Submitted by फेबु on 13 August, 2014 - 15:07
रामदेव बाबा यांची पतंजली ची प्रोडक्ट ऑनलाईन मागवता येतात का?असतील तर कुठून मागवता येतील?
पतंजली ची कुठली प्रोडक्टस चांगली आहेत ?तुम्ही वापरता का?अन आपला अनुभव काय आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पतंजलीचा दलिया आवडतो
पतंजलीचा दलिया आवडतो आमच्याकडे. मी तो वेगवेगळ्या भाज्या घालून करते बरेचदा. पण तासभर तरी भिजवायला लागतो कारण बाजरी शिजत नाही लवकर. मीपण धुवून घेते आणि मग ओवा तीळ तरंगतात, बरेच वाया जातात. माझ्या बहिणीला मात्र नाही आवडला दलिया.
बिस्किटंपण आवडतात आमच्याकडे. सध्या गुळ पावडर आणलीय.
हा दलिया कसा करतात ?
हा दलिया कसा करतात ? वेगवेगळ्या भाज्या घालून आणि न घालता पण दोन्हीच्या कृती सांगाव्यात प्लीज.
पतंजलीची उत्पादने "बेस्ट"
पतंजलीची उत्पादने "बेस्ट" आहेत.
मी दंतमंजन/व पेस्ट वापरली. शेव्हिंग क्रिम नुकतेच आणले आहे. छान आहे.
मॉश्चरायजर की कायसेसे क्रीमही खूप छान आहे.
बिस्किटे तर नेहेमीच घेतो.
बाकी औषधे मी नाही तरी मित्राने वापरुन बघितली आहेत, रिझल्ट्स चांगले आहेत.
शिवाय, देशी उत्पादने घेतल्याचे समाधान मिळते ते वेगळेच.
हॅना, मी तासभर दलिया धुवुन
हॅना, मी तासभर दलिया धुवुन भिजवुन ठेवते.
पाणी उकळून ठेवते. पातेल्यात फोडणी करून त्यात कधी आले, लसूण, मिरची तुकडे घालते कधी नाही. भाज्या घालणार असेल तर फोडणीत घालून परतते मग दलिया टाकते. भाज्या नसतील तर तसाच दलिया टाकते, परतते थोडा वेळ. मग गरम पाणी घालते. मीठ, तिखट आणि आमचा गोडा मसाला घालते. झाल्यावर वरून ओले खोबरे- कोथिंबीर- लिंबू (हे ऑप्शनल).
प्रमाण मला सांगता येणार नाही. माझं अंदाजपंचे दाहोदरसे असते.
हे सर्व मायक्रोवेव्हमध्ये केलं तर गरम पाणी घालत नाही. साधंच घालते आणि फोडणी वरून करते आणि मग मावेमध्ये ठेवते सर्व.
आजच्या इंडियन एक्स्प्रेसचे
आजच्या इंडियन एक्स्प्रेसचे संपूर्ण मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ भरून पतंजली जाहिरात आहे. ती पाहून इथे वाचलेले "पतंजलीची जाहिरात कुठे दिसली नाही" हे आठवले.
आमच्या इथल्या पेपरातही दोन्-तिन महिन्याने पान भरुन जाहिरात येते पतंजलीची.
पण साबण, तेल, टूथपेस्ट, बिस्किटे, ज्युसेस इत्यादी रोजच्या वापरातल्या वस्तुंची टिवीवर जी अमर्याद जाहिरात, महागड्या सेलेब्रिटीज वापरुन चाललेली असते तशा यांच्या जाहिराती नसतात. त्यामुळे रोजच्य वापरातल्या पतंजलीच्या किंमती कमी राहणारच.
मी तिथुन वॉशिंग पावडर घेते जी मला सर्फ एक्सेलसारखाच रिझल्ट देते. पतंजलीची ६० ते ८० रुपय किलो आहे आणि सर्फ १९० च्या आसपास आहे.
शिवाय, देशी उत्पादने
शिवाय, देशी उत्पादने घेतल्याचे समाधान मिळते ते वेगळेच.
>>>
देशी नव्हे हिंदुत्ववादी उत्पादने घेतल्याचे समाधान मिळते ते वेगळेच 'असे म्हणा...
रॉहू.... पतंजलीची उत्पादने
रॉहू.... पतंजलीची उत्पादने देशाबाहेर बनवलेली आहेत का ?
देशी नव्हे हिंदुत्ववादी
देशी नव्हे हिंदुत्ववादी उत्पादने घेतल्याचे समाधान मिळते ते वेगळेच 'असे म्हणा...
घाणीचे आरोग्यदायी तेल घेताना सेंटरचे नाव "युसुफ मेहरअली" आहे याने काहीही फरक पडत नाही. उद्या पतंजली स्वत:च्या नावाने रिफाईंड तेल विकायला लागला तर मी ते हिंदुत्ववादी दुकानात आहे म्हणुन डोळे मिटून घेणार नाही.
बाकी तुमचा प्रतिसाद वाचुन परत परत हसायला येतेय.
साधना , ते फक्त लिंब्याला
साधना , ते फक्त लिंब्याला उद्देशून होते
रॉहू...... बळेच.
रॉहू...... बळेच.
>>>>> शिवाय, देशी उत्पादने
>>>>> शिवाय, देशी उत्पादने घेतल्याचे समाधान मिळते ते वेगळेच. ,,,,,
>>>>>> देशी नव्हे हिंदुत्ववादी उत्पादने घेतल्याचे समाधान मिळते ते वेगळेच 'असे म्हणा... <<<<<
अजुन राहिलय, "ब्राह्मणी" उत्पादन कुठे काही असेल, तर त्यालाही मी प्राधान्य देतो बर्का हूडा....
त्यातही "कोब्रा" व "देब्रा" असे दोन पर्याय उपलब्ध असतील तर "कोब्रा" निवडतो.
अर्थात साधना म्हणतात तसे क्वालिटी/किंमत याचा विचार करतोच, पण कुठे तडजोड करायची, कुठे नाही याचे ठाम निकष असतात माझे.
व ते निवडताना, त्यात सर्वप्रथम "हिंदुइझम", नंतर जोडीला तोंडी लावण्यापुरता "मराठी भाषिकैझम", व अगदीच जमल्यास "जातीइझमही" वापरतो, जे करण्यात मला कसलाही कमी पणा वाटत नाही.
जन्माने मी आधी हिंदू आहे, व हिंदू आहे म्हणूनच जन्माने जातीचा ब्राह्मणही आहे, आता ब्राह्मण जात आहेच, तर त्यातही कोब्रा आहे, शिवाय इये मरहठ्ठीये देशी जन्मल्यामुळे "मी मराठी" ही आहे. या सगळ्यांचा अभिमान मी बाळगतो, व या सर्वांचे संरक्षण व संवर्धन कसे होईल याची जबाबदारीही मी मानतो.
पतंजलीची उत्पादनं रिटेल/
पतंजलीची उत्पादनं रिटेल/ डिपार्टमेन्टल स्टोअरमध्ये का मिळत नाहीत, काही कल्पना?
पतंजलीची उत्पादनं रिटेल/
पतंजलीची उत्पादनं रिटेल/ डिपार्टमेन्टल स्टोअरमध्ये का मिळत नाहीत >>> स्टार बाझार मध्ये मिळतात पतंजली उत्पादने (सगळी मिळत नाहीत आणि किंमत पतंजली दुकानापेक्षा जास्त असते)
आमच्याकडच्या सहकारी भांडारात
आमच्याकडच्या सहकारी भांडारात पतंजलीची बिस्किटे आलीत गेल्या आठवड्यापासून.
आता पतंजलीच्या नव्या जाहिराती आल्यात त्यात ही उत्पादने खरेदी करण्याचे आणखी एक कारण दिले आहे. (पहिले कारण - स्वदेशी) पतंजली ही नफा कमवणारी कंपनी नाही तर सर्व उत्पन्न संशोधनावर खर्च करणारी चॅरिटेबल (नक्की शब्द आठवत नाहीत) संस्था आहे.
पतंजलीची उत्पादनं रिटेल/
पतंजलीची उत्पादनं रिटेल/ डिपार्टमेन्टल स्टोअरमध्ये का मिळत नाहीत, काही कल्पना? >>> सगळी नाही मिळत. पण मध, च्यवनप्राश, बदामपाक नेहेमी असतो फूड बझारमध्ये. आमच्या इथले केमिस्ट बरीच उत्पादनं ठेवतात त्यांची. टूथपेस्ट, साबण, तेल, क्रीम वगैरे. मध आणि च्यवनप्राश तर असतेच.
केशकांती शॅम्पु, अंगाला
केशकांती शॅम्पु, अंगाला लावायचे साबण (मोगरा , ओजस , मुलतानी मिट्टी ) नेहमी वापरतो. सुप्पर क्वालिटी.

एकदाच तुप घेतलेलं, ते ही चांगलच आहे. पण मी गावाकडुन तुप घेउन येतो. त्यामुळे परत आणायची गरज लागली नाही. दलिया घेतो. घरच्यांना आवडतो. अजुनही बरच काहि असत तिथे, सर्व ट्राय केलेल नाहिये.
त्यांचे आयड्रॉप घेउ नका. भयानक झोम्बणारे आहेत.
रिलायंस फ्रेशमध्येही आहेत
रिलायंस फ्रेशमध्येही आहेत थोडी उत्पादने.
https://patanjaliayurved.net/
अच्छा. थोडी मिळतात. पण सगळी
अच्छा. थोडी मिळतात. पण सगळी नाही ना? त्यासाठी त्यांचेच दुकान गाठायला हवे असे दिसते. आमच्या भागात फक्त डीमार्ट आहे, तिथे दिसली नाहीत ही उत्पादनं.
@अंजू, धन्स.
@अंजू, धन्स.
माझ्या खरखरीत केसांसाथि यांचा
माझ्या खरखरीत केसांसाथि यांचा शॅम्पु उपयोगि पडेल का?
हॅना . नव-याने बेलफळाचा
हॅना :).
नव-याने बेलफळाचा मुरंबापण आणलाय. त्यात मोठे मोठे तुकडे आहेत बेलफळाचे. नवरा ठाण्याहुन आणतो बरेचदा पतंजलीच्या दुकानातून नाहीतर डोंबिवलीलापण आहेत दोन दुकाने.
मधपण आणतो. लिक्विड हँडवॉश साबणपण आणतो आम्ही. गुळपावडर आवडली.
डी-मार्टमध्ये नसतात. सगळ्या
डी-मार्टमध्ये नसतात.
सगळ्या उत्पादनांसाठी त्यांचे दुकानच गाठायला हवे. औंधमध्ये एक होते. आता आमच्या भागातही उघडले आहे. खरेतर जायचे आहे तिथे. राहून जातेय. वरच्या पोस्ट्स वाचून साबण, क्रीम्स वगैरे ट्राय करावे असे वाटते आहे. आम्ही फक्त मध वापरतो नियमित.
वरच्या पोस्ट्स वाचून
वरच्या पोस्ट्स वाचून क्रेकक्रीम , पीडांतक आणि शाम्पू वापरावासा वाटतोय , गिर्हाईक अनुक्रमे आई , साबा आणि मी . दोघी मैत्रिणी ही म्हणाल्या की शाम्पू चन्गला आहे . त्याच्या साईटवर किमती ही कमी वाटतायेत . कारण मैत्रिणीने शाम्पूची किमत १२५ वगैरे सन्गितली . फक्त ५०० रूपयाच सामान मागवाव लागेल .
अरे हो ओरेन्ज फेस वॉश देखील
अरे हो ओरेन्ज फेस वॉश देखील वापरलाय चांगला आहे.
शिकेकाई शाम्पू वापरलाय मी.
शिकेकाई शाम्पू वापरलाय मी. छान असतो. कंडिशनरही उत्तम. टुथपेस्ट बरीचशी विकोसारखी असते चवीला. साबण, च्यवनप्राश, गुलकंद, बेल मुरंबा हे आवडलेत. मध चक्क गोठला (साखर झाली त्याची), त्यामुळे तो आणत नाही, कोणाला रेकमेन्डही करत नाही. बिस्किटं नाही आवडली.
मी सुद्धा पतंजलीची फॅन
मी सुद्धा पतंजलीची फॅन आहे.कपड्याचा आणि भांड्याचा साबण बेस्ट आहे.
शाम्पू वापरतेय. कंडीशनर पण
शाम्पू वापरतेय. कंडीशनर पण आणला आहे. रीझल्ट उत्तम आहे.
झकासराव,. त्यांचे आय ड्रॉप डोळ्यात घातल्यावर डोळा पाच मिनीटं उघडायचासुद्धा नाही. एकदम गारगार वाटतं. जरा जरी डोळे मिचमिचले की झोंबायला सुरूवात होते.
डीमार्टात नाहीत आणि
डीमार्टात नाहीत आणि फ्रेशमध्ये फक्त थोडे अंगाचे साबण, शांपु, तुप, मुरंबे आणि थोडे कोरफड रस वगैरे आहेत. मला बाकीचे काही हवे असेल तर त्याच्याच दुकानात जावे लागते. त्याचे मसाले, ओवा वगैरेही मिळतात. ओवा व्यवस्थित साफ केलेला आणि एकसारखा दाणा असतो. मसाले घ्यायची वेळ अजुन आली नाही.
पतंजली ब्रंडचे तुप ४५० रुपये किलो आहे. गेल्या आठवड्यात गेलेले तेव्हा एका साध्या पर्ल्पेटच्या जारमध्येही तुप ठेवलेले दिसले. ब्रँडेड नव्हते. दुकानात विचारले तर ते ९०० रुपये किलो म्हणाला. अस्सल भारतीय वाणाच्या गाईचे तुप होते म्हणे. म्हटले, राहुदे, इतके परवडायचे नाही आम्हाला.
बोरिवली कि.वा आजुबाजूला कुठे
बोरिवली कि.वा आजुबाजूला कुठे आहे का ह्या.चे दुकान?
त्यांचे आय ड्रॉप डोळ्यात
त्यांचे आय ड्रॉप डोळ्यात घातल्यावर डोळा पाच मिनीटं उघडायचासुद्धा नाही>> ओके. ही माहिती नवीन आहे.
मी अनुभव घेतला नाहिये. जवळच्या मित्राने मला सल्ला दिला, त्याच्या अनुभवातुन.
Pages