रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.
पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?
या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...
HeForShe : KEY MESSAGES
* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world
* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality
* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.
ABOUT THE CAMPAIGN
HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.
अधिक माहिती :
https://en.wikipedia.org/wiki/HeForShe
***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी
पुरूषांची सामाजिक जबाबदारी -
१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.
२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.
३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.
४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.
५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.
६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.
७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.
८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.
९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.
***********************************************************************************************************
अंजली
बर्याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.
१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?
एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?
शिवाय अमेरिकेत असले अनुभव
शिवाय अमेरिकेत असले अनुभव 'पदोपदी येत नाहीत' म्हणताहात, म्हणजे मग धागाकर्ती यांनी धाग्याचे शीर्षक "एक भारतीय (उर्फ विकृत) पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय?" असे करावे, असे सुचवितो. कारण बाकी जगभरातले पुरुष हे सद्गुणांचे पुतळे असतात.
रेव्ह्यू यांनी त्यांचा स्वतःचा वरचा प्रतिसाद एडिट केलेला आहेच, तुमच्या मतांना गालबोट नको म्हणून. नैका?
एका फेजनंतर महिलांशी संपर्क
एका फेजनंतर महिलांशी संपर्क वाढल्यानंतर म्हणा हवं तर, अनेक गैस आपसूकच निवळले गेले, आता पूर्वी आपल्या काय काय कल्पना होत्या हे लक्षात न राहील्याने पुरुषांचा दृष्टीकोण कुठे असा असतो असं वाटू लागतंय. पण ज्यांना कधीही नीट माहीती मिळालेली नाही असे पुरूष भारतात खूप असतील. आदिवासी, लद्दाखी आणि इशान्येकडची राज्ये, थायलंड सारखे देश यांच्या संस्कृतीमुळे पुरुषाची विचारपद्धती भिन्न आहे.
मात्र आफ्रीकेत उलट अनुभव आले. केप टाऊनला गाईडने संध्याकाळी आमच्या ग्रुपमधील महिला आणि मुलींनी शक्यतो बाहेर पडू नये असं बजावून सांगितलं होतं. पैसे , दागिने यांची सुरक्षितता हा वेगळा इश्यू.. अरब जगताचे एका पत्रकार मुलीचे अनुभव चांगले नाहीत. असे अनुभव कुठे आणि का येऊ शकतात हे साधारणपणे लक्षात येईल.
नुस्तं स्त्रीपुरुष
नुस्तं स्त्रीपुरुष संबंधाबद्दल बोला की! नाही कोण म्हणतंय? अमेरिकेचं तुणतुणं का घेऊन येताहात इथे?
उगं मानभावी पणे असं सगळीकडेच असतं पण नां, भारतीय नां.. म्हणजे नां..
अरे हूऽट!
http://www.punemirror.in/pune
http://www.punemirror.in/pune/cover-story/ITS-ALL-IN-THE-FAMILY/articles...
>> अमेरिकेचं तुणतुणं का घेऊन
>> अमेरिकेचं तुणतुणं का घेऊन येताहात इथे?
आम्हाला ज्या दोन ठिकाणचे अनुभव आहेत त्याबद्दल आम्ही बोलतो आहोत. अनुभव आलेत ही फॅक्ट आहे. ते भारतातच आलेत हीसुद्धा फॅक्ट आहे. आमच्या फॅक्ट्स तुम्हाला तुणतुण्यासारख्या वाटत असतील तर तो आमचा प्रॉब्लेम नाही. तुम्ही आणि हूऽट - तुमच्या पॅराडाइजमध्ये आनंदात आहातच - वेगळ्या शुभेच्छांची तुम्हाला आवश्यकता दिसत नाही.
ते अमेरिकेचं तुणतुणं
ते अमेरिकेचं तुणतुणं तुम्हांला वाटतंय कारण तुम्हांला मुळातच अमेरिकेचं काही लिहिलं की चीड येते. पण ज्यांना भारत सोडून बाकी देशात रहायचाही अनुभव आहे ते सहाजिकच तुलना करणार. तुम्ही असतात तर तुम्हीही केलीच असतीत.
भारतातले सगळे पुरुष वाईट आणि बाकी उर्वरित जगातले चांगले असं कोणीही म्हणालेलं नाही आणि भारतात कायम वाईट अनुभवच येतात असाही कुणी दावा केलेला नाही.
>>
माफ करा, पण अशा आर्ग्युमेंट्सचा इतक्या उत्कटतेने नेहेमीच असाच प्रतिवाद करूनही काय साधतं, तेही मला समजलेलं नाही.>> हे कोण? नक्की तुम्हीच म्हणताय? तुम्ही काय करत असता इथे रोज ते जरा बघा बरं.
फक्त "भारतीय" म्हणजे अजूनही
फक्त "भारतीय" म्हणजे अजूनही भारतातच असणार्या पुरुषांनाच जनरलाईज करून घालून पाडून बोलायचा छंद असेल, तर तो ही आम्हा भारतीय पुरुषांचा प्रॉब्लेम नाही.
कसं असतंय ना? की लेक्चरसाठी ३० मुलं एक्स्पेक्टेड असताना फक्त ६ आलीत अर बाकी २४ का आले नाहीत म्हणून मास्तर आलेल्या ६ लोकांना विनाकारण झापतो, तसं चाल्लंय इथे.
असो.
दीमा , हो बरोबर , ही चर्चा
दीमा , हो बरोबर , ही चर्चा पूर्वी झालेली आहे टिपापात पण तुमचा प्रॉब्लेम काय ते कळले नाही. मुद्दे तेच आहेत कारण परिस्थिती तीच आहे! आणि व्हेन्ट काय त्यात ? आम्हाला व्हेन्ट करायला आहेत हक्काची ठिकाणं. इथे त्यासाठी यायची गरज नाही.
अमेरिकेचं तुणतुणं - धागाकर्तीनेच इतर देशातले अनुभव लिहायला इथे विनंती केली होती, (अॅक्चुअली टिपापावर येऊन सुचवलं होतं) हे तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही. चष्मा काढा तुम्हीच.
>>फक्त "भारतीय" म्हणजे अजूनही
>>फक्त "भारतीय" म्हणजे अजूनही भारतातच असणार्या पुरुषांनाच जनरलाईज करून घालून पाडून बोलायचा छंद असेल, तर तो ही आम्हा भारतीय पुरुषांचा प्रॉब्लेम नाही.>> पुन्हा तेच. वाचा वर.
तुम्हांला मुळातच अमेरिकेचं
तुम्हांला मुळातच अमेरिकेचं काही लिहिलं की चीड येते. LOL1
भारतातले सगळे पुरुष वाईट आणि बाकी उर्वरित जगातले चांगले असं कोणीही म्हणालेलं नाही आणि भारतात कायम वाईट अनुभवच येतात असाही कुणी दावा केलेला नाही. really??
माफ करा, पण अशा आर्ग्युमेंट्सचा इतक्या उत्कटतेने नेहेमीच असाच प्रतिवाद करूनही काय साधतं, तेही मला समजलेलं नाही.>> हे कोण? नक्की तुम्हीच म्हणताय? तुम्ही काय करत असता इथे रोज ते जरा बघा बरं.<<
please read what zakki has said.
and show me what exactly I have done? are you confusing me with someone else?
इतकी सगळी चर्चा सांसदीय भाषेत
इतकी सगळी चर्चा सांसदीय भाषेत सुरू असताना एका मतभेदावरून हूऽट करण्याची मानसिकता भारतीय म्हणायची की आजारी की कसं काय डॉक्टर? (बाकी भारतात 'हूऽट' सांसदीयच असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणा.)
माझी शाळा सुटली. बाय आता.
माझी शाळा सुटली. बाय आता. तुमचं चालू द्या. पुन्हा डोकं सरकलं तर बोलेन. नाही तर आहेच तुमचं तुणतुणं.
सगळेच पुरुष वाईट्ट बाई!
हूऽट करण्याबद्दल डॉक्टरकीवर
हूऽट करण्याबद्दल डॉक्टरकीवर यावं लागावं यातच सगळं आलं बर्का.
डोकं सरकलं असताना इथे लिहिलंत
डोकं सरकलं असताना इथे लिहिलंत हे कबूल केल्याबद्दल धन्यवाद. बाकी वर जे विचारलंय त्याची उत्तरं द्यायची गरज वाटत नाही.
उत्तर देता येत नाही म्हणा.
उत्तर देता येत नाही म्हणा. गरज वाटत नाही ही पळवाट आहे.
तुमच्याकडे बोलण्यासारखं काही
तुमच्याकडे बोलण्यासारखं काही उरलं नाही म्हणून पळ काढताय.
जाऊ दे. निदान आपण
जाऊ दे. निदान आपण अमेरिकेतल्या बायका विषयाला धरून बोलू.
अहो, मी आहे इथेच. मी प्रश्न
अहो,
मी आहे इथेच. मी प्रश्न विचारले तर उत्तर द्यायची गरज नाही म्हणायचं, अन वरतून मला वेडावून दाखवायचं, ह्याला काय म्हणतात?
बालिशपणा पुरे करा आता. जमत असेल तर उत्तर द्या माझ्या बोलण्याचं.
परमपूज्य झक्कीबोवांनी काय लिहिलंय धाग्यात? वाचलं की नाही?
and yes. it IS past midnight
and yes. it IS past midnight here. I have to go to sleep too, you know
"विषयाला धरून" = bashing the
"विषयाला धरून" = bashing the Indian males as a whole. नैका? All other males in the rest of the world are exemplary specimens of ideal male behaviour.
दीमांना ऑलरेडी झोप लागली आहे
दीमांना ऑलरेडी झोप लागली आहे
अरे ये क्या हो रहा है भाई? दी
अरे ये क्या हो रहा है भाई? दी मा, हो मी बोललो होतो (गप वगैरे नव्हतं केलं). तुमची जशी फॉलो अप चर्चा इथे सुरु आहे तशीच माझीही झाली करुन (इतरत्र). इकडे बराच गोंधळ उडालेला दिसतो आणि माझ्या आकलनाप्रमाणे मी सांगायचा प्रयत्न करतो. अ कु ह्यांची पोस्ट आल्यानंतर स्वाती२ ह्यांची ही खालची पोस्ट आली.
स्वाती२ | 14 August, 2015 - 13:58
अकु, पोस्ट आवडली.
बाकी परदेशातील अनुभवांबद्दल बोलायचे तर न्युयॉर्क काय किंवा टोक्यो काय. तुम्ही मेनस्ट्रीममधे असाल तर ट्रेन मधे विपरीत अनुभव येतात. जपानमधे chikan हा प्रकार भारतातल्या गर्दीच्या जागी जे काही वाईट अनुभव येतात त्याचेच जपानी रुप.
परदेशात भारतीय म्हणजे तुम्ही त्यांचे पाहुणे/ न्यु इमिग्रंट. त्यामुळे लोकं ठीक वागतात. मात्र स्थानिक स्त्रीयांना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते.
अमेरीकेत कायदे कडक आहेत तरीही फास्ट फूड इंडस्ट्री, असेंब्ली लाईनवर काम करताना अचकट विचकट , द्वयर्थी बोलणे वगैरे प्रकार होतात. स्त्री कर्मचार्याला क्वालीटी चेक करायला एकटे पाठवायचे नाही हे पथ्य एक -दोन सप्लायर्सच्या बाबतीत माझ्या नवर्याला कायम पाळावे लागते. एवढे करुनही अधून मधुन सप्लायरकडे गैरवर्तन करणार्या कामगाराबद्दल तक्रार करणे,वार्निंग देवून फायर वगैरे प्रकार होतात.
इथे त्यांनी (बहुतेक त्या अमेरिकेत राहतात म्हणून) सहज पॅरॅलल ड्रॉ केले. इथे मला फक्त विषय सुरु आहे म्हणून इतर देशांमध्ये काय परिस्थिती आहे हे त्यांनी दिलं असं वाटलं. वर्षू नील ह्यांनी पण तेच केलय/लिहिलय की इतर साउथ एशियन देशात त्यांना काय अनुभव आला. पुढे मला वाटतं, अमेरिकेत राहणार्या स्त्रीयांनी स्वाती२ ह्यांच्या पोस्टी मधल्या काही बाबींवर प्रश्न विचारले, ज्याची उत्तरं त्यांनी दिली आणि मला वाटतं तिथेच हे सगळं मिटलं. अमेरिकेत राहणार्या इतर स्त्रीयांचे म्हणणे असं आहे की अमेरिकेतला अनुभव आणि भारतातला अनुभव ह्याची तूलना होऊ शकत नाही (जर तशी तूलना केली गेली असेल तर) कारण ट्रेन मध्ये, पबलिक प्लेसेस मध्ये भारतात अमेरिकेपेक्षा स्त्रीयांना जास्त वेळा वाईट अनुभव येतात असं त्यांचं म्हणणं आहे. इथे नोट करा की सगळेच भारतीय पुरुष परवर्ट आहेत हा मुद्दा नाहीये तर ओवरॉल एक व्यक्ती म्हणून त्यांना आधी भारतात आणि मग अमेरिकेत राहुन त्यांना काय अनुभव आले हे त्या सांगत आहेत जे स्वतः सध्या भारतात असलेल्या स्त्रीया सुद्धा म्हणत आहेत. (मामी आणि इअतर स्त्री आयडी ज्यांनी त्यांचं फ्रसट्रेशन इथं व्यक्त केलय).
मी सुद्धा ही चर्चा आधी टिपापा वर झाली तेव्हा ह्या मुद्द्यावर अडकलो होतो आणि त्यावर माझी मतं स्पष्ट केली होती पण पुढे आणखिन च्र्चा झाली तेव्हा नेमका मुद्दा लक्षात आला.
तुम्ही किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे स्त्रीयांशी गैरवर्तन न करणार्या) भारतीय पुरुषानी हे पर्स्नली घ्यायची गरज नाही. ह्यापुढे हे ही म्हणेन प्रत्येक पुरुषानी, वर जे मुद्दे मांडले गेले आहेत ते आपल्याला लागू होतात का हे ही प्रामाणिकपणे पडताळून बघितले पाहिजे.
होप आय मेड सेन्स.
>>परमपूज्य झक्कीबोवांनी काय
>>परमपूज्य झक्कीबोवांनी काय लिहिलंय धाग्यात? वाचलं की नाही?>> तुम्ही वाचलंय ना? काय कळलं त्यावरून?
ईथे ईंडिया अमेरीका मॅच सुरू
ईथे ईंडिया अमेरीका मॅच सुरू झाली.
मला उद्या स्कोअर सांगा. शुभरात्री
दीमांचा थयथयाट मला अगदीच
दीमांचा थयथयाट मला अगदीच प्रातिनिधिक त्यामुळेच इन्टरेस्टिंग वाटला.
ते स्वतः आणि तसा विचार करणारे इतर "स्वतः असभ्य नसलेले" पुरुष यांच्या सामाजिक जबाबदारी (?)बद्दल बरेच काही सांगून गेला
एकूण काय तर "इतर पर्व्हर्ट लोकांच्या चुकीबद्दल आम्ही सभ्य लोकांनी काही का करावे?? मुळात काही ऐकूनच का घ्यावे " - बाफच्या हेडरमधील प्रश्नांचे त्यांनी (आणि तसा विचार करणार्या अनेकांनी) हे उत्तर दिलेले आहे असे धरायला हरकत नसावी ! असोच.
लोकं देशावर का घसरतात. वाईट
लोकं देशावर का घसरतात. वाईट लोकं कुठेही असू शकतात.
पण तरीही देश हा मुद्द्याला अनुसरून लिहायचे असेल तर, बर्याच वर्षापुर्वी न्यु यॉर्क ला ट्रेन मधून येताना आलेला वाईट अनुभव.
भारतात रहाताना गर्दीचा फायदा घेतलेले अनुभव आहेत.
पण एक जनरल रूल आहे, नेवर से नेवर. त्यामुळे देशानुसार काही व्रुती बदलत नाही हेच खरे. कोण वि़कृत कुठे कसा, कोणाच्या रूपात भेटेल हे सांगता येत नाही.
फक्त भारतापुर्तीच चर्चा मर्यादीत ठेवायची असेल तर, हा एक ग्रास्रूट लेवलवर घडवायचा बदल आहे.कोणी हा प्रश्ण असला तरी, इथे ह्या बीबीवर येवून, चार टाळकी चर्चा करून फार काहि बदल होणार नाही कितीही म्हटले तरी.
आणि नुसते हे बीबी वाचून( समजा मायबोलीवर असले छुपे विकृत आहेत असे समजून) दांभिकांचे विचार वा विकृतांचे विचार बदलणार असतील तर मग आनंदच आहे.
आणि उरले सुरलेला इथे येणारा जो काही सुसंस्कृत (पुरुष) वर्ग तरी, गुंड वगैरे फंदात पडणार नाही असेच वाटते. ते स्वतः स्वतःचीच, स्त्रीयांना नीट वागणूक द्यायची हमी घेवू शकतात ज्यास्तीत ज्यास्त. बाकी काही फरक होइल असे वाटत नाही अश्या बीबी वर चर्चा करून. इट मे सॉंउद पेसीमिस्टीक बट इट इज अ फॅक्ट. अ. आ. स्प. म.
आणि, कोणाला जर वाटत असेलच तर मग आढावा(बीबी मुळे, माझी स्त्रींयांकडे बघायची नजर बदलली, मी स्त्रीयांना मदत केली पाहिजे शक्य होइल तिथे असे बदलाचा आढावा) टाकला तर मजाच.
लेखिकेने, मायबोली सोडून, हेच प्रश्ण तिच्या आजूबाजूच्या माहितीतल्या पुरुषांना विचारून सुद्धा पहावे. आणि ते सुद्धा इथे लिहावे. मग कळेल की ह्या चर्चा करून फायदा होतोच का? आणि कोणाला? हे सुद्धा जाणून घ्यायला बरे होइल.
सामाजिक प्रश्णांची चर्चा फक्त एका मर्यादित समूहा समोर करून खरच काही बदल होतात का हाच खरा प्रश्ण आहे. मगच लोकं त्यात(मदत करायला सरसावतील) भाग घेतील. नाहि का?
इथे वरती, स्त्रीला मदत करायला गेलो तर ती त्यांच्यावर कावली. पण ह्या निगेटीव अनुभवाने, कोण कशाला काही करेल? जरी मदत चालूच ठेवली तरी शेवटी मदत करनार्याला हे प्रश्ण पडतातच ना की उद्या माझ्यावरच काही बेतले तर?
त्या क्षणाला मदत मिळणे जरूरीचे असते अश्या केसेस मध्ये कधी कधी.
रस्त्यावर असं छेड (किंवा
रस्त्यावर असं छेड (किंवा तत्सम)काही सुरु असताना नक्की काय करावं, करू नये?
आपली एक्ट्याची अशी किती कुवत शारीरिक आणि आर्थिक(पोलिस वगैरे भानगडी झाल्या तर)?
छेड काढणारा गुंड अथवा समुह आपल्यावरच उलटले तर किंवा आपल्यालाच धमकावू लागले तर?
आपल्यावर पाळत वगैरे ठेवून आपल्यावर हल्ला किंवा तसा कट केला तर?
ह्या सर्व बाबी लक्शात घेता सहसा कुणी यात असल्या भानगडीत पडत नाहित.
वरच्या अनेक पोस्टींचा सूर मला
वरच्या अनेक पोस्टींचा सूर मला तरी "सगळे/बहुसंख्य भारतीय पुरूष असे करतात" असा वाटला नाही. कोणत्या वाक्यामुळे/पोस्टीमुळे तसा वाटतोय? मला जनरल पॅटर्न "भारतात हा त्रास खूप सर्रास जाणवतो" अशा टोन चा दिसला, आणि तो ज्याच्या त्याच्या वैयक्तिक अनुभवावरून असल्याने त्याबद्दल काय विरोध करणार.
भारतात दरलाखी २ बलात्कार
भारतात दरलाखी २ बलात्कार नोंदवले जातात. ही संख्या दहापट वाढवली तरी फक्त २० पर्यंत पोहोचते (अंदाजे केवळ ११% बलात्कार नोंदवले जातात म्हणून दहापटीने वाढवतोय). तरीही २० ही संख्या अनेक प्रथमजगदीय देशांपेक्षा कमी आहे.
>>
गामा,
तुमच्याच लिंकमध्ये खाली हे ही लिहिलेलं : The number of reported rape cases in India have been steadily rising over the past decade. This, according to researchers, is because more and more women are coming out to report incidents of rape. Nonetheless, NCRB reports state that the number of reported rapes in India are only an estimated 1% of the total number of rapes that take place annually in the country [23]
म्हणजे दरलाखी १००+ होतील का?
फा, तो तसाच आहे जसा दिसतोय.
फा, तो तसाच आहे जसा दिसतोय. दीमांनी अमेरिकेचं तुणतुणं आणलं वाजवायला अमेरिका द्वेषापायी. कुणीही म्हणत नव्हतं की भारतातले एकूण एक पुरुष वाईट आहेत आणि बाकी देशांतले चांगले.
Pages