सखी-२

Submitted by सुहृद on 12 August, 2015 - 01:42

सखी ची आई जायच्या काही दिवस आधी बाबांनी सखीचे केस कापून आणले होते, कायम स्वःताला लांब वेण्यात पहायची सवय, आरश्यात बघून सखी खूप रडली होती. आई पण रडली पण कदाचित तिचे जाणे दोघांच्या लक्षात आले होते, पण सखी …?

दुपारी शेजारच्या काकू आल्या, आईची चौकशी करायला. सखीला परत उमाळा फुटला, काकुंचेही डोळे पाणावले. दुसऱ्या दिवशी मात्र शाळेत जायला सखी बिलकुल तयार नव्हती. बाबांनी कशी बशी समजूत घालून तिला पाठवले, तशीच ती शाळेत गेली, तिच्या जागेवर बसायला जात असताना हळूच मागच्या मुली कुजबुजल्या. ए घरी वारले न कि केस कापतात न… मला माहित आहे… सखी पुन्हा…. मनात प्रश्न वारणे म्हणजे ??

सगळच खूप विचित्र आणि तिच्या बालमनाला यातना देणारं…. आई गेल्यानंतर नदीवरचे कार्यासाठी सखीची ताई आणि ती सगळ्यांबरोबर गेल्या होत्या, एका झाडाखाली उभे असताना ताई एकदम म्हणाली "ते बघ काका आला " अरे आता हे काय …? बाबांचे का टक्कल केलंय…. त्यांचे केस कुठे आई विन्चारायची त्यांचे त्यांना येतात कि. आणि मला खूप आवडतात त्यांचे केस विंचरायला पण टक्कल ???

कोणाच्या लक्षात आले असेल अथवा नसेल पण सखी आई गेल्यावर रडलीच नव्हती …. कस पेललं तिने हे सारे या वयात …. कोणतीही चिडचिड न करता .... तिला कदाचित या घटनेचा परिणाम लक्षात आला नव्हता आणि येण्याचे तिचे वयही नव्हते….

सगळे कार्यक्रम आटोपल्यावर सखी आणि तिचे बाबा घरी गेले….

घरात एक कुंद धुक्यासारखे वातावरण

बाबा…. मला खूप भूक लागली आहे, खाऊ द्या न….

बस बाळ, मी तुझ्यासाठी शिरा करतो…

बाबांनी दिलेला शिरा खाऊन पेंगळून सखी तिथेच पाटावर झोपून गेली….

बाबांना हे बघून खूप भरून आले…. उगाचच भास झाला घरातले कुंद धुके कमी होतंय …. जसं काही सखीची आई तिची काळजी करत थांबली होती आणि आता बाबा छान काळजी घेत आहेत हे लक्षात आल्यावर हळू हळू ती निघून गेली

बाबा तसेच सखीच्या अंगावरून आईच्या किंवा कदाचित जास्तच मायेने हात फिरवत राहिले….
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आई जाऊन पंधरा दिवस झाले होते सखीचे रुटीन परत बसू लागले, बाबा तिची खूप काळजी करायचे रोज शाळेत सोडायला आणि आणायला जायचे शाळेच्या दारात सायकल घेऊन थांबायचे. चित्रा सखीची वर्गमैत्रीण होती, तिची आई पण तिला न्यायला शाळेत यायची…. सखी दिसली कि तिच्याकडे आईच्या तब्बेतीची चौकशी करायची, सखी त्या काकूंना टाळू लागली, अगदीच उत्तर द्यायची वेळ आली तर मान खाली घालून डोलवायची आणि पळून जायची. सहा महिन्यांनतर तिसरीचा निकाल आला सखीला ७८ टक्के गुण मिळाले, सगळ्यांनी सखीचे कौतुक केले, सखीला वाटले हे काय आहे दर वर्षी आपल्याला ८५ च्या वर टक्के पडतात पण कोण इतके कौतुक करत नवते पण आत्ता का ??

सखी हळू हळू मोठी होत होती मधली दोन वर्षे बाबांनी काहीच कामे सुरु केली नव्हती, आईच्या आजारपणात प्रचंड खर्च झाला होता,त्याचे कर्ज डोक्यावर होत. आता सखी पाचवीला गेली होती बाबांनी हळू हळू काम सुरु केले होते , सखीला घरात एकटे राहावे लागत होते, घर स्वतःचे होते पण खूपच जुने, मातीचे बांधकाम असलेले
शेजारी एक जुने भाडेकरू राहत होते, दिवाळीच्या सुट्टीत किल्ला करायचा म्हणून सखीने अर्धे पोते माती आणून ठेवली होती, त्या पोत्यावर उभे राहून आपली उंची किती वाढते हे पाहणे हा तिचा आवडता विरंगुळा होता, एक दिवस तिच्या मनात आले…. पक्षांना उडताना कसे वाटत असेल, असे म्हणून तिने आपले हात लांब पसरले आणि जमिनीच्या दिशेने झोकून दिले, थोडे खाली आले कि पाय टेकायचे असे ठरले होते पण काय झाले कळले नाही पण सखीचा पाय पोत्याच्या धाग्यात अडकला आणि ती पडली… समोर धुणे धुवायचा मोठा दगड होता त्यावर तोंड जोरात आपटले आणि खालचा एक सुळा पडला, ओठ फाटून बाहेर आला प्रचंड सूज आली… खूप रडू आले पण बाबा घरात नव्हते शेजारच्या काकांनी पाणी प्यायला दिले थोडा खाऊ दिला … संध्याकाळी सखी एकटीच डॉक्टरकडे गेली ड्रेसिंग करून आली … त्यादिवशी बाबांना यायला खूप उशीर झाला.

बाबा आले तेंव्हा सखी पांघरून घेऊन श्रांत झोपली होती … बाबांना हे बघून खूप वाईट वाटले पण सध्या तरी काय पर्याय नव्हता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

वाचकांचे खूप खूप धन्यवाद,

धन्यवाद टीना, चूक दुरुस्त केली आहे.

हे माझे पहिलेच लिखाण आहे त्यामुळे काही चुका असण्याची शक्यता आहे. आपल्या सूचनाचे स्वागत आहे. यातूनच माझे लिखाण अधिकाधिक चांगले होऊ शकेल.

धन्यवाद