कोफ्त्यांसाठी
एक वाटी किसलेलं पनीर, एक मोठा उकडलेला बटाटा, मीठ, जीरेपुड, गरम मसाला, तिखट
ग्रेव्हीसाठी
टॉमॅटो प्युरी १०० ग्रॅम (अर्धे पाकिट), क्रिम १०० ग्रॅम (अर्धे पकिट), मिल्क पावडर ( मी अमुलचं डेअरी व्हाइटनर वापरते), काजुची पुड, फोडणीसाठी थोडं तेल, जीरे, चमचाभर लांब चिरलेलं अद्रक, कसुरी मेथी, गरम मसाला /किचन किंग मसाला , जीरे, हळद, धण्याची पुड, तिखट, मीठ इ.
कोफ्त्यांसाठी लिहिलेलं सगळं साहित्य एकत्र मळून घ्यावं. व्यवस्थित मळल्यावर त्याचे आप्प्यांच्या आकाराचे गोळे करावेत. हवं असल्यास त्या गोळ्यांमध्ये काजुचा तुकडा किंवा एखादा किसमीस ठेवता येईल.
आप्पेपात्रात हे गोळे शॅलो फ्राय करून घ्यावेत. यात बाइंडींग साठी मैदा किंवा कॉर्नफ्लोअर न घातल्याने कढईत तळले तर गोळे फुटून सगळाच घोळ होवू शकतो. आप्पेपात्रात मात्र अगदी मस्त होतात. पनीरचं तेल सुटत असल्याने शॅलो फ्राय करताना अगदी थेंब-दोन थेंब तेल वापरलं तरी चालेल. एक बाजू झाल्यावर उलटताना खूप हलक्या हाताने कोफ्ते उलटावे लागतात.
हे कोफ्ते आप्पेपात्रात होत असतानाच एका कढईत थोड्या तेलात जीरे, अद्रक आणि हळद घालून फोडणी करावी. या फोडणीत घरात असल्यास चिमुटभर बिर्याणी मसाला टाकला तर मस्त वास येतो. फोडणीत टॉमॅटो प्युरी घालून थोडी शिजू द्यावी. यात गरम मसाला किंवा किचन किंग मसाला, तिखट, धण्याची पुड आणि कसूरी मेथी घालावी. टॉमॅटो प्युरीला तेल सुटल्यावर त्यात क्रिम घालावे.
ही ग्रेव्ही पातळ वाटल्यास त्यात मिल्क पावडर घालावी. चवीप्रमाणे मीठ घालावे. विकतची टॉमॅटो प्युरी वापरली असेल तर ग्रेव्ही बर्यापैकी आंबट वाटते. अश्यावेळी मी तरी काजुच्या पावडरीपेक्षा एमटीआरची केसर-बदाम पावडर घालते. (ही खरं तर दुधात घालण्यासाठी असते आणि त्यामूळे गोड असते) याच्या गोडव्यामूळे टॉमॅटोचा आंबटपणा जाणवत नाही.
ग्रेव्ही व्यवस्थित उकळल्यावर त्यात कोफ्ते घालून एकदा गरम करून घ्यावी. परत उकळल्यावर कोफ्ते फुटतिल का हे मला माहित नाही. उरलेली कोफ्ता करी उद्या सकाळी उकळल्यावरच कळेल ते.
मृण्मयीची पालक आणि चीझच्या बॉलची एक रेसेपी(http://www.maayboli.com/node/4515) आहे. मागे पार्टीसाठी करताना चीझ ऐवजी पालक, पनीर आणि बटाटा वापरून आप्पेपात्रात हे बॉल केले होते. त्यावरून कोफ्ते करायला सुचले.
ग्रेव्ही सायोच्या सुप्रसिद्ध पनीर माखनीचे मी करत असलेले व्हर्जन आहे.
रेडीमेड टॉमॅटो प्युरी वापरायची नसेल तर ३-४ मध्यम आकाराच्या टॉमॅटोची कच्चीच फुप्रो मधून्/चॉपर मधून प्युरी करून घ्यावी. ही शिजायला किंचीत जास्त वेळ लागतो. पण ही प्युरी आंबट नसते त्यामूळे नंतर आंबटपणा लपवण्यासाठी अजून थोडं क्रिम घाल, थोडी अजून मिल्क पावडर घाल, थोडी बदाम-केसर पावडर घाल असं करत बसावं लागत नाही.
मस्त!
मस्त!
फोटो कातिलाना. रेसिपी पण
फोटो कातिलाना.
रेसिपी पण सोप्पी सूटसुटीत दिसतेय. करून पाहणेत येईल.
thanx योकु
thanx योकु
आज करुन बघणार आहे मलई
आज करुन बघणार आहे मलई कोफ्ता....
माझी अत्यंत आवडीची डीश आहे. आता या रेसिपीने जमली तर मज्जाच आहे माझी.
एक बाळबोध प्रश्ण .. कोफ्ता करताना झाकण ठेवावे का? आप्पे करताना ठेवतो तसे.
(No subject)
आणि हे कोफ्ते. हे अगदि वेळेवर
आणि हे कोफ्ते. हे अगदि वेळेवर घालावेत. १५,२० मिनिटानी खुप मऊ पडले.
आज मलई कोफ्ता केला होता. खुप
आज मलई कोफ्ता केला होता. खुप छान झाला. आणि कमी तेल असल्यामुळे guilt free. धन्यवाद अल्पना.
वॉव !! मी मस्तानी ,सही फोटोज
वॉव !! मी मस्तानी ,सही फोटोज
कसली सही पाककृती आहे! फोटोतर
कसली सही पाककृती आहे! फोटोतर अफलातून सुंदर!
कोथिंबिरीचं एखादच पान घातलं असतं तर सगळ्या कोफ्त्यांशी नजरानजर झाली असती.
नक्की करून बघणार.
अल्पना, मी काल केली. कोफ्ते
अल्पना, मी काल केली. कोफ्ते घातल्यावर उकळली नाही. आमच्याकडे सुपरहिट छान पाककृती शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद
छान आहे रेसिपी कोफ्ते करून
छान आहे रेसिपी कोफ्ते करून बघेन नक्की
ग्रेविसाठी एकदा हि पद्धत वापरून बघा
कढईत लोणी घेऊन त्यात जिरं, एक मोठा कांदा उभा जाडसर कापून, दोन मध्यम टमाटर कापून, काजू ७-८ तुकडे, आल्याचा छोटा तुकडा, ओले किंवा सुके कुठल्याही नारळाचा छोटा तुकडा,दोन छोट्या विलायची, एक छोटा तुकडा कलमी, खसखस १ चमचा हे सगळे एकत्र घेऊन झाकण ठेवून (पाणी न घालता) ५-७ मिनिट नरम होईपर्यंत वाफवून घ्यायचं. Gas बंद करून जरा वाफ उतरली कि मिक्सर मधून बारीक करतांना त्यात एक मोठा क्यूब पनीर घालायचं पाणी घालून अगदी मिळून येईल अशी पेस्ट करायची. हि तुपात किंवा बटर मध्ये फोडणी घालायची नंतर आवडतात ते सगळे मसाले हळद, तिखट, धणे, जिरे पूड, मीठ थोडा गरम मसाला घालावा. उकळली कि त्यात अर्धा कप मलई आणि गोड आवडतं त्या प्रमाणात tomato sauce घालायचा.
या ग्रेवीत किंचित तळलेले किंवा कच्चे (आवडेल तसे) पनीर, कुठल्याही पद्धतीचे कोफ्ते किंवा उकडून पिळून घेतलेले न्युट्रीला ग्रेन्युल किंवा मशरूम घालता येतात. Serve करतांना वरून थोडं बटर आणि पनीर किसून वाढायचे. अतिशय सुंदर टेस्ट आणि झटपट होणारी ग्रेवी. करून बघा एकदा
एकदूम हिट आहे ही डिश.
एकदूम हिट आहे ही डिश. पहिल्यांदा केली ते ही २० लोकांसाठी, कोफ्ते थोडे वेळ खाउ आहेत पण चवीला उत्तम लागतात सो वोर्थ इट आणि क्वांटिटी च्या मानाने १.५ तासात भाजी तयार होती तयारी सह.
बिर्यानी मसाला आयत्यावेळी संपला होता म्हणून मग पाव भाजी मसाला वापरला ग्रेवी मधे चवीला उत्तम झाली ग्रेवी.
धन्यवाद या पाककृतीसाठी...
Pages