पेरूचं पंचामृत

Submitted by आरती on 26 August, 2015 - 05:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक मोठा पेरू,
पाव वाटी भाजून सोललेले शेंगदाणे,
पाव वाटी खोबऱ्याचे काप / खवलेला नारळ / किसलेलं खोबरं,
पाव वाटी चिंचेचा कोळ,
एक चमचा गोडा मसाला,
दोन हिरव्या मिरच्या,
आठ-दहा कडीलींबाची पाने,
वरून घालायला कोथिंबीर,
फोडणीसाठी मेथ्या,तीळ,जिरे,मोहरी,हळद,हिंग आणि तेल
चवीप्रमाणे मिठ, गुळाचा खडा.

क्रमवार पाककृती: 

पेरूच्या छोट्या-छोट्या चौकोनी फोडी करून घ्याव्या.
तेल तापवून मेथ्या,तीळ,जिरे,मोहरीची फोडणी करून घ्यावी.
हळद-हिंग-गोडा मसाला, हिरवी मिरची-कडीलींब घालावे.
पेरूच्या फोडी घालून परतून घ्यावे.
मिठ, गुळ, भाजलेले दाणे, खोबऱ्याचे काप घालून एक वाफ आणावी.
चिंचेचा कोळ आणि पाव वाटी पाणी घालून एक उकळी आणावी.
कोथिंबीर घालावी.
.
peruchaPranchamrut.jpg

वाढणी/प्रमाण: 
एका पेरुचे ४ जणांना पुरते.
अधिक टिपा: 

पंचामृत आंबट-गोडच छान लागते त्यामुळे त्याप्रमाणात गुळ घालावा.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई + बदल.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजू, मलाही कळलें गं पण मी मोबाईलवरून वाचत असल्याने नंतर लिहू म्हणून थांबले तर तू बाजी मारलीस Proud

धन्यवाद मंडळी.
फोटो आणि पाककृती आवडल्याचे कळवल्याबद्दल आभारी आहे. इतक्या सगळ्यांना पंचामृत आवडत असेल हे माहिती नव्हते. Happy

तसेच पंचामृत ते सत्रामृत या विषयावर 'चर्चा' घडवुन आणल्याबद्दल सर्व संबंधितांचे विषेश आभार Wink

Pages