
एका झुकिनीचे साधारण तीन पेर लांबीचे तीन तुकडे होतील एवढ्या लांबीच्या तीन झुकिनी.
मसाल्यासाठी: १ वाटी बेसन, १ वाटी भाजलेल्या दाण्यांचा कूट, १ चमचा तीळ, २ डाव तेल, मीठ, कोथिंबीर, प्रत्येकी अर्धा मसाल्याचा चमचा: तिखट, गरम मसाला, धणेजिरे पूड (ऐच्छिक), आमचूर पावडर किंवा चाट मसाला किंवा लिंबाचा रस (ऐच्छिक).
बेसन थोड्या तेलावर भाजून घ्यावे. त्यात मसाल्यासाठी सांगितलेले इतर साहित्य घालून सगळा मसाला नीट हलवून घ्यावा. कोरडा वाटत असेल तर तेल घालावे. तेल घालण्याचा धीर होत नसल्यास पाण्याचा हात लावावा.
स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या झुकिनीचे सारख्या लांबीचे प्रत्येकी तीन तुकडे करावेत. त्यातला गर काढून टाकावा. हा पदार्थ ज्या व्यक्तीनं पहिल्यांदा बनवला त्याच व्यक्तीनं आपला तो हा शब्द अस्तित्वात आणला असावा अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे.
झुकिनीच्या तुकड्यांना पाणी सुटतं. ते पुसून घ्यावं आणि अफजलखानाला तोफेच्या तोंडी द्यायचं आहे अशा आवेशात एकेका तुकड्यात मसाला ठासून भरावा.
पसरट कढईत किंवा पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात हे तुकडे सोडावेत. (झुकिनीच्या) पाठी सगळ्या बाजूंनी छान खरपूस भाजून/तळून घ्याव्यात.
पाठी शेकल्यावर सगळे तुकडे उभे करून बुडं (झुकिनीची) शेकावीत.
उरलेला मसाला भाजीवर भुरभुरवून, कढई/पॅनवर झाकण ठेवून मंSSSद आचेवर भाजी शिजू द्यावी. आवडत असल्यास तीळ पण घालावेत. तो मसाला पण छान खरपूस होतो.
पोळीसोबतच चांगली लागते ही भाजी.
_मसाल्यात तेल जेवढं जास्त असेल तेवढी भाजी चविष्ट लागते.
_भारतात हडाळ (बहुतेक भाजून घेऊन) दळून आणलेलं जे बेसन असतं ते भाजलं नाही तरी कच्चट लागत नाही. इथे मिळणारं मात्र कच्च लागतं म्हणून भाजून घ्यावंच
_मीठ आपल्या चवीनं घालावं, न जमल्यास टीनाला विचारावं
_बेसन आणि दाण्याच्या कुटाऐवजी बेसन+तिळाचा कूट पण चालेल
_भारतात राहाणार्यांनी 'हमारे पास मां है, घोसाळी है, पिछले आंगन मे घोसाळे का वेल भी है...' म्हणत अशीच भाजी घोसाळ्यांची करावी
bharli ghosali recipe marathi
मस्त फोटो.
मस्त फोटो.
मस्त फोटो प्राजक्ता.
मस्त फोटो प्राजक्ता.
मस्त पाक -कृती. भारी लिखाण
मस्त पाक -कृती. भारी लिखाण आणि फोटो. आमच्याकडे मी सोडून कुणालाच (म्हणजे नवऱ्याला!) घोसावळे आवडत नाहीत. भरली घोसावळी अश्या पद्धतीने करून पाहीन.
Pages