हिंदुंनी विशिष्ट वारी मांसाहार न करणेबाबत (discussion on conflict of calendars)

Submitted by स्पॉक on 21 August, 2015 - 03:35

टिपः या धाग्याच्या सोयीसाठी हिंदु / हिंदु धर्म = हिंदु धार्मीक समुह या अर्थाने वापरला आहे .

मासांहाराबाबतीत "काही" जण सोमवारी किंवा मंगळवारी न खाता ईतर दिवशी खातात.
ईथे प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार वार बदलतो.

ईथे मी कुणाच्याही श्रद्धेवर आक्षेप घेतलेला नाही. ती श्रद्धा पाळताना हे जे वारांचे गणित आहे ते योग्य आहे की नाही असा प्रश्न मला पडला आहे.

आपण जे सद्ध्या कॅलेंडर फॉलो करतो आहोत ते तर ख्रिती ग्रेगोरीयन कॅलेंडर आहे ना? भारतात ग्रेगोरीयन आणि हिंदु (नेपाळी) असे दोन अधिकृत कॅलेंडर असल्याचे कळते.

उदाहरणः समाजा एखादी व्यक्ती म्हणत असेल की, सोमवार हा शंकराचा वार असल्यामुळे मी आज मांसाहार करणार नाही. ठीक आहे. पण हा सोमवार तर ख्रिस्ती ग्रेगोरीयन कॅलेंडर प्रमाणे आहे ना? तुमच्या स्थानीक हिंदु कॅलेंडर(महाराष्ट्राच्या केस मधे "शके") प्रमाणे सोमवार आहे का आज?

विकी वर हिंदु कलेंडरांचे फक्त महीने दिले आहेत.

  • इतिहासाप्रमाणे पुर्वी हिंदु कॅलेंडरात वार होते का?
  • त्यांची नावे आणि गणित काय होतं?
  • हे सोमवार, मंगळवार वगैरे, निव्वळ ग्रेगोरियन कॅलेंडराचे भाषांतर आहे की एतिहासीक वेदिक संस्कृतीत असे "सात" वार होते?
  • हे विशिष्ट वारी न खाण्याची फॅड आत्ता ब्रिटीश काळानंतरचे आहे की फार पुर्वि पासुन भारततील हिंदु (जे जाती/धर्माप्रामाणे पुर्र्वीही मासांहर करत होते) ते तेव्हाही प्राचीन काळी वार पाहुन मांसाहर करत असत?
  • आपली (उपास करण्याची / मांसाहर न खाण्यची ई. ई.) जी काही श्रद्धा, ज्या कोणत्या धर्माप्रमाणॅ आहे, त्या धर्माच्या गणिताप् रमाणे / पदद्धतीप्रमाणॅ ती श्रद्धा पाळायला नको का? परक्या कॅलेंडरप्रमाणे पाळलेली श्रद्धा आपल्या देवाला पोहोचते का?

संकष्टी , विनायकी , एकादशी ई. हे सगळे हिंदु कॅलंडरप्रमाणे येतात आणि तसेच पाळले जातात. त्यामुळे काही प्रश्न नाही. ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणॅ येत नाहीत.

पण ,सोमवार, मंगळवार ई. ग्रोगोरीयन प्रमाणॅ येतात आणी त्या वारी करायचा उपास / मासांहार न करणे ई. त्यांच्याप्रमाणे पाळलेजातात. हे लॉजीकल नाही.

नाईलाजाने (मी हे वार वगैरे पाळत नाही) फारच गवत खावे लागल्यामुळे कोतबो मोड मधे हा प्रश्र विचारलेला आहे Sad
तरी दोन कॅलेंडरां मधील "परस्परविरोध"(conflict) अशी चर्चा अपेक्षीत असुन धार्मीक चर्चा अपेक्षीत नाही.
धन्यावाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही विषयांची सरळमिसळ केली आहे. माँसाहार विशिष्ट वारी का करू नये पेक्षा चर्चा (discussion on conflict of calendars) ह्या विषयावर व्हायला पाहिजे.

दोन्हीत खूप फरक आहे. अजूनही जर विषय बदलता आला आणि स्कोप तेवढाच ठेवला ( हिंदू व्हर्सेस ग्रेगरीयन ) तर चर्चेला मजा येईल.

तुमच्या विषयव्याप्तीमुळे ट्रोलधाड पडणार ह्यात जराही शंका नाही

.

शाकाहार उपलब्ध असेल तर कोणत्याही वारी मांसाहार करु नये पण हे कोणी थोपल म्ह्णुन किंवा घरातिल रुढी-परंपरा संस्कारआहे म्हणुन नव्हे तर मनात प्राणिमात्रे विषयी दया, प्रेम ,करुणा हे भाव जागृत होऊन निर्मित होऊन त्याचा त्याग केला गेला असावा.

बाकी जे खातच नाहित त्यांना वार तिथिने काय फरक पडणार.

या धाग्याच्या सोयीसाठी हिंदु / हिंदु धर्म = हिंदु धार्मीक समुह या अर्थाने वापरला आहे ज्यात शिख, जैन, बुद्ध ई सामाविष्ट आहेत.
>>
ह्यावरून धागा जोर्यात वाहणार Lol पॉपकोर्न !!!

बाकी सरळ सोप्पे लॉजिक आहे. मंगळवार, गुरवार आणि शनवार बर्याचदा लोक मांसाहार टाळतात. हे वार बर्याचदा उपवास म्हणून धरले जात असल्याने मुख्यत्वे मांसाहार किंवा इतर चमचमीत आहार टाळला जातो Lol

बाकी घरात एखादी पूजा असेल तर मांसाहार टाळावा (अर्थात मांसाहारी स्वयंपाक असेल तर काय बोला)
इतर वेळी … बिनधास्त खावा!

मलातरी श्रावण महिना किंवा चातुर्मास वगैरे आहे म्हणून खात नाही म्हणजे फालतूपणा वाटतो. अरे इतर वेळी खाता न, मग श्रावण काय सोडता?

शीखांमध्ये ह्या गोष्टी नसाव्यात कारण मित्रांना असे स्पेसिफिक वार पाहून न खाणे वगैरे करतांना पाहिले नाहीये , आणि जैनांमध्ये शाकाहारच असतो, त्याचं स्पेशल व्हर्जन असलेला.

केदार, मांसाहार विशिष्ट वारी करा वा न करा. ती श्रद्धा आहे.
पण, ज्या धर्मा प्रमाणे ही श्रद्ध आहे, त्या धर्माच्या गणिता (कॅलेंडर) प्रमाणे ते पाळायला नको का?
त्यामुळे ही सरमिसळ नाही.

हे वार बर्याचदा उपवास म्हणून धरले जात असल्याने >> कोणया बेसीस वर? ग्रेगोरीयन की हिंदु कॅलेंडर्प्रमाणे इज दी प्रश्न.

या धाग्याच्या सोयीसाठी हिंदु / हिंदु धर्म = हिंदु धार्मीक समुह या अर्थाने वापरला आहे ज्यात शिख, जैन, बुद्ध ई सामाविष्ट आहेत.
>>
ह्यावरून धागा जोर्यात वाहणार हाहा पॉपकोर्न !!!>>>>>

अगदी बरोबर शिख, जैन, बुद्ध ई ला हिंदू म्हणुन घ्यायला आवडत नाही त्यांची स्वतंत्र ओळख आहे.

हिंदू म्हणुन घ्यायला आवडत नाही >> त्यांची "आवड" महत्वाची नाही. हे सगळॅ हिंदु धर्माचेच उपशाखा होते सुरुवातीला.

त्यांना यात समाविषट करण्याचे कारण असे की, हे सगळे वेगळॅ होण्या आगोदरच्यापासुनचा इतिहास याबब्तीत काय सांगतो, ते ईथे अपेक्षीत होते.

तरी, राजकीय कारणांमुळे काढले आहे.

आज गुरुवार आहे म्हणून उप्वास आहे. पण हा गुरुवार तर ग्रेगोरीयन कॅलेंडर्प्रमाणॅ आहे ना?
पुर्वी जेव्हा अमुक देवासाठी अमुक वार पाळावा असे ठरले असेल तेव्हा ग्रोगोरीयन कॅलेंडर होते का?
मग त्या हिंदु कॅलेंडरप्रमाणॅ उप्वाल / खाणॅ ई. पाळायला नको का?

कधी काळी पंचांग थोडस वाचल होत, त्यात तिथी, वार नक्षत्र वगैरे आठवत, सो वार हे हिंदू कालगणनेत होतेच! त्यामुळे त्यांनी ते ते वार त्या त्या देवतेच्या उपवासासाठी ठेवले असतील. नंतर ते सरळ सरळ इंग्रजी कालगणतेत वापरल्या गेलेत.

दोन कॅलेंडर वापरणे प्रचंड त्रासदायक प्रकार असतो Lol त्यात एक सूर्यावर आणि दुसर चंद्रावर असेल तर अजूनच गोंधळ.

अवांतर:
२४ तासाचा दिवस, ७ दिवसांचा आठवडा ३६४ / ३६५ दिवसांचे वर्ष हे सर्व संस्कृतीमध्ये होते, ते मानवानी सामायिक रित्या लावलेल्या शोधांपैकी मानले जातात (नेमका शब्द आठवत नाही) कारण प्रत्येकानेच कालगणना केली होती.

ई.स.पु ५०० बॅबिलीयोन मध्ये पहिल्यांदा सात दिवसांचा आठवडा पद्धत अस्तित्वात आलेली अस कुठेतरी वाचलेलं. व्यापार उदीम, साम्राज्यविस्तार इत्यादी तऱ्हेने इतर लोकांनी तीच पद्धत आपल्याकडे वापरली असवी. पद्धत वापरली आहेच तर त्याला भारतीय तोंडावळा देण्यासाठी वारांची नावे सुद्धा इथल्या संस्कृतीप्रमाणे अस्तित्वात आली असावीत.

मला वाटतं हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून आहे .
आमच्या कडे हे चालत , आमच्या कडे हे चालत नाही .हे सरार्स आहे .

माहेरी पाच दिवसाचा गणपती येतो . त्यामुळे लहान्पणापसून आम्ही श्रावण नेमाने पाळायचो.
मांसाहारचे वार फक्त बुधवार , शुक्रवार आणि रविवार .
संकष्टी , विनायकी , एकादशी चुकुनही मांसाहार नाही.

माझे लग्न झाल्यावर ,नवरा बारामाही मांसाहारी मिळाला .
कुठलाही वार पाळणं त्याला पटत नाही.एकदा नवर्याने श्रावणी सोमवारी बाहेरून चिकन मागवल होतं , मी फार बडबड केली.
मी पहिल्यापासून नेम केल्याने अजूनही सोमवार , मंगळ्वार आणि गुरुवार पाळते . बाहेर जेवायला गेले तरी फक्त शाकाहारी. आता श्रावण पाळत नाही.पण श्रावणी शनिवारी चुकुनही मांसाहार करत नाही. विनायकी , एकाद्शी ला खाते चिकन वगैरे पण संकष्टीला चुकुनही नाही.

मी खात नसले तरी कुठल्यावारी घरात केलेलं , खाल्लेलं चालत ,पण गुरुवारी नाही . नवर्याने एक्दा घरी आणून खालेल्ल आणि लेकालाही खाउ घातलं होतं , मी आकांततांडव केलं होतं .
गुरुवारी घराबाहेर जाउन खा , घरी ना शिजवायचं ना बाहेरून आणायचं .

माहेरी असले तर तेच नियम परत लागू. पण सासरी नियम शिथिल. Happy .

स्पॉक, तुम्ही दुर्गा भागवतांनी लिहिलेले निसर्गचक्र पुस्तक वाचा.
त्यात याचा छान उहापोह केला आहे.
विशेषत: ग्रेगेरियन कॅलेंडरमधील दिवस आणि महिन्यांचा.
सध्या माझ्याकडे ते पुस्तक नसल्याने डिटेल्स देता येत नाहीयेत.

बाकी दिवस हिंदु/ भारतीय कॅलेंडरप्रमाणे सकाळी पहिल्या प्रहरी सुरू होतो तर आधुनिक पद्धतीत रात्री बारा वाजता.
रात्री बारा ते सकाळी साधारण चार साडेचारपर्यंत जन्मलेल्या मुलांच्या पत्रिकेत चक्कं आदला वार जन्मवार म्हणून लिहिलेला असतो.

ब्रिटीश्/मुस्लिम राज्यकर्ते येण्यापूर्वी कार्यालयीन कालमापनासाठी तरी पाक्षिक पद्धती वापरत होते. आणि तिथीनुसार कालगणना होऊन अमावस्या आणि पौर्णिमा सुट्टीचे वार असत.

राम्/कृष्ण किंवा पुराणातल्या कुठल्या मुख्य व्यक्तीची जन्मतिथी लिहिलेली असते पण वार नसतो.
बहुतेक वारांना महत्त्व इस्लामी ब्रिटीश शासनकाळात आले असावे.

बाकी काय खावे, काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्नं.
एक डायबेटॉलॉजिस्ट म्हणून मी पेशंटसना आठवड्यातून केवळ दोन किंवा तीनवेळा मांसाहार करण्यास परवानगी देते.
याकरिता सपोर्टिंग म्हणून माझ्याकडे शेकडो स्टडीजच्या लिंक्स आहेत.
पण त्या काही इथे देवून फायदा नाही.
Wink

संकष्टी , विनायकी , एकादशी चुकुनही मांसाहार नाही. >> हो सगळे हिंदु कॅलंडरप्रमाणे येतात आणि तसेच पाळले जातात.
ते ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणॅ येत नाहीत.

पण ,सोमवार, मंगळवार ई. ग्रोगोरीयन प्रमाणॅ येतात आणी त्यांच्याप्रमाणे पाळलेजातात.

मांसाहार पचायला जड असतो.त्यामुळे असेल कदाचित ,एक दिवसाआड मांसाहार करतात.तेवढाच पोटाला आराम.
हे नुसते सांगितले तर कोणी ऐकणार नाही म्हणून दैवताचे वार वगैरे पाळत असावेत.अर्थात हा केवळ तर्क आहे.

श्रावण किंवा चातुर्मास पाळणे यात या ऋतूंमधे माशांचा ब्रिडिंग सीजन असतो.मासे उथळ भागांत अंडी घालायला येतात.पुढे अजून मासे खायला मिळायला हवे तर त्यांच्या ह्या सीजनमध्ये मासे टाळलेले बरे.तसंच पावसाळी हवा ,अशुद्ध पाणी, मंद जठराग्नी हे घटकही मांसाहार वर्ज्य करण्यास कारणीभूत आहेत.नका खाऊ म्हणून सांगितले तर लोक ऐकणार नाहीत,तेव्हा धर्माचा आधार.बाकी काही नाही.

हिंदु पंचांगात पण वार आहेत. आणि ते वार प्रत्येक ग्रह/ देव यांना समर्पित केले आआहेत.
वार, तिथी,नक्षत्र, योग, कर ण हे ५ अंग आहेत पंचांगाचे.

हिंदु आणि पाश्चात्य कॅलेंडर मध्ये महिने वेगळे आहेत. दिवस नाहीत

देवकी, एखादा व्यक्ती श्रद्धा का पाळात असेल हे तुम्ही सांगता आहात. ते अपेक्षीत नाही.

राहुल, हिंदु आणि पाश्चात्य कॅलेंडर मध्ये महिने वेगळे आहेत. दिवस नाहीत.
>>
हिंदुंचे वर्ष आणि पाश्चात्य वर्ष एकाच दिवशी सुरु होत नाहीत. असे असताना त्या दोन्ही वर्षातील सगळे दिवस एग्झॅक्टली तेच सारखे कसे असतील.
एवढेच नाही, दोन्ही वर्ष ईतिहासाता वेगवेगळ्या वेळी बनवले आणि लागु केले गेले.
त्यांची वेगवेगळी गणितं आहेत. लिय ईयर, अधिक मास ई ई सर्व बाबी विचारात घेता,
हिंदु सोमवार आणि पाश्चात्य सोमवार; "सदासर्वकाळ" एकाच सोमवारी कसे येतील?
जेव्हा येतील तो निव्व्ळ एक योगायोग असेल.

देवकी, एखादा व्यक्ती श्रद्धा का पाळात असेल हे तुम्ही सांगता आहात>>>>> अजिबात नाही.
हे विशिष्ट वारी न खाण्याची फॅड आत्ता ब्रिटीश काळानंतरचे आहे की फार पुर्वि पासुन भारततील हिंदु (जे जाती/धर्माप्रामाणे पुर्र्वीही मासांहर करत होते) ते तेव्हाही प्राचीन काळी वार पाहुन मांसाहर करत असत? >>>> याला उद्देशून आहे.

<<हिंदु सोमवार आणि पाश्चात्य सोमवार; "सदासर्वकाळ" एकाच सोमवारी कसे येतील?>>

स्पॉक, याचे उत्तरही देऊ शकते पण नेमके संदर्भ सध्या माझ्या माहेरच्या घरी राहिलेत.
Happy

आणि विकीपेडियावरचे उसने संदर्भ द्यावेसे मला कधीच वाटत नाही.

तर- पूर्वी युरोपात बर्‍याच ठिकाणी आठ दिवसांचा आठवडा असायचा.
बहुतेक इथे पण असेलच.
नाहीतर आठवडा कसे म्हणाले असते?
चंद्रभ्रमणाच्या पद्धतीनुसार योग्य ते गणित करून भारतातल्या लोकांनी दिवसाचे २४ होरे ठरवले आणि अश्या २४ होर्‍यांचा एक दिवस एकेका ग्रहाला समर्पित केला. (त्यातही सोमवारी म्हणे चंद्राशी संबंधित अधिकाधिक होरे असतात. पण त्यावद्दल मला काही माहिती नाही.)
तर त्यावेळी म्हणजे इ स पूर्व १०० ते २०० या काळात ग्रीक आणि आशियात व्यापार उदीम चालत असे आणि त्याबरिबरच ज्ञानाची देवाणघेवाणही.
त्यामुळे त्यानंतर दोन्ही पद्धतींत बहुदा समन्वयाने हे सारखेच वार सुरू झाले.
अर्थात यात ग्रीक म्हणतात आम्ही ज्ञान भारतीयांना दिले आणि भारतीय म्हणतात ग्रीकांनी / अरबांनी आमचे ज्ञान नेले.
अर्थात आपल्याला त्या वादाशी काही देणे घेणे नाही.
पण म्हणजे त्या इस पूर्व दुसर्‍या शतकाच्या आसपासच दोन्ही क्यालेंडरे किमा वार तरी सारखा दाखवू लागली.

इथे त्यावेळी बहुदा गुप्त साम्राज्य होते. त्यामुळे किती धार्मिकता होती माहितच आहे.
त्यानुसार वारांना देव चिकटवून मांसाहार करणे/न करणे/ उपास करणे सुरू झाले (असावे)
असावे लिहित्येय कारण गुप्तकाळातला माझा इतिहास कच्चा आहे.

पण तुम्हाला खूप चांगले प्रश्न पडत आहेत तर तुम्ही या अनुशंगाने नक्की चांगले वाचन करा आणि काही इंटरेस्टींग मुद्दे मिळाल्यास इथे लिहा.

साती आणि सुन्याटून्या आपण जी व्यापार उदीमामुळे दोन्ही कॅलेंडर फार पुर्वीच समान झाली असतील अशी शक्यता वर्तविली आहे, त्या दृष्टीने आणखी माहिती घेतो.

सातीजींसाठी अवांतरः
उसने संदर्भ म्हणजे काय?
जे संशोधन मी स्वतः केलेले नाही आणि पुस्तके वाचुन, विकीपिडीया वाचुन किंवा तज्ञांची मते जाणुन घेतली तर ही सगळे, उसने संदर्भच झाले की?
मुळाज जोपर्यंत आपण स्वतः "आपल्या वाटेचा" अभ्यास करतो आहोत तो पर्यंत संदर्भ कुणाचे आहेत हे का मॅटर करावे?
तसेही विकी वर राजकीय विषय सोडता सगळॅ ९९% बरोबरच असते.
विकी बद्दला तुमचे काय आक्षेप आहेत ते जाणुन घ्यायल आवडेल.

वार का पाळतात या बाबत सिंपल फंडा आहे,
माणूस काही वाघसिंह नाही जे रोज मांसमटण (भले शिजवलेले) खाऊन पचवेल.
तसेच माणूस म्हणजे काही भेडबकरी नाही, जे रोज घासफूस खाऊन जगेल.

म्हणून मग सोमवार-मंगळवार पाळा
बुधवारी खा
गुरुवार परत पाळा
शुक्रवारी खा
शनिवार पाळा
रविवारी तर दाबून खा !

अश्याप्रकारे आठवड्याचे विभाजन केले आहे.

पुढे जाऊन प्रत्येक जण आपल्या शाकाहार-मांसाहाराच्या आवडीनुसार आणि श्रद्धेनुसार हे पाळायचे आणि खायचे दिवस कमीजास्त करतो.

मी स्वत: वर्षाचे ३६५ दिवस खाऊ शकतो, पण तब्येतीची काळजी घेत रोज खात नाही. कारण मला स्वत:च्या जिभेवर कंट्रोल ठेवायला या उपायांची गरज लागत नाही.

याचा एक फायदा मात्र होतो, दुपारच्या जेवणात कोणाच्या डब्यात आदल्या दिवशीचे म्हणजे रविवारची, बुधवारची वा शुक्रवारची मांसमच्छी दुसर्‍या दिवशी असेल तर बरेच न खाणारे कटतात आणि माझ्या वाटणीला दरवेळी जास्त येते. Happy

असो, मुळातच हे वार केवळ श्रद्धेचा भाग आहेत,
आणि एकदा का तुम्ही कुठूनही २४ तास मोजले आणि तुमच्या भावना देवापर्यंत पोहोचल्यात यावर श्रद्धा ठेवली की तुम्हाला हे प्रश्न पडायलाच नकोत. Happy

चंद्रभ्रमणाच्या पद्धतीनुसार योग्य ते गणित करून भारतातल्या लोकांनी दिवसाचे २४ होरे ठरवले आणि अश्या २४ होर्‍यांचा एक दिवस एकेका ग्रहाला समर्पित केला. .>>>>>> साती, मानलं तुम्हाला.१-२ महिन्यांपूर्वीच्या लोकसत्तेत
वर्षाचे ३६० -३६५ दिवस ,अधिक महिन्यांची कारणमिमांसा वाचली होती इतकंच आठवतेय.काय वाचले ते नाही.परत एकदा hatts off to u!

माननीय ऋन्मेऽऽष महोदय, स.न.वि.वि.
आपली बौद्धीक आणि सामाजीक जाण बघता मला या जन्मी तरी कधी त्या "लेव्हल" पर्यंत पोहोचता येईल असे वाटत नाही.
तस्मात, कृपया आमच्या नादी लागुन स्वतःची (उरलीसुरली) धुळीत मिळवुण घेवू नये तसेच आपल्या अमुल्य ज्ञानमौक्तीकांनी आमचे लेखन सजवु नयेत ही नम्र विनंती.
- "स्पोक"

स्पॉक मी शक्यता वर्तवली नाही.
ती तशी आहे असा लोकांचा अभ्यास आहे.
Happy

उसने संदर्भ म्हणजे विकीपिडीयावरच्या संदर्भांचे उत्तरदायित्त्व कोणाला नसते.
तुम्ही एखादी चुकीची माहिती आरामात दडपू शकता कींवा काहिही लिहून पुढे सायटेशन रिक्वायर्ड असं लिहीलंत की झालं!
थोडक्यात दुसर्‍याने तिसर्‍याचा दिलेला संदर्भ!
याउलट मी स्वतः वाचलेल्या एखाद्या ग्रंथाचा , संशोधनाचा संदर्भ दिला तर तो फर्स्ट हँड रेफरंस ठरतो.

हल्ली मी विकीपिडीया पहातच नाही. पूर्वी किथेक महान चुका पाहिल्या असल्याने आता परत विकीपीडीयाचे लेखन बघायची इच्छाच होत नाही.
याऊप्परही जैसे जिसकी सोच.

पण तो चर्चेचा मुद्दा नाही आहे.
Wink

Pages