अ:
४ वाटी ब्राऊन राईस (फुगीर ब्राऊन राईस, बासमती किंवा लाँग ग्रेन शक्यतो नको)
२ वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी हरभरा डाळ
थोडे (अंदाजे १ टी स्पून) मेथी दाणे
बः
३ वाटी ईंस्टंट ओट्स
अर्धी वाटी पोहे
१> नेहेमीच्या डोश्यासाठी भिजवतो त्या प्रमाणे ब्राऊन राईस व डाळी +मेथ्या वेगवेगळे भिजत घालणे.
ब्राऊन राईस नीट वाटला जाण्यासाठी चांगला भिजायला अंदाजे १०/१२ तास लागतील.
२>डोश्याचे डाळ, तांदूळ वाटण्याच्या आधी साधारण १५/२० मिनीटे ईंस्टंट ओटस + पोहे भिजत घालणे.
३>ग्राईंडर मध्ये भिजवलेल्या डाळी + मेथ्या मग भिजवलेला ब्राऊन राईस आणि मग शेवटी ओटस + पोहे असं थोड थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
४>आता वरील वाटलेलं एकत्र नीट मिसळून ते डोश्याचे पीठ उबेच्या जागी फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवावे.
५>पीठ फर्मेंट झालं की लगेचच फ्रीज मध्ये ठेवावे. जास्त वेळ बाहेर राहिल्यास जास्त आंबुस होईल.
नंतर लागेल तसं आणि तेवढ पीठ बाहेर काढून त्यात मीठ घालून मग त्याचे डोसे करावेत.
६>तवा चांगला तापला कि डावभर पीठ डोसा डावानेच तव्यावर पातळ पसरून आवडीप्रमाणे वरुन किंचीत तेल घालणे.
७> डोश्याला सोनेरी रंग आला की तव्यावरुन काढून प्लेट मधे बटाट्याचा मसाला , चटणी, सांबार बरोबर सर्व्ह करावा.
१>ब्राऊन राईस फुगीर मिळतो तो घेतला कि डोसा जास्त चविष्ट वाटला लाँग ग्रेन किंवा बासमती वापरुन केलेल्या पेक्षा .
२>याच पीठाचे उत्तापे देखील छान लागतात
३>हे डोश्याचे पीठ ईथे अमेरिकेत फ्रिज मध्ये ४,५ दिवस छान रहाते.
५>१० मि. हा वेळ डोश्याचे पीठ तयार केल्यावर डोसा करण्यासाठीचा आहे. यात डाळ, तांदुळ भिजण्यासाठी ,वाटण्यासाठी लागणारा वेळ धरला नाही.
या प्रकारे केलेला डोसा :
सही होतात ह्या रेसिपीने डोसे.
सही होतात ह्या रेसिपीने डोसे. मी केले आहेत.
पहिला दोसा भारी दिसतोय.
पहिला दोसा भारी दिसतोय.
मस्त दिसतोय.
मस्त दिसतोय.
पहिला दोसा भारी दिसतोय. >> +१
पहिला दोसा भारी दिसतोय. >> +१
अगदी सुंदर झालाय तो. असा जमला तर मजा येईल
सुंदर.
सुंदर.
लय भारी दिसतोय.
लय भारी दिसतोय.
डोसा एकदम कातील. ओट्सचा दोसा
डोसा एकदम कातील. ओट्सचा दोसा आता करून बघतो
स्स्स काय सुरेख आहे!!
स्स्स काय सुरेख आहे!!
सही दिसतायत. पण काय हे....
सही दिसतायत. पण काय हे.... वेळ आणि कमी करून १.५ मिनिट नाही का लिहिता आला. १० मिनिट वाचून आलेला उत्साह मावळला की
मस्त दिसताहेत डोसे. करून
मस्त दिसताहेत डोसे. करून बघेन.
मस्तच, काय रेसिपि आहे!
मस्तच, काय रेसिपि आहे!
छान आहे पाकृ. नक्की करणार
छान आहे पाकृ. नक्की करणार !
दोसा भारी दिसतोय.>>+१
जहबहरी!
जहबहरी!
मीपु, पहिल्या फोटोतला डोसा
मीपु, पहिल्या फोटोतला डोसा चांगलाच मोठा दिसतोय. एवढा मोठा डोशाचा तवा आहे तुझ्याकडे?
सही! पहिला फोटो तर जबरी
सही! पहिला फोटो तर जबरी दिसतोय.
एकदम भारी फोटो आहेत. माझी ही
एकदम भारी फोटो आहेत. माझी ही बुकमार्क्ड रेसिपी आहे, बघु कधी जमतंय.
शूम्पी, सिंडी, मनीमोहोर,
शूम्पी, सिंडी, मनीमोहोर, धनि, अन्जू, सायो, टण्या, सिम्स, अमितव, सीमा, साहील, राधिका, वत्सला, फा , पारु धन्यवाद लोकहो!
करुन बघा
अमितव,
१.५, २ मिनीटात होणार्या पदार्थांवर बॅन येतो, १० मिनीटेच ठिके
सायो,
तो डोश्याचा नॉनस्टिक तवा तसा रेग्युलर साईझचा आहे गं, फार मोठा नाही, पण बहुधा प्लेट मुळे, डोश्याच्या फोल्ड मुळे किंवा फोटोतल्या अँगलने जास्त मोठा वाटत असावा.
हे बघ, त्याच तव्यातले हे ब्राऊन राईस ओट्स चे डोसे (जुने फोटो), डोश्याची फोल्ड बदलून आणि वेगळ्या अँगल ने काढलेले फोटो
वा, हा शेवटचा फोटो भारीये.
वा, हा शेवटचा फोटो भारीये. मस्त दिसतंय भरलेलं ताट.
वा !! जबरी फोटो
वा !! जबरी फोटो
मस्त इलेक्ट्रीक ग्रिडल वरती
मस्त

इलेक्ट्रीक ग्रिडल वरती पण करता येतील डोसे.
काय सुंदर रंग आलाय डोशाला!
काय सुंदर रंग आलाय डोशाला! भूक खवळली फोटो पाहून.
ब्राऊन राईस व ओट्स म्हणून मला डोसा पण ब्राऊन काळपट होईल की काय असं वाटलं होतं. पण ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा
डोश्याचा फोटो जबरी आहे.
डोश्याचा फोटो जबरी आहे. तोंपासु!
तोंपासु फोटो!
तोंपासु फोटो!
आत्ता भुक लाग् लिना जबरी फोटो
आत्ता भुक लाग् लिना जबरी फोटो बघुन
आई गं! कसला मोहक आहे हा
आई गं! कसला मोहक आहे हा डोसा.
मला हवा आत्ता
खूपच पौष्टिक मिश्रण झाले
खूपच पौष्टिक मिश्रण झाले आहे!
तू खूप बारीक वाटलेस का बॅटर? मला डोशाचे बॅटरच जमत नाही. इडलीचे जमते पण डोशाचे बॅटर रवाळ होऊन मग मी त्याचे जाड साधे उत्तपे करतो. पण असा अगदी कागदासारखा डोसा जमत नाही. काही टिप्स असतील तर दे ना प्लीज.
छान जमलय डोसा !
छान जमलय डोसा !
जबरी फोटो! मस्त दिसतोय डोसा.
जबरी फोटो! मस्त दिसतोय डोसा.
पराग, शँकी, आशूडी, मंजूडी,
पराग, शँकी, आशूडी, मंजूडी, क्रिश्नन्त, रीया, बी, दिनेश, अकु सगळ्यांना धन्यवाद
बी,
ग्राईंडर वर जेव्हढे शक्य आहे तेवढे बारीक वाटते डोश्यासाठी पण अगदी गंधासारख बारीक होतं नाहीच माझ्या ग्राईंडर वर, थोडं रवाळं रहातं . पण डोसे डावाने तव्यावर पातळ पसरले गेले कि क्रिस्पी होतात रवाळ पीठाचेही
बाकी टिप्स अशा नाहीत खरतर पण या गोष्टी करते
१>तवा खूप तापला असेल तर डोसा नीट पसरत नाही, त्यामुळे डोसा घालायच्या आधी ओल्या पेपर टॉवेलने, किंवा थोडे थंड पाणी शिंपडून तव्याचे टेंपरेचर कमी करुन मग त्यावर डोसा घालते. चांगला पातळ पसरला जातो.
२>डोसा तव्यावर घालण्यासाठी स्पेशल डोसा डाव मिळतो त्याने डोसा तव्यावर घालणं, पसरवणं सोयीचं पडतं.
ही रेस्पि मी इथे नसताना आली
ही रेस्पि मी इथे नसताना आली होती वाट्टं. सगळे फोटो कातिल आणि प्रो आहेत.
माझ्याकडे तो ब्राउन राइस आहे. आता हा डोसा ट्राय करून पाहु. उडीद डाळ पण सालवाली घेतली तर चालेल का? (आय अॅम ऑन अति हेल्दी मोड सध्या)
Pages