4 टी स्पून इन्स्टंट कॉफी पावडर (मला nescafe आवडते)
5 टेबलस्पून साखर (दाणेेदारच हवी) प्रमाण आवडीनुसार बदला..
4 कप दूध
1 टेबलस्पून उकळते पाणी.
काल कॉफी आणि बरंच काही पहात होते तर त्यात भुषण प्रधान हॅंड बीटन कॉफी मागतो की चला आता १५- २० मिनिटाची निश्चिंती. त्याच्यावरून आठवलं, अरे किती दिवसात आपण प्यायलो नाही ही कॉफी. होस्टेलच्या दिवसात ऑलमोस्ट रोज व्हायची..
सो, सकाळी उठल्या उठल्या सुरू केली कृती:
१. दूध गरम करायला ठेवा (हि पहिली स्टेप मी नेहमी विसरते )
२. एक स्टीलचा ग्लास किंवा मजबूत मग घ्या.
३. त्यात साहित्यातली सगळी साखर आणि कॉफी पावडर ओता.
४. आता त्यात ते एक चमचा पाणी घालून स्टीलच्या चमच्याने 10 मिनिटे नॉन स्टॉप घोटा. कॉफी आता फेसाळ लाइट ब्राउन दिसायला लागेल. अशी,
५. चार कप मधे गरम दूध ओता.
६. प्रत्येकी एक चमचा तयार कॉफी, चमच्यासह कप मध्ये ठेवा आणि एकदाच हळूूवार ढवळा.. मास्टरस्ट्रोक :p
(क्र. ५ मला अप्लिकेबल नाही कारण हा पूर्ण मग मीच पिणार आहे, एक पुस्तक खाताना)
साखर आणि कॉफीचे प्रमाण आवडीनुसार बदला. मला स्ट्रॉन्ग आवडते..
हां... हीच कॉफी इथे मायबोलीवर
हां... हीच कॉफी इथे मायबोलीवर कांचनकुंद कॉफी म्हणून लिहिली होती (आयडी आठवत नाहीये आत्ता). एकदम जबरी होते. फक्त दुधात कॉफी न घालता कॉफीत उकळतं दूध ओतायचं. मस्त कडक फेसाळ कॉफी तयार होते.
ओह, सॉरी मी नाही बघितली..
ओह, सॉरी मी नाही बघितली.. उडवू का हा धागा?
'धागा उडवा' असं सुचवण्यासाठी
'धागा उडवा' असं सुचवण्यासाठी प्रतिसाद लिहिला नाही मी.
एक फोटो जरुरी है
एक फोटो जरुरी है
मंजूडी, अगं मला वाटलं, डबल
मंजूडी, अगं मला वाटलं, डबल रेसिपी असेल तर ती डिलीट करावी लागते म्हणून विचारलं.
स्निग्धा, येस्स आ रहा है
मस्त !! झब्बू द्यायचा प्रयत्न
मस्त !! झब्बू द्यायचा प्रयत्न करेन
हो मंजुडी, काचमुकुंद असं
हो मंजुडी, काचमुकुंद असं काहीसं नाव होतं कॉफीचं. मी अशीच करते घरी नेहमी. रंग मस्त येतो ह्या कॉफीला..
मस्त! कांचमकुंद कॉफी इथे
मस्त!
कांचमकुंद कॉफी इथे आहे...
याच कृतीने परंतु गार दूध
याच कृतीने परंतु गार दूध वापरून व बर्फाचा चुरा वापरून कोल्ड कॉफी करता येते. आयत्या वेळी जरा क्रीम किंवा आईसक्रीम घालून मिक्सरमध्ये थोडेसे फिरवायचे आणि वरून व्हॅनिला आईसक्रीमचा स्कूप घालायचा. जीव गारेगार होतो.
आता अशीच बनवलेली कॉफी पित
आता अशीच बनवलेली कॉफी पित आहे.
मला इन्स्टंट कॉफी अशीच बनवलेली आवडते. किंवा मग मद्रासी कापी.
अरे ते मद्राशी कापी च
अरे ते मद्राशी कापी च डिकॉक्शन सुद्धा गरम पाण्यात घालून ब्लॅक कॉफी होते. अप्रतीम चवीची!
काय आठवण केली नंदीनी!
माझ्या आजीकडे स्टेनलेस स्टील च कॉफी फिल्टरही होतं. आपल्या पाण्याचं साधं फिल्टर जसं असतं तसलं पण मिनी साईज (फारतर वितभर उंचीचं). वरच्या खणात ४ ते ५ चमचे मद्राशी कापी पावडर घालायची, मग त्यातली जाळी कोरड्या कॉफीवर जरा दाबून बसवायची अन दीड ते दोन कप खळखळून उकळतं पाणी वर ओतायचं. आर्ध्या तासात डिकॉक्शन तयार. हे डिकॉक्शन वापरून मग गरम दूध + साखर घालून कॉफी करायची.
पुर्वी कॉफीची वडी मिळायची. ती
पुर्वी कॉफीची वडी मिळायची. ती कॉफी खूपच वेगळी लागायची. त्यात एक स्मोकी फ्लेवर असायचा. ती वडी आता मिळते का? ही बात ८० च्या दशकातली आहे. जुनी गाणी, ३ वाजताची कॉफी चहाची वेळ. मस्त!!!
अरे तो कॉफीचा मग की कप किती
अरे तो कॉफीचा मग की कप किती क्युट आहे. त्यावरवा तो हत्ता आणि ती अंबारी सही दिसते आहे प्रचि.
हो बी, मिळते ती वडीवाली कॉफी
हो बी, मिळते ती वडीवाली कॉफी बहुतेक. मी रीसेंटली अकोल्याला घरीच पाहीली आहे. इथे विचारावं लागेल.
हिरवा लेयर कशाचा आहे ?
हिरवा लेयर कशाचा आहे ?
योकु, नीट माहिती काढ जमल्यास
योकु, नीट माहिती काढ जमल्यास आणि सांग. मला ती कॉफी प्यायची आहे. व्दीवाली - हे नाव मला माहिती नव्हते. धन्यवाद.
अकु, मस्तं आयडिया.. नंदिनी,
अकु, मस्तं आयडिया..
नंदिनी, मद्रासी फिल्टर कापी क्या याद दिलाई!!
योकु, सही, माझ्याकडे पण आहे तो फिल्टर
योकु, माझ्याकडे आहे तसलं
योकु, माझ्याकडे आहे तसलं फिल्टर.
इकडे आल्यावर सेल्व्हीला एक दोनदा चहा करून दिला, आवडला नाही. म्हटलं तुला जसा हवा तस करून घे, तर मला म्हणाली. शंभर रूपये द्या. (हे फारच भारी कम्युनिकेशन होतं तेव्हा तमिळ यायचं नाही) मला वाटलं पैसे हवे असतील, पगारातून कापूच तर ही दुसर्या दिवशी तो फिल्टर, कापी पावडर घेऊन आली. तेव्हापासून आमच्यकडे रोज एक कप फिल्टर कापी होतेच होते. आता सेल्व्ही कामाला येत नाही, पण आय्म्माला कापीच हवी असते.
योकु - तू वडीवाली ऐवजी
योकु -
तू वडीवाली ऐवजी व्दीवाली लिहिलेस. मला वाटले की तेच त्या कॉफीचे नाव आहे
जाई तो हिरवा नाहिये पांढराच
जाई तो हिरवा नाहिये पांढराच आहे, माझ्या सेल्फोन कॅमेराची मिश्टेक आहे ती :p
बी, धन्स, माझाही आवडता मग आहे
बी, धन्स, माझाही आवडता मग आहे तो.. एकदम इंडिअन लूक आहे त्याचा
मी नेहमी अशीच करते कॉफी -
मी नेहमी अशीच करते कॉफी - ब्रु कॉफी वापरून.
पण मद्रासी फिल्टर कापी सबसे बेस्ट!!!! मणीला भेट द्यायला हवी.
अय्यो मणीज! कसल्या आठवणी
अय्यो मणीज! कसल्या आठवणी निघताहेत आज...! गरम्मागरम वडा सांबार चटणी (किंवा काहीही दुसरं सौदिडिंअन ब्रेफा) वर दोन कप फिल्टर कापी! वाटी+लहान फुलपात्रातून मिळणारी. आण्णा आपल्या टेबलाशी येऊन पार मीटर - दीड्मीटर वरून ती कापी खाली वर करून देणार... मस्त!
मला नै आवडत कॉफी.. कधीतरी
मला नै आवडत कॉफी..
कधीतरी घेते..पण जेव्हाही घेते तेव्हा अशीच बनवते..हँड बीटन
मला पण साखर कमी हवी आणि स्ट्राँग..नेसलेचे छोटे दोन पॅकेट पाऊण कॉफी मग साठी..
माझ्याकडे माझा खुप खुप आवडता मग आहे..मिळाला तर प्रचि डकवते..तसा सर्वांना आवडेलच अस नाहीए पण त्या मागच्या फिलींग्स क्लास आहेत..
आसो..
कॉफी मग आवडला कि घे विकत या सदरात मोडतो माझा त्यामुळे खुप सारे घेतलेत आजपर्यंत..
कॉफी मग साठी धागा काढावा का ?
एकदम ऋन्मेष आठवला मला
कॉफी मग साठी धागा काढावा का
कॉफी मग साठी धागा काढावा का ?
एकदम ऋन्मेष आठवला मला फिदीफिदी>> अगदी..
व्वा... रेसिपी करुन पाहण्यात
व्वा... रेसिपी करुन पाहण्यात येईल.
कॉफीफॅनक्लबात म्या भी. काहीच नाही तर कॉफीवाली कॅन्डी सुद्धा चालते !
मद्रासी कापीची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद. काल मुद्दाम ठरवून इथल्या 'सर्वाण्णा भवन' तून मद्रासी कापी पिऊन आलो.
काही म्हणा ही मद्रासी फिल्टर कापी एका छोट्या पेल्यातून मोठ्या पसरट पेल्यात ओतून गार करुन पिण्यात जी मजा आहे ती बरिस्ता, कोस्टा च्या चकचकीत मोठाल्या कपात किंवा डिस्पोजेबल ग्लासांत नळी घातलेल्या कॉफ्यांमधे अजिबात नाही
मी पण कॉफी गटात. रोजची सकाळ -
मी पण कॉफी गटात. रोजची सकाळ - संध्याकाळची कॉफी अशीच घेतली जाते.
ते कॉफीचं छोटं फिल्टर आईकडे पण आहे. मला पण शोधायला हवं इथे. रोस्टेड कॉफी बीन्स मिळाल्यात, त्या वापरता येतिल.
काल मुद्दाम ठरवून इथल्या
काल मुद्दाम ठरवून इथल्या 'सर्वाण्णा भवन'>>> सरावन्ना भवन. सरावन्ना= मुरूगन= कार्तिकेय
मी थोडं उलटं करते यात. ब्रू
मी थोडं उलटं करते यात. ब्रू वापरते. पाणी घालून फेटून घेते मग त्यात उकळतं पाणीच ओतते आणि इलुससं दूध. साधारण पूर्ण क्वांटिटिच्या पाऊणपट पाणी आणि पावपटच दूध.
एकदम मस्त आणि स्ट्राँग..
फिल्टर कॉफीचा फिल्टर किंवा कॉफीमेकर हे काहीतरी घ्यायचंय एकदा पण बघू.
छान आहे ही कृती.. पुर्वीची
छान आहे ही कृती.. पुर्वीची कृती आल्यावर बर्याचवेळा करून बघितली.. आता साखरेवरील निर्बंधामूळे नाही करता येत ! ( निर्बंध साखरेवर नाहीत.. माझ्यावर आहेत !!! )
Pages