रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.
पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?
या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...
HeForShe : KEY MESSAGES
* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world
* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality
* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.
ABOUT THE CAMPAIGN
HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.
अधिक माहिती :
https://en.wikipedia.org/wiki/HeForShe
***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी
पुरूषांची सामाजिक जबाबदारी -
१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.
२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.
३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.
४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.
५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.
६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.
७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.
८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.
९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.
***********************************************************************************************************
अंजली
बर्याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.
१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?
एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?
वर्षू नील, साऊथ एशियन देश आणि
वर्षू नील, साऊथ एशियन देश आणि भारतात कशामुळे इतका फरक असेल?
<<<
Mahaan Indian culture full of double standards
बरेच चांगले मुद्दे आले आहेत.
बरेच चांगले मुद्दे आले आहेत. मुलांवर संस्कार हा तर बेसिक मुद्दा आहे. पूर्वी मुलगी झाली की तिच्या लग्नाची तयारी, हुंडा याच्या काळजीने आईबापांच्या कपाळावर आठ्या पडत असत. आता या असुरक्षिततेच्या भीतीने पोटात गोळा येतो. आपल्या मुलाप्रमाणेच शेजारच्या घरातली मुलगीही 'सुखी, सुरक्षित' राहावी ही जबाबदारी मुलाच्या आई वडलांचीही आहे. म्हणूनच आता "मुलगा झाला!" या आनंदासोबतच आजूबाजूच्या चार पाच मुलींना सेफ वाटण्याचीही जबाबदारी आपल्यावर येते याचे भान कायम असावे. यासाठी काय करावे हे वर आलेलेच आहे. हल्ली कॉलेज क्लासमधे सिगारेटच्या लायटरने मुलींना भीती दाखवली जाते, पाच वर्षाचे मुलगे घरी खेळायला आलेल्या छोट्या मुलीला ओठावर किस करतात हे सगळं कुठून येतं? की मुलगा झाला म्हणून त्याचे आईबाप या "काचेच्या भांड्या"च्या जोखीमीतून कायमचे सुटतात? ही मानसिकता स्त्री पुरूष दोघांचीही बदलायला पाहिजे.
साहिल शहा, जपानबद्दल अतिशय
साहिल शहा, जपानबद्दल अतिशय सहमत. सकाळी खचाखच भरलेल्या ट्रेनने रेग्युलर प्रवास केला आहे पण अजिबात कधी अनुभव आला नाही किंवा वखवखलेल्या नजरेने बायका बघणारे पुरुषही कधी दिसले नाहीत जसे भारतात असतात. इथे वेळ आली नाही कधी पब्लिक ट्रान्सपोर्ट नियमित घ्यायची. पण गर्दीच्या ठिकाणी असा अनुभव आलेला नाही.
न्यू जर्सीतून न्यूयॉर्क आणि
न्यू जर्सीतून न्यूयॉर्क आणि न्यूयॉर्क सबवे असा पब्लिक ट्रान्स्पोर्टने पीक अवर कम्यूटर गर्दीत प्रवास केला आहे. गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम अटेन्ड केले आहेत. एकदाही वाइट अनुभव आला नाही. वीस वर्षांत एकदाही.
भारतात देवळांतसुद्धा गर्दीचा फायदा घेऊन लगट करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे अनुभव आहेत - बाकी ठिकाणांबद्दल बोलायलाच नको!
विषय निघालाच आहे तर आणखी एक निरीक्षण : भारतीय पुरुषांना सोशल सिच्युएशन्समध्ये बायकांशी मोकळेपणाने बोलताच येत नाही. (मायबोलीकर मित्र हे सन्माननीय अपवाद! )
ऑफिसमध्ये कामानिमित्ताने बोलतात, पण पार्टी/गेट टुगेदर अशा प्रसंगी देशी जनता हमखास बायका आणि पुरुष अशा ग्रूप्समध्ये विभागली जाते. साधं 'काय कसं काय' याचं उत्तर द्यायला एकतर बिचकतात किंवा ही बाई आपल्याशी फ्लर्ट करते आहे असा काहीतरी ग्रह करून घेतात. एकंदरीत ऑकवर्डच असतात. का हे मला आजतागायत समजलेलं नाही.
मला या बाबीचा मूळ धाग्याच्या विषयाशी बराच घनिष्ट संबंध वाटतो म्हणून हे निरीक्षण नोंदवलं.
खडीसाखर तुझी पोस्ट खूप आवडली.
खडीसाखर तुझी पोस्ट खूप आवडली. तू नेमक्या शब्दात विश्लेषण केलंयंस, तुझ्या घरात तरी तू नक्कीच या दिशेने
प्रयत्न करत असशील. ओपन टॉक विदिन द फॅमिली ही पहिली पायरी असायला हवी. आई वडीलच ऑकवर्ड विषयांवर
बोलायचे टाळत असतील तर मुलं बाहेरून, चोरून लपून, अधकचरं ज्ञान मिळवतील आणी त्याचा परिणाम काय होईल, ते सांगायला नकोच.
. मी थ्रू आऊट को एड शाळांतून शिकल्यामुळे दोस्ती जेंडर वर आधारलेली नव्हती. मुलंमुली आपसात मोकळेपणी बोलायचे, कार्यक्रमात भाग घ्यायचे. तेंव्हा जी मुलं मित्रं झाली, ती आजतागायत मित्रच आहेत. उलट फक्त मुलांच्या शाळेत शिकणारी मुलं , मात्र मुलीं च्या मागेमागे फिरणं, नाक्यावर उभं राहून त्यांच्याबद्दल अर्वाच्य बोलणे, कधी मुलींच्या सायकली च्या हॅडलमधे टुकार प्रेमपत्रं डकवणे इ. कारनाम्यांना पुरुषार्थाची कमाल समजत असत.. ख सा च्या पोस्टमुळे असे करण्या मागचे कारण क्लिअर झालेय. घरात असले प्रश्न विचारण्याची चोरी, न मिळालेले एक्स्पोजर, अपुरे ज्ञान, विचार करण्याची भरकटलेली दिशा अश्या अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.
तर पालकांनो आपापल्या मुलामुलींना को एड शाळांत शिकायला ठेवलं नाही या गोष्टीलाच प्रिकॉशन समजू नका तर स्वतःला काळानुसार बदला. मुलांशी संवाद साधा. त्यांच्या मनात तुमच्याबद्दल इतका विश्वास जागृत करा कि त्यांना तुमच्या शी कोणत्याही विषयावर डिसकस करताना संकोच नाही वाटो. किमान तुम्ही ज्या चुका लहानपणी किंवा मोठेपणी केल्या त्या तुमच्या मुलांकडून होणार नाहीत याची तरी हमी, जबाबदारी ,काळजी घ्या.
मायबोलीकर मित्र हे सन्माननीय
मायबोलीकर मित्र हे सन्माननीय अपवाद! >>> लोल मी तेच म्हणलं की कुठल्या विषयावर बोलणं झालं नाही?
एकंदरीत ऑकवर्डच असतात. का हे मला आजतागायत समजलेलं नाही. . >>> जडणघडण. हेच उत्तर आहे.
मुलगी बोलली म्हणजे ती एकतर बहिण असते किंवा मानलेली बहिण असते. त्यात निखळ मैत्री हा टाईपच नाहीये.
बरं मैत्री केली तर मग पर्यायाने प्रेम आहे अशी समजून. आणि मग लगेच लग्न असेही. म्हणजे एकाच वेळी प्रेम असतानाही लग्न न करू शकणे हे देखील इथे लोकांना वेगळेच वाटते. कम्पिटॅबिलिटी हा शब्दच नविन असू शकतो. ( हा थोडा ऑफ टॉपिक )
आणि एखादी मुलगी पोर्न / सेक्स / स्त्री पुरूष संबंध / सिगरेट / दारू असे काही बोलायला लागली की मग तर झालेच. (एकतर गाडी तिथपर्यंत जातच नाही, पण गेलीच तर मग ती नक्कीच कॉल गर्ल कॅटेगीरी आहे, असा समज होणे सहज शक्य आहे. )
माझी मैत्री होती राधा (नाव चेंज) तिला सिगरेट प्याव्याश्या वाटत. आणि ती मला तेंव्हा सांगत असे. मी कधीकधी आणून देत असे. आणि हे सर्व माझ्या मित्रांना माहिती होते. तर त्यातील ७० टक्के जनता ही, "अबे चान्स का मारत नाहीस" असे विचारत? आय मिन कमॉन. ती सिगरेट पिऊ शकत नाही का? ह्यात चान्सचा काय संबंध आहे? सिगरेट पिणे हे घातक आहे मान्य पण मुलं जेंव्हा पितात ते कसे चालते मग?
सुदैवाने आता असे कमी होत आहे. मोठ्या शहरातून मित्र मैत्रीनी सर्रास दिसतात. हे जितके वाढेल तेवढे मग, कुठल्या विषयावर काय बोलायचे हा प्रश्न सुटेल.
थोडक्यात मुल मुली बहिण ह्या नात्यातून बाहेर पडून मित्र असावेत.
माझे नेहमीचे आवडते मत म्हणजे, "सेक्स" विषयी भारत जितका ओपन होत जाईल तितका हा प्रॉब्लेम नाहीसा होत जाईल. ( परत सेक्स ह्या शब्दाला तुम्ही कसे इंटरप्रिट करता ह्यावर तुमची जडणघडण आहे. बदलायला वेळ लागतो / लागेल पण संधी दिली तर स्वतःमध्येच बदल दिसतील. )
स्वाती आंबोळे, छान पोस्ट! इथे
स्वाती आंबोळे, छान पोस्ट!
इथे प्रत्येक कार्यक्रमात गर्दी स्त्री पुरूष अशीच विभागली जाते.
आणि आता तर इतकी सवय झालीय याची की कुणी दुसर्या ग्रूपात जास्तच मिसळला / ली तर ऑड वाटावे.
लिम्बूदा, पोस्टची दखल
लिम्बूदा, पोस्टची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद. धाग्यावर मत न मांडण्याचे एक कारण वेळ आणि दुसरे कारण हे की, धाग्याचा विषयच पटलेला नाही. माझ्या मते दुसर्याच्या जबाबदार्यांची उठाठेव करण्यापेक्षा माणसाने स्वतःच्या जबाबदारीची चिंता करावी. तसेच जबाबदारी ही जबाबदारी असते त्यात स्त्री पुरुष हा लिंग्भेद असण्याचे कारण असूच शकत नाही. असो. तूर्तास इतकेच.
केदार तुम्ही जो मुद्दा
केदार तुम्ही जो मुद्दा मांडताय तो योग्य असला/भासला तरी त्याला आकडेवारी साथ देत नाही. रेप व्हिक्टीम्स मध्ये ४७% स्त्रिया रिपोर्ट करतात की रेपिस्ट हे ओळखीचे होते किंवा मित्र होते आणि २५% डेट/बॉयफ्रेंड/ पती इ इंटीमेट गटात होते.
प्रत्येक मित्र वाईट नसतो पण वाईट अनुभव ज्याच्यामुळे येतो तो अनेक वेळा मित्र ही असू शकतो हे मुलींना सांगणे जरूरी आहे.
खूप व्यवस्थित चर्चा सुरू
खूप व्यवस्थित चर्चा सुरू आहे. बेफिकीरांच्या सविस्तर पोस्टनं चर्चेचा एकूण सूर एकदम ट्रॅकवर आला आणि त्यानंतरही बर्याच अंशी तसाच राहिला. याबद्दल सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार.
वर्षुताई, स्वाती, दीपांजली वगैरेंनी त्यांचे परदेशातील अनुभव मांडल्यामुळे हा प्रॉब्लेम भारतातच आहे हे स्पष्ट दिसत आहे.
परदेशात फिरताना खरंच एकदाही याबाबतीत असुरक्षित वाटत नाही. बायका अत्यंत तोकडे, कमी कपडे घालून फिरतात पण कोणीही घाणेरड्या कमेंट्स, घाणेरडे स्पर्श करत नाही. कधी कोणाला घाणेरड्या नजरेनं बघतानाही पाहिलं नाही.
खरंतर यंदाच्या अमेरिकावारीत पब्लिक ट्रान्स्पोर्टानं फिरल्यामुळे अनेक विचित्र वागणार्या व्यक्ती दिसल्या. अशा जरा वेडपट / विक्षिप्त / चक्रमासारखं वागणार्या व्यक्ती दिसल्या की मी दचकायचे. आता हा बाप्या काय करतोय, कसा वागतोय देव जाणे! असं मनात यायचं पण कधीही चुकूनसुद्धा काही घाणेरडा अनुभव आला नाही. जे काय त्यांचे चाळे, हातवारे, मोठ्यानं बोलणं असेल ते त्यांच्यापुरतं. फारकाय, बसमधली इतर मंडळीही कंफर्टेबल असायची. त्यांच्याशी कधीकधी बोलायची देखिल. हे मला नविन होतं. हे अवांतर वाटेल पण तसं नाहीये. नॉर्मल दिसणारे पुरुषही किळसवाणे वागतात, बोलतात याचीच सवय असलेल्या मला, हे विक्षिप्त पुरुषदेखिल कुठे मर्यादा ओलांडत नाहीयेत हे लक्षात घेणं कठिणच गेलं.
म्हणजे विकृत वागणं हे दरवेळी मानसिक रोगी असल्याचं लक्षण नाहीये. ते व्यवस्थित ठरवून केलं जातं. रस्त्यानं जाताना समोरून स्त्री येताना दिसली की नेमका तिच्या छातीला धक्का लागेल अशा पद्धतीनं हात शर्टाच्या खिशात घालणे किंवा पटकन खांदा हलवून तिला छातीला धक्का मारणे, स्टेशनवरच्या गर्दीत स्त्रीयांच्या नितंबांना हाताळणे हे इतकं सर्रास होतं की आजूबाजूच्या पुरुषांनाही सवय होऊन त्यांची मनं मेलीयेत. इतपत होणारच. रेप तर नाही ना होत आहे? अशी समजूत होत चालली आहे. जी भयानक आहे.
या धाग्याच्या निमित्ताने मनं उघडली गेली तरी खूप महत्त्वाचं.
जर खरंच प्रत्येक पुरुषानं अशी घाणेरडी पुरुषी वृत्ती अस्तित्वात आहे आणि ती दूर करण्याचा निदान प्रयत्न करणे ही पुरुषांचीही जबाबदारी आहे हे सत्य स्विकारलं तर चित्रं पालटायला हातभार लागेल.
लग्न वगैरे जमवताना किंवा
लग्न वगैरे जमवताना किंवा बैठकित मुलिची आई बोलनारी असेल तर मुलां कडच्यांना आवडत नाही.
खुप ठिकाणी मुलिला दाखवायला मुलाच्या घरी घेऊन जातात.अश्या प्रथांमुळे मुले जास्त शेफारतात.
मिळून सार्याजणीच्या जुन्या
मिळून सार्याजणीच्या जुन्या अंकात एक छान कथा आहे याबद्दल मामी.
कसा एक नॉर्मल घरातला सभ्य माणूस हळूहळू असा पर्वर्ट होत जातो.
तू सुद्धा
डबल!
डबल!
मामी, स्पर्श करणे, हाताळणे हा
मामी, स्पर्श करणे, हाताळणे हा प्रकार होत नसला तरी रस्त्यावर अचकट विचकट बोलण, नजरा याचा अनेक महिलांना न्यू योर्क सारख्या शहरात सामना करावा लागतोच. थोड्या सुदैवी अशा आहेत ज्यांच्याकडे अशा नजरा गेल्या नाहीत. कायद्याची अंमलबजावणी कडक नसती तर नजरांचे रूपांतर स्पर्शात व्हायला वेळ नाही लागणार.
https://www.youtube.com/watch?v=b1XGPvbWn0A
हा व्हिडियो मध्यंतरी व्हायरल झाला होता (४० लक्ष इ इ) लोकांनी पाहिला. विषयाला अनेक फाटे फुटले - हा व्हिडियो स्टेज्ड आहे, रेसिस्ट आहे, ही हरॅस्मेंटच नाही इ इ. पण मूळ मुद्दा- असला व्हिडियो काढायची किंवा त्यात महिला असण्याची गरज आज आहे - हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे.
http://www.ihollaback.org/
रस्त्यावरील वाईट अनुभव बंद व्हावेत ह्या साठी झटणारी नॉन-प्रॉफिट. एकूण ९२ शहरात ह्या संस्थेतर्फे काम चालते.
सीमंतिनी - स्टील थिंकिंग
सीमंतिनी - स्टील थिंकिंग तो मुद्दा भासला गटा मध्ये मोडू शकतो कदाचित.
वर्षुताई, स्वाती, दीपांजली वगैरेंनी त्यांचे परदेशातील अनुभव मांडल्यामुळे हा प्रॉब्लेम भारतातच आहे हे स्पष्ट दिसत आहे. >>>
मामी अहो हे सुलभीकरण झाले की इथे प्रॉब्लेम आहे आणि तिथे नाही. वेट अ मिनिट. निष्कर्ष काढू नका इतक्यात.
https://www.rainn.org/statistics इथेही नजर घाला. दर १०७ व्या सेकंदाला अमेरिकेत सेक्स असॉल्ट होतो असे लिहिले आहे. आणि इतरही खूप काही आकडेवारी आहे.
थोडक्यात अमेरिकेत असे नसते / इंग्लड चांगले ह्याला खरच अर्थ नाही. तिथेही हा प्रॉब्लेम दुर्दैवाने आहेच.
तिथे निदान लोकं ओपनली तक्रार करतात आपल्याकडे तर ती ही करायला "परिवार की इज्जत" मध्ये येते.
"परिवार की इज्जत" मध्ये येते
"परिवार की इज्जत" मध्ये येते >> +१००
केदार, हो बरोबर. हे अनुभव
केदार, हो बरोबर. हे अनुभव सर्वत्रच आहेत. पण तरीही व्यक्तीगत पातळीवर दोन देशांमध्ये खूप फरक अनुभवला आहे. वर इतर स्त्रियांनीही असंच अनुभवलं आहे.
ण तरीही व्यक्तीगत पातळीवर दोन
ण तरीही व्यक्तीगत पातळीवर दोन देशांमध्ये खूप फरक अनुभवला आहे. वर इतर स्त्रियांनीही असंच अनुभवलं आहे. >>
ऑबिव्हसली जाणवणारंच. त्यात नवीन काहीच नाही. कारण त्याची कारणं वेगळी असू शकतील ना. म्हणून म्हणलं सुलभीकरण नको.
सगळ्या पोस्ट्स वाचल्या.
सगळ्या पोस्ट्स वाचल्या.
अंकल लोकांच्या लोचटपणाबद्दल : (मी भारतापुरतंच लिहितेय)
मला वाटतं की या सर्वांची सुरूवातच कुठंतरी त्यांच्याच लहानपणापासून होती. साधारण ६०-७० च्या दशकामध्ये या पिढीनं एक वेगळंच बालपण अनुभवलं. अर्थातच त्यामधेय सेक्स एज्युकेशन वगैरे काही नव्ह्तंच. शिवाय मुलींशी बोलायचेदेखील नाही, वगैरे बंधनं होतीच. पुढे ९० मध्ये याच पिढीकडे वारेमाप पैसा आला, सुबत्ता आली, बर्याच नवीन गोष्टी मिळाल्या. इतक्या थडाथड बदलामध्ये कायम राहिल्यामुळे ही पिढी या सर्व बदलांशी कोप अप करू शकत नाहीये. या लोकांना एखादी तरूण मुलगी दिसताच त्यांच्या कधीकाळी अधुर्या राहिलेल्या फॅण्टसी सुचायला लागतात. शिवाय घरामधली जोडीदार आता मुलाबाळांमध्ये (आणी नोकरीमध्ये) जास्त रमलेली असल्यानं यांना रान मोकळंच मिळाल्यासार्खं अस्तं. शिवाय "आपण सभ्य आहोत" म्हणजे आपल्याला कोण काय म्हणणार नाही असा एक गोड गैरसमज असतोच. परिणामी, गर्दीमध्ये अथवा चान्स मिळताक्षणी कुठंतरी हात लावून स्पर्शसुखाचं का होईना सुख घेण्याचा यांचा कीळसवाणा अट्टहास चालू असतो. (नंतर एकांतात या स्पर्शसुखाच्याच आठवनी काढायच्या असतात यांना)
याच लोकांना मुक्त विचारांची, आधुनिक कपडे घातलेली, मेकप केलेली प्रत्येक मुलगी ही वॅम्प (रीडः अरूणा इराणी किंवा हेलन) वाटत असते. कारण यांची आदर्श नारी बहुधा साड्या नेसून "आज मै जवान हो गयी" करत्त बागडणारी सुसंस्कारी असते. मग जे उघडं आहे त्यात मी तोंड मारता येतं का बघतो असा यांचा विचार असतो.
फनीली, मुलींच्या कपड्यालत्त्यावरून ओरडणारी बहुतेक जनता याच कॅटेगरीमधली असते. यांनाच भारतीय नारीच्या इमेजची काळजी असते, आणि हेच रस्त्यावरून गोरी परदेसी बाई जाताना दिसली की भलत्याभलत्या कल्पना रचू लागतात.) ही अंकल लोकांच्या टिपिकल लक्षणं आहेत.
छान चर्चा होतेय इथे. धागा
छान चर्चा होतेय इथे. धागा निघाला तेव्हा पाहिलेला. तेव्हा मनातल्या मनात १. अशा धाग्याची गरज काय २. आता तेच ते अभिप्राय येणार ह्या दोन गोष्टी लगेच नोंदल्या गेलेल्या.
पण जसे वाटलेले तसे घडले नाही. धागा खरंच खुप छान जातोय, चांगली चर्चा.
वर परदेशात गाडीमध्ये लेडिज स्पेशल डब्बा नसतो हे वाचल्यावर जरा कसेतरीच वाटले. माझ्यावर तिथे खचाखच भरलेल्या ट्रेनमधुन प्रवासाची वेळ आली तर मला "कोणी हात तर लावत नाही ना यावर सतत वॉच ठेवणे" हा विचार डोक्यातुन काढुन फक्त प्रवासावर लक्ष केंद्रीत करणे अजिबात शक्य होणार नाही. इथे कधी चुकून जनरल डब्ब्यात चढल्यावर कधी उतरते असे होते. अर्थात जनरल डब्यात चढल्यावर लगेच सगळी मंडळी तुमच्यावर तुटून पडत नाहीत पण पहिल्यापासुनच सार्वजनिक ठिकाणी स्त्री म्हणुन स्वतःची एक वेगळी काळजी घ्यायची इतकी सवय झालीय की अशा कुठल्याही ठिकाणी डोक्यातुन तो विषय काढुन वावरणे अशक्य होऊन बसलेय. कधीकधी असे होते की आपण पुर्ण सेफ आहोत असे समजुन तो विषय जरा डोळ्याआड करतो आणि लगेच फटका बसतो. त्यामुळे वावरताना कायम एक साक्षिभाव का काय म्हणतात तो असतोच आपल्यावर लक्ष ठेवण्याचा . काय करणार? इथे हे असे आहेच हे अॅक्सेप्ट केलेय आता.
वर जपानबद्दलचे मत ++ तिथे
वर जपानबद्दलचे मत ++
तिथे नुसते खचाखच गर्दीच्याच वेळेला नाही तर मी एक्टीदुकटी दुरवरचे पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करुन अडनीड्या जागेच्या हॉटेल्समधे एकटी राहीले आहे. तिथे डिनरच्या वेळेस हॉटेलच्या मालकीणबाई सोडल्या तर बहुतांश पुरुष असतात तिथे जेवताना, गप्पा मारताना, दुसर्या दिवशीच्या ट्रेक बद्दल बोलताना कधीही काही वाटले नाही. अगदी पहाटे पहाटे एखाद्या अडनिड्या जागी गाडीने सोडायलाही हॉटेल मालक तयार अस्तात. तिथे १०वर्षात कधीच 'माणसांची' भिती वाटली नाही.
याच अनुभवावरुन अमेरिकेत एकदा एकटी साल्ट लेक तलावावर पहाटे गेले होते. तिथे मात्र मित्रमैत्रिणींच्या शिव्या खाल्ल्या होत्या.
कारण त्याची कारणं वेगळी असू शकतील ना. >>>
सेक्स हा विषय टॅबू नाही. दोन्ही कडुन संमती असेल तर हे टिनएज पासुन सहज चालते.
कमी कपडे घालणारे स्त्री पुरुष हे ही टॅबू नाही. मुळात कमी कपडे कशाला, नग्नताही तिथे टॅबू नाहीये. एखादी मुलगी ट्रेकमधे शर्ट खराब झाला म्हणुन थोडं बाजूला थांबून शर्ट बदलत असेल तरिही कोणीच बघत नाही. अगदी बालपणापासुन स्त्री आणि पुरुष यांचे देह समोर दिसल्यामुळे त्यात कुतुहल, चोरुन बघण्याची वृत्ती नाही. शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षण उपलब्ध आहे शिवाय इतरही अनेक प्रकारे कुतुहल आणि भावनांचे शमन केले जात असावे असे वाटते.
त्याशिवाय, जे आपले नाही ते, ज्याची परवानगी नाही ते आपण घ्यायचे नाही ही भावना अगदी बाळपणापासुन घोटून घोटून डोक्यात पक्की केलेली असते. त्यामुळे ते पडलेले पैसे, राहीलेले वॉलेट जसे आपले नाही म्हणु घेतले जात नाही तसेच जिवंत व्यक्ती देखील परवानगी देत नाही तोपर्यंत तिला छेडण्याचा , हात लावण्याचा प्रकार घडत नाही.
एक उदा. शिबुया स्टेशनाच्या बाहेर रात्री १०/११ नंतर मुली उभ्या असतील तर कधी कधी कुणी कॉलेज कुमार ( बहुधा कॉलेज कुमारच पाहीले आहेत ) मुलींच्या बाजुला जाउन 'शॉल वी हॅव टी' असे जपानीत विचारतात. मुलीने नकार दिला तर सहज निघुन जातात पण हात लावुन छेडत, त्रास देत नाहीत हे पाहिले आहे. माझ्यासारख्या फॉरेनर व्यक्तीच्या मात्र चार हात दुर असतात. मला एकदाही असा त्रास झालेला नाही.
काही वर्तमानपत्रामधे सर्रास पॉर्न फोटो दिसतात. आपण ट्रेन मधे बसलो असु तर बाजुच्या माणसाच्या हातातील पेपरमधे ते सहज दिसतात. त्यात त्याला लपवावेसे काही वाटत नाही आणि पॉर्न फोटो बघुन लगेच ( वर कुणीतरी लिहील्याप्रमाणे ) वासना अनावर होऊन तो बाजूच्या स्त्री ला चिकटायला जात नाही.
हे सगळे कारणांसाठी आणि उदा. म्हणुन लिहीले आहे. मुळ पोस्टला धरुन नसेल तर डिलीट करेन.
सावली, छान लिहिलंयस. डिलिट
सावली, छान लिहिलंयस. डिलिट नको करूस कृपया.
मागे मी कामानिमित्त
मागे मी कामानिमित्त तामिळनाडुतील एका शांतताप्रिय समजाची वस्ती असलेल्या ठिकाणी हाफ पँट वर गेलो असता मला ताबडतोब फुलपँट घालण्याची "विनंती" (नम्रपणे) करण्यात आली.
बँगलोर चेन्नई हायवेवर हाफ पँट घालुन बाईक चालवताना प्रत्येकजण अगदी वेग कमी करुन कोणीतरी आत्तच मेंटल होस्पीटलमधुन सुटून आलेला आहे कस होणार यच असे लुक देऊन जात होता.
मुलांनी हाफ पँट घालायला जर एवढा प्रोब्लेम असेल तर ईतरांचे काय? मोठ्या माणसांनी हाफ पँट घालणॅ भारतात समाजमान्य का नाही?
कोतबो.
जापान आणि इतर एशियन
जापान आणि इतर एशियन देशांमध्ये स्त्रीया एवढ्या मुक्त विहार करण्यासाठी तेथील धर्म तर कारणिभुत नसेल ना?
नंदिनी, दुर्दैवाने अंकल आजोबा
नंदिनी,
दुर्दैवाने अंकल आजोबा लोकांचे असे वागणे पाहुन मुलांनाही त्यात काही गैर वाटत नाही आणि हेच चक्र पुढे चालु रहाते.
आधी कुणीतरी 'नुसते पाहिले तर चालेल' अशा अर्थाची एक पोस्ट लिहीलेली आहे असे आठवते. तर प्लिज समजुन घ्या. हे पहाणे किती घाणेरडे असते आणि किती किळसवाणे असते याची तुम्हाला कल्पना नसावी. मुली त्याला रागाने एक्सरे विजन म्हणतात.
ट्रेन मधे जॉइन डब्बा असतो तिथे बसणे म्हणजे खरोखरच एक शिक्षा असते. जितकावेळ प्रवास कराल तितकावेळ समोरचा एखादा पुरुष अतिशय घाणेरड्या नजरेने पहात बसलेला असु शकतो. त्यामुळे नुसते पहाणे चालेल असे कुणि म्हणु नका.
कहर म्हणजे एका सुशिक्षीत, आयुष्याची काही वर्ष अमेरिकेत राहुन आलेल्या मुलानेही नुकतेच या डब्ब्याला टिव्ही चॅनल असे नाव देत समोर दिसणार्या मुलींची वर्णने केल्याची घटना पाहीली तेव्हा तर प्रचंड राग आला होता. :रागः
ओके मामी
मामी, >> पण तरीही व्यक्तीगत
मामी,
>> पण तरीही व्यक्तीगत पातळीवर दोन देशांमध्ये खूप फरक अनुभवला आहे. वर इतर स्त्रियांनीही असंच
>> अनुभवलं आहे.
सहमत आहे. शिवाय स्वाती_आंबोळे यांच्या अनुभवाशीही सहमत आहे. हे बायकांचे अनुभव झाले. माझा अनुभव सांगतो.
इकडे इंग्लंडमध्ये बायका जास्त धीट असतात. एखादा पुरूष आवडला तर बिनधास्त अॅप्रोच मारतात. रेल्वे, बस, पब वगैरे गर्दीच्या ठिकाणी तर धक्का देखील मारतात. बऱ्याचदा धक्का अंगाने न मारता पर्स वा हातातली कागदपत्रे वापरून मारला जातो. भारतात स्त्रीला एखादा पुरूष आवडला तर ती इतकी उघडपणे व्यक्त होत नसावी.
गुरुवार संपला की एकटे (=सिंगल) पुरूष आणि स्त्रिया माजावर येतात. पुरूष दारू पिण्याकडे वळतो तर बाई 'शिकार शोधायला' निघते. पब वा क्लबमध्ये 'फ्रायडे मूड' मध्ये असलेल्या एखादीला एकडून दोन पेग पाजले तर एका रात्रीची सोय आरामात होते. भरपूर उपलब्धीमुळे छेडछाड अत्यल्प आहे.
आ.न.,
-गा.पै.
गामा, तुमचा मुद्दा आणि तो
गामा,
तुमचा मुद्दा आणि तो सांगण्याची पद्धत ह्यात तफावत असते असे एक निरिक्षण! चु भु द्या घ्या. वरील पोस्ट वाचून तिकडे नुसता हैदोस आणि धमाल असते असा समज होत आहे. शिवाय स्वस्तपणे लिहिल्यासारखे वाटले.
क्षमस्व!
मूळ मुद्दा असा असावा की सिन्स सेक्स इज नॉट अ बिग डील, सच थिंग्ज रेअरली ऑकर!
बेफिकीर, तुमचं म्हणणं लक्षात
बेफिकीर,
तुमचं म्हणणं लक्षात आलं. मुद्दा इथे फक्त धमालच चालते असा नाहीये. तर धमाल सहज उपलब्ध आहे. त्यासाठी लेडीज बारमध्ये जायची गरज नाही. एव्हढंच.
बाकी अर्थाचा विपर्यास झाल्याबद्दल क्षमा असावी.
आ.न.,
-गा.पै.
दिपा म्हेत्रेच्या गोष्टीत
दिपा म्हेत्रेच्या गोष्टीत विषेश काय आहे? ती कुणा एखाद्याची पत्नी मुलगी असेल तिला बसमध्ये एक पुरुष सहकारी भेटला तसे त्या पुरषाच्या पत्नी मुलिलाही असा कोणी तरी प्रवासात भेटतच असेल की.
लेख आवडला आणि चर्चाही.
लेख आवडला आणि चर्चाही.
Pages