रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.
पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?
या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...
HeForShe : KEY MESSAGES
* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world
* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality
* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.
ABOUT THE CAMPAIGN
HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.
अधिक माहिती :
https://en.wikipedia.org/wiki/HeForShe
***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी
पुरूषांची सामाजिक जबाबदारी -
१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.
२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.
३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.
४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.
५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.
६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.
७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.
८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.
९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.
***********************************************************************************************************
अंजली
बर्याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.
१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?
एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?
ओह!! साती, ते खरंच फार
ओह!! साती, ते खरंच फार तापदायक प्रकरण दिसतंय. आईच्या बाहेरच्या कामाच्या व्याख्याही कशा सुस्पष्ट दिल्या आहेत. इतर क्षेत्रं अस्तित्वातच नाहीत.
धन्य आहेत एकंदरीत शाळावाले.
साती, काही करणार असशिल तर ते
साती, काही करणार असशिल तर ते काळजी घेऊन कर,मुलगा त्रासात पडायला नको.
अशा रितीने मुलांवर बाहेरून
अशा रितीने मुलांवर बाहेरून व्हायचे ते संस्कार होतातच. नाही लक्ष दिलं तर..
अमेरिकेत विद्यापीठांत
अमेरिकेत विद्यापीठांत बलात्कार होतात असं ऐकून आहे.
भारतात आपण दररोज बलात्कार होत असल्याचं वाचत असलो तरी दरडोई संख्या कमी असावी असा माझा अंदाज आहे.
>>> ऐकून आहे, वाचत असलो तरी अंदाज आहे , कसला अंदाज ? कोणत्या बेसिस वर ? दरडोई बलात्काराची संख्या म्हणजे काय ?
काय लिहिता ते वाचून तरी पहा की एकदा ?
खरेच आपण २०१५ मध्ये आहोत का ?
खरेच आपण २०१५ मध्ये आहोत का ? तो धडा खरेच वाईट आहे. पण तो सरकारी पुस्तकात आहे की एखाद्य खाजगी प्रकाशकाच्या ? सरकारी असेल तर सोशल मिडिया टाकूओन वर काही फरक पडेल.
सरकारी पुस्तकात आहे की एखाद्य
सरकारी पुस्तकात आहे की एखाद्य खाजगी प्रकाशकाच्या ? >>> माझ्या मुलाच्या फर्स्ट स्टॅण्डर्डच्या आयसीएससीच्या सोशल सायन्सच्या पुस्तकात पण असं काहीतरी होतं गेल्या वर्षी. कुणाला दिलं नसेल तर इथे फोटो देण्यात येतील.
सरकारी असेल तर सोशल मिडिया
सरकारी असेल तर सोशल मिडिया टाकूओन वर काही फरक पडेल.
<<
मायबोली हे सोशल मिडिया का माडिया म्हणतात तस्लं काही आहे अशी माझी सम्जूत आहे.
फरक पडतो अशी तुमची समजूत आहे का?
खसा आणि साती - इथे फोटो
खसा आणि साती - इथे फोटो देऊन काय उपयोग ? निषेध व्यक्त करून सोशल नेटवर्क वर टाका , लिन्क इथे द्या. आम्हीही शेअर करू मग.
सीबीएसई च्या पाठ्यपुस्तकांचा
सीबीएसई च्या पाठ्यपुस्तकांचा ( हुर्रे , जमला जमला) अभ्यासक्रम एनसीईआरटी तर्फे अभ्यासक्रम ठरवण्यात येतो. त्यातले किती सदस्य मायबोली वाचत असतील ? चिवचिवाट किंवा थोपु वर कदाचित लक्ष वेधून घेण्यात येईल.
मैत्रेयी, ते दरडोई बलात्कार
मैत्रेयी, ते दरडोई बलात्कार वगैरे जाऊ दे. चर्चा बहुधा 'मुळात प्रॉब्लेम नाहीच आहे - किंवा असला तरी तो जगभरात असल्यामुळे एकंदरीत सगळं नॉर्मल समजायला हरकत नाही' अशा वळणावर आलेली दिसते आहे.
एकच अवांतर : सामाजिक जबाबदारी
एकच अवांतर : सामाजिक जबाबदारी म्हणून धाग्यास वेटोळे घातलेला भुजंग घालवला याचा अभिमान वाटतो.
>>>ऋन्मेऽऽष | 17 August, 2015
>>>ऋन्मेऽऽष | 17 August, 2015 - 22:14<<<
ऋन्मेष, पुन्हा सहमत! अचूक बोललात! असल्या पाठ्यपुस्तकांचा निषेधही प्रामुख्याने पुरुषांनी करायला हवा, तर हवा तो इम्पॅक्ट मिळेल. (तुम्हाला प्लस वन)
आला
आला
चर्चा बहुधा 'मुळात प्रॉब्लेम
चर्चा बहुधा 'मुळात प्रॉब्लेम नाहीच आहे - किंवा असला तरी तो जगभरात असल्यामुळे एकंदरीत सगळं नॉर्मल समजायला हरकत नाही' अशा वळणावर आलेली दिसते आहे.>>>> हेही नेहमीचेच.
नाही, दरडोई बलात्कार रेट
नाही, दरडोई बलात्कार रेट भारतात जास्त आहे - १.९/१००० अमेरिकेत ०.४/१००० . (संदर्भः विकी. विकीत रिसर्चचे संदर्भ आहेत. तेही मी खात्री केले). तेव्हा अंदाजे विधाने करून चर्चा भरकटण्यापेक्षा एक गुगल सर्च केला तर सगळ्यांनाच उपयोगी ठरेल.
(हे दरडोई प्रकरण अधिकच भीषण आहे कारण भारतात स्त्री-पुरूष रेशियो व्यस्त आहे म्हणजे त्या १००० पैकी अमेरिकेत अंदाजे ५०० महिला असतील तर भारतात ४०० महिला असतील.)
मी इथे अमेरीकेत आणि जपान मधील
मी इथे अमेरीकेत आणि जपान मधील परीस्थिती बद्दल लिहिले आहे. जगात सगळीकडे चालते तेव्हा ते नॉर्मल असे मी म्हटले नाहिये. मात्र इथे काही त्रास नाही हा सूर मला खटकला. तेव्हा उगाच मी लिहिलेल्या पोस्ट्सचा सोयीस्कर अर्थ लावणे, विपर्यास करणे नको.
स्वाती२, कॉन्टेक्स्ट लक्षात
स्वाती२, कॉन्टेक्स्ट लक्षात घेतला असतात तर सूर खटकायचं कारण नव्हतं. माझ्या आधीच्याही एका पोस्टमध्ये मी म्हटलं आहे की जगाच्या पाठीवर कुठेही काही लोकेशन्स, काही एन्विरॉन्मेन्ट्स , काही टायमिंग्ज जोखमीची असतात हे कोणीच अमान्य केलेलं नाही. पण भारतात येतात तसे आणि तितके जळीस्थळी अनुभव इथे आलेले नाहीत. वर्षू नील, सायो यांनी अन्य देशांतले अनुभव लिहिले आहेत तेही असेच आहेत.
मग 'असं काही नाही, अमेरिकेतही आहेत की अशी उदाहरणं' या आर्ग्युमेन्टने नक्की काय साधतं मला समजलेलं नाही.
लोकहो, सहवेदनेबद्दल
लोकहो, सहवेदनेबद्दल धन्यवाद!
सीबीएसईची शाळा आहे. प्रायवेट पब्लिकेशन्सची बुक्स आहेत.
मी सोडून कुणाला काही खटकणं शक्य नाही कारण २० मुलांच्या वर्गात दोनच जणांच्या वर्किंग मदर्स आहेत आणि त्यातल्या दुसर्या बाई त्याच शाळेत शिक्षिका आहेत.
त्यामुळे उगाच एकटीला अरण्यरुदन करावे लागेल. म्हणूज जाऊदे मरूदे.
तसंही या शाळेशी वेवलेंग्थ जुळत नाही म्हणून पुढच्या वर्षी दुसर्या शाळेत टाकणार.
त्या दुसर्या शाळेत चक्कं 'सिंगल पॅरेंट फॅमिलीही असतात. काही मुलांना फक्तं आई किंवा फक्तं बाबा असतात ' हे ही धड्यात समाविष्टं आहे.
इथे काही त्रास नाही >>> इथे
इथे काही त्रास नाही >>> इथे काहीतरी समजुतीचा घोटाळा आहे का? कारण इथे तसा त्रास नाही हे "गर्दीच्या ठिकाणी होणारे नकोसे स्पर्श/ ग्रोपिंग" च्या घटनांबद्दल होतं.
maitreyee, आपला इथला संदेश
maitreyee,
आपला इथला संदेश वाचला.
१.
>> काय लिहिता ते वाचून तरी पहा की एकदा ?
बघितलंय.
२.
>> दरडोई बलात्काराची संख्या म्हणजे काय ?
दरडोई बलात्कारांची संख्या म्हणजे समाजात झालेल्या एकंदर बलात्कारितांच्या संख्येस एकंदर लोकसंख्येने भागून जो भागाकार येतो तो. एका पीडीतेवर दोनदा बलात्कार झला तरी संख्या एकंच धरली आहे.
३.
>> ऐकून आहे, वाचत असलो तरी अंदाज आहे , कसला अंदाज ? कोणत्या बेसिस वर ?
अंदाजाचा पाया कच्चा आहे कारण भारतात बरेच बलात्कार गुन्हा म्हणून नोंदवले जात नाहीत. कृपया इथे पहा : https://en.wikipedia.org/wiki/File:Rape_rate_per_100,000_-_country_compa...
या आलेखाच्या आधारे स्वीडनला बलात्काऱ्यांचा देश म्हणता येईल का?
असो.
अधिक माहितीसाठी : https://en.wikipedia.org/wiki/Rape_statistics#India
भारतात दरलाखी २ बलात्कार नोंदवले जातात. ही संख्या दहापट वाढवली तरी फक्त २० पर्यंत पोहोचते (अंदाजे केवळ ११% बलात्कार नोंदवले जातात म्हणून दहापटीने वाढवतोय). तरीही २० ही संख्या अनेक प्रथमजगदीय देशांपेक्षा कमी आहे.
आ.न.,
-गा.पै.
मग 'असं काही नाही, अमेरिकेतही
मग 'असं काही नाही, अमेरिकेतही आहेत की अशी उदाहरणं' या आर्ग्युमेन्टने नक्की काय साधतं मला समजलेलं नाही.
<<
माफ करा, पण अशा आर्ग्युमेंट्सचा इतक्या उत्कटतेने नेहेमीच असाच प्रतिवाद करूनही काय साधतं, तेही मला समजलेलं नाही.
आय मीन ऑल धिस हॅज हॅपन्ड
आय मीन ऑल धिस हॅज हॅपन्ड बिफोर अँड आय वॉज गिव्हन फंडाज अबाऊट "व्हेंटिंग".
भारतातच राहणार्या महिला "जळी
भारतातच राहणार्या महिला "जळी स्थळी असेच अनुभव २४ तास येतात" असे म्हणत आहेत काय? मला तर धाग्यातच अनेक पॉझिटिव्ह अनुभवही दिसलेत त्यांनी लिहिलेले. अमेरिकेबद्दल मला काडीचीही माहिती नाही असे मान्य करुन टाकू सध्यापुरते.
दीमा, तुम्हाला स्टॅटिस्टिक्स
दीमा, तुम्हाला स्टॅटिस्टिक्स हवं आहे का? गापैंना विचारा, ते देतील.
मलाही भारताबद्दल माहिती नाही असं वादासाठी गृहित धरू, मग हा धागा का काढावा लागला अशी तुमची कल्पना आहे? धागाकर्तीचा गैरसमज?
ibA, you know exactly what i
ibA,
you know exactly what i am talking about.
>>'असं काही नाही, अमेरिकेतही
>>'असं काही नाही, अमेरिकेतही आहेत की अशी उदाहरणं' या आर्ग्युमेन्टने नक्की काय साधतं मला समजलेलं नाही.>>
कारण इथेही लढाई सुरुच आहे. कधी संपेल ? माहीत नाही. भारताच्या मानाने गुन्हा करायला संधी मिळत नाही, जोडीला सेक्स ऑफेंडर रजिस्ट्री, कायद्याची अंमलबजावणी वगैरे बाबी मदत करतात. पण मानसिकतेचा विचार करता चित्र फारसे चांगले नाही हे ही सत्य आहेच. जे काही पॉझिटिव आहे ते ही खूप झगडून मिळालयं. रेप किंवा इंसेस्ट हे गर्भपातासाठी एक्सेप्शन असू नये म्हणून प्रयत्न होतात तेव्हा ही मानसिकता जाणवल्या शिवाय रहात नाही. देश प्रगत आहे किंवा इथे मुक्त व्यवहार आहे म्हणुन सर्व आलबेल असा गैरसमज नको म्हणून लिहिले.
ऑफ कोर्स. गैरसमज हा योग्य
ऑफ कोर्स. गैरसमज हा योग्य शब्द आहे.
यू मीट अ पर्व्हर्ट, अँड यू ब्लेम द ब्लडी होल मेल पार्ट ऑफ द स्पिसिज फॉर दॅट? एल ओ एल. एन्जॉय युअर पॅराडाइज.
दीमा कशाला उगीच शब्दाचा कीस
दीमा कशाला उगीच शब्दाचा कीस पाडता ? वेड पांघरत असाल तर बोलणे खुंटले पण खरोखर नसेल माहित तर तुमच्या नात्यातल्या/ ओळखीच्या भारतातल्या स्त्रियांना विचारून पहा किती कॉमन आहेत हे अनुभव ते. कुठेही जा, मंदिरात नाहीतर ट्रेन स्टेशन वर गर्दी म्हटल्यावर हे अनुभव येतातच. जितक्या वेळा गर्दीत जाऊ त्या प्रत्येक वेळी ! आता मलाच उत्सुकता आहे , हे अनुभव कधी आले नाहीत अशी स्त्री आहे का कुणाच्या पाहण्यात ?
मैत्रेयी, उग्गं हाय फंडे देऊ
मैत्रेयी,
उग्गं हाय फंडे देऊ नका, मी काय अलिबागवरून आलेला एलियन नाहिये.
मीही एका स्त्रीच्याच पोटी जन्मास आलो आहे, एका स्त्रीशी विवाह केलेला आहे, अन एका स्त्रीचा पिता आहे.या सगळ्या भारतातल्याच आहेत.
ही चर्चा टीपापावर पूर्वी झालेली आहे, अन बायका "अँगर व्हेंट" करीत आहेत म्हणून बुवांनी मला गप केलंय, मीही आवरलं आहे.
बाकी चालू द्या.
मग तुमच्या मते भारतात
मग तुमच्या मते भारतात प्रॉब्लेम नाही? त्याचं कारण नीट चॅनलाइज न झालेले सामाजिक आणि सांस्कृतिक बदल नाहीत? त्यासाठी काहीही - आत्मपरीक्षणसुद्धा करण्याची आवश्यकता नाही? आहे ते उत्तमच आहे?
Pages