Submitted by आरती on 26 August, 2015 - 05:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक मोठा पेरू,
पाव वाटी भाजून सोललेले शेंगदाणे,
पाव वाटी खोबऱ्याचे काप / खवलेला नारळ / किसलेलं खोबरं,
पाव वाटी चिंचेचा कोळ,
एक चमचा गोडा मसाला,
दोन हिरव्या मिरच्या,
आठ-दहा कडीलींबाची पाने,
वरून घालायला कोथिंबीर,
फोडणीसाठी मेथ्या,तीळ,जिरे,मोहरी,हळद,हिंग आणि तेल
चवीप्रमाणे मिठ, गुळाचा खडा.
क्रमवार पाककृती:
पेरूच्या छोट्या-छोट्या चौकोनी फोडी करून घ्याव्या.
तेल तापवून मेथ्या,तीळ,जिरे,मोहरीची फोडणी करून घ्यावी.
हळद-हिंग-गोडा मसाला, हिरवी मिरची-कडीलींब घालावे.
पेरूच्या फोडी घालून परतून घ्यावे.
मिठ, गुळ, भाजलेले दाणे, खोबऱ्याचे काप घालून एक वाफ आणावी.
चिंचेचा कोळ आणि पाव वाटी पाणी घालून एक उकळी आणावी.
कोथिंबीर घालावी.
.
वाढणी/प्रमाण:
एका पेरुचे ४ जणांना पुरते.
अधिक टिपा:
पंचामृत आंबट-गोडच छान लागते त्यामुळे त्याप्रमाणात गुळ घालावा.
माहितीचा स्रोत:
सासुबाई + बदल.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर फोटो आरती. नेहमीचं
सुंदर फोटो आरती.
नेहमीचं पंचामृत आहे घरी फ्रिजमध्ये बाटलीत भरून ठेवलेलं.. आता पेरुचे तुकडे फोडणीत परतून त्यात घालते ते पंचामृत.
फक्त पेरू पूर्ण पिकलेला घ्यायचा की कच्चा/ हिरव्या सालीचा घ्यायचा?
हिरव्या सालीचा पण चालतो. फक्त
हिरव्या सालीचा पण चालतो. फक्त अगदी कडक नको.
खुप जास्त पिकलेला असेल तर लगदा होतो.
आमच्याकडे पण याचं पध्द्तीने
आमच्याकडे पण याचं पध्द्तीने करतात. पेरु पुर्ण पिकलेला आणि बिया नाही घेत इतकच.
वा , छान आहे पाककृती
वा , छान आहे पाककृती
सत्यानारायणाच्या पुजेला पण
सत्यानारायणाच्या पुजेला पण चालत का हे पंचामृत?
मस्त दिसत आहे.
बी, न चालण्यासारखं काही दिसत
बी,
न चालण्यासारखं काही दिसत तरी नाहिये. पण तु आपले तुझ्या गुरुजींना विचार.
ओके
ओके
ओहो..सही दिसतय.. पण मिरचीचा
ओहो..सही दिसतय..
पण मिरचीचा तिखतपणा कसा उतरणार यात ?
टीना, सर्वसाधारणपणे मिरची
टीना,
सर्वसाधारणपणे मिरची फोडणीत घातली की उतरतो ना तिखटपणा
पेरु पुर्ण पिकलेला आणि बिया
पेरु पुर्ण पिकलेला आणि बिया नाही घेत इतकच.
>>>
पेरूच्या बिया वेगळ्या कशा काढायच्या गं?
रीया, सुरीने किंवा चमच्याने
रीया, सुरीने किंवा चमच्याने बियांचा भाग कोरून काढून टाकायचा.
अगं म्हणजे गरच काढून टाकायचा
अगं म्हणजे गरच काढून टाकायचा
मग ते तर सालीचं पंचामृत झालं न नुसतं?
रीया मोठे हिरवट पेरु घे. (
रीया मोठे हिरवट पेरु घे. ( आत्ता आलेत बघ बाजारात) त्यात बीया कमी दिसल्या मला.
आरती मस्त पाकृ. जरुर करणार. फोटो फार छान आलाय.
रीया, पेरुची साल इतकी पातळ
रीया, पेरुची साल इतकी पातळ नसते गं पिकलेल्या पेरुची उभी फोड हातात धरुन दोन्ही टोकांच्या बाजुने हलकी फाकवली तर बियांचा भाग आपोआप सुटून येतो
मस्तच, मला आवडते
मस्तच, मला आवडते
आम्ही पण बीया नाही घेत कारण
आम्ही पण बीया नाही घेत कारण बिया फार कचकचतात दातात.
त्यासाठी कमी बियांचे , मोठे , दळदार , अलहाबादी पेरु घ्यायचे.
आरती , मस्त रेसिपी
त्यासाठी कमी बियांचे , मोठे ,
त्यासाठी कमी बियांचे , मोठे , दळदार , अलहाबादी पेरु घ्यायचे.>> ममो, हे ठाण्यात कुठे मिळतात हे हातासरशी सांगूनच टाक. आणि ते नेमके अलाहाबादीच आहेत हे ओळखण्याची खूणही सांग.
त्यासाठी कमी बियांचे , मोठे ,
त्यासाठी कमी बियांचे , मोठे , दळदार , अलहाबादी पेरु घ्यायचे. > हे मी गृहीत धरलं रीया सॉरी गं
मी बियांसहीत घेतला होता पेरु.
मी बियांसहीत घेतला होता पेरु. कमी बियांचा होता त्यामुळे खुप कचकच नाही जाणवली.
फोटो मस्त.
फोटो मस्त.
ओके माझ्या साठी हा प्रकार
ओके
माझ्या साठी हा प्रकार पुर्नपणे नविन आहे तरीही पेरू आवडतो त्यामुळे करून पाहीन
छान प्रकार... असेच अर्धवट
छान प्रकार... असेच अर्धवट पिकलेल्या केळ्याचे पण करतात.
छान प्रकार... असेच अर्धवट
छान प्रकार... असेच अर्धवट पिकलेल्या केळ्याचे पण करतात.>>
बापरे पंचामृताच्या नक्की किती पाककृती आहेत? मला फक्त दोनच माहिती होत्या. आणि माझी अशी व्याख्या होती की पंचामृत म्हणजे त्यात पाच घटक आलेत. पण इथे आरतीने जी कृती दिली त्यात पाचापेक्षा अधिक घटक आहेत.
बी, पाच पदार्थ गोडाच्या
बी, पाच पदार्थ गोडाच्या पंचामृतात असतात नां ? तुझ्या कृती काय आहेत ?
या पंचामृतातले पाच घटक म्हणजे
या पंचामृतातले पाच घटक म्हणजे तीळ, शेंगदाणे, खोबरं, चिंच आणि गूळ.
पानाच्या डाव्या बाजूला वाढण्यासाठी जे पंचामृत करतात त्यात हे पाच प्रमुख घटक असतात. मग त्यात आवडीप्रमाणे काजू, बेदाणे, मनुका, जर्दाळू, अंजीर घालतात, किंवा आरतीने लिहिलेय तसा पेरू किंवा दिनेशदांनी लिहिलंय तसं केळंही घालतात. मी पेरू वा केळं घातलेलं पंचामृत अजून खाल्लं नाहीये. पंचामृतात बाकी फोडणी, गोडा किंवा गरम मसाला, हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट, कढीपत्ता इत्यादी व्यंजनं आपापल्या आवडीप्रमाणे चव वाढवण्यासाठी/ खुलवण्यासाठी घालतात.
हे पाच घटक वापरून भाज्या करतात त्यांनाही पंचामृती कारली, पंचामृती तोंडली, पंचामृती वांगी अशी नावं आहेत.
आमच्याकडे सर्वसाधारणपणे भरली वांगी अशी पंचामृतीच केली जातात. मसाल्यात कांदा क्वचितच घालतो आम्ही.
सुंदर दिसतंय अगदी ! पेरुच्या
सुंदर दिसतंय अगदी !
पेरुच्या लोणच्यातला पेरु आवडत नाही त्यामुळे हे आवडेल का शंका आहे.
हे माहितीच नव्हते. धन्यवाद
हे माहितीच नव्हते.
धन्यवाद मंजूडी
काजू, बेदाणे, मनुका, >> या गोष्टी मी फक्त गोडाच्या पंचामृतातच बघितल्या होत्या.
गोड पंचामृत म्हणजे दही, दूध,
गोड पंचामृत म्हणजे दही, दूध, तूप, साखर आणि मध.
पण हे पुजेसाठीच तयार करून नंतर मटकावून टाकलं आहे हे वापरून केलेल्या पाककृती जास्त ठाऊक नाहीत (स.पुजेचं तीर्थ वगळता) परवाच हे घटक वापरून केलेला पराठा वाचला.
आमच्याकडे काकडी आणि भेंडीचं
आमच्याकडे काकडी आणि भेंडीचं पंचामृत करतात. ते बहुतेक उपवासाला चालतं.
मस्त आंबटगोड लागत असणार.. सही
मस्त आंबटगोड लागत असणार.. सही रेसिपी.
मैत्रिणीकडून (यूपीच्या) अजून एक कृती समजली, छान आहे नैवेदयाला..
नैवेदयाचं पंचामृत (उत्तर भारतीय):
साहित्यः गोड दही २ कप, दूध अर्धा कप, साखर पाव कप, मध २ टे.स्पून, मखाने (कमळबीजाच्या लाह्या) १० आणि पाच/सहा तुळशीची पाने.
कृती:
एका मिक्सिंग बोलमधे दही, दूध, साखर, मध नीट मिसळा. त्यात मखाने ४ तुकडे करून मिसळा आणि तुळशीची बारीक चिरलेली पानं घाला. नैवेदय तयार
Pages