- एक पातीच्या कांद्याची जुडी त्यातल्या कांद्यांसकट (८ ते १० नग असतात बहुधा एका जुडीत)
- तेल
- तिखट
- हळद
- मीठ
- हल्दिराम भुजिया सेव चं एक साधारण साईजचं पाकीट
- पात + त्याबरोबरचे कांदे स्वच्छ करून बारीक चिरून घ्यावेत
- तेलावर मोहोरी, हळद, लाल तिखट घालून कांदा परतावा. एक वाफ आली की पातही घालून नीट परतावं. मीठ घालावं.
- वाफेवरच भाजी शिजू द्यावी. नीट शिजली की भाजीच्या प्रमाणात भुजिया शेव घालून पुन्हा एकदा परतून भाजी खायला घ्यावी.
- साधा पराठा, तेल लावलेली पोळी याबरोबर ही भाजी चवदार लागते.
- मीठ घालतांना जरा जपून. भाजी आक्रसते वाफ धरल्यावर आणि भुजिया शेवेतही बर्यापैकी मीठ असतंच.
- पातीचा कांदा फार जून नको, फारच उग्र असतो मग बहुतेकवेळेला.
- बाकी काही मसाला घालायची गरज नाही यात. शेवेचा खमंगपणा मस्त लागतो. पिवळी शेव + हिरवीगार कांदापात दिसायलाही छान दिसतं.
- हवं असेल तर फोडणीमध्ये लसूण परतून घेता येईल.
भुजीया शेव न्यु अॅडिशन आहे
भुजीया शेव न्यु अॅडिशन आहे माझ्यासाठी..
मस्त वाटत आहे..
फोटो कुठयं ?
योकु शेव संपवायची मस्त आयडीया
योकु शेव संपवायची मस्त आयडीया दिलीस. माझ्याकडे खुप जास्ती लसूण शेव शिल्लक आहे. विकांताला कांद्याची पातही आणलेली आहे. आता आज संध्याकाळी करून टाकतो. झटपट होईल भाजी. सोबत मस्त लिंबू आणि पोळ्या घेतो.
मस्त झटपट पाकृ वाटतेय. करून
मस्त झटपट पाकृ वाटतेय. करून बघणार
पातीच्या कांद्याची भाजी
पातीच्या कांद्याची भाजी घातलेले पट्टीसमोसे फार छान लागतात.
डबलपट्टीकाढली.
डबलपट्टीकाढली.
शेवेची आयडिया भारी! मीठ खरंच
शेवेची आयडिया भारी! मीठ खरंच अगदी हलक्या हातानं घालावं लागेल. भाकरीबरोबरही मस्त लागेल ही भाजी.
वॉव.. एकदम तोंपासू रेसिपी
वॉव.. एकदम तोंपासू रेसिपी
खारी बुंदी घालुन पालक आणि
खारी बुंदी घालुन पालक आणि थोड़ी मेथी अशी करते मस्त होते.संजीव कपूरची रेसिपी आहे.
आता कांद्याच्या पातीची अशी करीन. छानच होईल.
शेवेची आयडीया भारी आहे.
शेवेची आयडीया भारी आहे. नेहमी ह. डाळीचं पीठ पेरुन केली जाते. शेव घालून करुन बघणार.
अरे वा मस्त भाजी. हेमाताई
अरे वा मस्त भाजी.
हेमाताई खारी बुंदी, आयडीया मस्त.
भिजवलेल्या डाळी घालून आपण वेगवेगळ्या भाज्या करतोच. पण तळलेली मुगडाळ, चणाडाळ मिळते. त्या घालुन पण परतलेल्या भाज्या छान होतात. पालेभाज्या, घोसाळे, शिराळे वगैरे.
शेवेची आयड्या भारी, करून
शेवेची आयड्या भारी, करून बघणेत येईल.
(स्पेसिफिकली हल्दीरामची शेव म्हणजे वैदर्भीय रेसिपी दिसते. :P)
नाय ओ... मी म्हमईतच खाल्ली
नाय ओ... मी म्हमईतच खाल्ली होती
अंजु, मस्त आयडिया .तळलेली मुग
अंजु, मस्त आयडिया .तळलेली मुग डाळ घातली तर घोसाळ्याच्या भाजीचा अगदी मेकओवर होईल ग.
हो छान होतात हेमाताई. डाळ जरा
हो छान होतात हेमाताई. डाळ जरा उशीरा घालते म्हणजे खातानापण थोडा कुरकुरीतपणा रहातो आणि विशेष म्हणजे एकदा सहज केलेला हा प्रयोग नव-याला खुप आवडला. मग करते अधुनमधुन. दोन्ही डाळी घालते.
मस्त वाटतेय!! ईबा
मस्त वाटतेय!!
ईबा
मेरे पास भी लसूण शेव है, करके
मेरे पास भी लसूण शेव है, करके देखेंगे.
भुजिया शेव घालण्याची भारी
भुजिया शेव घालण्याची भारी आयडिया सुपीक डोक्यातली आहे! भाजी करून बघायला हवी.
भुजिया शेव घालण्याची भारी
भुजिया शेव घालण्याची भारी आयडिया सुपीक डोक्यातली आहे!>> अगदी अगदी!
हैला... भारी आहे रेसिपी. करून
हैला... भारी आहे रेसिपी. करून बघेन लवकरच.
भारी ! डाळीचं पीठ लावून
भारी ! डाळीचं पीठ लावून नेहेमी करते पण डाळीच्या पिठाची शेव वापरुन करता येईल हे कधीच सुचलं नाही.
लवकरात लवकर करणार !
मस्त वाटतेय रेसिपी . फोटु
मस्त वाटतेय रेसिपी . फोटु टाकायची कृपा करावी .
स्वाती
भारी आयडिया आहे. नक्कि करणार.
भारी आयडिया आहे. नक्कि करणार. धन्यवाद.