रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.
पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?
या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...
HeForShe : KEY MESSAGES
* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world
* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality
* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.
ABOUT THE CAMPAIGN
HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.
अधिक माहिती :
https://en.wikipedia.org/wiki/HeForShe
***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी
पुरूषांची सामाजिक जबाबदारी -
१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.
२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.
३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.
४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.
५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.
६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.
७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.
८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.
९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.
***********************************************************************************************************
अंजली
बर्याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.
१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?
एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?
चर्चा रुळावर आणण्याचा
चर्चा रुळावर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्नः (प्रयत्न अनावश्यक वाटत असल्यास प्रतिसाद कृपया दुर्लक्षित केला जावा).
१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?<<<
मुलगा किंवा मुलगी नाही. मानलेली मुलगी आहे पण तिला तिचे पालक संस्कार देत असतातच. शिवाय ती आमच्याकडे बरेचदा असते त्याच काळात असे नव्हे तर कोणासमोरच पत्नीला अजिबात असे काही म्हणत नाही. किंबहुना, आम्ही दोघेच असताना वाद झाले तरीही ते ह्या पातळीला जातच नाहीत (सुदैवाने).
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?<<<
आमच्या शेजारच्या एका जोडप्यातील नवर्यानेने त्यांचा मुलगा चौदा-पंधरा वर्षांचा झाल्यावर त्याला समोर बसवून स्त्री पुरुष संबंधांबाबत सर्व काही नीट समजावून दिले. ह्याशिवाय, लैंगीक शिक्षण आवश्यक आहे असे म्हणणारे अमाप लोक मला गेल्या दिड वर्षात मी करत असलेल्या कामानिमित्ताने भेटले. मला वाटते आता निदान सुशिक्षित लोकांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत ह्यातील फरक थोडासा समजू लागला असावा व त्यामुळे एक बर्यापैकी मोठा सुशिक्षित वर्ग आता सुसंस्कृत होण्याकडे वाटचालही करत असावा. पॉर्न पाहणार्या मुलाला त्याच्या पातळीनुसार समजावणे हा त्यामुळे योग्य उपाय आहे हे आता जवळपास सगळ्यांनाच पटेल.
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?<<<
मित्र, कलीग ह्यांना जेव्हा असे करताना पाहायचो तेव्हा सुरुवातीला नकोसे वाटायचे. नंतर मीही हसायचो. नंतर एखाद्या स्त्रीबद्दल अगदी विश्वासू मित्रांच्या ग्रूपमध्ये काही थट्टामस्करी वगैरेही केली. (अश्लील नक्कीच नाही, पण स्पायसी म्हणता येईल). (काय रे, तू सारखा तिकडे काय बघतोस वगैरे प्रकारचे! हे अगदी कुटुंबियांमध्येही चालते हे माहीत आहे). नंतर आंतरजाल, अनेक पुस्तके, समाज सुधारणेशी संबंधीत अनेक व्यक्ती ह्यांच्या संपर्कात जसजसा यायला लागलो तसे विचारांचे परिघ प्रसरण पावत राहिले. आता अगदी बहिणी, भाऊ, अगदी जिवाभावाचे मित्र असे असले तरच अश्या काही (त्याही गंमतीशीर, अश्लील वगैरे नव्हे) कमेंट्स करतो, जे सगळेच करतात. किशोरवयीन मुलांनी अशी कमेंट केली तर थोडेसे रागवून समजून घेणारी अनेक मुले आसपास पाहात आहे.
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?<<<
असे विशेष प्रसंग पाहण्यात नाहीत. पण कधी झालेच तर फारच गुंड मवाली असले तर आधीच लिहिल्याप्रमाणे फार काही हिरोगिरी करता यायची नाही. पण आजूबाजूच्यांना जागे करण्याचा प्रयत्न करेन.
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?<<<
वर ह्याचे उत्तर जवळपास दिलेलेच आहे. तसेही, आता काळ बदलला आहे आणि असे काही बोलण्याचे काय परिणाम होऊ शकतील ह्याबाबतची जागरूकता असे बोलणार्यांमध्येही झालेली आहे.
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?<<<
माझ्यासाठी गैरलागू प्रश्न!
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?<<<
शक्यच नाही. पण ऑफिसमधील मुलगी कामे टाळत असेल तर योग्य ते सुनवायलाच लागणार!
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?<<<
बायकी बोलणे हा प्रयोग मी अनेकदा करतो, पण तो टीकात्म अर्थाने नव्हे. पारंपारीकरीत्या अनेक विषयांत सहसा बायका अधिक स्वारस्य घेऊन बोलतात. किंवा वाद झाला तर मुद्द्यावर प्रतिवाद न करता असंबद्ध सैल ताशेरे झाडणे असेही अनेक बायका करतात व हे नैसर्गीक आहे. त्याला मी बायकी असे म्हणतो पण ते टीकात्म नसते ह्याचा अर्थ असा की बायकांना कमी समजतो म्हणून त्याला मी बायकी असे विशेषण लावत नसतो. 'बिनडोक बायका' असे कधी म्हणत नाही.
http://www.lokmat.com/storypa
http://www.lokmat.com/storypage.php?catid=30&newsid=2284
अनिरुद्ध_वैद्य, >> म्हणजे
अनिरुद्ध_वैद्य,
>> म्हणजे दरलाखी १००+ होतील का?
म्हणूनच माझं मत अंदाजपंचे आहे असं म्हंटलंय.
शिवाय तिथला मूळ संदर्भ पहिला (http://www.thelancet.com/pdfs/journals/lancet/PIIS0140-6736(14)60435-9.pdf) तर त्या अहवालात sexual violence असा उल्लेख आहे. बलात्कार हा लैंगिक हिंसाचार मानला तरी सर्व प्रकारचे लैंगिक हिंसाचार बलात्कारात मोडंत नाहीत. विषयवस्तूचा आवाका संदिग्ध आहे.
आ.न.,
-गा.पै.
बेफिकीर, तुमच्या प्रामाणिक
बेफिकीर, तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांकरता खरंच मनापासून धन्यवाद.
रस्त्यात होणारी प्रत्येक छेडाछेडी ही गुंडांकडून होते असं समजणं यासारखा दुसरा मोठा विनोद नाही. गर्दीचा फायदा सगळे संभावित लोकं घेतात. रोज स्टेशनवर, बसस्टॉपवर, बसमध्ये सकाळ-संध्याकाळ ऑफिसच्या वेळांत प्रवास करणारे गुंड नसतात तर सुशिक्षित आणि पांढरपेशी मंडळीही असतात. मी असं म्हणत नाहीये की हेच लोकं त्रास देतात. पण गर्दीला चेहरा नसतो याचा फायदा मनात विकृती असलेला कोणीही पुरुष घेत असतो हे सत्य आहे. जर असं कोणी करत असेल आणि आजूबाजूच्या इतर पुरुषांनी त्याला त्याचवेळी रंगेहात पकडून दोन मुस्कटात लगावल्या, फोटो काढून व्हॉटसॅप वर टाकले तर केवळ लाज जाईल या भितीपायी अशा घटना कितीतरी प्रमाणात कमी होतील. जे गुंड प्रवृत्तीचे आहेत ते कदाचित सुधारणार नाहीत पण हे इतर गर्दीच्या बुरख्याआडचे संभावित तरी असं काही करू धजावणार नाहीत. त्या प्रमाणात स्त्रीला सुरक्षितता प्राप्त होईल.
मामी, या कामासाठी इतर
मामी, या कामासाठी इतर पुरुषांवर का विसंबुन रहावे?
अश्या लोकांसाठी तुमचा एखादा जहरी लूक पण पुरेसा ठरावा
मामी, हे सगळं तिर्हाईत
मामी, हे सगळं तिर्हाईत पुरूषाने का करावं हे नाही समजले. मधे फेसबुकवर एक व्हिडीओ पाहिला होता. विमानात मागे बसलेला पुरूष त्या मुलीला सारखा त्रास देत होता. शेवटी तिने शिस्तीत व्हिडीओ चालू करून त्याला शिव्या घातल्या, विमानातलं सगळं पब्लिक गोळा केलं. आता हा तिने ठरवून केलेला पब्लिसिटी स्टंट आहे असं पण वाचनात आलं. अशा गोष्टींचे प्रमाण वाढले तर स्टंटबाजीचा आरोप पत्करून का होईना स्त्री व पुरूष दोन्ही वर्गात सजगता वाढेल असे वाटते. वर आधीच कुणीतरी लिहील्याप्रमाणे अशा धाडसाचे पश्चात परिणाम काय असतील हा धोका स्त्री व पुरूष दोघांनाही आहे. मला वाटतं, अशा हलकट लोकांना जागेवरच धडा शिकवला पाहिजे. किळस, शिसारी, घृणेवर मात करून. इतर पुरूषांकडून अपेक्षा करू नये.
>>>रस्त्यात होणारी प्रत्येक
>>>रस्त्यात होणारी प्रत्येक छेडाछेडी ही गुंडांकडून होते असं समजणं यासारखा दुसरा मोठा विनोद नाही<<<
हे विधान माझ्या प्रतिसादाबाबत असेल तर एक स्पष्टीकरण! हे विधान पटले आहेच. फक्त अगदी थेट गुंडच असणारे लोक उघडपणे असा प्रकार करत असतील तर त्यांना जाऊन धमकावणे हे प्रत्येकाला जमेल असे वाटत नाही. म्हणून म्हणालो की चार चौघांना सुचवेन की जे चालले आहे त्यात हस्तक्षेप करूयात.
मामी, हे सगळं तिर्हाईत
मामी, हे सगळं तिर्हाईत पुरूषाने का करावं हे नाही समजले. >>>
ज्यांनी मुंबईतल्या स्टेशन्सवरची गर्दी अनुभवली नाही आहे त्यांना असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.
जमेल तसा प्रतिकार स्त्रिया करतातच. पण गर्दीत धावपळीत असताना मागून असं काही केलं गेलं तर मागे वळून बघेपर्यंत बरेचदा ती व्यक्ती आपण त्या गावचेच नाही असा साळसूद चेहरा करून चाललेली असते. आजूबाजूला निदान १०-१२ माणसं खेटून चाललेली असतात. पकडणार कोणाला? आणि कसं?
हेच जर त्या व्यक्तीला करताना कोणी पाहिलं आणि आजूबाजूला असलेल्या सगळ्यांनी एकत्रित आवाज उठवला तर जरब बसू शकते.
तिर्हाईत पुरुष म्हणजे काय नेमकं ते कळलं नाही. सामाजिक जाणिव असलेल्या पुरुषांनी या बाबतीत स्त्रियांना मदत करावी हाच या धाग्याचा उद्देश आहे. मग तो पुरुष ओळखीचा असो वा नसो.
स्त्रियांनी जर कोणाला असं काही करताना पकडलं तर तिला त्यावेळी सपोर्ट करणारे किती सापडतात?
हे विधान माझ्या प्रतिसादाबाबत
हे विधान माझ्या प्रतिसादाबाबत असेल तर एक स्पष्टीकरण! >> हे तुमच्या प्रतिसादाकरताच फक्त नव्हतं. वरती अनेक ठिकाणी हे वाचायला मिळालंय म्हणून....
>>>या कामासाठी इतर पुरुषांवर
>>>या कामासाठी इतर पुरुषांवर का विसंबुन रहावे?<<<
>>>हे सगळं तिर्हाईत पुरूषाने का करावं हे नाही समजले<<<
माझ्या अंदाजाने धाग्याची मूळ संकल्पनाच 'कोणत्याही पुरुषाने कोणत्याही स्त्रीसंदर्भात काय सामाजिक भूमिका घ्यावी' अशी असल्यामुळे येथे फक्त आपल्या कुटुंबातील, परिचयातील पुरुषांबद्दल न बोलले जाता कोणाही पुरुषांबद्दल बोलले जात आहे.
ज्यांनी मुंबईतल्या
ज्यांनी मुंबईतल्या स्टेशन्सवरची गर्दी अनुभवली नाही आहे त्यांना असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. >> सरसकटीकरणाबद्दल धन्यवाद. म्हणजे इथे लिहायला कोण एलिजीबल नाही हे तुम्ही परस्पर ठरवूनच टाकलंयत तरी सांगते, घाणेरडे अनुभव यायला "मुंबईच्याच लोकलनेच गर्दीतच" प्रवास करावा लागतो असं नव्हे. पुणे स्टेशनवर घाईगर्दीच्या वेळी, गणेशोत्सवात, मोठ्या कार्यक्रमांच्या एंट्री एक्झिटला, सिनेमा संपल्यावर अरूंद अंधार्या दारा जिन्यातून बाहेर येताना असे हजारो ठिकाणी ही "सोय" असते. इथे प्रत्येक ठिकाणी शेजारच्या परक्या तिर्हाईत पुरूषाने त्याच्या सामाजिक जाणीवेचे भान ठेवून त्या हलकटाला फटकारणे अशी अपेक्षा आदर्श, पुस्तकी आणि अवास्तव वाटते.
सामाजिक जाणीव असलेल्या पुरूषांनी स्वत: कसं वागायचं हे ठरवता येईल. फारतर, मुलाला, भावाला असे वागू नये असेही सांगता येईल पण ते तसं वागणार नाहीतच याची खात्री देता येणार नाही. धाग्याच्या उद्देशाबाबतच प्रश्न निर्माण झालाय.
बर... असे कुणा लगट करणार्याला
बर... असे कुणा लगट करणार्याला हटकले आणि ते नेमके कपल (अधिकृत/अनधिकृत) निघाले तर काय करावे?
असा एखादा व्हिडीओ काढून पब्लिश केला आणि मग त्यावर त्या स्त्रीनेच बदनामी नको म्हणून आक्षेप घेतला तर काय करावे?
इथे वादासाठी वाद घालत नाही आहे पण हीच बहुतेक आजुबाजूच्या बघ्यांची मानसिकता असते!
आशूडी + १०००००००० हेच
आशूडी + १००००००००
हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेच सोंग घेतलेल्याला नाही.
मला होणार्या त्रासाबद्दल दुसर्याने तिसर्याची जबाबदारी का ठरवावी ?
वरच्या अनेक पोस्टींचा सूर मला
वरच्या अनेक पोस्टींचा सूर मला तरी "सगळे/बहुसंख्य भारतीय पुरूष असे करतात" असा वाटला नाही. कोणत्या वाक्यामुळे/पोस्टीमुळे तसा वाटतोय? मला जनरल पॅटर्न "भारतात हा त्रास खूप सर्रास जाणवतो" अशा टोन चा दिसला, आणि तो ज्याच्या त्याच्या वैयक्तिक अनुभवावरून असल्याने त्याबद्दल काय विरोध करणार.
<<
फा,
वाक्य क्र. १ "सगळे/बहुसंख्य भारतीय पुरूष असे करतात" असा वाटला नाही.
वाक्य क्र. २ "भारतात हा त्रास खूप सर्रास जाणवतो"
हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत का? भारतात त्रास खूप सर्रास जाणवतो, तर तो त्रास देणारे कोण? (उदा.) म्यानमारमधून स्पेशल त्रास देणारे येतात का इकडे?
बाकी अमेरिकेचा द्वेष करतो म्हणजे काय करतो म्हणे मी?
धाग्याच्या उद्देशाबाबतच
धाग्याच्या उद्देशाबाबतच प्रश्न निर्माण झालाय.
<
तेच.
एका मुलीला गुंडापासून
एका मुलीला गुंडापासून वाचवताना परवाच एका जवानाचा मृत्यु झाला आहे.
http://www.hindustantimes.com/india-news/jawan-beaten-to-death-while-try...
हे ही भारतीयच आहेत -मदत करायला धावणारे.
असल्या गुन्डाना बेदम मारहाण
असल्या गुन्डाना बेदम मारहाण करुन वर मीठ चोळुन, उलटे टान्गुन खालुन मिर्च्यान्ची धूरी दिली पाहीजे.:राग: खरे तर फाशी द्या असे लिहीणार होते. नाहीतर मिलीटरीच्याच ताब्यात द्या.
आपल्या देशाला एकदा मिलीटरी शासन लावले पाहीजे. नाहीतरी लोकशाहीची लक्तरे मन्त्र्या-सन्त्र्यानी आणी सामान्य नागरीकानी पण वेशीवर टान्गली आहेतच.
माझ्या अंदाजाने धाग्याची मूळ
माझ्या अंदाजाने धाग्याची मूळ संकल्पनाच 'कोणत्याही पुरुषाने कोणत्याही स्त्रीसंदर्भात काय सामाजिक भूमिका घ्यावी' अशी असल्यामुळे येथे फक्त आपल्या कुटुंबातील, परिचयातील पुरुषांबद्दल न बोलले जाता कोणाही पुरुषांबद्दल बोलले जात आहे. >>> बेफी + १.
बापरे, ही साधी गोष्टही किती वेळा सांगावी लागत आहे.
@ आशुडी
ज्यांनी मुंबईतल्या स्टेशन्सवरची गर्दी अनुभवली नाही आहे त्यांना असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. >>
सरसकटीकरणाबद्दल धन्यवाद. म्हणजे इथे लिहायला कोण एलिजीबल नाही हे तुम्ही परस्पर ठरवूनच टाकलंयत तरी सांगते, घाणेरडे अनुभव यायला "मुंबईच्याच लोकलनेच गर्दीतच" प्रवास करावा लागतो असं नव्हे. पुणे स्टेशनवर घाईगर्दीच्या वेळी, गणेशोत्सवात, मोठ्या कार्यक्रमांच्या एंट्री एक्झिटला, सिनेमा संपल्यावर अरूंद अंधार्या दारा जिन्यातून बाहेर येताना असे हजारो ठिकाणी ही "सोय" असते. इथे प्रत्येक ठिकाणी शेजारच्या परक्या तिर्हाईत पुरूषाने त्याच्या सामाजिक जाणीवेचे भान ठेवून त्या हलकटाला फटकारणे अशी अपेक्षा आदर्श, पुस्तकी आणि अवास्तव वाटते.
सामाजिक जाणीव असलेल्या पुरूषांनी स्वत: कसं वागायचं हे ठरवता येईल. फारतर, मुलाला, भावाला असे वागू नये असेही सांगता येईल पण ते तसं वागणार नाहीतच याची खात्री देता येणार नाही. धाग्याच्या उद्देशाबाबतच प्रश्न निर्माण झालाय.
>>> वाकड्यात शिरण्याचं कारण कळलं नाही. पुरुष अशी सोयीस्कर भुमिका घेतात हे माहित आहे. आता स्त्रियादेखिल केवळ आपला मुद्दा पुढे रेटता यावा यासाठी अशा भुमिकेला पाठिंबा देत आहेत हे बघून खरं सांगायचं तर धक्का बसला. एकच मुद्दा घेऊन त्यावर शब्दच्छल करून मग डायरेक्ट धाग्याच्या उद्देशाबद्दल शंका निर्माण करण्याच्या कौशल्याबद्दल ____/\____ . यापेक्षा हेडरमधिल अरुंधतीचे मुद्दे आणि अंजलीचे प्रश्न या निमित्ताने काही इथे लिहिता आले तर लिहावे.
समाजात स्त्री-पुरुष हे दोन्ही घटक असतात आणि एक सुरक्षित समाज निर्माण होण्यासाठी दोघांच्याही मदतीची गरज असते. आपले प्रश्न आपणच सोडवा हीच मनोवृत्ती जास्त प्रमाणात बोकाळली आहे म्हणून गुन्हाचे प्रमाण वाढत आहे असंही वाटायला लागलंय. उद्या शेजारघरी कोणी मदतीकरता हाका मारत आहे असं दिसलं तरी 'आपल्याला काय त्याचं. त्यांचे प्रश्न तेच सोडवतील.' असं म्हणणार का? मग उद्या तुम्ही हार्टअॅटॅक येऊन / अॅक्सिडेंट होऊन रस्त्यावर पडल्यावर तुमच्यासोबत असलेल्या तुमच्या बायकोला/नवर्याला मदत न करता बाकीचे आपापल्या कामाला लागले तर त्यांना दोष देणार नाही ना?
इथे प्रत्येक ठिकाणी शेजारच्या परक्या तिर्हाईत पुरूषाने त्याच्या सामाजिक जाणीवेचे भान ठेवून त्या हलकटाला फटकारणे अशी अपेक्षा आदर्श, पुस्तकी आणि अवास्तव वाटते. >>> ही अशी मानसिकता घडण्यापर्यंत समाज बिघडलाय असंच वाटतंय आता.
पण तरीही अनेक जण इतके संकुचित विचार न करता एक सुरक्षित समाजासाठी जी काही आणि जितपत जमेल तेवढी त्यांच्यापरीनं मदत करतील अशी आशा अजूनही आहे. ज्यांना हा आदर्शवाद वाटतो त्यांनी आपल्यापुरतं बघून जीवन सुरू ठेवायला हरकत नाही.
मला होणार्या त्रासाबद्दल
मला होणार्या त्रासाबद्दल दुसर्याने तिसर्याची जबाबदारी का ठरवावी ? >>>>
हे वाक्य दुसर्या पद्धतीनं असं लिहिता येईल : (शहर, राज्य, देश यातले काहीही घ्या) अर्ध्या लोकसंख्येतील काही विकृत़ घटकांमुळे उर्वरित अर्ध्या लोकसंख्येला सार्वजनिक जागी सुरक्षित वाटत नाही. तर त्या विकृतीला धरबंध घालण्यासाठी सर्वजणांनी एकत्रित येण्याची गरज आहे.
ही चर्चा एका व्यक्तीच्या पर्सनल अनुभवांमुळे चालली आहे असं वाटतंय का?
नाही!
नाही!
वाकड्यात शिरण्याचं कारण कळलं
वाकड्यात शिरण्याचं कारण कळलं नाही. पुरुष अशी सोयीस्कर भुमिका घेतात हे माहित आहे. आता स्त्रियादेखिल केवळ आपला मुद्दा पुढे रेटता यावा यासाठी अशा भुमिकेला पाठिंबा देत आहेत हे बघून खरं सांगायचं तर धक्का बसला. एकच मुद्दा घेऊन त्यावर शब्दच्छल करून मग डायरेक्ट धाग्याच्या उद्देशाबद्दल शंका निर्माण करण्याच्या कौशल्याबद्दल ____/\____ . यापेक्षा हेडरमधिल अरुंधतीचे मुद्दे आणि अंजलीचे प्रश्न या निमित्ताने काही इथे लिहिता आले तर लिहावे. >>
मुद्दा पुढे रेटायची मला गरज वाटत नाही. शब्दच्छल करणे हाही उद्देश छंद नाही. जरासं वेगळं मत मांडलं तर लगेच, तुम्हाला काय कळणार आमच्या व्यथा किंवा थेट हलकट मनोवृत्तीला पाठिंबा असा निष्कर्ष निघत असेल तर चर्चा नक्कीच एकांगी होत आहे. आणि म्हणूनच धाग्याच्या उद्देशाबद्दल शंका उपस्थित करायला फारसं कौशल्य लागत नाही.तसं सुरवातीला वाटलं असतं तर दोन तीन पाने मागे टाकलेली पोस्टही लिहीली नसती. पण आता जो 'दुसर्या पुरूषानेच या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा अन्यथा तो सामाजिक भान नसलेला बेजबाबदार, असभ्य भारतीय नागरीक आहे' असा जो समज पसरवला जातोय तो चुकीचा वाटला म्हणून लिहीले तर त्यावर मुंबईच्या लोकल गर्दीचे दाखले दिले गेले. याचा अर्थ तुम्हाला लोकांकडून काय वदवून घ्यायचंय ते ठरलेलं आहे जे ते बोलत नाहीत ते सगळे स्त्रियांना छळणारे, त्या प्रकारांना खतपाणी घालणारे. हे म्हणजे पोलीसांनी कबूलीजवाब घेतल्यासारखं झालं. आता इथे आणखी लिहीण्यात रस नाही. कारण रेटलाच पाहिजे असा कोणता मुद्दा घेऊन मी आले नव्हते.
आम्ही काय करायचे ते आम्हाला
आम्ही काय करायचे ते आम्हाला कुण्णी कुण्णी सांगायचे नाही, चुकुन एखादा गेलाच सांगायला तर तो प्रतिगामी, बुरसटलेल्या विचारांचा पण तुम्ही काय करायचे यावर मात्र साधकबाधक चर्चा व्हायला पाहिजेच!
चर्चा कसली अमुक असेच रिएक्ट व्हायला पाहिजे हा आग्रहच जवळजवळ आणि तसे नाही झालात किंवा तसे न होण्यामागची कारणे सांगायला गेलात तर तुम्ही सरसकट बिघडलेला समाज!
पण आता जो 'दुसर्या पुरूषानेच
पण आता जो 'दुसर्या पुरूषानेच या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा अन्यथा तो सामाजिक भान नसलेला बेजबाबदार, असभ्य भारतीय नागरीक आहे' असा जो समज पसरवला जातोय >>>> कठीण आहे.
<< हे वाक्य दुसर्या पद्धतीनं
<< हे वाक्य दुसर्या पद्धतीनं असं लिहिता येईल : (शहर, राज्य, देश यातले काहीही घ्या) अर्ध्या लोकसंख्येतील काही विकृत़ घटकांमुळे उर्वरित अर्ध्या लोकसंख्येला सार्वजनिक जागी सुरक्षित वाटत नाही. तर त्या विकृतीला धरबंध घालण्यासाठी सर्वजणांनी एकत्रित येण्याची गरज आहे. >>>
जबाबदारी सर्वांचीच आहे, फक्त पुरुषांची नाही हेच सांगतोय.
<<ही चर्चा एका व्यक्तीच्या पर्सनल अनुभवांमुळे चालली आहे असं वाटतंय का? >>
माहित नाही कोणाच्या कसल्या अनुभवांमुळे चाललीये. पण चांगली चर्चा चाललीये. फक्त शिर्षकामुळे असं ध्वनित होतय की "बोला, हा असा त्रास होतोय मला, काय पावलं उचलताय तुम्ही ?"आणि मुद्द्याचा पॉईंट असा आहे, कि मला होणार्या त्रासाबद्दल मी दुसर्याने काय करावं हे बोलू नये. त्यापेक्षा मी काय केलं हे बोलावं. बरोबर असेल तर पाठिंबा मिळतोच.
आता जो 'दुसर्या पुरूषानेच या
आता जो 'दुसर्या पुरूषानेच या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा अन्यथा तो सामाजिक भान नसलेला बेजबाबदार, असभ्य भारतीय नागरीक आहे<><<< हे असं वाचलेलं पाहून खरंच धक्का बसला आहे. मला इतर वादविवादात पडायचं नाहीये, पण एक्झाक्टली हेच तर निर्भया प्रकरणात घडलं होतं ना??
समोर एखादी चुकीची घटना - विनयभंग असेल, बलात्कार असेल, खून असेल, डोमेस्टिक व्हायलेन्स असेल किंवा शाळेतल्या पोरांची मारामारी असेल - अशा घटनांअम्ध्ये इतरांनी (यात स्त्री-पुरूष दोघंही आले) जर हस्तक्षेप करत नसतील, केवळ बघ्याची भूमिका घेत असेल तर ती व्यक्ती नक्कीच सामाजिक भान नसलेली बेजबाबदार असभ्य भारतीय नागरिक आहे. अपघात प्रसंगी केवळ "अरेरे! गेला वाटतं" करत हळहळत जाणारे लोकंदेखील यात सामील करा.
नंदिनी, शेवटचा पॅरा.....
नंदिनी, शेवटचा पॅरा..... बर्याच अंशी सहमत. मदत मागितली नसताना मदत करायला जाणार्यांचे काहि अनुभव वाचलेत ह्याच धाग्यावर. मदत हवी आहे का ? हे विचारुन मगच पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय मी माझ्यापुरता. पण मदत न करु शकणार्यांचीही काहि कारणे नक्कीच असतील. सरसकट त्यांना बेजबाबदार ठरवणं कितपत सयुक्तिक आहे ?
पण ही केवळ स्त्रियांचीच
पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये. >>>> हेडरमधल्या या वाक्याकरता फिल्टर लागला होता की काय?
अरेरे चांगली चर्चा सुरु होती
अरेरे चांगली चर्चा सुरु होती की, आता मात्र इथे पर्सनल स्कोर सेटल करणे सुरु आहे.
दीमा :
वाक्य क्र. १ "सगळे/बहुसंख्य भारतीय पुरूष असे करतात" असे नाही
वाक्य क्र. २ "भारतात हा त्रास खूप सर्रास जाणवतो"
हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत का? >>>>> होय!! आणि त्यातच तुम्ही गल्लत करत आहात.
'दुसर्या पुरूषानेच या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा अन्यथा तो सामाजिक भान नसलेला बेजबाबदार, असभ्य भारतीय नागरीक आहे >>>> ?? असे कुठे कोण म्हणत आहे ?! उगीच विपर्यास का ? धाग्याचा हेतू एवढाच आहे माझ्या समजुतीप्रमाणे की स्त्रियांना तर डायरेक्ट व्हिक्टीम असल्याने जे करावे लागते ते लागतेच, पण समाजाचा एक भाग म्हणून पुरुषांनाही (ते स्वतः डायरेक्ट शिकारी किंवा शिकार नसले तरी!! ) काही करता येईल का ? पण इथल्या रिअॅक्शन्स खरंच बरेच काही सांगून जात आहेत.
खरंच. पण आता जो 'दुसर्या
खरंच.
पण आता जो 'दुसर्या पुरूषानेच या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा अन्यथा तो सामाजिक भान नसलेला बेजबाबदार, असभ्य भारतीय नागरीक आहे' असा जो समज पसरवला जातोय >>> हे अत्यंत बेजबाबदार वाक्य आहे. आणि त्यातला 'समज पसरवला जातोय' असं म्हणणं म्हणजे तर कहर आहे.
धाग्याचा हेतू एवढाच आहे माझ्या समजुतीप्रमाणे की स्त्रियांना तर डायरेक्ट व्हिक्टीम असल्याने जे करावे लागते ते लागतेच, पण समाजाचा एक भाग म्हणून पुरुषांनाही (ते स्वतः डायरेक्ट शिकारी किंवा शिकार नसले तरी!! स्मित ) काही करता येईल का ? >>>>> हेच तर बेफिकीर केव्हाचे सांगून राहिलेत पण ते समजून घ्यायचंच नसल्यामुळे वाद सुरू आहेत. खरं तर या विषयावर वाद होण्याचं कारणच काही नाहीये.
<< पुरुषांनाही >> ह्यातच सगळं
<< पुरुषांनाही >> ह्यातच सगळं आल.
मामी, फिल्टर कशाला लावायला हवा ? शिर्षक सांगतय की काय सांगायचय ते. आणि माझ्या सगळ्या पोस्टमध्ये तेच तर सांगून र्हायलोय की. मुळात शिर्षकाबरहुकूम इथे फक्त पुरुषांच्याच पोस्टी पडायला हव्यात.....
Pages