LED दिव्यांबद्दल माहिती हवी होती

Submitted by बन्या on 28 August, 2015 - 01:27

नमस्कार,

घरातले (1BHK) जुने दिवे काढून नवीन LED बसवण्याचा विचार सुरु आहे , पण याबाबतीत काहीही कल्पना नाहीये
आपल्या नेहमीच्या ट्युबलाईट पेक्षा हे खूपच महाग आहेत .

मला काही प्रश्न पडलेत

१. हे जास्त टिकाऊ असतात का ?
२. याने नक्की किती वीज वाचते
३. महत्वाचे म्हणजे याने लक्ख उजेड पडतो का , मागे एक मजा म्हणून दिवा घेतला होता , फारच मीणमीणता होता

कोणी घरी संपूर्ण LED दिवे वापरतात का ? याच्या ट्युब्स मिळतात का ?

अनुभव कसा असतो, याबाबतीत काही चर्चा झाल्यास उपयोग होईल
धन्यवाद Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. हे जास्त टिकाऊ असतात का ? >> नक्कीच. २-३ वर्षांची वॉरंटीदेखिल असते.
२. याने नक्की किती वीज वाचते >> ते किती वॅटचा दिवा आहे त्यावर अवलंबुन. आपण 'झिरो' वॅटचा म्हणुन बल्ब घेतो ,तो ५ वॅट्स चा असतो. पण एलीडी १.५ वॅटचा असतो. आणि तितकाच प्रकाश देतो.
३. महत्वाचे म्हणजे याने लक्ख उजेड पडतो का , मागे एक मजा म्हणून दिवा घेतला होता , फारच मीणमीणता होता. >> लख्ख वगैरे पडत नाही. त्यासाठी जास्त वॅटचा दिवा घ्यावा लागेल. एलीडीदिव्यांचा साधारण पिवळसर प्रकाश पडतो. आणि एलीडी ट्युब्स देखिल मिळतात. रीफ्लेक्टर वापरल्यास प्रकाश चांगला मिळतो.

१२ वॅट फिलिप्स एलईडी चा प्रकाश ६० वॅट बल्ब एवढा नक्कीच पडतो.. पण तो फिलिप्स किंवा नामवंत कंपनीचाच असावा.. चायनीजचा प्रकाश एकदम कमी पडतो..१२ वॅट चायनीज हा ८ वॅट फिलिप्स एवढाच प्रकाश देतो..

छोटी खोली असेल तर आठ / बारा वॅटचा ही लख्ख उजेड पडतो.
पूर्वी एलइडी दिवे पिवळसर असायचे पण आता नाही. आता डेलाईट किंवा ६५के असे लिहिलेले दिवे स्वच्छ पांढरा उजेड देतात. पण हो नामवंत कंपनीचाच बल्ब घ्या. तोच पांढरा शुभ्र प्रकाश देतो.

त्याशिवाय एलइडी पॅनेल्सही मिळतात. साधारण १२/१८ वॅटचे. पांढरा शुभ्र आणि फार लख्ख प्रकाश आहे याचा. शिवाय हे छान दिसतात खुप पण जरा महाग आहेत. इथे बघा
यात सरफेस माउंट किंवा पिओपी माउंट असे प्रकार आहेत. सरफेस माउंट म्हणजे सिलिंगवर डायरेक्ट लावायचे. तर पिओपी माउंट / फॉल्स सिलिंग माउंट फॉल्स सिलिंगचे काम अजुन करायचे असल्यास लावायचे. हे लाईट अगदी थिन असल्याने यामुळे फॉल्स सिलिंग फार खाली येत नाही. माझ्याकडे यातले तीन लावलेत. घरातला तो भाग सर्वात अंधारा होता,आता तो सगळ्यात जास्त लख्ख असतो.

१. हे जास्त टिकाऊ असतात का ? :>>>>>> ट्युब साधारण १ वर्ष चालते. हे कदाचित ३ वर्ष चालत असावेत.

२. याने नक्की किती वीज वाचते>>>> ह्या बाबतोत खाली गणित देतो.

३. महत्वाचे म्हणजे याने लक्ख उजेड पडतो का , मागे एक मजा म्हणून दिवा घेतला होता , फारच मीणमीणता होता >>> ट्युबसारखा लक्ख उजेड एका दिव्यानी पडत नाही. दोन दिवे ( ८ वॅट्चे ) वापरणे भाग आहे.

तुम्हाला ४० वॅट च्या ट्युब च्या ऐवजी दोन ८ वॅट्चे दिले लावायला लागतील. म्हणजे तुमचे २४ वॅट वाचतील. हे झाले वीज वाचण्याबद्दल. आता पैसे कीती वाचतील ते बघु.

तुम्ही ट्युब साधारण पणे दिवसात ४ तास वापरत असाल. म्हणजे वर्षाला ३६५ दिवस x ४ तास x २४ वॅट = ३५०४० वॅट अवर वाचतील म्हणजे ३५ किलोवॅट अवर म्हणजेच ३५ युनिट वीज वर्षाला वाचेल.

३५ युनिट विजेची बचत वर्षाला म्हणजे साधारण ३५ x ५ रु/युनिट = १७५ रुपये वाचतील.

तुमचा एलइडी लावण्याचा खर्च = २ x 300 रुपये = ७०० रुपये.
तुमची वार्षिक बचत = १७५ रुपये अधिक दरवर्षी ट्युब चा खर्च ४० रुपये. = २१५ रुपये वार्षिक बचत.

म्हणजे तुमची एलईडी मधली गुंतवणुक वसुल होयला साडेतिन वर्ष लागतील ( आणि एलईडी चे आयुष्य ३ वर्ष आहे म्हणे ). म्हणजे थोडक्यात आपण पर्यावरणवादी आहोत हे दाखवायचे नसेल तर एलईडी नी ट्युब रीप्लेस करणे म्हणजे आर्थिक दृष्ट्या येडेपणा आहे.

मी नुकताच एक विप्रोचा १२वॉटचा एलईडी खरेदी केला....छापील किंमत ६९०रूपये...मला तो ४७५रूपयात मिळाला. हा दिवा मी माझ्या स्वयंपाकघरात लावलाय..आधीच्या २३वॉट सीएफएलच्या जागी...तेवढाच, किंबहुना त्याहुनही थोडा अधिक प्रकाश देतोय. त्याच्या बॉक्सवर जे लिहिलंय ते इथे देतोय.
टंगस्टन दिवा ८५ वॉट=सीएफएल दिवा=२०वॉट=एलईडी दिवा १२वॉट
किती तास चालतात? टंगस्टन दिवा: १०००तास सीएफएल दिवा ५०००तास आणि एलईडी दिवा १५०००तास
वरील रेटिंगप्रमाणे प्रमाणे किंंमतः टंगस्टन दिव्यापेक्षा सीफएल साधारणपणे दुप्पट किंमतीला असतो आणि सीएएफएलपेक्षा एलईडी साधारणपणे दुप्पट/अडीचपट किंमतीला असतो.
आता तुम्हीच ठरवा कोणता वापरायचा आणि का?

एल ई डी उर्फ लाईट एमिटिंग डायोड चे दिवे बहुतांशी मोनोक्रोमॅटिक पोलराईज्ड लाईट प्रकारचा उजेड देतात. दुसरे म्हणजे, हे दिवे पॉईंट सोर्स ऑफ लाईट या प्रकारचे असतात.
डिफ्यूज लाईटसोर्स जसे ट्यूबलाईट, (ही सीएफएलही असते) चा उजेड डोळ्याला जास्त सुखावह असतो, यात गडद सावल्या पडत नाहीत.

"पैशांची" बचत या उद्देशाने या बल्बकडे पाहिल्यास बचत नाही असे उत्तर येते. विजेची बचत म्हणून पाहिलं, तर होईल थोडीफार.

टंगस्टन दिवा: १०००तास सीएफएल दिवा ५०००तास आणि एलईडी दिवा १५०००तास >>>>>>

सीएफएल किंवा एलईडी ची तुलना टंगस्टन दिव्याशी करणे म्हणजे मार्केटींग गिमीक आहे. तुलनाच करायची असेल तर साध्या ट्युब्लाईट ची केली पाहीजे.

ह्या ५००० तास किंवा १५००० तास ह्यांना काही आपल्या साठी अर्थ नसतो. कारण हे आकडे दिवा सतत चालू असण्याबद्दल असतात. हे तास धरले तर सीएफएल कमीत कमी ३ वर्षे आणि एलईडी कमीतकमी १० वर्ष चालले पाहीजेत ( दिवसाचा ४ तास वापर धरुन ). तशी गॅरेंटी कोणी का देत नाही. सीएफएल ची गॅरेंटी १ वर्ष असते आणि चांगल्या कंपनीचा सीएफएल जातो सव्वा दिड वर्षात.

एलईडी चा उजेड हळुह्ळु कमी होत जातो. हो आणि दिमा नी लिहील्याप्रमाणे एलईडी च्या प्रकाशात वाचायला त्रास होतो.

टोचा, आपलं म्हणणं बरोबर आहे....स्वतः चिकित्सक पद्धतीने वापरून पाहिल्याशिवाय नेमका खरा दावा कोणता हे ठरवणं खरंच कठीण आहे...आणि सर्वसामान्य व्यक्ती ही जाहिरातींवरच विसंबून चालत असते.

तुमची वार्षिक बचत = १७५ रुपये अधिक दरवर्षी ट्युब चा खर्च ४० रुपये. = २१५ रुपये वार्षिक बचत.
<<
माझ्याकडे ५-६-७ वर्षेही विनातक्रार काम करणार्‍या साध्याच (नॉन काँपॅक्ट फ्ल्युरोसंट) ट्यूब्ज आहेत. अजूनही चालू स्थितीत.

माझ्याकडे ५-६-७ वर्षेही विनातक्रार काम करणार्‍या साध्याच (नॉन काँपॅक्ट फ्ल्युरोसंट) ट्यूब्ज आहेत. अजूनही चालू स्थितीत.>>>>

हो अगदी बरोबर. मी सेफ स्टँड घेउन गणित दाखवले. माझ्या कडच्या ४ ट्युब ३ वर्ष आणि १ ट्युब दिडवर्ष तरी नक्कीच चालु आहेत.

चामारी , काहीच बचत होताना दिसत नाहीये ..

विजेची बचत होऊ शकेल कदाचित..
जेवढा आत्ता मिळतोय तेवढा प्रकाश मिळायला हवा घरी, बस झाले

विजेची बचत होऊ शकेल कदाचित..>>>>>>>>

बन्याभाऊ - स्वताच्या खिषातले पैसे घालवून वीजेची बचत करायची काय हौस आलीय तुम्हाला?
एलइडी वर पैसे घालवण्यापेक्षा स्वतासाठी किंवा बायकोलाकाहीतरी घ्या, मनाला जास्त शांतता मिळेल.

एलइ डी दिव्यांबाबत इंटरनेटवर वाचले असतात ते सुमारे ५०००० तास चालतात असे लिहीले आहे. मात्र हे आयडीयल कंडीशन मधले टेस्टींग असावे. त्यामुळे इतके नक्कीच शक्य नाही. मात्र
दिवसाला ५ तास दिवे लावले तर ३६५ * ५ = १८२५ तास वर्षाला. हे बघितल्यास तीन वर्षापेक्षा नक्कीच जास्त चालतील.
या लाईटचा पर वॅट ल्युमेन जास्त असल्याने कमी वॅटला प्रकाश जास्त वाटतो.
इथे (LED_lamp Comparison table)इथे (led_bulbs_comparison) याबद्दल थोडी माहिती आहे

पॉईंट सोर्स ऑफ लाईट >> घरी असलेले पॅनेल लाईट ट्युबलाईट पेक्षाही सुखावह आणि स्मुथ लाईट देतात. एक ८ वॅट्चा बल्ब आहे तोही त्रासदायक नाही. मात्र १ वॅटचा पिक्चर स्पॉट लाईट आहे तो डायरेक्ट बघायला हार्श वाटतो.

सध्या आपण आपले वीज बिल वाचवणे हा मुख्य मुद्दा लक्षात घेतोय पण खुप जण एलइडी दिवे वापरायला लागले तर ओवरऑल विजेची नक्कीच बचत होईल. सध्याच्या वीज तुडवड्याच्या काळात ते सोयीचे होईल अशी अंधुकशी आशा आहे. Proud

पण एकाच वेळी विजेची बचत म्हणुन आधीचे लाईट काढुन टाकून नवीन बसवणे पर्यावरणासाठी योग्य नाही. मात्र असलेले बल्ब गेले की एकेक बदलणे चांगले आहे.

सिएफएल बल्ब ची पर्यावरणाच्या दृष्टीने विल्हेवाट लावणे हे कठीण काम आहे असे वाचलेले आठवते. आता एलइडी बल्ब बद्दल मात्र विल्हेवाट लावायची वेळ अजुन न आल्याने याबद्दल चर्चा नाही कुठेच. ती अजुन चार पाच वर्षांनीच घडेल !

बन्याभाऊ - स्वताच्या खिषातले पैसे घालवून वीजेची बचत करायची काय हौस आलीय तुम्हाला?

=)) ख्या ख्या

अहो माका अशे म्हणयचे होते कि वीज बिल कमी येईल न

चला, आता लिहितोच. जर याविषयावर नेटाने संशोधन केल्यास आपल्याला led ची तुलना cfl व incandescent (म्हणजे जुने टंगस्टन फिलामेन्टवाले) यांच्याशी केली जाते आहे हे जाणवेल. का ? कारण तसे सोपे पडते सिद्ध करायला. खरच led बल्ब व ट्यूब्स cfl व incandescent पेक्षा जास्त efficient असतातच. पण आपण जुन्या काळातले बल्ब वापर्तो का सध्या ? त्यामुळे तो ऑप्शन बाद, उरला cfl. जेव्हा हि टेक्नॉलॉजी आली तेव्हा ढोल वाजवले गेले हिच्या सर्वगुणसंपन्नतेविषयी. ह्या सगळ्यात दुर्लक्षित राहिली ती ट्युबलाईट. त्यात हळूहळू बदल होत होतेच. सध्या T5 सर्वोत्तम आहे.

जर आपण दिव्यांच्या lumens per watt efficiencyविषयी सर्च मारला तर समजेल की

LED - ४० - ९० ल्युमेन्स पर वॉट
CFL - ४० - ७० ल्युमेन्स पर वॉट
T5 - ७० - १०० ल्युमेन्स पर वॉट

आता उरला दिव्याच्या आयुष्याचा प्रश्न, तर LED ५०००० तास म्हणताहेत तर फिलिप्सवाले T5 ३६ ते ६० हजार म्हणताहेत. LED दोन फुटाची ट्यूब १७०० रुपयाला म्हणाला मला एक दुकानदार

आपण फक्र ब्रॅन्डेडविषयीच बोलतोय हां

अजून एक मला फिशटॅन्कसाठी हवं होत इकॉनॉमिकल सोल्युशन, दिवसातून आठ तास चालणार म्हणून LED लावला तर झाडाम्ची वाढ होईना, मग लावल्या T5 हाय एफिशियन्सी. जबरदस्त रीझल्ट्स. पेनिट्रेशन कमी पडतय LED च.

माझ्या मते हे तंत्रज्ञान अद्याप संपुर्ण प्रगत नाही.

यामुळे एल ई डी चा पावर सप्लाय वोल्टेज फेरफाराला टिकाव धरु शकतो का ? सर्ज वोल्टेजेस ला टिकाव धरु शकतो का माहित नाही.

साधा इलेट्रोनीक चोक ( बजाज कंपनीचा ) माझ्या घरी टिकाव धरु शकत नाही. सारे दुकानदार आता कॉइलवाले चोक मिळत नाही म्हणतात.

एल ई डी याचे सर्कीट वोल्टेज चढाव्/उतार किंवा सर्ज वोल्टेजेस ला टिकले तरच याचे पैसे वसुल होतील.

अन्यथा हा सौदा हौसेला मोल नाही असाच होईल.

घरात असणार्‍या विजेचे वोल्टेज constant असेल तरच ह्या दिव्यांचा उपयोग आहे. नसेल तर सतत होणार्‍या fluctuation ने ह्याचे इलेकट्रॉनिक्स पार्ट गरम होऊन, निकामी होण्याची शक्यता जास्त.

टोचा, अचूक उत्तर.... पण खालील पर्यायात LED दिवे उपयोगात येतात.

१> जर लाईट १२ तास चालु असेल ( जिना किंवा घरा बाहेरिल व्हरांडा)

२> जर लाईट सारखी जात असेल आणि inverter वापरण्यात येत असेल तर.

अन्यथा CFL cool daylight हा सर्वात चांगला option आहे.

चांगल्या कंपनीचा LED दिवा घेतला तर तो १०० ते २४०V वर चालु शकतो.

नुकतेच ८ दिवे खरेदी केलेत (महाराष्ट्र शासनाच्या योजेनेअंतर्गत १०० रुपयाला १ दिवा या दराने मिळाले).. याशिवाय EMI चे पर्याय पण उपलब्ध होते.. लाईट बिल आधार कार्ड ची झेरोक्स वैगेरे घेतली.. सध्या २ - ४ घरात लावून बाकीचे नातेवाईकांमध्ये वाटलेत.. आता तरी लक्ख उजेड पडतोय.. बघू काय रिझल्ट्स देतायत ते..!!

Comparison Chart
LED Lights vs. Incandescent Light Bulbs vs. CFLs

http://www.designrecycleinc.com/led%20comp%20chart.html

कोणी घरी संपूर्ण LED दिवे वापरतात का : प्रयत्न करतोय... संपूर्ण नाही पण ७० % आहे घरी
याच्या ट्युब्स मिळतात का : होय

शक्यतो online घ्या... स्वस्त मिळतील.. मी घेतले आहे..
१४ watt(हा २५ watt CFL एवढा प्रकाश देतो ),
आणि ७ watt (हा १४ watt CFL एवढा प्रकाश देतो )
६ महिण्यांपासून वापरतोय काहीच प्रोब्लेम नाही आला आतापर्यंत..
शक्यतो Eveready घ्या त्याचा power factor + luminance चांगला आहे.

मी ज्या साईटवरण घेतलाय त्याची लिंक देत आहे..
link: https://paytm.com/shop/search/?q=led%20bulb&brand=2790

१४ watt,
https://paytm.com/shop/p/eveready-14-watt-cool-day-light-led-bulb-pack-o...

७ watt
https://paytm.com/shop/p/eveready-led-bulb-7w-pack-of-2-HHDECOEDBULB7WX2...

इतरत्र कुठूनही घेण्याआधी जवळच्या MSEB ऑफिस मध्ये चौकशी करा. महावितरण कडून ग्राहकांना स्वस्त दरात LED दिले जात आहेत, आणी दर्जाही चांगला आहे (मेड ईन इंडिया)..!!

मी सध्या फिलिप्स ची 20 wat ची ट्यूब लाइट वापरतो आहे.. रोजच्या 40 wat च्या ट्यूब पेक्षा खुप उजेड आहे... लाईट शांत आहे... म्हणजे डोळ्यांना त्रास नाहि...
बल्ब जास्त तापत नाहि...

शासनाचे बल्ब (7 w) चांगले आहेत... बिलात किति फरक पडतो हे लक्षात यायचे आहे.... सध्या थांबा आणि पहा...

महत्वाचे म्हणजे लोड कमी zaalaay हे जाणवते...
माजि तरी पसंति आहे led ला...

( बाजारात मिळणारा 0w चा बल्ब 15 w चा असतो)

काहि ठिकाणी लघु उद्योग कार्यरत आहेत led बल्ब व ट्यूब बनविनारे...विश्वास ठेवल्यास कमी किमतीत चांगला माल मिळेल

ऑन लाईन मिळ्नारे बल्ब डुप्लीकेट असावेत... मि ऑफर चे पाच बल्ब ऑर्डर केलेले... फसलो... दखविल्या w पेक्षा कमी प्रकाश आहे...
म्हणून स्टैंडर्ड मागवावेत

महत्वाचे ...
led बल्ब ची कीमत त्याच्या ल्युमिनस म्हणजे प्रकाश देणाऱ्या क्षमतेवरुन ठरते... (प्राप्त माहिती)
यामुळे watt पेक्षा ल्युमिनस पहावा असे वाटते...

मार्गदर्शन व्हावे

एलईडी चे आयुष्य ३ वर्ष आहे म्हणे>>>>
नाही, नक्कीच याहून जास्त आहे. मी घरी शौचालयात लावलेला 1 watt चा LED गेली सुमारे ६ वर्षे व्यवस्थित चालू आहे. (साधारण ५ watt च्या CFL इतका प्रकाश देतो)

Back to top