एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी?

Submitted by मामी on 11 August, 2015 - 09:24

रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्‍याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.

पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?

या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अ‍ॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...

HeForShe : KEY MESSAGES

* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world

* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality

* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.

ABOUT THE CAMPAIGN

HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.

अधिक माहिती :

https://en.wikipedia.org/wiki/HeForShe

http://www.heforshe.org/

***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी

पुरूषांची सामाजिक जबाबदारी -

१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.

२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.

३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.

४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.

५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.

६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.

७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.

८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.

९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.

***********************************************************************************************************

अंजली

बर्‍याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.

१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?

एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धुलाई मध्ये संशयित दगावला तर >>>>>>> यातील संशयित या शब्दावर बराच उहापोह होऊ शकतो, तुर्तास वेळेअभावी करत नाही,
,
पण जर खरेच अश्या प्रकारात काही जण दगावले ना, तर कायदा आणि सुरक्षा लागलीच कडक होईल याची खात्री देतो, आणि मग साहजिकच गैरप्रकार देखील आपसूकच कमी होतील.

आणि मग साहजिकच गैरप्रकार देखील आपसूकच कमी होतील.>>>> अहो पण त्या हुप्पाहुईयांचा मुद्दा लक्षात आला का?
संशयित (गुन्हा सिद्ध झालेला नाही) किंव अनिरपराध व्यक्ती दगावली तर? म्हणजे गेली तर गेली पण बाकीचे लोकं घाबरुन तसं काही करणार नाहीत हा अप्रोच बरोबर आहे का? बाहेर दिसतात/ घडतात त्या बर्‍याच गोष्टी आपण टिव्ही वर बातम्यांवर बघतो म्हणून ते फक्त आकडे वाटतात. ज्या वेळी आपल्यावर वेळ येते तेव्हा लक्षात येतं आणि तेव्हा आपल्याला तो मुद्दा किती महत्वाचा आहे हे लक्षात येतं. समोरच्याच्या जागी आपण स्वतःला टाकून बघितलं तर असले अंधळे विचार करण्यापासून आपला बचाव होऊ शकतो (इच्छा असेल तर).

<<पण जर खरेच अश्या प्रकारात काही जण दगावले ना, तर कायदा आणि सुरक्षा लागलीच कडक होईल याची खात्री देतो, आणि मग साहजिकच गैरप्रकार देखील आपसूकच कमी होतील.>>

----- बेजबाबदार विधान आहे... ४- १० लोक दगावले तर कायदा आणि सुरक्षा कडक होईल ? कशाच्या आधारावर ?

<<<मूल्य शिक्षण आणि एकट्या दुकट्याचे सक्षमीकरण नव्हे (ते पण खरं हवेच आहे) तर सामाजिक कायदा आणि सुव्यवस्थेचे बळकटीकरण हेच दोन ऊपाय आहेत. केवळ गुन्हा घडल्यावरच नाही तर अनसेफ वाटते म्हणून सरकारी कार्यालयांवर मोर्चे, पब्लिक अवेअरनेस, कार्यशाळा, हेल्प लाईन, सपोर्ट ग्रूप, कामाच्या ठिकाणी मॅनेजमेंटवर सोयी सुविधांसाठी द्बाव ई. प्रोअ‍ॅक्टिव गोष्टी करायला हव्यात. आणि हो! ही पुरुषांची आणि ही स्त्रियांची सामाजिक जबाबदारी असे न करता संपूर्ण समाज त्यातील एका घटकाला होणार्‍या त्रासाच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतो आहे असे चित्रं व्हावे. लेडीज स्पेशल डबा, बसमध्ये रिझर्व सीट्स सारख्या गोष्टी सुद्धा कुणाच्या तरी प्रयत्नातुनच झाल्या आहेत ना, आज तेवढ्याच गोष्टी पुरेश्या नाहित म्हणून ईतर ऊपायांसाठी नव्याने एकत्रित प्र्यतन करावे लागणार.>>>

१००% सहमत. वरती रिया ने सा.न्गितला आहे तो अनुभव कि.न्वा नुकताच झालेला त्या सैनिकाचा दुर्दैवी मृत्यु ह्या घटना सा.न्गतात की इचछा असली तरीहि कधीकधी आपल्याला ( स्त्री/पुरुष कुणिहि) मदत करण शक्य होइलच अस नाहि. वर म्हन्ट्लय त्या प्रमाणे अश्या पर्व्हर्ट पुरुषा.न्चे मतपरिवर्त्न हा स्तुत्य पण लॉ.न्ग टर्म उपाय आहे.

अमेरिका आणि सिन्गापुर ह्या दोन ठिकाणा.न्ची तुलना करता मला सिन्गापुरातली परिस्थ्तिती अमेरिकेपेक्षाही चा.न्गली वाटली. अगदी रात्री ११.३०/१२ वाजता ही स्त्रीया एकटीने मोकळेपणाने फिरु शकतात. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात. हवे तसे कपडे घालतात (हिजाब पासुन शॉर्ट्स पर्यन्त सगळ्या प्रकारच्या पोषाखातल्या स्त्रीया इथे दिसतात). अगदी कुठल म्हणता कुठलच दडपण जाणवत नाही. ह्याच कारण म्हणजे येथील सरकारची ह्या बाबतीत असलेली नो टॉलरन्स पॉलिसी. हे विधान वाचायला विचित्र वाटेल पण अशी छेडखानीची तक्रार स्त्रीने केली तर स.न्बब्न्धीत पुरुषाला चाबकाचे फटके देण्याचे अधिकार पोलिसा.न्ना आहेत. ह्या वस्तुस्थितिचा वचक जाणवतो. अर्थात आपल्याकडे आपणहि असा चाबक्याच्या फटक्या.न्चा आग्रह धरावा असे नाही. पण हा गुन्हा आहे आणि ह्याला शिक्षा होउ शकते. गुन्हा केल्यामुळे रोजच आयुष्ञ त्रासदायक होउ शकत असा स.न्देश जर आपण गुन्हेगारा.न्पर्य.न्त पोहचवु शकलोत तरी बर्‍याच अ.न्शी ह्या समस्येला आळा बसु शकेल.

इथे बलात्कार घडताहेत तर सरकारला त्याचे गांभीर्य समजणे कठीण. पण जनतेच्या रोषात काही बळी पडले तर मात्र ते खडबडून जागे होऊ शकतात, कारण लोकांनी कायदा हातात घेणे सरकारला कधीही नको असते. मग ते लोकांना अपेक्षित असलेले कायदे आणि सुव्यवस्था पुरवतील आणि त्याची अंमलबजावणी आपल्याच हातात ठेवतील.

पण आपली भिती रास्त आहे. अश्या मार्गाचा अवलंब केल्यास काही निरपराधही मरू शकतात. अंदाधुंद माजू शकते. वगैरे साईड इफेक्ट आहेतच.

यावरही मग वेगळा मार्ग आहेच. तीच आपली तीन फेमस तत्वे. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह !

यात तुमच्या हातून निरपराध एकही मरणार नाही, पण स्वता निरपराध असूनही मरायची तयारी ठेवावी लागेल. जमावाच्या चेहर्याआड लपून नाही तर समोर येत लढावे लागेल. धैर्य आणि संयमाची कसोटी लागेल.

पण आपल्याकडे 10 पैकी 9 जण आपल्या सोयीने या तीन तत्वांची टिंगल उडवतात, अश्या समाजाला हे जमणे कठीणच. म्हणून सोपा मार्ग सांगितला. Happy

>>>> ह्या घटना सा.न्गतात की इचछा असली तरीहि कधीकधी आपल्याला ( स्त्री/पुरुष कुणिहि) मदत करण शक्य होइलच अस नाहि. <<<<<
रीयाने सांगितलेली घटना प्रातिनिधीक आहे.
>>>>> ह्या घटना सा.न्गतात की इचछा असली तरीहि कधीकधी आपल्याला ( स्त्री/पुरुष कुणिहि) मदत करण शक्य होइलच अस नाहि. <<<<<
मला वाटते की धाग्याच्या शीर्षकाप्रमाणे मात्र "अशा परिस्थितीत पुरुषांनी षंढासारखे न वागता" मधे पडावे अशी अपेक्षा असावी.
अन्यथा, बाकी चर्चेत, येथील पुरुष आयडी स्वतः कसे सोज्वळ आहोत हे सिद्ध करण्याची जबाबदारी धाग्याच्या शीर्षकामुळे येऊन पडल्यासारखे वाटून तशा अर्थाच्या बर्‍याच पोस्टी आल्यात.
मला सर्व पाने वाचूनही, धाग्याच्या शीर्षकाचा नेमका व गर्भित अर्थ उमगला नाहीये, व जो गर्भित अर्थ उमगला आहे तो एकतर्फी भयावह आहे. असो.
माझी पोस्ट इग्नोर करण्याची पूर्ण मुभा वाचकांना आहेच्च.

चला ह्या प्रश्नाचं उत्तर देऊनच टाकतो.

<< समजा तुमची ८-१० वर्षांची मुलगी स्कूलबस मधून उतरून समोरच असलेल्या तुमच्या बिल्डिंगकडे येत आहे. कोणा एका माणसानं (गुंड नव्हे. लहान मुलगी एकटी आहे या संधीचा फायदा घेणार्‍या एखाद्या विकृत इसमानं) तिला त्रास द्यायला सुरूवात केली. रस्त्यावरून एखादाच पुरुष अथवा स्त्री जात आहे. अशावेळी त्यांनी काय विचार करावा?

जाऊ दे, त्या मुलीचा प्रॉब्लेम आहे. ती आणि तिच्या घरचे बघून घेतील. असा विचार करावा का? तोच योग्य आहे असं दिसतंय. >>>

त्यांनी काय विचार करावा हे ठरवणारा मी कोण ? हि दुसर्‍याने काय विचार करावा हे ठरवणारी मनोवृत्तीच पहिले ठेचली पाहिजे. मी माझ्या मुलीला अश्या प्रसंगाला तोन्ड द्यायला सक्शम बनवेन आणि वेळप्रसंगी सर्व शक्तीनीशी तिच्या पाठिशी उभा राहीन. इतर समाज काय करतोय ह्याचा विचार तर मुळीच करत बसणार नाही.

तुम्हाला काय दिसतय ते तुम्हीच पहात बसा. त्यावर माझा कंट्रोल नाही.

काही लोक या चर्चेत वारा येइल तशी पाठ फिरवतायत, आपण मांडतोय त्या विचारांपेक्षा आपल्या आयडीच्या इमेजची काळजी असल्यावर असे व्हायचेच म्हणा!

<< ही काही कारणे जर "कोण लफड्यात पडेल?" "पोलिसांचं झंझट कोण लावून् घेईल?" "मरेनात का तिकडे! अजून चार मेली तरी काय फरक पडतोय?" "दुसरं कोणीतरी बघेलच" ही असतील तर मी तरी त्या व्यक्तींना बेजबाबदार म्हणेन. >>>

तुम्ही म्हणा खुशाल बेजबाबदार. मी विचार करणारा माणूस आहे, आणि प्रत्येक अ‍ॅक्शनपाठी एक कारण असतं हे मला ठाऊक आहे. मला माहिती नसलेल्या कारणांबरुन खुशाल निश्करश्ककाढणे हे मी बेजबाबदार समजतो.

<<मदतीची गरज नसताना मदत करा असा कोणी हाकारा पिटत नाही. पण किमान मदतीची गरज आहे का ते तरी विचारा!!! >>> मदत मागणार्‍यांना मदत करणार्‍यांविषयी मी लिहिलच नाहिये.

<< बाबा पोलीसांना फोन करणार होते पण आम्ही त्यांना ते करू दिलं नाही कारण आम्हाला आमच्या बाबांची काळजी जास्त आहे त्या मुली पेक्षा (स्वार्थी म्हणा किंवा काहीही पण हे खुप नॉर्मल आहे. त्यावेळेला घरातली परिस्थीती आणि त्या मुलाचा धमकी द्यायचा टोन बघता आम्हाला हेच करणं योग्य वाटलं) >>

हे घ्या उत्तम उदाहरण. बाबा फोन करणार होते मुलीने करु दिला नाही.....

बाबा फोन करणार होते मुलीने करु दिला नाही.....>>>> मुलीचे बरोबर आहे.उद्या घरात वा रस्त्यात गाठून त्या मुलाने बाबांना मारहाण केली असती तर ?

बाबा फोन करणार होते मुलीने करु दिला नाही.....>>>> मुलीचे बरोबर आहे.उद्या घरात वा रस्त्यात गाठून त्या मुलाने बाबांना मारहाण केली असती तर ? >> म्हणजे 'सामाजिक जबाबदारी' एक 'पुरुष' निभाउ पाहत होता पण...

देवकी, मुलीचे चूक आहे असं म्हंटलय का मी ? माझा मुद्दाच हा आहे की, "पुरुषानी काय करावं ?" हा धागा बेसलेस आणि एकांगी आहे. जबाबदारी दोन्ही घटकांची आहे, खरतरं वैयक्तिक स्वरुपाची आहे. दुसर्‍याने काय करावे हे सांगायचा हक्क कोणालाच नाही असं सांगायचा प्रयत्न करतोय मी.

आणि तुम्ही म्हणताय की उद्या मुलाने रस्त्यात गाठून मारहाण केली तर ? मी विचारतो कुठल्याही प्रसंगात मदत करायला जाणार्‍याला हा धोका संभवत नाही का ? मग ? हा धोका पत्करायला तयार नसलेले बेजबदार का ?

चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी :

वर अरुंधतीनं जे अनेक मुद्दे मांडले आहेत त्या अनुषंगानं प्रत्येक पुरुषानं आपले विचार तपासून घेतले आणि बदलण्याचा प्रयत्न केला तर ती एक चांगली सुरूवात ठरू शकेल.

जर स्वतःबरोबरच निदान आणखी एका पुरुषाचे स्त्री विषयक असलेले विचित्र विचार बदलता आले तर उत्तम.

स्त्रियांवर अनेक बंधनं आहेत आणि ती योग्यच कशी यावरही अनेकदा चर्चा होतात. स्त्रियांवर होणार्‍या अन्यायांना त्या व्हिक्टिम स्त्रियाच कशा जबाबदार आहेत असेही मुद्दे मांडले जातात. पण त्याचवेळी समाजातील स्त्रियांवर शारिरीक, मानसिक अन्याय करणारा एक मोठा आणि सामाजिकदृष्ट्या प्रिव्हिलेज्ड गृप - पुरुष - आहे, त्यांनाही विचार परिवर्तनाची गरज आहे. या धाग्याच्या निमित्ताने काही अंशी काही पुरुषांनी आपले विचार प्रामाणिक पणे तपासले आहेत असं दिसलं, सुयोग्य मुद्दे आणि काही रोखठोक प्रश्न समोर आले. साधक बाधक चर्चा झाली.

माझ्या मते या धाग्याचा हेतू बर्‍याच अंशी साध्य झाला आहे.

अजूनही कोणाला वरच्या मुद्द्यांवर आणि प्रश्नांवर प्रामाणिक उत्तरं द्यायची असतील तर त्यांचं स्वागत आहे.

वस्त्यांमधे,साळांमधे teenageमुललांना sensitise करणारी workshops घेतली तर त्यांच्यावर्तुणुकीमधे खुप फरक पडतो.

पुण्यात पालकनीती परिवारातर्फे असे उप्क्रम चालवले जातात. वेगवेगळ्या शहरातल्यदत्दटांनी मद्त मागितल्ञास ते तुम्हाला प्रशिक्श्नण देउ शकतात. किंबहुना पालकनीती परिवाराच्य शाखाच आपण आपल्या शहरात सुरु करु शकतो.
1) Palakneeti Pariwar,

Phone No-020-25441230.
Email : palakneeti@gmail.com

2) Khelghar

Shubhada Joshi,

Email : khelghar@gmail.com, shubha_kh@yahoo.co.in

http://english.palakneeti.org/contact-us

मी माझ्या मुलीला अश्या प्रसंगाला तोन्ड द्यायला सक्शम बनवेन आणि वेळप्रसंगी सर्व शक्तीनीशी तिच्या पाठिशी उभा राहीन. इतर समाज काय करतोय ह्याचा विचार तर मुळीच करत बसणार नाही>>>

तरिही मुलिच्या बाबतित असा एखादा वाईट प्रसंग घडला आणि कोणिही मदतिला नाही आले तर तुम्हाला काय वाटेल?

छान माहिती दिलीत, arc.

नव्या पिढीत पहिल्यापासून असे विचार भिनवले तर नक्कीच परिस्थितीत फरक पडेल.

>>>> पण त्याचवेळी समाजातील स्त्रियांवर शारिरीक, मानसिक अन्याय करणारा एक मोठा आणि सामाजिकदृष्ट्या प्रिव्हिलेज्ड गृप - पुरुष - आहे, त्यांनाही विचार परिवर्तनाची गरज आहे. <<<<< अतिशयच सहमत, व याबाबत लहानपणापासूनचे संस्कार (ज्याचे वर्णन इतरांनी आधीच केले आहे) अत्यावश्यक आहे.

>>>>> या धाग्याच्या निमित्ताने काही अंशी काही पुरुषांनी आपले विचार प्रामाणिक पणे तपासले आहेत असं दिसलं, <<<<<< या मुद्याशी असहमत. प्रामाणिकपणे वा अप्रामाणीकपणे हे आपण केवळ येथील टाईप्ड मजकुरावरुन कसे ठरविणार? असो.
तरीही तसे धरुन चालले तरी माबोवरील "पुरुष आयडी" आख्ख्या जगातील "नरांचे" प्रतिनिधित्व करीत नाहीत, करू शकणारही नाहीत.
अन त्याचमुळे, धाग्याचे शीर्षक, माबोवरील पुरुष आयडींना "जाब विचारल्याप्रमाणेच व गुन्हेगारांच्या सोबतीला नेऊन बसविणारे" वाटले.
धागाकर्तीचा उद्देश स्तुत्य आहे यात मला शंका नाही, पण इतक्या गंभीर व मूलगामी विषयाचि मूळ मांडणीच चूकीच्या गृहितकांवर आधारित असल्याने चूकीच्या रोखाने जाऊन फसली असे माझे मत.

माझी पोस्ट इग्नोर करण्याची पूर्ण मुभा वाचकांना आहेच्च. (करताय ना? करालच्च!)

तुम्हाला का जाणून घ्यायचय ते सांगा बघू आधी, तसच तुमची खरी ओळखही सांगा, मग मला काय वाटेल ते सांगतो हो तुम्हाला.... Rofl

Ark छान माहिती..
बाबा फोन करणार होते मुलीने करु दिला नाही.....>>>> मुलीचे बरोबर आहे.उद्या घरात वा रस्त्यात गाठून त्या मुलाने बाबांना मारहाण केली असती तर ? >> अहो पण पोलिसांना फोन कोणी केला हे त्या मुलाला कळलेच नाही तर तो गाठून मारहाण कशी करेल.. काहीही लॉजिक Sad
उलट ज्याना भांडणात पडायचे नाही ते पोलिसांना फोन तरी नक्कीच करू शकतात..

उत्तम माहिती आर्क, पण इथे पुरुषांसाठीचीच माहिती हवीय, पालकांमध्ये स्त्रीयाही येतात ना.....

लिम्बूदा ... पुन्हा एकदा उत्तम पोस्ट. पण काय आहे ना, संस्कार पाळणे हे मागसलेपणाचे लक्षण आहे. कारण त्यामुळे मुक्त आचारावर बंधने येतात. त्यामुळे ते खुळचटपणाचे आहे हे एकदा ठरवले की झाले.

वरच्या रीयाच्या अनुभवावरून (हे पुढचं स्त्री-पुरूष निरपेक्ष पद्धतीनं वाचा) इथल्या किती लोकांच्या मोबाईलमधेय जवळच्या पोलिस स्टेसनचा नंबर आहे? किती जणांना त्यांचा एरीया कुठल्या पोलिस स्टेशन अंतर्गत येतो हे माहित आहे? इथले किती जण नवीन ठिकाणी रहायला गेल्यावर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तिथल्या इन्स्पेक्टरची ओळख स्वतःहून करवून घेतात? किती जणांकडे त्या इन्स्पेक्टरचा नंबर असतो???

पोलिस म्हणजे वाईटच असणार हे जे गृहितक आहे ते कित्येकदा गुन्ह्यांना खतपाणी घालणारं असतं. पोलिसांना फोन करायचा म्हणजे आपणच अडकणार याची भिती कशाला? पोलिसांना निनावी फोन केला तरी चालतो. (त्यासाठीच आधी पोलिस स्टेशनचा नंबर हवा!!!) आमचं नाव कुठं येऊ देऊ नका अशी विनंती केली तरी पोलिसांना चालते. पोलिस ऐकतात. १०० नंबरला फोन केल्यावर तुमचे नाव गाव विचारत नाहीत. केवळ पत्ता (तुमच अन्व्हे, तर जिथं प्रॉब्लेम आहे तो) आणि इतर तपशील- माहितीची खात्री करून घेतात, आणि ताबडतोब हवालदार पाठवतात. मोठा गुन्हा असेल तर त्यानुसार त्यांची प्रोसीजर असतेच.

पुन्हा एकदा लिहितेयः इथली चाललेली सर्व चर्चा "डॅम्सेल इन डिस्ट्रेस" आणी नाईट इन शायनिंग आर्मर" इतक्याच विषयाभोवती फिरतेय. बीबीमध्ये त्याहूनही अधिक अभिप्रेत आहे, आणि त्यावर बोललंच जात नाहिये. एक पुरूष म्हणून, एक पिता, भाऊ, मित्र, नवरा या सर्व नात्यांमधेय तुमची सामाजिक जबाबदारी काय आहे ते जरा सविस्तर लिहा.

देवकी, तुमचाही अनुभव प्रातिनिधिक आहे. तुमच्या वा अन्य स्त्रीपुरुषांचा मदत करण्यातल्या असहाय्यते विषयी सहमत. त्या मानसिकतेमागची व शारिरीक परिस्थितीमागची नेमकी कारणे शोधणे अत्यावश्यक आहे, न की निव्वळ "पुरुषांची जबाबदारी" काय हे निश्चित करणे, व ते देखिल स्त्रीपुरुष समानतेच्या काळात.

>>>>> लकीली ती मुलगी पोलीसातली होती.त्यांना ते ट्रेनिंग दिले गेले असावे. <<<<<<
आज किती पांढरपेशा व्हाईट्ट कॉलर्ड घरातुन मुलामुलिंना शारिरीक प्रतिकाराचे शारिरीक व मानसिक शिक्षण दिले जाते? किती शाळांतून तशी सोय आहे? (अंधश्रद्धेच्या नावाखाली जी बाब विचारातच घेतलि जात नाही, पण प्रत्यक्षात अस्तित्वात आहे ती म्हणजे प्रत्येकाच्या जन्मकालिन ग्रह गुणांप्रमाणेच ति ति व्यक्ति किती प्रतिकार करेल /भांडणात कुणा एकाची बाजू घेऊन मधे पडेल वा नाही हे ठरत असते. या गोष्टीचा व्यक्तिगणिक बदलणार्‍या शारिरीक्/मानसिक स्थितीचा तर इथे विचारही होताना दिसत नाही व सरसकट लेबले लावणे अर्थात नि:ष्कर्ष काढणे होते.)

>>>>> भांडणात आपण नाही पडू शकत पण हात तर धरू शकतो किंवा तसा प्रयत्न तर करू शकतो. <<<<<<
खरे तर करु शकतो, पण नंतरचे परिणाम हात आखडता घ्यायला लावतात. ते परिणाम काय नी कसे यावर स्वतंत्र धाग्यांची जंत्री निघू शकते.
मी बरेचदा भांडणात मधे पडलो आहे व त्यावरुनच सांगतोय.

>>>>> रियाच्या अनुभवात तिचे बरोबरच आहे. मीही कदाचित तसाच विचार केला असता. <<<<<
माणुस विचार करतो, तेव्हा "निव्वळ विचार स्वातंत्र्य" इतकाच घटक वा मेंदुतील केमिकल लोच्यातुन विचार स्फुरणे इतकेच होत नसते, तर भूतवर्तमानभविष्य याबाबतही विचार होत असतो व स्वानुभव्/ऐकिव माहितीतुन अमुक प्रसंगात स्वहित/कौटुंबिक हित जपण्यात काय बाधा येऊ शकेल या बाधेच्या विचाराने तसाच विचार केला तर त्या गुन्हा वा अपराधी वाटून घेण्याचे कारण नाही, कारण आपल्या "सिस्टीम्स" इतक्या दिव्य आहेत की माणुस एकदा का त्या चक्रात सापडला, तर शब्दशः गुर्‍हाळातील उसाच्या चिपाडाप्रमाणे चिणून निघतो.

इथे लिहीतानाही, मी स्वानुभव, स्वकृती, व अनुभूति असल्याशिवाय एकही शब्द वा वाक्य लिहीत नाहीये.

माझी पोस्ट इग्नोर करण्याची पूर्ण मुभा वाचकांना आहेच्च. (करताय ना? करालच्च!) [बाबु, हे वाक्य तुझ्याकरता नाही]

खरंतर ही चर्चा अरूंधतीच्या "स्त्रियांनी सजग, सक्षम व्हायला हवे. स्त्रियांनी एकगठ्ठा, जमावाने झुंडीने बाहेर पडायला हवे. पुरूषांकडून मदतीची अपेक्षा करू नये " वगैरे लिहीलेल्या त्या पोस्टवरच संपते. पुढची सगळी पानं म्हणजे निव्वळ वाफ दवडणे आहे. पण प्रश्न विचारला पुरूषांसाठी आणि उत्तर मिळाले स्त्रियांसाठी असा घोळ झालेला असल्याने पुढे सगळं फसलं.
आता यावर, "स्त्रीने प्रतिकार केला तरीही जर त्या इसमाकडून संकट संभवलंच तर काय?" असा निरर्थक प्रश्न येऊच शकतो. कारण त्याचं थिअरॉटिकल उत्तर आत्ता काय वाट्टेल ते लिहीलं तरी वास्तवात स्थळ, काळ, वेळ आजूबाजूच्या लोकांची मानसिक स्थिती, शारिरीक क्षमता यावर ते अवलंबून असणार आहे. त्यामुळे शेवटी आपल्या हातात काही नसते इथेच गाडी येऊन थांबते, आपल्या इच्छेविरुध्द.

नंदिनी, लिम्बू आणि आशूडीच्या वरच्या पोस्टस् ना अनुमोदन......

संतोषीमाते, तुमचा अजेन्डा कळला.... सगळ्यानाच Proud

बाबा मदत करत होते मुलीने करू दिली नाही हा सुर असणार्‍या प्रत्येकासाठी -

अगदी स्पष्ट बोलायचं तर त्या वेळेला तुम्ही हे करू शकत होतात, ते करू शकत होतात वगैरे डोस बाहेरून पहाणारा प्रत्येक जण पाजू शकतो. अगदी मी देखील हा प्रसंग आमच्या सोबत घडला नसता तर हेच डोस पाजले असते.पोलीसांना काय कळतं , तुम्ही करायला हवा होत फोन वगैरे वगैरे!
पण काय करायला हवं असतंऐवजी काय केलं असतं ते ऐकायला आवडेल. हा प्रसंग स्वतःच्या घरात घडला तर इथे मोठे मोठे डोस देणारी एकूण एक व्यक्ती समाजा आधी आपलं कुटुंबच बघेल हे मी लिहून देते.
इथे लिहिताना प्लिज 'correct' मतांपेक्षा 'honest' मतं लिहा.

नंदिनीच्या पोस्ट मधून पुन्हा पुन्हा हीच वाक्य डोकावतायेत की एक पुरुष म्हणुन ('किंवा अगदी एक व्यक्ती म्हणूनही) तुम्ही काय कराल ते लिहा. पण त्यावर चर्च अकरण्यात कोणालाच रस नाही.

भूषण दादा, रपारप मारत होता म्हणजे दिड तास एक सलग न थांबता मारत होता असं वाटलं की काय तुला? Uhoh तसं काही मी म्हणलेलं नाहीये. ती मुलगी पळून का नाही गेली/ बचाव का नाही केला/ मदत का नाही मागितली वगैरेची उत्तरे मला माहीत नाही. आणि किंबहुना म्हणुनच आम्ही मधे न पडणं प्रेफर केलं. तिने एकदा जरी मदत मागितली असती तरी कदाचित आम्हाला साथ देणार्‍यांची संख्या वाढली असती आणि आम्ही देखिल मागे हटलो नसतोत. पण हे सगळं जर तर च्या गोष्टी आहेत.

रच्याकने माझ्या पोस्टीत पोलीस वाईट असतात असा सुर कुठेही नाही किंवा मी असं काही म्हणलेलं नाही. माझ्या पोस्ट बद्दल काही लिहिताना इतर कोणी म्हणलेलं असेल तरी ते माझं मत नाही.

सगळेच पोलिस वाईट नसतात. जे वाईट असतात ते 'जमावाला' घाबरतातच.

http://www.mumbaimirror.com/mumbai/crime/What-a-jerk-American-national-t...

ही कालची बातमी. एका स्त्री वर विचित्र प्रसंग ओढवला असताना तिनं त्यावर स्वतः लगेच त्या माणसाचे फोटो काढण्याइतपत प्रसंगावधान दाखवलं. पण त्याच बरोबर इतर दोन पुरुषांनी तिला साथ दिली म्हणून त्या माणसाला पकडून पोलिसांकडे जाण्यापर्यंत त्यांची तयारी होती. (तो विकृत माणूस पळून गेला. कदाचित अजून एक दोन जणं असते तर त्याला सहज कह्यात ठेवता आलं असतं.) हे शक्य झालं कारण ते दोन पुरुष मदतीला आले म्हणून.

सामाजिक जाणीव असलेल्या त्या दोन पुरुषांना धन्यवाद.

ण काय करायला हवं असतंऐवजी काय केलं असतं ते ऐकायला आवडेल<< रीया, मी काय केलं ते लिहितेय. प्रसंग थोडाफार सिमिलर. मुलगा दारू पिऊन आलेला, मुलीसोबत काहीतरी लफड्याचं भांडण. मुलगी साधारण चौदा पंधरा वर्षाची. मुलगा पंचविशीचा. हा प्रसंग घडला तेव्हा आम्ही चौघेजण होतो. आधी बराच वेळ आरडाओरडा चालू होता तेव्हा दुर्लक्ष केलेलं. मग हळूहळू त्यानं तिला एक दोनदा मारलं. ते पाहून सोबत असलेला एक जण उठला. त्या मुलाला काहीतरी बोलून आला. थोडावेळ शांतता. नंतर सोबतचे दोघंजण कामानिमित्त निघून गेले. आता आम्हीच दोघीजणी उरलो. यांची भांडणं परत चालूच राहिली. मारामारी पण चालू झाली (आह हॅव टू मेन्शन दिस, मुलगी पन काय कमी नव्हती, पोराला धरून तिनंही दोन तीन हाणले होते) पण हळूहळू गंभीरता वाढीला लागली होती. आम्ही तिथून निघालो, वाटेत एस टी डी बूथला थांबून (हो, तेव्हा मोबाईल नव्हते) पोलिस स्टेशनला फोन केला आणि माहिती दिली. नंतर दोन तीन दिवसांनी क्राईम ब्रीफ वाचताना समजलं की त्या दोघांना पोलिसांनी पकडलं होतं. अरेस्ट नव्हतं केलं पण तिच्या घरी कळवलं होतं त्याला थोडावेळ डांबून ठेवलं होतं.

हा प्रसंग घरी असताना घडलेला नाही, तर एका बागेसारख्या उघड्या ठिकाणी घडलेला आहे. तिथं आमच्यासरखेच अजूनही इतर बरेच लोकं होते त्यांनी या सर्व प्रकरणाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलेलं होतं बहुतेक. आमचं नाव या प्रसंगात कुठंही आजवर आलेलं नाही.

Pages