Submitted by आरती on 26 August, 2015 - 05:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक मोठा पेरू,
पाव वाटी भाजून सोललेले शेंगदाणे,
पाव वाटी खोबऱ्याचे काप / खवलेला नारळ / किसलेलं खोबरं,
पाव वाटी चिंचेचा कोळ,
एक चमचा गोडा मसाला,
दोन हिरव्या मिरच्या,
आठ-दहा कडीलींबाची पाने,
वरून घालायला कोथिंबीर,
फोडणीसाठी मेथ्या,तीळ,जिरे,मोहरी,हळद,हिंग आणि तेल
चवीप्रमाणे मिठ, गुळाचा खडा.
क्रमवार पाककृती:
पेरूच्या छोट्या-छोट्या चौकोनी फोडी करून घ्याव्या.
तेल तापवून मेथ्या,तीळ,जिरे,मोहरीची फोडणी करून घ्यावी.
हळद-हिंग-गोडा मसाला, हिरवी मिरची-कडीलींब घालावे.
पेरूच्या फोडी घालून परतून घ्यावे.
मिठ, गुळ, भाजलेले दाणे, खोबऱ्याचे काप घालून एक वाफ आणावी.
चिंचेचा कोळ आणि पाव वाटी पाणी घालून एक उकळी आणावी.
कोथिंबीर घालावी.
.
वाढणी/प्रमाण:
एका पेरुचे ४ जणांना पुरते.
अधिक टिपा:
पंचामृत आंबट-गोडच छान लागते त्यामुळे त्याप्रमाणात गुळ घालावा.
माहितीचा स्रोत:
सासुबाई + बदल.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दूध, तूप घालुन पराठा केला
दूध, तूप घालुन पराठा केला आहे. मस्त खुसखुशीत होतो. पंचामृताचा करुन बघायला हवा एकदा.
काकडीचं पण छान लागतं असणार.
इथेच मायबोलीवर वाचला...
इथेच मायबोलीवर वाचला... बहुतेक नंदिनीला युक्ती सुचवली होती. बघायला हवं.
आत्मधून, मी हीच रेसिपी
आत्मधून, मी हीच रेसिपी द्यायला आले होते
सायली पातुरकर ह्यांनी मखाण्याचं पंचामृत लिहिलं आहे.
हो, मला बेत काय करावा वर
हो, मला बेत काय करावा वर सुचवला होता तो पराठा. एखाद्या वीकेंडला करून बघेन. गोडघाशे खातीलच.
ओह, सायलीचं तर अगदी शाही
ओह, सायलीचं तर अगदी शाही पंचामृत दिसतंय
अरे बापरे! इथली ही चर्चा
अरे बापरे! इथली ही चर्चा वाचून मला पंचामृताच्या माहितीबद्दल गोंधळायला झाले.
पाच म्हणजे अगदी पाचच घटक असायला हवेत. जर पाच पेक्षा जास्त घटक असतील तर ते पंच ह्या शब्दाशी कसे काय संयुक्तिक होईल? पंचखाद्यामधेही अगदी पाचच घटक असतात ना!!!
आमच्याकडे जे पंचामृत करतात त्यात फक्त दुध, तुप, दही, साखर, आणि मध असे अगदी बरोबर पाच घटक असतात.
आता आरतीने जे घटक घेतले आहेत ते मोजूया:
एक मोठा पेरू,
पाव वाटी भाजून सोललेले शेंगदाणे,
पाव वाटी खोबऱ्याचे काप / खवलेला नारळ / किसलेलं खोबरं,
पाव वाटी चिंचेचा कोळ,
एक चमचा गोडा मसाला,
दोन हिरव्या मिरच्या,
आठ-दहा कडीलींबाची पाने,
वरून घालायला कोथिंबीर,
फोडणीसाठी मेथ्या,तीळ,जिरे,मोहरी,हळद,हिंग आणि तेल
चवीप्रमाणे मिठ, गुळाचा खडा.
बापरे.. आरती तू १७ घटक घेतले आहेत. माझी पंचामृताबद्दलची सगळी माहिती कोलमडून पडली आहे अगदी.
आणि जर गोडा मसालामधील घटक घेतले तर १७ पेक्षा जास्त होतील
.. आणखी एक आमच्याकडे पंचामृत
.. आणखी एक आमच्याकडे पंचामृत फक्त आणि फक्त पुजेलाच करतात आणि फक्त प्रसाद म्हणून त्याचे भक्षण असते. इतर कुठल्याच पाककृतीमधे आम्ही पंचामृताचा वापर करत नाही. जसे इथे पराठे वगैरे बद्दल तुम्ही बोलत आहात. आमच्याकडे हे सर्व विधीच्या विरुद्ध गणले जाईल.
मस्तच
मस्तच
आरती, ते नाव सत्रांमृत कर
आरती, ते नाव सत्रांमृत कर बाई.
हे भारी दिसतंय. करून बघणार
हे भारी दिसतंय. करून बघणार आणि खाणार सुद्धा. (कधी ते माहित नाही. )
मस्त , चविष्ट. वा आरती
मस्त , चविष्ट. वा आरती आज किचन मधे बराच वेळ दिला . छान आहेत सर्वच रेसिपी. मंजुडी ने पण छान माहिती दिली.
सत्रामृत
सत्रामृत
सत्रांदा एडीट केलंस नी.. पण
सत्रांदा एडीट केलंस नी.. पण त्रावर अनुस्वार नको... अजून एकदा एडीट कर आता
नको. नेट इतकं स्लो आहे की एक
नको. नेट इतकं स्लो आहे की एक एडिट करायला पाच मिनिटं लागली. तुम्ही विदाऊट अनुस्वार वाचा.
पूजेचा पंचामृत हा
पूजेचा पंचामृत हा मिल्कशेकसारखा प्यायला महान लागतो. पंचामृत फेशियल पण एकदम मस्त रीलॅक्सिंग असतंय.
पूजेचा पंचामृत हा
पूजेचा पंचामृत हा मिल्कशेकसारखा प्यायला महान लागतो. पंचामृत फेशियल पण एकदम मस्त रीलॅक्सिंग असतंय.>>
मला वाटत ही पंचामृताची अवहेलना आहे. मी असे कधीच करु धजणार नाही. हल्ली सर्वांचे बाजारीकरण होते आहे.मी विचारही करु शकत नाही पराठे आणि फेशिअय आणि मिल्क्शेक..
मस्त वाटतेय रेस्पी. मी फक्त
मस्त वाटतेय रेस्पी. मी फक्त हिरव्या मिरचीचे पंचामृत खाल्लेय.
आता वांग्याचे वा भेंडीचे करुन पाहीन - घरचीच कोवळी वांगी, भेंडी मिळत आहेत सध्या .
इं ग्रो मधे चांगले पेरु मिळाले तर पेरूचे ही करावे म्हणतेय.
बी, अता बास!!! अति करू नकोस.
बी, अता बास!!! अति करू नकोस.
नंदीनी तुझे अभिप्राय चालतात
नंदीनी तुझे अभिप्राय चालतात तसे माझेही आहेत. उगाच दरवेळी डॉमीनेटींग करायचा प्रयत्न करु नकोस.
चला आता पेरूच्या पंचामृताची
चला आता पेरूच्या पंचामृताची डाळ शेपू करूया !!!
ए नंदिनी, तुला काय कळतंय की
ए नंदिनी, तुला काय कळतंय की नाही? मिल्कशेक आणि फेशियल या दोन्ही पाश्चात्य गोष्टींचा संबंध तू सत्यनारायणाच्या पुजेशी जोडतेस? प्रसाद खाणार्यालाच देव पावेल असं लिहिलं असलं कथेत म्हणून काय झालं? अश्या गोष्टींची सरमिसळ करायची हिंमत तरी कशी होते तुझी?
नी, तुला नक्की म्हणायचंय काय?
नी, तुला नक्की म्हणायचंय काय? पंचामृत केवळ पूजेसाठी वापरावं असं कुठल्या पुस्तकात लिहेलेलं आहे का? आणि देवळांमधून मूर्तींना पंचामृतांचे अभिषेक करतात ते चालतं वाटतं.
सत्यनारायणाच्या पूजेला केवळ शिर्याचा प्रसाद असतो. पंचामृताचा नाही. आणि फेशियल पाश्चात्य असं कुठं लिहिलंय? आयुर्वेदामध्ये फेशियलचे उल्लेख आलेतच आहेत की.
माझी आजी पेरूचं लोणचं करायची
माझी आजी पेरूचं लोणचं करायची जे मला प्रचंड आवडायचं. ही पाकृ वाचून आजीची आठवण आली खूप! मला वाटते की तिचं लोणचं साधं होतं. मी ह्या पद्धतीने करून पाहीन. यम्मी दिसतंय एकदम!
पंचामृत केवळ पूजेसाठी वापरावं
पंचामृत केवळ पूजेसाठी वापरावं असं कुठल्या पुस्तकात लिहेलेलं आहे का? <<
तू केवळ पुजेचं पंचामृत म्हणाली होतीस ते का? पुजेची टिंगल करायलाच ना?
देवळांमधून मूर्तींना पंचामृतांचे अभिषेक करतात ते चालतं वाटतं. <<
तू स्वतःला मूर्ती समजतेस का? (तुझे आडनाव मूर्ती नाहीये बहुतेक!)
आयुर्वेदामध्ये फेशियलचे उल्लेख आलेतच आहेत की. <<
हाच तो सायंटिफिक भोंदूपणा.. ज्या त्या गोष्टी आमच्याकडे आहेतच्च म्हणून खपवायच्या..
(No subject)
पंचामृत फेशियल पण एकदम मस्त
पंचामृत फेशियल पण एकदम मस्त रीलॅक्सिंग असतंय. >>> नशिब इथंच थांबलीस.
पंचामृत बनवलं की लगेच ते प्रसाद होत नाही. त्याचा नैवेद्य दाखवला की मग त्याला उच्चासनावर बसवा. तोवर वापरा की कसं काय वापरायचंय ते.
आमची आई थंडीच्या दिवसांत
आमची आई थंडीच्या दिवसांत आम्हाला पंचामृत प्यायला द्यायची. कोमट दूध, दही, मध, साखर आणि तूप. मस्त लागायचं.
मी स्वतःला काय समजते हा
मी स्वतःला काय समजते हा नंतरचा प्रश्न आहे, मुळात मी पूजेची टिंगल केली तर तुझा नक्की काय प्रॉब्लेम होतोय तेच मला कळेनासं झालंय.
आयुर्वेदामधेय फेशियल आहे यात भोंदूपणा कसला? तू स्वतः आयुर्वेद वाचून बघ की. पुण्यामध्ये सर्व ब्युटी पार्लरमध्ये पंचामृत फेशियल अव्हलेबल आहेच की. त्या सर्व ब्युटीशीअन मूर्ख आहेत असं तुला म्हणायचंय का?
बराच कीस काढले दिसतोय
बराच कीस काढले दिसतोय पंचामृताचा.
मंजुडी , गावदेवी मार्केट मधल्या फळवाल्यांकडे मिळतात अलाहाबादी पेरु.
मोठे आणि रंगाने फिकट हिरवे असतात. तु त्यानांच विचारलस तरी ते सांगतिल अलाहाबादी आहेत की नाहीत.
पण तुला रेसिपी साठी थांबाव लागेल कारण ते थंडीत येतात .
आमच्याकडे जे पंचामृत करतात
आमच्याकडे जे पंचामृत करतात त्यात फक्त दुध, तुप, दही, साखर, आणि मध असे अगदी बरोबर पाच घटक असतात.
<<
यात पंचा कुठे आहे?
Pages