अकोल्यातील खादाडी

Submitted by हर्ट on 27 May, 2009 - 09:41

अकोल्यातील खादाडीबद्दल मी इथे लवकरचं लिहिणार आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मी या विषयावर हे मा शे पो म्हटल..
तंगडी खेचणे प्रकारामधे विदर्भातले बोल बोलले कि आणखी तिखट होते ज्यावर चर्चा झालीय आधीच म्हणुन म्हटल कि नकोच ते एक्सप्लेनेशन वगैरेची भानगड..
बाकी काही नै केदारजी..
इथ माबोवर हरेक ठिकाणी मनाला लावुन घेतल तर कठीन व्हायच म्हणुन Wink

नंदिनी, पुणे नाशिक रोडवरचा एक ढाबा आमचा फार आवडता आहे >> कोणता?? कोणता?? फार प्रॉब्लेम येतो ह्या रस्त्यावर आम्हाला तरी. चांगलं हॉटेल/ ढाबा मिळतच नाही.

ओये टीना क्या हेमाशेपो हेमाशेपो कर रहेली है तू.:फिदी: हे खालच नीट वाच.

http://www.maayboli.com/node/28311

आणी गम्मत कळत नाय का तुला? केदार विषयी शन्का बाळगु नकोस. तो कुणाचा फटकन अपमान करत नाही, उगीच गैरसमज करु नको करुन घेऊस.:स्मित:

खादाडी म्हणल्यावर पळत आले. आमच्या करता विदर्भ म्हणजे शेगाव. श्री गजानन महाराज आणी कचोरी हे जिव्हाळ्याचे विषय.

आणी खाण्याचे म्हणाल तर खरच हे प्रान्तावर अवलम्बुन असते. माझ्या बाबान्चे मित्र पोलीसात होते. मुळचे नासिकचेच, पण भयानक तिखट खायचे. केव्हा पण भजी करायला लावायचे बायकोला. पण इकडे नासिकला असले तिखट सोसवणार नाही. अन्गमेहेनत कमी असली की तिखट जास्त पचणारच नाही. ब्राह्मण असो वा मराठा, अन्गमेहेनत व व्यायाम हवाच. मग खावा ठेचा नाहीतर तर्री.

विदर्भात नागपूरला एका धार्मिक प्रसन्गी जाणे झाले तेवढेच आता गेले की चरुन बघेन वैदर्भीय खाणे.

आता बसच झाल हं...
हे परत एकदा हिब्रु भाषेत लिहिते..ऐका रे बा पुन्हा राज्य देणार नाई..
मी विषयासंबंधी हे मा शे पो अस म्हटलेल आहे.. धाग्यावरच शे पो नै..तरी कुणीही गैरसमज करुन घेऊ नये...पीलीज.. केदारजी कृपया वाईट वगैरे वाटून घ्यायच्या फंदात अज्याबात पडू नये.. I am really a big fan of yours ( हे इंग्रजी वाक्य भारतीय ओन मध वाचावे ) म्या तुमचे लेख न चुकता वाचते..खर्रच्च..
आता टाका या टॉपिकला गधी****** .. आणि कंटीन्यु...

माझी एक विदर्भातली मैत्रिन आहे तिच्या सोबत एकदा महिन्याचे वाण सामान आनायला जायचा योग आला होता.
घरात एकुन माणसे पाच
खरेदी
तेलाचा १६ कोलोचा पुर्ण पॅकबंद डबा ५० किलो तांदुळ बाकी मग खुप सार सुख्या मेव्या पासुन सगळ.
घरी येणारे जाणारे पण खुप होते. जे काही करयाची ते भरपुर.एकदा संध्याकाळी खायला म्हणुन परात भर पकौडे तळलेले पाहिले पाचा पैकी एकही जाडा नाही.

केदारजी कृपया वाईट वगैरे वाटून घ्यायच्या फंदात अज्याबात पडू नये. >>

ओ मला वाईट वाटायला काय झाले? मीच त खेचत होतो. जाऊ द्या. तुमची रेसिपी येऊद्या एखादी.

थंडा मामलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथला अ‍ॅम्बियंस पण चांगला आहे आणि स्वच्छताही. अन पोर्शन साईज पण मस्त.

निच ,

*आधी डिस्क्लेमर :- इतरांत नसतो असे नाही

वैदर्भीय लोकांस खिलवण्याचा भयंकर षोक असतो! एक टिप म्हणुन सांगायचे झाले तर जर तुमचा स्टॅमिना ५ पुरणपोळ्यांचा असला तर ३ नंतरच "आता पुरे" सुरु करा नाही तर तुम्ही सरळसोट आपले ५ खाऊन बास म्हणाल अन मग वर्हाड़ी आग्रह सुरु होईल!! बरं आग्रह करताना तुम्ही वाढलेले संपवाल अश्या टिप्स चा मारा सुरु असतो, ऊदा

"काही नाही होत इतका जवान पोर्या तू एका पोळी न काय होते, (मग आत मधे स्वैपाकघराकड़े पाहुन) अरे ऐकू राहिल्या काय! पाहुणे लाजु राहले ज़रा तूप आनसान त अर्धी वाटी ! त्याइले पोई चांगल्यानं सरन मंग"

"काई नाई होत, ३ घंटे लावा न खाइले आम्ही बसतो सोबती ले आरामारामान खायजा चावु चावु "

"काई नाई होत, च्यटणी द्याव काय संग? नाही पुरणपोळी न तोंड लै गोळ(गोड) होते मंदी यक बोट चटणी घेसान चव बदलायले"

पाहुण्यास खाऊ घालणे म्हणजे एक परमकर्तव्य असल्यासारखे महान कार्य!

केदार ,

आम्ही तिकडे सोमाटणे फाट्याच्या पुढे टोल नाक्याच्या जस्ट बाजुला मयूर ला खुप वेळा बसत असु

सोन्याबापू,
डीट्टो..एवढूसाही फरक नै एका शब्दातही..
मग उभ पन राहवत नै.. घरचे खाउन पिउन आल्यावरही म्हणते..
राज्जा , डोये भराचे असनच अजुन..खा न मा जरास..बर नको जेऊ निदान एक (पुरणाची) पोयी, भजे न कढीच पे..पण खा उल्लीसक्क.. आन व बाई.. दोन वडे बी देजो सोबत..

इथ माबोवर हरेक ठिकाणी मनाला लावुन घेतल तर कठीन व्हायच म्हणुन डोळा मारा >> क्या बात है टीना!! तू तर पक्की मायबोलीकर बनतेयस :फिदी:. गूड अ‍ॅटीट्युड!! Happy

बाकी ढाबा गप्पा मस्त!! मला औरंगाबादच्या बाहेरचा फौजी ढाबा आठवला. पहिलावहिला आणि एक्दम फेमस!! Happy

मस्त गप्पा चालल्या आहेत. कालपासून वाचत आहे. सोन्या बापू,वाघमारे,टिना मजा आणलीत एकदम धाग्याला.

अरे काय मस्त गप्पा चालल्या आहेत. मज्जा आली एकदम
काय काय त्या एकेक आठवणी .. नुसत्या आठवणीनेच भूक खवळली ..शेगावची कचोरी तर जीव कि प्राण...

>>>>*आधी डिस्क्लेमर :- इतरांत नसतो असे नाही<<<

हे बाकी बरे केलेत हां, नाहीतर को* राग आला असता. Proud

मायबोलीवर जातीय उल्लेख नकोत. कळले ना. Wink

शिव शिव शिव !!
अकोल्यामार्गे लई चकरा मारल्या नागपुराले पण खायाले चांगला धाबाच घावला नाही राजेहो ... पन आकोल्याच्या भायेरून बायपासने जायचो. त्यामुळे ही तीर्थ्क्षेत्रे कधीच दिसली नाही. ओळखीच्या भागात आमची गाडीही घात करते.

बाय द वे, आमचा शिपाई 'मिरच्याची भाजी " करी . सुरवातीला आज मिरच्याची भाजी आहे अशी माहिती दिल्यावर मी तर टरकलोच होतो. पण निघाले एकदम फुळकवणी. म्हनजे एखादी तरी मिरची आहे की नाही त्यात अशी शंका यावी. फोडणीच्या वरणाच्या आसपास जाणारा तो प्रकार असे. अमरावतीच्या बाहेर हायवेला आतिथ्य नावाचे एक व्हेज धाबं आहे. त्यात कच्चे सॅलड इतके देतात की आख्खे जेवण त्यात व्हावे....

रॉबिनहुड सर,

आतिथ्य ढाबा हा अमरावती च्या गड्डा हॉटेल द्वारा संचालित आहे, स्पेशलिटी आहे गरम रस्सा नॉनवेज अन चुलीवरल्या भाकरी (अजुन आहे का नाही माहिती नाही) बाकी अमरावती ला अंजनगाव बारी रोड वर बडनेरा च्या पांडे फॅमिली चा "रानमाळ" ढाबा आहे /होता तिथे अप्रतिम नॉनवेज मिळत असे

सोहोण्याबाहापु काहीतरी गडबड आहे. तिथे नॉनव्हेज मिळत नाही. स्थानिक वैदर्भीय वेज मिळते. पण मेनटेनन्स नाही. कुत्री बागडत असतात... नाव चुकतेय का माझे?

Pages