श्री मोरेश्वर- मोरगाव, जि. पुणे
मार्ग- पुणे-सातारा मार्गावर पुण्यापासुन ६४ कि. मी. अंतरावर. अनेक मार्गांनी इथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या येतात.
यात्रा- भाद्रपद शु. चतुर्थी व माघ शु. चतुर्थी. या दोन्ही तिथींना चिंचवडहून श्रींची पालखी मोरगावी येते.
मूर्ती- स्वयंभू. मखरात बसवलेली, वर नागफणा. मूर्ती उकिडव्या अवस्थेत बसलेली आहे. सोंड डावीकडे. सबंध मूर्ती सिंदूरचर्चित. मूर्तीच्या पुढ्यात पाषाणाचे उंदीर व मोर.
मंदिर- उत्तराभिमुख. इस्लामी धर्तीची बांधणी. प्रचंड दीपमाळा. भक्कम तटबंदी. मंदिराजवळ थोड्या अंतरावरून कर्हा नदी वाहते. मंदिरापुढे चौथर्यावर प्रचंड नंदी. जवळच दगडी उंदीर.
इतिहास- हे क्षेत्र गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ आहे. अष्टविनायकांच्या गणनेत या देवाला अग्रस्थान आहे. मोरया गोसाव्यांनी इथे तप केले. इथे कर्हा नदीत त्यांना गणेशमूर्ती मिळाली, ती घेऊन ते चिंचवडला गेले.
छानै
छानै
मार्ग- पुणे-सातारा मार्गावर
मार्ग- पुणे-सातारा मार्गावर >>>
इथे काहितरी चुक आहे बघ पल्ले.
ते बारामती रोड ला आहे मंदीर. जर सासवड - जेजुरी वरुन गेल तर.
मोरगाव वरुन बारामती ३०-४० किमी असेल.
चित्र छानच. आणि माहिती देखील.
मस्तच . गणपतीबाप्पा मोरया
मस्तच . गणपतीबाप्पा मोरया
धनु.
व्वाह... कसले सुंदर काढले
व्वाह... कसले सुंदर काढले आहेस चित्र !
|| गणपती बाप्पा मोरया ||
सुरेख!
सुरेख!
सुरेख ग पल्ली. हात
सुरेख ग पल्ली. हात जोडल्याशिवाय पुढे जाणंच शक्य झालं नाही.
छानच आलंय. रोज एक येणार का
छानच आलंय.
रोज एक येणार का आता? मस्त..
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
आवडले पल्ले.
आवडले पल्ले.
पल्ले, मोरश्वरा मोरया! सुरेख!
पल्ले, मोरश्वरा मोरया!
सुरेख! रोज एक का काय? तुला भेटेन तेव्हा धरू दिलेस तर पाय किंवा मग हात तरी धरेनच.... एक पेंसिल चार खोडरब्बर ही माझी कथा आहे चित्रकलेत
सुंदर काढलंय चित्र.. आवडलं..
सुंदर काढलंय चित्र.. आवडलं..
पल्ले, फार गोड काढलायंस गं
पल्ले, फार गोड काढलायंस गं गणपती.
चित्र बघितल्या बरोबरच हात
चित्र बघितल्या बरोबरच हात आपसुक जोडले गेले नमस्कारासाठी.. भन्नाट एकदम.. मोरया.
या सगळी चित्रे नंतर संकलीत करून मस्त अष्टविनायक पोस्टर तयार होइल..