहे ते."
"अगदी मान्य! पण आलोक पेशंटचे नाव, पेमेंट इ. ची खोटी एंट्री शक्य आहे पण डॉक्टर्स अॅब्सेन्स इज नॉट दॅट सिंपल टू इरेज! आम्हाला फक्त हे बघायचे आहे कि त्या विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी कोणता डॉक्टर हॉस्पिटल मध्ये नव्हता."
"प्रज्ञा हे बेकायदेशीर आहे. जर हे उघडकीस आले तर डॉ. सायरस मला लॅब मधून हाकलून देतील."
"आलोक प्लीज यार! कुणाल समजव ना याला."
"आलोक हा तुझा हिरो बनायचा चान्स आहे. कम ऑन बडी."
"अरे पण तुम्ही मला कारणही देत नाही आहात. अखेर तुम्हाला अशी काय गरज पडावी कि तुम्ही हे असले धंदे करायला प्रवृत्त व्हावात? ही प्रज्ञा एक बावळट आहे. हिच्या डोक्यात डिटेक्टिवगिरीचे खूळ आहे पण कुणाल तू सुद्धा?"
"ए गप रे ज्युलियस सीझर! अगदी अट टू ब्रुट च्या थाटात विचारतो आहेस त्याला!"
"प्रज्ञा थट्टा नको. लेट मी हॅन्डल धिस. जा तोवर आपली ऑर्डर आण."
प्रज्ञा गेल्यावर कुणाल बोलू लागला
"हे बघ आलोक्या, आम्हाला तुला उगाच या प्रकरणात जास्ती गोवायचे नाही आहे कारण हे सर्व धोकादायक आहे. आपल्या नेहमीच्या अनुभवांच्या पलीकडचे आहे. पण तुला अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर मुंबईत घडणार्या सर्व विचित्र घटना, ते खून आणि तो तथाकथित कोल्हा या सर्वांच्या मूळाशी याच्यामार्फत पोचता येण्यासारखे आहे. प्लीज आलोक, प्लीज. एक मित्र म्हणून आम्हाला मदत कर."
आलोकने थोडा वेळ विचार केला. त्याचे लक्ष ट्रे हातात धरून त्यांची ऑर्डर घेऊन येत असलेल्या प्रज्ञाकडे गेले. तिने अनवधानाने आपल्या डोळ्यांवर आलेली बट हाताने बाजूला सारली आणि ट्रे टेबलावर ठेवत ती आलोकच्या समोर बसली.
"आलोक हो म्हणाला प्रज्ञा. थँक गॉड" - कुणाल
आलोक कुणालकडे बघू आ वासून बघू लागला. मी हो म्हणालो? त्याला स्वतःचेच हसू आले. प्रज्ञा आणि कुणाल एकमेकांना टाळी देत होते. चलो, प्यार के खातिर ये भी कर के देख लेते है.
**********
तिघेही हॉस्पिटल मध्ये होते. आलोकची बोटे झरझर कीबोर्डवर फिरत होती. कुणाल दाराशी उभा राहून कोणी येत असल्यास सावध करण्याचे काम करायला खिडकीपाशी थांबला होता. प्रज्ञा आलोकच्या शेजारी उभी राहून त्याला सूचना देत होती. प्रज्ञाला खात्री होती कि युरुगुच्या प्रभावाखाली आलेल्या या जगात आपण जितकी जास्त रिस्क घेऊ तितकी आपण यशस्वी होण्याची शक्यता जास्त! म्हणून तिने बेधडक पासवर्ड - password असा वापरला आणि तो चक्क ग्राह्य ठरला. आलोकला या अनुभवानंतर प्रज्ञा आणि कुणाल जे काही करत आहेत त्यात तथ्य आहे असे वाटू लागले. डाटाबेस शोधताना त्यांची कार्यप्रणाली अशी होती
डाटाबेस अॅक्सेस करताना विशिष्ट वेळातल्या एंट्रीज चेक करणे. जॉनीला सलाईन लावायची गरज पडू शकते त्यामुळे ते इक्विपमेंट घेऊन जायची रिक्वेस्ट असणार कारण अर्थात रसूल जॉनीला हॉस्पिटलमध्ये दाखल नाही करणार. म्हणजेच जॉनी एखाद्या घरात/अपार्टमेंटमध्ये हॉस्पिटलाईज झाला असणार आणि बहुतांश उपकरणे तात्पुरती तरी बाहेर नेली गेली असणार.
"प्रज्ञा पण हे सर्व एखाद्या सीनियर डॉक्टरच्या ऑथोराईजेशन शिवाय शक्य नाही. ते सुद्धा खरे तर रिस्की आहे. तो डॉक्टर असे का करेल ना? म्हणजे शक्यतो सगळे सभ्य लोकं या भाईगिरी इ. गोष्टींपासून दूरच राहण्याचा प्रयत्न करतात. आय मीन तू एखादे प्रायव्हेट हॉस्पिटल का चेक करत नाहीस?"
"नाही. मला रिपोर्टरने जेवढे काही किलरबद्दल सांगितले आहे त्यानुसार किलर कधीच जॉनीसाठी प्रायव्हेट डॉक्टर बघणार नाही. कारण सगळे तेच करतील मग अनपेक्षित मूव्ह कशी काय होईल? आपण अनेकदा ऑब्व्हियस दुर्लक्षित करतो कारण ते अपेक्षित असते. इथेच किलर अनेकदा सर्वांना मात देऊन जातो."
"हम्म..... एक मिनिट! हे कसे शक्य आहे?"
"काय झालं?"
"ही एंट्री.....हा अगं या अल्बर्टला मी ओळखतो. तो माझाच कलिग आहे. बरं झालं सर्च फिल्टर आपण काढला तात्पुरता नाहीतर हा झोल दिसलाच नसता. अल्बर्ट आणि रेश्मा या सर्जरीवर असणे अपेक्षित होते पण दोघांनाही काहीतरी दुसरी सर्जरी आली म्हणून मी डॉ. सायरसना असिस्ट केले. पण अल्बर्ट या वेळेत अजूनही एंगेज दिसतो आहे. म्हणजे त्याने ती सर्जरी अटेंड केली आणि रेश्माने आणि मी सुद्धा. रिडिक्युलस!! ती सर्जरी म्हणजे अगदी साधं ऑपरेशन होतं. त्याला एक डॉक्टर सायरस सरांना पुरेसा झाला. वर ट्रेनी आणि नर्स पण होत्याच की!!"
"त्या अल्बर्टने काही चेकआऊट केलं होतं का बघ! अॅम्ब्युलन्स तर करावीच लागेल त्याला. त्याचं रेकॉर्ड पाहिजेच!"
"हो केली आहे त्याने. शिट कोणी या रेकॉर्ड्स कडे लक्ष का देत नाही?"
"त्यांचा दोष नाही आहे आलोक. हे जगच पूर्णपणे बदलले आहे." कुणालने पुस्ती जोडली.
"त्याला परमिशन कोणी दिली बघ! त्याने बरंच सामान नेलेले दिसत आहे. सॉरी आलोक पण लूक्स लाईक युअर कलिग्ज आर इनव्हॉल्व्ह्ड!"
आलोकने थरथरत्या हाताने स्क्रोल करून ते नाव बघितले आणि ते तिघेही शॉकमध्ये गेले.
*****************
दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी बरोबर ७ वाजता हॅन्सला न्यायला ते गृहस्थ आले. सिस्टर मिरियाने त्यांचे स्वागत केले.
"सॉरी सिस्टर क्लेअर काल रात्रीपासून कुठे दिसल्या नाही आहेत त्यामुळे इथे जरा धांदल आहेच. पण सिस्टरने मला काल रात्रीच सांगून ठेवले होते कि ड्यु टू द नेचर ऑफ युअर रिक्वेस्ट आम्ही काही कागदपत्री नोंद ठेवत नाही आहोत. आय पर्सनली डू नॉट रिकमेंड धिस, गॉड फरगिव्ह बोथ ऑफ यू पण आय कॅन अंडरस्टँड! ओन्ली धिस टाईम वी आर मेकिंग अॅन एक्सेप्शन. जर तुम्ही लवकर हॅन्सला घेऊन गेलात तर बरे होईल म्हणजे मी या गडबडीकडे लक्ष द्यायला मोकळी होईन."
"ओह प्लीज. मला फक्त एका ठिकाणी सही करावी लागेल असं क्लेअर म्हणाल्या होत्या."
"होय, इथे. हॅन्स, काँग्रॅच्युलेशन्स! यू आर नो लाँगर होमलेस!"
हॅन्सच्या चेहर्यावर एक निरागस हसू होते. कालचा हॅन्स आतमध्ये कुठेतरी दडवला गेला होता.
..................
..................
सिस्टर क्लेअर जंगलात तशीच एका झाडाला टेकून पडली होती. अॅग्नेसचे प्रेत आता जंगलभर विखुरले होते. क्लेअरच्या कानात हॅन्स जाता जाता म्हणाला "थँक्स फॉर द सिम्पथी ऑन द डे वन ऑफ अवर अॅक्वेंटन्स. इट इज रिटर्न गिफ्ट फ्रॉम मी फॉर दॅट - युवर लाईफ!!"
(सिस्टर क्लेअर हॅन्स गेल्यानंतर जवळ जवळ १२ तासांनी सापडली. कोणी जंगलात जायला तयार नसल्याने आणि पोलिस उशीरा आल्याने इतका वेळ लागला. जेव्हा ती सापडली तेव्हा तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. अॅग्नेसचा खून झाल्याचेही निष्पन्न झाले पण तो खूनी कधीच सापडला नाही. नंतर ती केस बंद झाली, सेंट मोनिकाज हाऊस फॉर होमलेस पूर्ववत चालू लागले व मिरियाने क्लेअरची जागा घेतली. क्लेअर त्या दिवसानंतर कधीच बोलू शकली नाही. एका जिवंत प्रेताप्रमाणे तिने तिची उरली सुरली वर्षे काढली. मे हर सोल रेस्ट इन पीस!)
..................
..................
हॅन्स मुंबईत आल्यानंतर त्या सधन कुटुंबाचा एकुलता एक वारस म्हणून लाडात वाढला. त्याचे शिक्षण सर्वोत्तम संस्थांमध्ये झाले. शास्त्राची आवड असल्याने तो शास्त्र शाखेत जाणार हे निश्चित होतेच. नंतर त्याचा रस वैद्यकशास्त्रात व त्यातही सर्जरी, न्युरोसायन्समध्ये वाढला. मूळात हुशार असल्याने तो खूप लवकर लवकर पुढे सरकला. या दरम्यान त्याचा काहीसा ग्रामीण अवतारही सुधारला. त्याचा चेहरा नैसर्गिक आकर्षक होता तो अजून खुलून आला.
अशा रीतिने कुठल्यातरी अनामिक गावात झालेल्या हत्याकांडातून वाचलेला एकमेव मुलगा, जंगलात रानटी प्राण्यांमध्ये राहून जंगली बालपण जगलेला मुलगा, हैदराबादमध्ये आल्यानंतर मानवी मांसाची चटक लागलेला, सेंट मोनिकाज हाऊस ऑफ होमलेसचा हॅन्स आणि अॅग्नेसचा बेपत्ता खूनी पुढे जाऊन एक नामांकित सर्जन बनला पण त्याच बरोबर आपली आवड भागवण्यासाठी एक नृशंस खूनी देखील!
हॅन्सला दत्तक घेणार्या व्यक्तिचे नाव होते होमी दावर. त्यांना जेव्हा मुलगा झाला तेव्हा त्यांना आपल्या आयुष्यात नवीन पहाट झाली, एक नवी सुरुवात झाली म्हणून एका पराक्रमी पारशी राजाचे नाव (आणि सूर्याचे देखील) त्यांनी आपल्या मुलाचे ठेवले होते. हॅन्सही त्याच नावाने ओळखला गेला. ते होते.............
..............................................................................
आलोकने पुन्हा एकदा सावकाश ते नाव वाचले
डॉ. सायरस दावर!!!!!!!
~*~*~*~*~*~
गोरो आणि इलेगुआ पुढे बोलू लागले
"मग हा गेनासेयरा म्हणजे नक्की कोण होता? त्याला नाव का नव्हते? [१]"
"कोणाला माहित? गेनासेयराने स्वतः युरुगुचे पुस्तक पहिल्यांदा बनवले का हे सुद्धा मला माहित नाही. मी गेनासेयराच्या पुस्तकाची सैर केली. त्याचे पुस्तक माझ्या पुस्तकाच्या मानाने फार नीरस आहे. गेनासेयराला नवीन लेखक शोधण्यात जास्त रस आहे त्यामुळे तो नवीन लेखक शोधत राहतो जे युरुगुचे पुस्तक बनवतील. त्यामुळे कदाचित तो स्वतःच्या पुस्तकावर मेहनत घेत नसेल. असो पण पुस्तक बनवण्यासाठी मी बरेच काही केले पण एक मुख्य क्रियेवर माझे गाडे अडले. युरुगु जसा अम्माचा नावडता तसे यासिगी अम्माची आवडती! त्यामुळे शक्याशक्यता अगदी समान करण्यासाठी एक आवडता एक नावडता पाहिजे. मुळात एक मुलगी पाहिजे होती जी यासिगीची उपासक असेल."
" इलेलगी " गोरो उद्गारला!
*****
गोरो आजची शिकार घेऊन कबिल्यात परत आला. त्याचे शरीर आता चांगलेच बलदंड दिसू लागले होते. राजाही आता त्याच्यावर खुश राहू लागला होता. गोरोची आई या सगळ्यामुळे हरखून गेली होती आणि का नाही जाणार? अखेरीस तिची प्रतिष्ठा वाढली होती, राजा परत तिच्याकडे येऊ लागला होता. गोरोच्या मनात मात्र कोणत्याही गैरसमजूती नव्हत्या. तो आपले बालपण विसरला नव्हता. केवळ आणि केवळ इलेगुआने युरुगुची निवड केल्यामुळे हे शक्य झाले होते. राजाचे त्याच्यावर किंवा त्याच्या आईवर प्रेम होते अशातला भाग नव्हता. त्याला फक्त आपल्यानंतर हा कबिला आपल्याच कोणा मुलाच्या ताब्यात रहावा एवढीच इच्छा होती. जर गोरो नसता तर त्याने दुसर्या मुलासाठी प्रयत्न केले असते. या विचारांच्या धुंदीत अचानक गोरोचे इलेलगीकडे लक्ष गेले. त्यांची नजरानजर होताच गोरोने स्मित केले. इलेलगीने लाजून तोंड वळवले आणि ती गोरोच्या नजरेआड गेली. गोरोला आपल्या प्रतिक्रियेचे नवल वाटले पण तो आणि इलेलगी आता पूर्वीपेक्षा बरेच जवळ आले होते. इलेलगीची आईदेखील आता गोरो व गोरोच्या आईशी जुळवून घेऊ लागली होती.
इलेलगीला अजूनही तो दिवस आठवत होता जेव्हा तिच्या आईने गोरोशी जवळीक वाढवण्याचे काम लादले होते. आधी इलेलगी काहीशा अनिच्छेनेच हे काम करत असे. आता मात्र ती गोरोकडे आकर्षित होऊ लागली होती. तिच्या वयानुसार स्त्रीसुलभ आकर्षण वाटणे स्वाभाविक होते, कबिल्याच्या मानाने काहीसा उशीरच झाला होता. इलेलगीच्या आईच्या मते मात्र गोरोशिवाय दुसरा कोणी पुरुष जर इलेलगीने निवडला तर तिला एखाद्या सामान्य स्त्रीप्रमाणे जगायला लागण्याची शक्यता होती. गोरोला पण इलेलगी हळू हळू आवडायला लागली होती.
............
"हे हे एक मिनिट. आपली स्टोरी लव्हस्टोरी नाहीये. आणि आपल्या फ्लॅशबॅकमध्ये एवढा वेळ नाहीये. नेक्स्ट नेक्स्ट! एडिट धिस पार्ट!"
"इलेगुआ, एडिट म्हणजे काय रे?"
"एडिट खूप क्लिष्ट गोष्ट आहे रे. तुला कसं समजवू? असं समज तुला नको असलेला भाग काढून टाकता येतो."
"मग तू जे काही केलंस या मधल्या काळात ते तुला काढून टाकावसं वाटलं नाही"
................................
इलेगुआकडे काहीच उत्तर नव्हते.
.................................
.................................
जेव्हा दिवस शांततेचे असतात तेव्हा कधी कळत नाही कि दिवस कसे निघून जातात. गोरो आणि इलेलगीचे प्रेम एकीकडे फुलत होते दुसरीकडे राजा दिवसेंदिवस म्हातारा होत चालला होता. लवकरच गोरोच्या खांद्यावर जबाबदारी सोपवून राजाला निवृत्ती स्वीकारायची होती. होता होता गोरो आणि इलेलगीचे लग्न लावून द्यायचे नक्की झाले. तेवढ्यात एक अशी बातमी आली जिच्यामुळे गोरोला हे लग्न पुढे ढकलावेच लागले.
गोरोला त्याच्या कबिल्यातर्फे एक छोटीशी तुकडी घेऊन इतर कबिल्यांच्या मदतीला जायचे होते. कोल्ह्याची कातडी पांघरणार्या एका नव्याच कबिल्याचा उदय झाला होता. आधी सर्वांनी तिच्याकडे अफवा म्हणून दुर्लक्ष केले पण जेव्हा मुडदे पडायला सुरुवात झाली तेव्हा या नव्या लोकांची दखल घेणे भाग होते. कोल्हा म्हणजे युरुगुचे प्रतिक! मग कोणी जुने, नामशेष झालेले युरुगुचे उपासक परत आले कि काय? या शंकेमुळे आसपासचे सर्व कबिले एकत्र येऊन या आपत्तीचा एकदाच सोक्षामोक्ष लावायचे ठरवले गेले.
"तू किती दिवसात येशील?" इलेलगीने गोरोच्या हातात त्याचे मक्रक देत देत विचारले.
गोरोने तिला जवळ ओढले. काही क्षण ते दोघे एकमेकांकडे बघतच राहिले. गोरोने तिचे एक दीर्घ चुंबन घेतले आणि बोलला
"लवकरच!"
"मी वाट बघेन."
******
गोरो आणि त्याच्या बरोबरचे लढवय्ये निघून गेल्यानंतर त्या कबिल्यात फारसे कोणी लढाईस सक्षम असे उरले नव्हते. सर्व कबिले लढत आहेत म्हटल्यावर कोण हल्ला करणार असा विचार प्रत्येकानेच केला होता. अशा वेळी अनपेक्षित शत्रु निर्माण झाला तर काय होईल याचा विचार न केल्याची भीषण किंमत त्यांना चुकवावी लागणार होती.
एका मोक्याच्या जागी उभा राहून इलेगुआ आपल्याच कबिल्याचे निरीक्षण करत होता. शेजारच्या एका झाडावर गेनासेयरा पाय गुडघ्यात मुडपून बसला होता. इलेगुआने आपली पाहणी पूर्ण झाल्यावर त्याला विचारले
"तू लढाईत नक्की भाग नाही घेणार?"
गेनासेयरा हसला. "नाही. मी लढाई वगैरेच्या फंदात पडत नाही. खूप मेहनत लागते त्याला. मी शांततापूर्ण जीवनात विश्वास ठेवतो. त्यामुळे उगाच मारामारी, कापाकापी.... जाऊ दे. तू कर तुझे काम."
"इतके अयशस्वी प्रयोग करणारा असं बोलतो आहे. छान!"
"हे, ते प्रयोग होते. तू लढाई करतो आहेस. तिथे वाचण्याची शक्यता होती इथे नाही आहे."
इलेगुआने मान डोलाविली. त्याच्यामागे कोल्हाचे कातडे पांघरलेले असंख्यजण उभे होते.
"यांच्याकडे लढाऊ सेना नाही त्यामुळे विजय आपलाच आहे. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही लढू शकता, हवे त्याला कापू शकता; इलेलगी सोडून. इलेलगी मला हवी आहे, जिवंत!! समजलं? छान! आक्रमण!!"
*******
गोरो जेव्हा परतला तेव्हा आपल्या कबिल्याची धूळधाण उडालेली पाहून तो हबकून बघतच राहिला. त्यांच्या कबिल्यावर या कोल्ह्या वाल्यांनी आधी कधीच हल्ला केला नव्हता. त्याने जी आघाडी सांभाळली तिथे त्याने अनेक कोल्ह्यांना ठार केले पण पिछाडीवर असा हल्ला होईल अशी अपेक्षा त्याने कधीच केली नव्हती. त्याची आई त्याला दिसली. ती रडत बसली होती आणि तिच्या शेजारी एक भयानक दृश्य होते.
"कोण होतं?"
"इलेगुआ!" गोरोची आई रडत रडत म्हणाली.
*******
"इलेगुआ मला आधीच समजायला हवं होतं कि या युरुगु आणि कोल्ह्यांच्या मागे तूच असला पाहिजे." राजा त्वेषाने म्हणाला.
इलेगुआला आता त्याच्या रागाची किंवा कशाचीच पर्वा नव्हती. त्याला स्वतःला फक्त इलेलगीची गरज होती. तो हे अतिरिक्त रक्त का सांडवत होता त्याचे त्यालाच कळत नव्हते. पण कधी कधी भावना अनावर होतात आणि .........
इलेगुआने आपल्या हातातील भाल्याचे टोक राजाच्या खालच्या जबड्यातून आत घुसवले. तिथून ते कपाळातून बाहेर आले. तो इतक्यावर थांबला नाही. त्याने तसेच भाल्यावर ते शरीर पेलले आणि तो भाला हातात उंचावून त्याने एक विजयफेरी मारली. जाताना तो भाला तसाच तो जमिनीत रोवून गेला.
*******
गोरोने कधीच आपल्या वडिलांविषयी आत्मीयता दाखवली नव्हती. दाखवण्यापुरती अर्थात तो प्रदर्शित करत असे पण सर्वांना माहित होते कि गोरोचे आपल्या वडिलांवर खरे प्रेम नाही. तरीदेखील त्याला त्यांची ही अवस्था पाहून वाईट वाटले. इलेगुआचा सात्विक संतापही आला पण त्याने मोठ्या मुश्किलीने संताप आवरला. अखेर आधी कबिल्याला पूर्वपदावर आणणे आवश्यक होते. अचानक त्याला आठवण झाली
"इलेलगी कुठे आहे?"
त्याला एक आणखी हुंदका ऐकू आला. ती त्याची सावत्र आई, इलेलगीची सख्खी आई होती.
"गोरो" तिचे रडणे थांबतच नव्हते.
"इलेगुआ, इलेगुआ... इलेगुआ इलेलगीला घेऊन गेला."
हे ऐकल्यावर गोरोच्या कानाच्या पाळ्या तापल्या. नाही इलेगुआ तू एकाच वेळी माझ्याकडून दोन-दोन माणसे हिरावून घेऊ शकत नाहीस. नाही.... नाही...... नाही!!!!!!!! गोरो सर्व जोर लावून ओरडला.
"इलेगुआऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ"
इलेगुआला देखील जणू जाणीव झाली. त्याने गेनासेयराकडे पाहिले. गेनासेयराने मान डोलाविली.
"होय तो येतोय!!"
~*~*~*~*~*~
क्रमशः
टीप :
[१] गेनासायेरा - असे नाव नसते. मी डोगोन लोकांच्या भाषेतून नाही आणि नाव या अर्थाचे शब्द घेऊन हे नाव तयार केले आहे. थोडक्यात गेनासायेराचा अर्थ होईल नाव नसलेला, अनामिक - म्हणून गोरो तसा प्रश्न विचारतो. अडूर्नो = जग हा शब्दही तिकडूनच घेतला आहे पण पपायरसची बॅकग्राऊंड पूर्णतः काल्पनिक आहे.
संदर्भ - http://dogonlanguages.org/docs/Jamsay_vocab.pdf
२) ऑयकर - हा पण पत्त्यांचा एक खेळ असतो. असे म्हणतात कि 'जोकर'चा अंतर्भाव करणारा हा पत्त्यांचा पहिला खेळ होता त्यापूर्वी पत्त्यांमध्ये जोकर नसायचा. थोडा फार ब्रिजसारखा असतो पण ब्रिज जास्ती लॉजिकने खेळायचा गेम आहे, ऑयकरमध्ये त्यामानाने लकला अधिक महत्त्वाचे स्थान आहे.
पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/56946
मी पैली लयच गुंतागुंत
मी पैली
लयच गुंतागुंत
अरे बापरे.. सांग आता शेवटचा
अरे बापरे..
सांग आता शेवटचा भाग कधी कारण परत एकदा न थांबता पहिलेपासुन वाचायची आहे..
हा भाग मस्तच..
सायरस बद्दल सांगण्याआधीच शक गेला होता...
मज्जा आली
धन्यवाद सांग आता शेवटचा भाग
धन्यवाद
सांग आता शेवटचा भाग कधी >> असं कसं सांगू? पण अजून जास्तीत जास्त ५ भागात ही मालिका आटोपणार आहे. सध्यातरी विचार असा आहे कि गणपतीबाप्पांबरोबर या कथेला निरोप देऊ या म्हणजे पुढच्या महिनाअखेरीस कधीतरी संपवू या पण सध्या मी कुठलेच प्रॉमिस करणार नाही.
लयच गुंतागुंत >> दुसरं या कथेत आहेच काय? एक काम करतो पुढच्या भागाच्या आधी मागे एकदा दिला होता तसा आढावा/रिकॅप/(आतापर्यंत आपण काय वाचलेत) देतो मग जरा बरं पडेल. मी आज सलग जेवढी आहे तेवढी वाचून पाहिली तर कळत आहे असं वाटलं. असो, चांगली वाटत आहे ना? गुंतागुंत संपली आता, हे फ्लॅशबॅक सगळी गुंतागुंत सोडवायलाच तर आहेत. आता फक्त अॅक्शन - युरुगुच्या पुस्तकाच्या आत!!
मस्त रे! थँक्स, पायस
मस्त रे! थँक्स, पायस
mast.....
mast.....
भारि है बोस
भारि है बोस
मस्त! खरचं रिकॅप द्या..
मस्त!
खरचं रिकॅप द्या.. खुप दिवसाच्या गॅप मुळे समजायला कठीण जातं.
Mala ek pransn padala
Mala ek pransn padala ahe...jar goro ani Elegua rajache mula ahe ani Elelagi Elegua chi Sister ahe tar ti goro chi pan sister asanar...mag goro ani tich lagn kasa shakat?
'एक वाचनवेडा ते सावत्र आहेत
'एक वाचनवेडा
ते सावत्र आहेत बहुधा.
बाकी पुढील भागाच्या प्रतीक्षेत
हे डोक्याला फार त्रास देणारे
हे डोक्याला फार त्रास देणारे आहे. भुंगे लागतात.
लव्कर पुढचा भाग लिहा
ते सावत्र आहेत बहुधा. >> होय
ते सावत्र आहेत बहुधा. >> होय ते सावत्र आहेत. तसेही लक्षात आले असेलच कि त्यांच्या सांस्कृतिक प्रथा आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत त्यामुळे ते भाऊ-बहिण, आई-वडिल-मुलगा या नात्यांशी भावनिक दृष्ट्या तितके बांधले गेलेले नाहीत.
हे डोक्याला फार त्रास देणारे आहे. >> म्हणूनच लिहायला वेळ लागतो ना! मी एकदा लिहिले कि कथानकाची ट्री डायग्रॅम बनवलेली आहे तिच्याशी ताडून बघतो. नवीन भाग लिहिला कि या आकृतीत नवीन ब्रांचेस वाढतात आणि मग प्रत्येक बदल तार्किक दृष्ट्या सुसंगत आहे का ते बघणे आलेच!
ऑके....पुढील भाग लवकर येवु
ऑके....पुढील भाग लवकर येवु द्या...
अरे पायस, आधीच कथा
अरे पायस, आधीच कथा गुंतागुंतीची त्यात तुम्ही इतका वेळ लावताय. पुढचा भाग टाका लवकर.
?????????????????????????
?????????????????????????
पुढच्या भागाची वाट बघताना
पुढच्या भागाची वाट बघताना सगळे भाग परत वाचले तेव्हा एक शंका आली
अनिरुद्ध चा मृत्यु पुस्तक वाचल्याने झाला असला तरी तो किल्ल्यावर चाबी गाडीलाच ठेऊन काय करायला गेला होता
बाय द वे पुढचा भाग कधी.
¿¿¿¿¿¿¿¿
¿¿¿¿¿¿¿¿