रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.
पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?
या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...
HeForShe : KEY MESSAGES
* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world
* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality
* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.
ABOUT THE CAMPAIGN
HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.
अधिक माहिती :
https://en.wikipedia.org/wiki/HeForShe
***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी
पुरूषांची सामाजिक जबाबदारी -
१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.
२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.
३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.
४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.
५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.
६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.
७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.
८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.
९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.
***********************************************************************************************************
अंजली
बर्याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.
१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?
एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?
sarcosuchus imp. तुमची १६
sarcosuchus imp.
तुमची १६ ऑगस्ट १२ :१७ च्या पोस्ट बद्दल
पाश्चात्य देशात योनिशुचितेचा बाऊ केला जात नाही हे खरे पण तरी इथे स्कोअर करणे हा प्रकार आहेच. हा प्रकार हायस्कूलमधे आणि काही प्रमाणात कॉलेजमधे चालतो. पब्लिक टॅली ठेवतं किती मुलींची वर्जिनिटी घेतली याचे.
http://news.yahoo.com/rape-case-sheds-light-elite-prep-schools-sordid-15...
मुलींना रस्त्याने जाताना धक्के बसत नाहीत पण त्याचवेळी लॉकर बेज , स्टेअरवेल्स वगैरे ठिकाणी हात मारुन घेणे चालते. कॉलेज कँपसवर आपली मुलगी कितपत सुरक्षित ही काळजी प्रत्येक आईबाबांना सतावते. बर्याचदा गुन्हा रिपोर्टही केला जात नाही तरीही पाचात एक हे स्टॅट आहे.
पाश्चात्य देशात जाते व्यवस्था नाही पण वर्णभेद आहेच शिवाय आर्थिक विषमतेवर आधारित भेदभावही आहे. रॉन्ग साइड ऑफ ट्रॅक हा प्रकार आहे. स्त्री अप्राप्य नाही तरीही डेट रेप होतात. लिव इन आहे , नो फॉल्ट डिवोर्स आहे पण रिलेशनशिप मधून स्त्री बाहेर पडू इच्छिते तेव्हा तो नकार पचवणे जमले नाही म्हणून एक्स वर प्राणघातक हल्ला करणे ही होते. स्त्रीकडे मालकीची वस्तू म्हणून बघणे होते.
मिलीटरी मधील सेक्शुअल अॅसॉल्ट , रिपोर्ट केल्यावर वाट्याला येणारे रिटॅलिएशन , न्याय मिळवण्यात येणार्या अडचणी, हे सर्व तर शरमेने मान खाली घालायला लावणारे.
लैगिंक गुन्हे हे फक्त लैगिक भूक न भागल्याने होतात हेच मुळात खरे नाही. बरेचदा लैगिंक गुन्हे हे भिती दाखवायला, कंट्रोल करायला, दमन करायला वापरले जातात. एक प्रकारची entitlement ची वृत्ती दिसून येते.
लहानपणापासून प्रयत्नपूर्वक संस्कार, गुन्हा झाल्यास पिडीत व्यक्तीला दोष देणे थांबवणे आणि सशक्त न्याय व्यवस्था या सर्वच पातळींवर सातत्याने काम करणे गरजेचे आहे.
स्वाती२, चांगला तपशील/माहिती
स्वाती२, चांगला तपशील/माहिती दिलीत.
"पुरुषांचे मनोवृत्तीबाबत" या धाग्याप्रमाणेच तिकडे सरसकट "पुरुषांची सामाजिक जबाबदारी" कशाप्रकारे विचारली जाते, ठरवली जाते व नियंत्रीत केली जाते?
स्वाती२, पोस्ट फारच
स्वाती२,
पोस्ट फारच महत्त्वाची वाटली.
अ.कु, अंजली उत्तम
अ.कु, अंजली उत्तम प्रतिसाद!
स्वती२- उपयोगी माहिती!
तसही स्त्री तशी कुठेच सुरक्षीत नाही किंवा असे म्हणेन की.. त्या त्या प्रांतातील पुरुष व त्यांची स्त्री कडे बघण्याची मानसीकता काय आहे? या प्रश्ना च्या उत्तारा वर बरेचस अवलंबुन आहे.
मुलीला तु तुझे संरक्षण करु शकतेस हा आत्मविश्वास देणे जीतके जरुरीचे आहे तितकेच मुलाला एखद्या मुलीचे संरक्षण तुच केले पाहिजेस हे कर्तव्य ही सांगायला हवे.
मुलाला सांगणे हे आई पेक्षा वडिल जास्त चांगले करु शकतात. कारण ते सुद्धा त्या भुमिकेतुन गेलेले असतात/जात असतात.
मुळात 'त्या समोरच्या व्यक्ती' कढे आधी 'माणुस' म्हणुन बघ हा संस्कार फ़क्त आणि फ़क्त 'घरातुनच' होतो/होईल. काही अंशी तो प्राथमिक शिक्षण/शाळेतुन होवु शकतो.
छान चर्चा,
छान चर्चा,
लोकहो, वेळ मिळाला तर जरा
लोकहो, वेळ मिळाला तर जरा त्या हेडर मधल्या प्रश्नांची उत्तरं द्या.
उत्तरे फक्तं पुरुष आयड्यांनी
उत्तरे फक्तं पुरुष आयड्यांनी द्यायचीत की स्त्री आयड्यांनी पण ?
दोघांनी द्या पण जास्त करून
दोघांनी द्या पण जास्त करून पुरुष आयड्यांकडून उत्तरं आली तर धाग्याचा हेतू साध्य होईल.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/man-misbehaves-with-rav...
हे पहिल्यांदा घडत नाहीये. बिपाशा बसूने पण आरोप केल्याचं आठवतंय. या आयोजकांची 'सामाजिक' जबाबदारी काय आहे?
Anjali Agadi hech share
Anjali
Agadi hech share karnar hote , so cheap !
आमच्या लेकाच्या शाळेत अगदी
आमच्या लेकाच्या शाळेत अगदी रटून घेतात डिस्क्रिमिनेशन
हल्ली नविन अभ्यासक्रमत पण हे
हल्ली नविन अभ्यासक्रमत पण हे असलं चालतं ?
हायला!! धन्य!!
हायला!! धन्य!!
बापरे, कठिण आहे.
बापरे, कठिण आहे.
:- असा अभ्यासक्रम कोणी बनवला
:- असा अभ्यासक्रम कोणी बनवला त्याचा शोध घ्यायला पाहिजे.
साती, तुम्ही शाळेला किंवा
साती, तुम्ही शाळेला किंवा त्या टीचर ला लिहून / सांगून पाहिले का यासंदर्भात ? कमाल आहे ती वर्कशीट खरंच!
हे काहीच नाही. वडिलांचं नाव
हे काहीच नाही.
वडिलांचं नाव 'मिस्टर प्रकाश' आईचं नाव 'मिसेस प्रकाश' आईला सेपरेट नाव वगैरे नाहीच.
शेवटी काही आया घराबाहेर कामंही करतात असं लिहीलंय.
पण म्हणजे अपवादच.
आणि पॅरेंटस मुलांना खेळात मदत करत नाहीत?
एकंदर आनंदी आनंद!
मैत्रेयी ही वर्कशीट
मैत्रेयी ही वर्कशीट नाही.
सोशल सायन्सच्या टेस्टबुकातला फोटो आहे.
नेमका उद्या परीक्षेला हाच धडा आहे.
अनायासे शिकवताना ह्या धाग्यासाठी फोटो घेतला.
शाळेत बोलून काहिही फायदा नाही.
ते म्हणतील ९९ टक्के घरी असंच असतं.
अनुभव घेऊन झाला आहे.
साती, १)फादर २)मदर ३)फादर असे
साती,
१)फादर २)मदर ३)फादर असे टिक केले असते तर ते चुकिचे ठरवले असते का?
हो. कारण मूळ धडा असा आहे-
हो.
कारण मूळ धडा असा आहे-
ओमागॉ. हॉरिबल आहे हे!
ओमागॉ. हॉरिबल आहे हे!
ते जास्त कॉमन म्हणून तेच
ते जास्त कॉमन म्हणून तेच बरोबर उत्तर ?!!
हे म्हणजे "माझे डोळे ****** रंगाचे आहेत" हा परीक्षेत गाळलेल्या जाग मधे प्रश्न असला अन ज्यांनी "काळे" असे उत्तर लिहिले त्यांचे उत्तर बरोबर दिल्यासारखे झाले!! घार्या वगैरे डोळ्यांच्या मुलांचे उत्तर चुकले !
>>सोशल सायन्सच्या
>>सोशल सायन्सच्या टेस्टबुकातला फोटो आहे.>>
शिक्षण मंंडळाकडे तक्रार करुन पाठपुरावा करावा. जोडीला स्टेटच्या शिक्षणखात्यातही याबाबत तक्रार करावी.
भविष्य काळात या धड्यात बदल
भविष्य काळात या धड्यात बदल होईल अशी आशा अपेक्षा आपण ठेऊ शकतो एवढेच आपल्या हातात आहे.
शाळेच्या आणि शिक्षण मंडळाच्या
शाळेच्या आणि शिक्षण मंडळाच्या फेसबूक वेबसाईटवर हे टाका, पालकांना टॅग करा.
अर्थात शाळेची मॅनेजमेंट रिटॅलिएट करू शकते, पण शासनमान्य पुस्तकांत असे काही लिहिले असेल तर मोठ्या शहरातल्या शाळांवर संबंधित पालकांचा दबाव आणता येवू शकतो.
सीबीएसई अॅप्रुव्ह्ड असेल ना
सीबीएसई अॅप्रुव्ह्ड असेल ना पुस्तक? कोणतं पब्लिकेशन आहे?
हो सोशल नेटवर्किंग वापरून
हो सोशल नेटवर्किंग वापरून बरेच काही करता येईल याबाबत. शाळेची साइट नसली किंवा टेक सॅव्ही नसली तरी जर अनेक पालकांनी/ इतर लोकांनी सोशल नेटवर्क मधे स्क्रीशॉ शेअर करुन निषेध केला तर उपयोग होईल असे वाटते. तो धडा अशा प्रकारे फेमस झाला तर शासन/ सीबिएसई इ. ना दखल घ्यावी लागेलच की.
खरंच तो शालेय धडा अशक्य
खरंच तो शालेय धडा अशक्य आहे.
आजचा जमाना सोडा, माझी आई वर्किंग वूमन असल्याने तिने ऑफिस आणि घर अशी दुहेरी भुमिका सांभाळल्याने ती मला जास्त कर्तुत्ववान वाटते.
बाकी ईथेही पुरुष पालकांनीच सामाजिक जबाबदारी घेत त्यावर निषेध नोंदवायला हवा. निषेध जास्त इफेक्टीव्ह राहील.
मैत्रेयी +१
मैत्रेयी +१
स्वाती२, >> कॉलेज कँपसवर आपली
स्वाती२,
>> कॉलेज कँपसवर आपली मुलगी कितपत सुरक्षित ही काळजी प्रत्येक आईबाबांना सतावते. बर्याचदा गुन्हा रिपोर्टही
>> केला जात नाही तरीही पाचात एक हे स्टॅट आहे.
हो, अमेरिकेत विद्यापीठांत बलात्कार होतात असं ऐकून आहे. याला दुजोरा देणारी घटना : http://www.telesurtv.net/english/news/US-Fraternity-Promoting-Sexual-Vio...
भारतात आपण दररोज बलात्कार होत असल्याचं वाचत असलो तरी दरडोई संख्या कमी असावी असा माझा अंदाज आहे.
आ.न.,
-गा.पै.
Pages