१. जाता सातार्याला . . . . .
२. "कास"ची फुलं "झक्कास"
३.रौद्र सौंदर्य - ठोसेघर धबधबा
४. "Mesmerizing" महाबळेश्वर
प्रचि ०१
वाई येथील प्रसिद्ध ढोल्या गणपती मंदिर
प्रचि ०२
वाईहुन मेणवलीकडे जाताना
प्रचि ०३
मेणवली येथील नानासाहेब फडणवीसांचा वाडा
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
वाड्यासमोरचा गणपती
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
कृष्णा नदीच्या काठावर मेणवली येथे बांधलेला घाट. (स्वदेस, सिंघम, बोल बच्चन सिनेमा आठवला का?)
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
कृष्णा माई
प्रचि १६
प्रचि १७मेणवली घाटाचे विहंगावलोकन. युट्युबवर एकाने प्रदर्शित केलेला सुंदर व्हिडियो
Menavali Ghat Video By Impressive Creation Wai
प्रचि १८
मेणवलीतुन दिसणारा "पांडवगड"
प्रचि १९
प्रचि २०धोम गावातील अतिशय सुंदर, प्राचिन असे श्री नृसिंहाचे मंदिर.
मंदिरात दगडी कमळाच्या मधोमध असलेल्या कासवाच्या पाठीवर नंदी विराजमान आहेत. इतकी सुंदर कलाकृती मी आजवर पाहिली नाही. पण मंदिरात प्रचंड गर्दी असल्याने फोटो नीटसे काढता आले नाही (कसलासा धार्मिक कार्यक्रम चालु होता).
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
एकाच खांबावर असलेले (चारही बाजुला चार आणि वर एक ) हे पाच चेहरे.
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३धोम धरण
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
जिप्सी भाऊ मस्त आलेत फोटो.
जिप्सी भाऊ मस्त आलेत फोटो. धोम चा फोटो dull आलाय पण बाकीचे typical इप्सि टच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेणवली अन तो घाट कित्तीही वेळा पहिला तरी समाधान होत नाही.
त्या वसई च्या किल्ल्यातून जिंकून आणलेल्या घंटेचा फोटो टाक कि. मी बघतो माझ्याकडे आहे बहुतेक.
तसच ह्या घाटावर एखादा खंड्या पक्षितर दिसतोच हमखास !
नृसिंह मंदिर चे फोटो अफाट आहेत . कासव नंदी अन पाच चेहर्याचा स्तंभ अप्रतीम. आता जायलाच हव तिथे.
वाई सारख गाव नाही रे. इथून पुढे जांभळी गाव आहे. कधी गेला नसशील तर जा पण पाऊस नाही रे सध्या !
<<<<<पठार फुलले आहे का? इतक्यात कोणी जाऊन आले असल्यास परिस्थिती कळवावी. धन्यवाद.
शिवाली कास पठारावर फुल नाहीयेत अजून. मी गेल्या शुक्रवारीच जाऊन आलो.
जिप्सीभाऊ, मस्त फोटो … धोम
जिप्सीभाऊ,
मस्त फोटो … धोम मंदिराचे फोटो विशेष आवडले … कमळ, कासव आणि त्यातला नंदी, सुरेख वाटले
बाकी गेल्या रविवारीच वाई मेणवली करून आलो. त्यात धोम ठाऊक नसल्याने आता तिकडे जाण्यासाठी परत एक टूर टूर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
धन्यवाद अमित.
धन्यवाद अमित.
मस्त फोटो!
मस्त फोटो!
आता इतक्यात जाणे नाही होणार.
आता इतक्यात जाणे नाही होणार. गणपतीनंतरच वेळ मिळेल.
नेहमीप्रमाणेच उत्तम!
नेहमीप्रमाणेच उत्तम!
जिप्सी, मस्त फोटो . पहिलाच
जिप्सी, मस्त फोटो . पहिलाच खुप आवडला. वर्षु, तुझा झब्बू ही छान आहे.
सायली मलाही कॅम्प आठवला त्या
सायली मलाही कॅम्प आठवला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्या मेणवली वेशीजवळच माझे घर आहे.
फोटोज मस्त आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि २७ - महान! (देऊळ
प्रचि २७ - महान! (देऊळ विषयावर तू काढलेले फोटो उत्तमच असतात सहसा
)
वाई सारख गाव नाही रे.>>>>>
वाई सारख गाव नाही रे.>>>>> तुम्हाला मोदकाचे ताट![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वाईमध्ये खूप देखणी देवळे आहेत
वाईमध्ये खूप देखणी देवळे आहेत जिप्सी. पुढील भेटीत नक्की पाहून ये सगळी. पुल्या गणपती, धुंडी विनायक, लक्ष्मी मंदिर, विष्णू मंदिर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्या मेणवली वेशीच्या अलीकडे डाव्या हाताला वळलात तर उजव्या हाताचा १ला वाडा, पटवर्धन वाडा. त्या वाड्यात खूप जुनी भित्तीचित्रे आहेत. त्यासमोरच्या वाड्यात एक-दोन रात्र राहण्या जेवण्याची सोय होते ग्रूप्सची. तोही वाडा खूप सुरेख आहे. जुना सांगाडा तसाच ठेवून बाकी वाड्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. बघण्यासारखा आहे. तो करंदीकर वाडा.
वाई गटग झालंच पाहीजे. हा
वाई गटग झालंच पाहीजे.
हा योग्या असा टांग मारतो नेहेमी.
प्राची तु म्हणजे कमाल केलीस.
प्राची तु म्हणजे कमाल केलीस. मला वाटायचं कि मला वाई बद्द्ल खूप माहिती आहे पण सपशेल माफी मागतो. आता तू सांगितलेली स्थळ पाहण मस्ट आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कांदेपोहे प्लान करा ! आम्हाला यावेळी तरी टांग न मारता घेऊन चल
करू या नक्की. वाईमध्ये ७ घाट
करू या नक्की.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाईमध्ये ७ घाट आहेत. साधारण जानेवारी ते मार्च याकाळात कृष्णामाईचा उत्सव सुरू असतो. प्रत्येक घाटावर आठ दिवस उत्सव चालू असतो. वेगवेगळे कार्यक्रम, स्पर्धा असतात. या काळात एकदा नक्की भेट द्यावी वाईला.
व्वा! मस्त फोटो जिप्सी! मी
व्वा! मस्त फोटो जिप्सी! मी मागच्याच महिन्यात वाईला बहिणीकडे गेले होते ....
प्राची - माझी बहिणीने कृष्णामाईच्या उत्सवाचं इतकं भरभरून बोलत होती की तो लगेच असता तर मी कदाचित राह्यलेच असते.... ती आयोजन समितीत असते. कधीतरी एकदा नक्की जायचं ठरवलंय ...
मस्त फोटो!!! प्रचि ११ मधल्या
मस्त फोटो!!!
प्रचि ११ मधल्या झाडाच्या पारावर तासन् तास बसायला आवडेल... असे गटग झाले तर मी नक्की येईन.
मस्त फोटो रे !!
मस्त फोटो रे !!
आमच्या सातारा जिल्ह्याचे फोटो
आमच्या सातारा जिल्ह्याचे फोटो पाहून भर श्रावणात मुराळी माहेरी न्यायला यावा इतका आनंद झाला . माझ्या वडलांच बालपण ब्राह्मणशाहीत गेलं नी त्यांच शिक्षण द्रविड हायस्कूल मध्ये झालं त्यामुळे त्यांच्या भाषेवर ढवळीकर मास्तरांचे खुप चांगले संस्कार झाले. या उलट आम्हा सर्व बहिणींचे बालपण ,शिक्षण पाचगणीत झाले भाऊ पोष्टमास्तर असल्याने … sorry ,विषयांतर झालं … मी अजून खूप लिहीत राहीन तो स्वतंत्र लेखनाचा विषय आहे .प्रचंड जिव्हाळ्याचा … मनापासून धन्यवाद ! ही सर्व मालिका खूप अप्रतिम झालीय .
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घरी यातलेच काही फोटो दाखवत होतास ना ? पण माझे लक्ष नव्हते कारण .. दुसरे एक लक्षवेधी व्यक्तीमत्व कडेवर होते >>>>>>दिनेशदा
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त मेणवली दर्शन.त्या वाड्यात अजून कोणी राहतात का?>>>>srdजी बहुतेक नाही राहत वाड्यात कुणी.
पहिल्या फोटोlला जरा Warmify करता येते का बघ.>>>>>हो केपी, तो फोटो ओव्हरएक्स्पोज झालाय.
पण फ्रेमिंग आवडली म्हणुन पोस्ट केला. ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
निसर्गाचा मुक्त वरदहस्त लाभलेला परिसर आहे तो सगळा.>>>>>सई, +१०००००![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नानासाहेब पेशव्यांचा वाडा मेन्टेन्ड आहे का? ..स्मारक म्हणून?>>>>>मानुषीताई, त्यातल्या त्यात "ठिक" आहे.
वाई सारख गाव नाही रे. इथून पुढे जांभळी गाव आहे. कधी गेला नसशील तर जा पण पाऊस नाही रे सध्या !>>>>>नक्की रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचि २७ - महान! (देऊळ विषयावर तू काढलेले फोटो उत्तमच असतात सहसा स्मित )>>>>>माधव, धोममधील नृसिंह मंदिर, मेणवली काठावरची मंदिरे खरंच खुप सुंदर, सुबक आहेत. खास वेळ देऊन इथे भेट दिली पाहिजे. तरी देवळांचे मनासारखे फोटो नाही काढता आले. पुन्हा एकदा नक्की जाणं होणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाई सारख गाव नाही रे.>>>>> तुम्हाला मोदकाचे ताट>>>>>प्राची, मला कंदी पेढ्याचे ताट
तरी मी "खामकरांकडच्या" कंदी पेढ्याचा आणि प्यासा मधल्या आईस्क्रीमचे फोटो नाही टाकले. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तो करंदीकर वाडा.>>>>>हा आता पहायलाच पाहिजे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाई गटग झालंच पाहीजे. >>>>>मी तय्यार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाईमध्ये ७ घाट आहेत. साधारण जानेवारी ते मार्च याकाळात कृष्णामाईचा उत्सव सुरू असतो. प्रत्येक घाटावर आठ दिवस उत्सव चालू असतो.>>>>>>हि नविन माहिती. कृष्णाकाठचे सगळेच घाट फोटोजनिक आहेत.
सातार्याच्या संगम माहुली सहित. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्या सातारा जिल्ह्याचे फोटो पाहून भर श्रावणात मुराळी माहेरी न्यायला यावा इतका आनंद झाला>>>>>भुईकमळ, मी सुद्धा सातार्याच्या पण जरा पलिकडचा (फलटण, जिल्हा सातारा माझं गाव)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटोज . तो १२ नं.
मस्त फोटोज .
तो १२ नं. फोटोमधला घाट ' काकस्पर्श' मध्ये पण दाखवला आहे ना ?
मस्त फोटो. ५ नंबरच्या
मस्त फोटो.
५ नंबरच्या फोटोमधलं दार हे फडणविसांच्या वाड्याचं आहे का? त्यावर वेल्कम कसलं लिहिलंय. काय पण करतात लोक.
सही प्रची
सही प्रची
अप्रतिम! कोल्हापुर पुणे
अप्रतिम! कोल्हापुर पुणे वाटेवरुन इतक्यांदा जातो पण वाकडी वाट करुन बघणं झाल नाही! जायलाच हवं असं वाटतय फोटोज बघुन!
काय रे सुंदर दिसतंय सगळं.
काय रे सुंदर दिसतंय सगळं. मस्त प्रचि. महाबळेश्वरला जाता-येता एकदा तरी वाईवारी होतेच. एकदा खास इथल्या आठवड्याच्या बाजारात फिरून भाज्यांची, तांदळाची खरेदि केली होती.
गणपतीला फारच आपुलकीचं नाव आहे इथे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
६५ -७० च्या सुमारास धोम धरण
६५ -७० च्या सुमारास धोम धरण झाले आणि वाईतल्या वाहत्या कृष्णेच्या पात्रातल्या डोहांची डबकी झाली.बसडेपोकडून ढोल्या गणपतीकडे येताना पायपुल ओलांडायला नकोसं वाटतं.कृष्णामाईचा फेब्रुवारीतला उत्सव नावालाच उरला आहे.बाजारात कर्णकर्कश रेकॅार्ड सतत वाजत असतात.एकूण रम्य ठिकाणांचं रम्यपण लुप्त होत चाललं आहे.
सातारा जिल्हा पर्यटन विषयी आदित्य फडके यांचं पुस्तक चांगलं आहे.
SRD अगदी खरय. तरीपण मी ८०-८५
SRD अगदी खरय. तरीपण मी ८०-८५ पर्यंत कृष्णेला सुरेख पाणी बघीतले आहे. अनकडा डोल्यागणपतीच्या मागच्या कुंडात डुंबलेलो देखील आहे. आता ती डबकी बघीतली की नकोच वाटते.
ढोल्या गणपतीसमोर ती कृष्णामाई
ढोल्या गणपतीसमोर ती कृष्णामाई आहे? मी ५ वर्षांपुर्वी गेले होते तेव्हा मला तो रुंद नाला वाटला होता![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
त्यामानाने सांगली, नरसोबाच्या वाडीची कृष्णामाई फारच सुंदर वाटली होती.
कांदेपोहे तु पण डुबकी मारली
कांदेपोहे तु पण डुबकी मारली आहेस तर ! अस वाटतय की अनेकांना बरच काही आठवतय आणि बोलायचय ! चला राव त्या कठवरच्या पारावर बसुनच बोलु.
बाकि अत्ता त्रिपुरिपोर्णिमेच पन उत्सव असतो ना वाइला !
मस्त प्रचि!!
मस्त प्रचि!!
नदीचं पाणी बघुन खरच खुप त्रास
नदीचं पाणी बघुन खरच खुप त्रास होतो... आमच्याही लहानपणी बरच पाणी असलेलं आठ्वतय नदीला...
नगरपालिकेला हाताशी घेऊन नदी आणि परिसर स्वच्छ करण्याचे ब-याच लोकांचे जोरदार प्रयत्न चालु आहेत.
बाकी वाई गटग ला कधीही यायला आवडेल...
कृष्णाबाईचा उत्सव म्हणजे दिवाळीसारखा मोठा सण असतो तिकडे.. त्याकाळात वाई सोडुन रहायचं म्हणजे अजुनही शिक्षा वाटते..
पुढच्या वेळेला जांभळी बरोबर नागेवाडी लिंब ची बारा मोट्याची विहीर पण बघा ... खुप मस्त आहे..
वाई कला आणि संस्कृती म्हणुन एक पुस्तक आहे .. ते जरुर वाचा बरीच माहिती आहे त्यात आणि खुप सुंदर चित्र/ फोटो..
बाकी वाई सारखं गाव नाही>>>> अगदी अगदी ....
Pages