एका झुकिनीचे साधारण तीन पेर लांबीचे तीन तुकडे होतील एवढ्या लांबीच्या तीन झुकिनी.
मसाल्यासाठी: १ वाटी बेसन, १ वाटी भाजलेल्या दाण्यांचा कूट, १ चमचा तीळ, २ डाव तेल, मीठ, कोथिंबीर, प्रत्येकी अर्धा मसाल्याचा चमचा: तिखट, गरम मसाला, धणेजिरे पूड (ऐच्छिक), आमचूर पावडर किंवा चाट मसाला किंवा लिंबाचा रस (ऐच्छिक).
बेसन थोड्या तेलावर भाजून घ्यावे. त्यात मसाल्यासाठी सांगितलेले इतर साहित्य घालून सगळा मसाला नीट हलवून घ्यावा. कोरडा वाटत असेल तर तेल घालावे. तेल घालण्याचा धीर होत नसल्यास पाण्याचा हात लावावा.
स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या झुकिनीचे सारख्या लांबीचे प्रत्येकी तीन तुकडे करावेत. त्यातला गर काढून टाकावा. हा पदार्थ ज्या व्यक्तीनं पहिल्यांदा बनवला त्याच व्यक्तीनं आपला तो हा शब्द अस्तित्वात आणला असावा अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे.
झुकिनीच्या तुकड्यांना पाणी सुटतं. ते पुसून घ्यावं आणि अफजलखानाला तोफेच्या तोंडी द्यायचं आहे अशा आवेशात एकेका तुकड्यात मसाला ठासून भरावा.
पसरट कढईत किंवा पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात हे तुकडे सोडावेत. (झुकिनीच्या) पाठी सगळ्या बाजूंनी छान खरपूस भाजून/तळून घ्याव्यात.
पाठी शेकल्यावर सगळे तुकडे उभे करून बुडं (झुकिनीची) शेकावीत.
उरलेला मसाला भाजीवर भुरभुरवून, कढई/पॅनवर झाकण ठेवून मंSSSद आचेवर भाजी शिजू द्यावी. आवडत असल्यास तीळ पण घालावेत. तो मसाला पण छान खरपूस होतो.
पोळीसोबतच चांगली लागते ही भाजी.
_मसाल्यात तेल जेवढं जास्त असेल तेवढी भाजी चविष्ट लागते.
_भारतात हडाळ (बहुतेक भाजून घेऊन) दळून आणलेलं जे बेसन असतं ते भाजलं नाही तरी कच्चट लागत नाही. इथे मिळणारं मात्र कच्च लागतं म्हणून भाजून घ्यावंच
_मीठ आपल्या चवीनं घालावं, न जमल्यास टीनाला विचारावं
_बेसन आणि दाण्याच्या कुटाऐवजी बेसन+तिळाचा कूट पण चालेल
_भारतात राहाणार्यांनी 'हमारे पास मां है, घोसाळी है, पिछले आंगन मे घोसाळे का वेल भी है...' म्हणत अशीच भाजी घोसाळ्यांची करावी
bharli ghosali recipe marathi
जबरी! फोटो तोपासु!
जबरी!
फोटो तोपासु!
<<हा पदार्थ ज्या व्यक्तीनं
<<हा पदार्थ ज्या व्यक्तीनं पहिल्यांदा बनवला त्याच व्यक्तीनं आपला तो हा शब्द पहिल्यांदा अस्तित्वात आणला असावा अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे. >>
मस्त दिसतेय भाजी .. आपला तो
मस्त दिसतेय भाजी ..
आपला तो हा शब्द >>
भारी! शेवटचा फटू कातील आहे.
भारी!
शेवटचा फटू कातील आहे. रच्याकने यात लसूण नाही, तर... असोच!
आपला तो हा शब्द
फोटो सुंदर दिसतोय अगदी!!!
फोटो सुंदर दिसतोय अगदी!!!
आम्ही पडवळ भरू.
मस्त यम्मी दिसतंय. घोसाळे
मस्त यम्मी दिसतंय.
घोसाळे वापरुन करायला हवे.
भारी दिसतेय भाजी! झुकीनी
भारी दिसतेय भाजी! झुकीनी आवडती भाजी आहे
हमारे पास मां है, घोसाळी है,
हमारे पास मां है, घोसाळी है, पिछले आंगन मे घोसाळे का वेल भी है...' वगैरे म्हणत हीच भाजी घोसाळ्यांची करावी>> यप्प
हीच भाजी घोसाळ्यांची करावी <<
हीच भाजी घोसाळ्यांची करावी <<
इतके तेल तीळ कूट खाल्ल्यावर
इतके तेल तीळ कूट खाल्ल्यावर नंतर पंध्रा दिवस तेलच खाउ नये
भारतात राहाणार्यांनी 'हमारे
भारतात राहाणार्यांनी 'हमारे पास मां है, घोसाळी है, पिछले आंगन मे घोसाळे का वेल भी है...' वगैरे म्हणत हीच भाजी घोसाळ्यांची करावी
>> झुकिनी घरपोच मिळते हो आजकाल. बिगबास्केट्.कॉम.
यम्मी. खूप छान खमंग दिसतेय
यम्मी. खूप छान खमंग दिसतेय भाजी.
छान पाकृ! पडवळ, घोसाळी
छान पाकृ! पडवळ, घोसाळी वापरूनही छान लागेल असं वाटतंय.
<<अफजलखानाला तोफेच्या तोंडी द्यायचं आहे अशा आवेशात एकेका तुकड्यात मसाला ठासून भरावा.>> येथे मी या झुकिनीच्या तयार तोफा शेवटी कोणावर तरी डागल्याची कल्पना करून हसून घेतलं!
थोडस रवाळ डा.पीठ मिळत पटेल
थोडस रवाळ डा.पीठ मिळत पटेल बंधुंकडे ते नाही भाजलं तरी चालतं.
दाण्याचा कुट,थोडे सुके खोबरे,भरपुर कोथींबीर, किसलेला/ठेचलेला लसुण, गुळ, कच्चे तेल, मिठ हे मिश्रण भरुन पण घोसाळी मस्त खमंग लागतात. झटपट ही होतात.
झुकिनीत भरुन बघायला हवे एकदा
खुपच छान रेसिपी! फोटो पण
खुपच छान रेसिपी! फोटो पण सुंदर. करुन बघितले पाहिजे.
थँक्यु थँक्यु अकु, अमा,
थँक्यु थँक्यु
अकु,
अमा, मुद्दा तो नाही हो. मूळ कृती भरल्या घोसाळ्यांची आहे आणि घोसाळ्याचीच भाजी जास्त चांगली लागते. इथे घोसाळी मिळत नाहीत, भारतात मिळतात तर खावीत की.
वॉव मस्त दिसतेय भाजी !!
वॉव मस्त दिसतेय भाजी !!
फोटो कातिल!
फोटो कातिल!
डागलेल्या तोफा भारी
डागलेल्या तोफा भारी दिसतातयत!
गूढकथेमधे भरली झुकिनी हे नाव असलेला पदार्थ त्या बंगल्याच्या विक्षिप्त मृत मालकाला फार आवडत असे असं लिहून टाकता येईल.
" साक्षातचा विक्षिप्तपणा दिवसेंदिवस वाढत चालला होता. आत्ता अपरात्री सव्वा दोनला उठून स्वयंपाकघरात चोरून भरली झुकिनी करताना त्याला पाहून श्वेताच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला."
(No subject)
आशुडी भाजी छान. फोटो मस्त.
आशुडी
भाजी छान. फोटो मस्त. फोटोग्राफीचा क्लास बिस लावला की काय?
मी आजवर झुकिनीची भाजी वगैरे कधीच केलेली नाही. भजी आणि पास्त्यातच पडते नेहमी.
भरली झुकिनी वैदर्भिय पद्धतीने
भरली झुकिनी वैदर्भिय पद्धतीने बनवलेली असली तरी तसे न लिहिल्याने मी रेसिपी वाचणार नाही
आशुडी, वैदर्भिय पद्धतीने
आशुडी,
वैदर्भिय पद्धतीने बनवलेली असली >>>> हे असं लिहून तुम्ही विळदी अस्मितेला कचर्याचा डबा दाखवलात की
सायो, अगं ओट्याचा एक कोपरा आहे तिथे नॅचरल लाइटमुळे कशाचेही फोटो छान येतात
अरेच्च्या असं झालं होय मला
अरेच्च्या असं झालं होय मला वाटलं आप्ला घाट कात्रजचा घाट
असली भरली पडवळ आवडतात.
असली भरली पडवळ आवडतात. झुकीनीला तोफेच्या का तोफेला झुकीनीच्या तोंडी लावायला देऊ आता.
झुकिनी ? घोसाळे ? मला
झुकिनी ?
घोसाळे ?
मला दुसर्या ग्रहावर आल्याच फिलींग येतेयं .. अरे कोई है................................
फोटो जबरी आलेयत..
गिलकी म्हैतायत का?
गिलकी म्हैतायत का?
नै.. फोटोवरुन कळेल ..
नै..
फोटोवरुन कळेल ..
भारी! तिळाचं कूट करून घेत
भारी!
तिळाचं कूट करून घेत नाही का?
आम्हाला लसूण लागेल. लाडात आलो तर कांदाही.
मस्तं पाककृती! भारी लिहिलिय.
मस्तं पाककृती! भारी लिहिलिय. फोटोतर सुपर कातिल! शेवटला फोटो जानलेवा लेव्हलचा आहे.
आपले ते हे पोखरून भरले तर बरे लागतील का?
Pages