रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.
पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?
या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...
HeForShe : KEY MESSAGES
* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world
* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality
* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.
ABOUT THE CAMPAIGN
HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.
अधिक माहिती :
https://en.wikipedia.org/wiki/HeForShe
***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी
पुरूषांची सामाजिक जबाबदारी -
१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.
२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.
३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.
४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.
५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.
६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.
७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.
८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.
९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.
***********************************************************************************************************
अंजली
बर्याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.
१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?
एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?
वैद्यबुवा, I am sorry असं
वैद्यबुवा, I am sorry असं म्हटलं नाहीये I feel sorry असं म्हटलं आहे. मला वाटत ह्या दोन्हीच्या अर्थात बराच फरक आहे. दुसऱ्याच्या गुन्ह्यासाठी तुम्ही माफी मागावी अशी अपेक्षा नाही. >>>>>> अंडरस्टुड.
पराग, धन्यवाद, इग्नोर करतोय
पराग, धन्यवाद, इग्नोर करतोय असं लिहिण्याची तसदी घेऊन माझी पोस्ट इग्नोर केलेली नाही असं कळवण्यासाठी >>> इग्नोर केली म्हणजे वाचली, पटली नाही पण तरीही.. असं म्हणायचं होतं मला.
मामी, मी इथल्या सगळ्या
मामी, मी इथल्या सगळ्या पोस्ट्स वाचल्या नाहीत. पण एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवते की आपल्या वागण्यातून आपण काही 'चुकतोय' याची जाणीवच अनेकांना नसते. म्हणजे, मी जे वागत आहे तेच बरोबर आहे, नैसर्गिक आहे, सर्वसामान्य आहे अशी स्वतःची समजूत असणे. तसेच ग्रूपमध्ये असताना विशिष्ट प्रकारे वागणे, बोलणे, शेरे - हावभाव - हातवारे वगैरे.
तसेच एखाद्या स्त्रीने आपल्याकडे पाहिले किंवा आपल्याकडे पाहताना तिच्या चेहर्यावर जर स्मित असले किंवा ती काही कामानिमित्त आपल्याशी बोलली याचा अर्थ भलताच लावणारे अनेक नरपुंगव आजही आजूबाजूला ढीगाने बघायला मिळतात. याबद्दल कमालीचे चुकीचे आडाखे लोकांमध्ये असतात. मुलगी पटली हे कसे ओळखावे वगैरे वगैरे. चुकीची माहिती. चुकीचे समज. शंकासमाधान होत नाही. होते तेही भलत्याच मार्गाने किंवा चुकीच्या प्रकारे. वासनांचे शमन होत नाही. नीती-अनीती खूप दूर राहिली. 'बाई'बद्दल कमालीच्या किळसवाण्या कल्पना. कदाचित घरच्या स्त्रियाही या कल्पनांमधून सुटत नसतील. कल्पनेतले कामजीवन व प्रत्यक्षातले कामजीवन यांत खूप मोठी तफावत. देह स्पर्शास हपापलेला. त्या हपापण्यापायी सारासार बुद्धी (असल्यास) गहाण.
या अशा मानसिकतेत व परिस्थितीत बराच मोठा वर्ग आहे. त्यांना मुळात त्यातून बाहेर यायची इच्छा तरी आहे का? असे वागल्याने त्यांचे (तसेही) काय बिघडते आहे? शिवाय त्यांना पाठीशी घालणार्या आया-बहिणी-बायकाही असतातच. त्यांचे समर्थन होत राहाते. वर्चस्व सिद्ध होत राहाते. खुमखुमी भागवली जाते. दबलेला वर्ग तसाच दबून राहातो. बघणारे बघत राहातात. स्पर्श करणारे स्पर्श करत राहातात. गैरफायदा घेणारे गैरफायदा घेत राहातात. आपल्या लेकी, मुली, सुना, आया, बहिणींनाही कोणीतरी असेच वागवत असेल / वागवू शकते वगैरे शक्यतांचा त्यांच्यावर ढीम्म परिणाम होतो. इतकी चुकीची मानसिकता कायदा तरी किती हातांनी सावरू शकणार? त्यातून व्यसनांची भर. ते आणखी एक कारण. अनेक बलात्कार हे व्यसनाच्या अंमलाखाली असताना घडतात हे वास्तव आहे. पण ते तसे मान्य करायचे नसते. नाहीतर व्यसनांवर गदा येईल.
मुलांच्या हातात लहान वयापासून पालकांचे स्मार्टफोन रुळताना दिसतात. फोनमध्ये अनेक प्रकारचे फोटो, क्लिप्स असतात. चाईल्डलॉक वगैरे प्रकार अनेक पालकांच्या गावीही नसतो. मुलांना सहजच अॅक्सेस मिळतो. अगदी घरबसल्या.
तर असे अनेक घटक एकत्रितपणे कार्यरत असताना मुलींना, स्त्रियांना येथे निर्भयपणे, मोकळेपणाने कधीतरी वागायला - राहायला मिळेल ही केवळ एक कविकल्पनाच ठरते. केवळ घटनेतील एक आदर्श विचार. तो प्रत्यक्षात नाही आला तरी बहुसंख्य लोकांचे (त्यांच्या मते) फारसे काहीही बिघडत नाही.
एक पुरुष म्हणून माझी सामाजिक
एक पुरुष म्हणून माझी सामाजिक जबाबदारी वा त्यातील पहिली जबाबदारी मी किमान एवढी समजतो की स्वत:चे वर्तन असे ठेवावे की आपल्या आजूबाजुच्या महिलांमध्ये आपल्याबद्दल एक विश्वासाचे नाते निर्माण होईल.
जर ते झाले नाही तर जेव्हा केव्हा त्यांना मदतीची गरज असेल तेव्हा त्या आपल्याकडे मदत मागतानाही विचार करतील.
ऋन्मेष, पोस्ट आवडली.
ऋन्मेष, पोस्ट आवडली.
अरुंधती, तुमची पोस्ट योग्य असली तरी धाग्यातील विषयाशी निगडीत वाटली नाही. चु भु द्या घ्या.
काय जाणवतं ते लिहिलंय.
काय जाणवतं ते लिहिलंय.
याउप्पर, आपल्या मुलाचे घरातले किंवा बाहेरचे चुकीचे वागणे वेळीच थोपवणे, किंवा त्याला योग्य प्रकारे समज देणे, वेळप्रसंगी कठोर उपाययोजना करणे हे करू न शकणारे अनेक पालक आजही आजूबाजूला वावरतात. ही मुले आपल्या भावी समाजाचे घटक आहेत.
एक उदाहरण मनात आलं...
आपल्या मुलांसमोर पांचट व स्त्रियांना हीन लेखणारे जोक्स मारणे, तसे चित्रपट / सीरियल्स चवीचवीने पाहाणे, शेरेबाजी, स्त्रियांच्या देहयष्टीबद्दल - रूप रंगाबद्दल वारंवार सवंगपणे बोलणे हे अनेक पालक करत असतात. असे जोक्स एकमेकांना गठ्ठ्याने (अगदी फॅमिली ग्रुपमध्येही) फॉरवर्ड करत असतात. पालक असं मुद्दाम लिहिते आहे कारण पालक स्त्रियाही 'अरे, जोकच तर आहे!' म्हणून असे जोक्स फॉरवर्ड करतात. शेवटी या सर्वातून स्त्रीची काय प्रतिमा आपण निर्माण करत आहोत, आणि स्त्रीचेप्रती पुरुष कसा विचार करतात याबद्दल आपण काय संदेश देत आहोत याचा कधी विचार केला जातो का? काही गरज भासते का? चावट, अश्लील, पांचट वगैरे अनेक छटांचे नाव देऊन या तर्हेच्या विनोदांची पुनरावृत्ती होत राहाते.
मग प्रश्न असा निर्माण होतो की जगात इतरत्र असे जोक्स केलेच जात नाहीत का? तर, स्त्रीच्या देहयष्टीवरून, रूपरंगावरून व (नसलेल्या) बुद्धीवरून भरपूर जोक्स सर्वत्र केले जातात (किंवा केले जात असावेत.)
पण येथे कदाचित ''आधीच मर्कट.... '' अशी अवस्था होत असावी. म्हणजे मुळातच तोकडे ज्ञान आणि त्यात अशा जोक्सची व सवंग दृष्टिकोनाची भर.
तर, या अशा गोष्टी टाळणे सध्याच्या काळात कितपत शक्य आहे? मुळात तसे शक्य आहे का? आपले मूल एक आदर्श (किंवा किमानपक्षी जबाबदार) नागरिक होण्यासाठी पालकही तसे वागतात का? (आणि त्यांनी तसे वागावे का?)
चांगल्या पोस्टी अरुंधती.
चांगल्या पोस्टी अरुंधती. पराग, तुझी पण वर्कप्लेस विषयीची पोस्ट आवडली.
अकु, >> पण एक गोष्ट अतिशय
अकु,
>> पण एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवते की आपल्या वागण्यातून आपण काही 'चुकतोय' याची जाणीवच अनेकांना
>> नसते. म्हणजे, मी जे वागत आहे तेच बरोबर आहे, नैसर्गिक आहे, सर्वसामान्य आहे अशी स्वतःची समजूत असणे.
अगदी अगदी! इथे डरमधला शारूक्खान आठवतो. स्त्रीची काय किंमत करतो तो? अशा चित्रपटांना न जाणे हे पुरूष करू शकतात.
आ.न.,
-गा.पै.
धागा चांगला आहे.. या ज्या
धागा चांगला आहे..
या ज्या घटना समाजात आज वाढत आहेत, याचे काऱण स्त्री पुरुष असमानता आहे असे मला वाटत नाही. वर बऱ्याच पोस्ट स्त्री पुरुष समानता कशी रुजवावि त्याबद्दल दिसतात. तो वेगळा विषय म्हणून बरोबर आहे पण इथे हा जो स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचा विषय त्याचे समाधान त्यात नाही असे मला वाटते....
माझ्या आकलना नुसार, या वाढीस लागलेल्या गोष्टींची कारणे अशी आहेत,
१. स्त्रीभ्रूण हत्यांमुळे स्त्रियांची संख्या कमी zaleli आहे ; यामुळे अनेक लोकांचे लग्न उशिरा होतात किंवा होत नाहीत.
सबब, यांची शारीरिक भूक तशीच राहते..
२. तंत्रद्यानाच्या प्रगतिमुळे पोर्न सहज उपलब्ध होते. ते बरेच अतिरंजित दाखवलेले असते.. त्यातून पुढे ती हाव वाढत जाते..
३. छेड़छाड़ केल्या नंतर स्त्री जनलजेस्तव तक्रार करणार नाही याची कल्पना या लोकांना येते. अथवा अशाच लोकांना गाठले जाते जे इच्छा असून तक्रार करू शकणार नाही. उदा. चोरून निर्जन स्थळी भेटणारे जोड़पे.
अर्थात, पहिल्या दोन प्रकाराने येणारे आसुरी विचार सत्यात उतरवण्याची संधि त्यांना यामुळे मिळते..
आता अनुक्रमे उपाय,
१. स्त्री पुरुष संख्येत असमानता - या बद्दल जनजागृती सुरु आहे.. वाट पाहाणे सोडुन काही हातात नाही. ही निर्माण होणारी भूक मुक्त पाश्चात्य पद्धतिच्या समाजात शमली जात असावी. पण तो आपला मार्ग नव्हे..
२. पोर्न उपलब्धता - यावर नियंत्रण मिळवणे केवळ अशक्य आहे. कोणी तानाशाही करून तसे करायला गेल्यास याचा उलट परिणाम होउ शकतो. उलटा परिणाम अशामुळे की अचानक उचंबळून येणाऱ्या भवनांचा अनेकजण पोर्न च्या माध्यमातुन निचरा करतात आणि शांत बसतात. पॉर्न बंद केल्याने या भावना उचंबळून येणे तर थांबणारे नाही, मग त्यातून इतर मार्गांचा शोध सुरु होईल....
मुळात technically हे शक्य होईल असे मला वाटत नाही.
३. छेड़छाड़ करण्यास वाव मिळेल अशी परिस्थिति निर्माण होणे--
आपल्या पांढरपेश्या लोकांच्या दुर्दैवाने अशी परिस्थिति निर्माण न होउ देणे हेच एक आपल्या हातात आहे.
आपापल्या आजुबाजूच्या स्त्रियांना निर्जन स्थळी एकटे न जाऊ देणे, त्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे.. शस्त्र जवळ ठेवण्यास चालवण्यास शिकवणे. एवढेच आपल्या हातात आहे..
तुम्ही म्हणाल नवीन काय सांगितले,
तर मला हेच सांगायचे आहे कि नवीन काही उपाय वगेरे आहेत ऎसे मला वाटत नाही. हे जे जुने आहे, तेच सत्य आहे. हे पटवून सांगण्या करता वरील पोस्ट.
बाकी सगळे संथ गतीने होणारे बदल आहेत.. toparent काय याचा विचार होणे क्रमप्राप्त आहे असे मला वाटते..
वरील माझ्या पोस्टि मधील तो
वरील माझ्या पोस्टि मधील तो पुरुषांचा वर्ग सोडून असा एक निर्लज्ज आणि मानवतेला काळीमा फासणारा वर्ग आहेच जो केवळ गंमत म्हणून ऎसे मूर्खतापूर्ण काम करतो..
अशांना वर शहा यांच्या पोस्टि मधल्या सिंगापुरी प्रसादाशिवाय उपायच नाही..
सुमुक्ता या आइडी च्या पोस्ट आवडल्या..
भारतीय पुरुष स्त्रियांना
भारतीय पुरुष स्त्रियांना जास्त न्याहळुन बघतात हे खर आहे का ?>>> हो
काहीहि हं,प्राजक्ता!
तसे भारतात जवळपास ५० कोटी च्या आसपास पुरुष असतील. सगळ्यांनाच एका मापाने?
अहो विशिष्ठ वयात भारतातलेच काय जगातले सगळेच पुरुष सगळ्याच बायकांना न्याहाळून बघतात! विशिष्ठ वयातल्या बायकांना ते आवडते पण. तसा नैसर्गिक नियमच आहे! मनुष्य जात नष्ट होऊ नये म्हणून निसर्गानेच तशी सोय केली आहे.
आता तुम्ही फक्त भारताबद्दलच बोलत असाल, तर नुकतेच मुक्तिपीठ वर वाचले की आयत्या वेळी आलेल्या आगांतुकांना जेवायला वाढण्याबद्दल कुरकुर केली तर नवर्याने बायकोला उलटे टांगून मिरच्यांची धुरि द्यावी हीच भारतीय संस्कृति असे वाचले! (वाचा: श्रीकांत जोशी यांचा लेख) . तर अश्या संस्कृतीत बलात्कार याला विशेष महत्वाचे कोण समजणार?
मी काय करतो, समोर असे काही
मी काय करतो,
समोर असे काही घडत आहे अथवा घडू शकते असे वाटल्यास तेथे आजुबाजूला फक्त उभा राहतो. त्यानेही बराच फरक पडतो.
एकदा एक लांबचा प्रवास करताना गाड़ी जेवणा करता थांबली होती. तेथे चार आमच्या गडीतून प्रवास करणारे मूल एका मुलीकडे बघून शिट्टी मारणे ई करत होते. मी आपला सहज गेल्या सारखा फ़ोन मधे पाहत जाऊन त्या मुलीच्या आणि त्यांच्या मधे जाउन उभा राहिलो.
त्यांनी मला डायरेक्ट बाजूला जायला वगेरे सांगितले नाही. त्यांना नाविलाजाने ते बंद करावे लागले. त्यांनी तोंडातल्या तोंडात दिलेल्या शिव्या मला ऐकू आल्या पण मी वर संगीतल्या प्रमाणे फोन पाहण्यात मग्न होतो..
असेच एकदा मी रेल्वे स्थानकावरपण अनुभवले आहे.
presence of someone matters a lot..
ते छेड़ काढणारे तुम्हाला काही करत नाही कारण तुम्ही त्यांना काही करतच नस्ता.
आणि समजा ते मारण्या करता आलेच तरी 'क्या हुवा भाई क्या हुवा! सॉरी ना भाई, ध्यान में नही आया' म्हणत वेळ काढ़ायचा. त्या वेळात ती मुलगी सतर्क होऊन निघून जाऊ शकते. एखाद्या भगिनी/माते करता दोन ठोसे खावे लागले तरी फार काही वाइट नाही ऎसे मला वाटते..
अत्यंत उपयुक्त धागा आणि
अत्यंत उपयुक्त धागा आणि चर्चा!
मामी मनापासुन धन्यवाद.
अनुमोदन निरा.
आम्ही घरात यासाठी काय
आम्ही घरात यासाठी काय करतो,
आम्ही स्त्रीयांवर थोडीशी बंधने लादतो,
या आमच्या स्त्रीया नॉन सेन्स नसल्याने त्या योग्य ठिकाणी जाताना योग्य ते कपड़े घालतात. कपड़े कसे घालावेत हे सांगायची वेळ येत/येणार नाही. (सांगायचे कारण म्हणजे तशी वेळ आली असती तर सांगितले असते,असे)
बंधने हि येण्याजाण्याच्या वेळा, कोणत्या रस्त्याने ये जा करावी, उशीर होत असल्यास एकटे येऊ नये, पब्लिक ट्रांसपोर्ट कोणते वापरावे, प्रवास कधी करावा कधी करू नये इ.वर असतात..
(अर्थात हे जाचक वगेरे प्रकारात मोड़तील असे नसतात. त्यांच्या संमतीने त्यांना परिस्थितिची कल्पना देऊन निर्णय घेतला जातो)
कधी कधी हे अति होतय वगेरे वगेरे म्हणून त्या चिडचिड करतात वर jidnyasa या आयडिने केलिये तशी. पण तेवढ़ चालत आम्हाला.
आजचे काय, प्राप्त परिस्थिति काय आहे त्यावरून आज काय करावे ते ठरवणे आम्हाला गरजेचे वाटते.
वरती कोणीतरी "हजारो
वरती कोणीतरी "हजारो स्त्रियांतल्या एकीचा काही अनुभव आला तर तो इथे व्यवस्थित लिहिला जातोय अन बाकी स्त्रिया त्याला एक्सप्लेनेशन वगैरे देत आहेत"
असे बोलल्याचे दिसले, तर प्रश्न हा आहे की प्रश्नकर्त्या/कर्ती ने माझी पोस्ट नीट वाचली आहे का? हजारो स्त्रियांत एकिचा अनुभव वाईट आला म्हणून मी तो लिहिता झालो हे दिसते आहे तर हजारो लिंगपिसाट पुरुषांच्या जागी माझ्या सारख्या एका "मामी ने संगीतलेली जबाबदारी" घेऊ इछिणाऱ्या पुरुषाला ही ती पॉजिटिव एक्सक्लूसिविटी का नसावी? हे फेमिनाझीपण झाले असे वाटते, कारण मला generalization करायचे नाही हा बोल्ड केलेला डिस्क्लेमर कोणीच वाचलेला दिसत नाही, केदार म्हणाले त्या प्रमाणे जे पुरुष काही करत नाहीत त्यांनी लिंगपिसाट लोकांच्यावती ने माफ़ी का मागावी हा सवाल विचारला आहे , आता मी तर स्वतः जबाबदारी घेतोय मग मी काय म्हणावे?
Besides
I am responsible for me not for remaining ५० cr Indian males for that matter , i was imparted an upbringing where women are worshiped and respected, I lived to that still had a bitter experience still m saying that I won't generalize still if some one says why hasn't this guy apologized ? For me thats plain ridiculous!!
>>> For me thats plain
>>> For me thats plain ridiculous!!<<< सहमत आहे सोन्याबापू. मला वाटते तुमच्या पोस्टवर ती पोस्ट नसेलही, ती एक वेगळीच पोस्ट असेल.
अवांतर - सरसकटपणे पुरुषांना एका माळेचे मणी ठरवले जाणे ह्याबाबत एक वेगळा धागा असलेला बरा, येथील धाग्याचा उद्देश तसा नसावा.
बेफीक़ीरजींचे अवांतर +११११
बेफीक़ीरजींचे अवांतर +११११
>>>>> वैद्यबुवा: भावनाउद्रेक
>>>>> वैद्यबुवा: भावनाउद्रेक समजू शकतो पण इतर पुरुषांनी फक्त पुरुष आहेत म्हणून बाकी अत्याचारी पुरुषांच्या वतीनं माफी मागायचा किंवा जबाबदारी घ्यायचा काय संबंध? धाग्याच्या मुख्य विषयाशी त्याचा काय संबंध? <<<
>>>>> केदारः त्यापुढे जाऊन मी लिहीन की आमच्यासारख्या पुरूषांना देखील तसे पुरूष अपराधी वाटतात, तर त्या पिंजर्यात आम्ही स्वतःला का बसवावे? <<<
वरील मजकुराशी सहमत.
>>>>> जिज्ञासा: जबाबदारी घेणे ही फार दूरची गोष्ट आहे! पण आज दररोज सर्वत्र स्त्रियांवर इतके अत्याचार होत असण्याबाबत as a male I feel sorry and guilty असं ह्या धाग्यावर कबूल करण्याची हिम्मत कालपासून किती जणांनी दाखवली? <<<
तुमच्या प्रश्नास वर उत्तर दिले गेलेले आहे. पण तुमच्या प्रश्नास कसलेच उत्तर दिले गेले नाही, तर मायबोलीवरील पुरुष।ई हीन दर्जाचेच आहेत असा अर्थ ध्वनित होतोय, जो या धाग्याच्या विषयानुरुपच वाटतोय, अन म्हणूनच माझ्या आधीच्या पोस्ट तशा होत्या.
पुरुषांचे गैरवर्तनाबाबत पुरुषांनी गिल्टी वाटुन घेणे वा न घेणे, याचे उलट स्त्रीयांचे गैरवर्तनाबाबत बाकी समस्त स्त्रीयांनी गिल्टी वाटून घेणे न घेणे असा चूकीच्या गृहितकांवर आधारीत रणप्रसंग आणण्या ऐवजी, स्त्रीपुरुष मानवांच्या गैरप्रकाराबाबत बाकी मानवांनी "गिल्ट वाटून" घेण्या ऐवजी, त्याचा प्रतिकार करण्याची काय भुमिका घेणार असा असता तर एरवी स्त्रीपुरुष समानतेचा घोष लावणार्यांना ते अधिक शोभुन दिसले असते, अधिक संयुक्तिक ठरले असते असे कुणालाच वाटत नाही का?
माझे माझ्यापुरते "पुरुष" म्हणून धोरण सु:स्पष्ट आहे
माझ्या घरातील/परिचितातील स्त्रीवर्गाला रस्त्यावरील कोणी गुंड/मवाली त्रास देत असेल तर हरप्रकारे त्याचा "बिमोडच" करायचा, त्यास ठेचूनच काढायचे. पुरुष म्हणून मी इतकेच करू शकतो.
पण धाग्यात व एकुण प्रतिक्रियात एक सूप्त अपेक्षा दडलेली आहे की "पुरुष म्हनूण " तुम्ही कसे वागता/वागाल, याची कबुली इतर गुन्हेगार पुरुषांबद्दल गिल्ट व्यक्त करुन द्या, तर तसे मी करणार नाही. त्याचबरोबर अध्यार्हुतपणे येऊ घाललेली "मी कसा सज्जन" याचे विश्लेषण करण्याच्या जबाबदारिची गरजही मला वाटत नाही. कारण मुळात इतर पुरुषांच्या नालायक/विकृत वागणूकीला पायबंद घालायला "कायद्याने व सामाजिक बंधनाने" मी जबाबदारच ठरत नाही. मी माझ्यापुरता, व माझी अपत्ये १८ वर्षाची होईस्तोवर त्यावर काय संस्कार केलेत त्याकरता जबाबदार आहे. १८ वर्षावरील माझ्या मुलाच्या वागणूकीसही मी कायद्याने जबाबदार असू शकत नाही.
माझा माझ्या चारित्र्या वर /नैतिकतेवर विश्वास आहे, व त्याबद्दल माझ्या कुटुंबियांचा विश्वास संपादन करण्यापुरती माझी प्रमुख जबाबदारी आहे ती मी इमानेइतबारे निभावतोय. पण इथे अन्य जगातील पुरुष कसे काय वागतात त्याबद्दल गिल्ट व्यक्त करण्या च्या अपेक्षेचा नेमका संबंधच माझ्या लक्षात आला नाहीये.
धागाकर्ती म्हणते की लिंबु नै लिहीलेत तरी चालेल.
बाबुला माझी पोस्ट कड्डक म्हणजे अचूक मुद्देसुद वाटते.
खडीसाखर म्हणतात की अजुन लिहा, फक्त थोडे लॉजिक लावा.
वैद्यबुवांनी माझ्या शंकेला समर्पक उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. पण मी जो मुद्दा मांडू पहात होतो, तो अतिशय थोडक्या शब्दात अचूकपणे वर वैद्यबुवांनीच व केदारने नंतर दिला आहे.
धागाकर्तीची व अन्य अनेक सदस्य आयडींची अपेक्षा की लिंबुने इथे लिहू नये.
तेव्हा इथे हे.मा.शे.पो. (अन्य धाग्यांवर मात्र या विषयाचा संदर्भ घेऊन मी नक्किच लिहू शकेन)
एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक
एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी?
मी ही जबाबदारी माझ्या नाईट रायडर ह्या लेखात मांडली होती आणि एक स्पोर्ट्समन म्हणून पारही पाडली होती.
----------------------------------------------------------------------------------------------------
पोस्ट प्रोसेसिंग
कल्याणी ऐवजी तिथे एखादा मुलगा असला असता तर मी इतकी हळू चालवली असती का? उत्तर नाही असे आहे. का? तर ती मुलगी आहे, तिच्या सोबत जायला आवडले असते म्हणून नाही, तर ती मुलगी आहे, एकटी होती आणि संपूर्ण रात्र चालवायची होती आणि मुख्य आपला भारतीय समाज व स्त्रीयांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण हेच मुख्य कारण होते. त्यात ती एकटी आणि रात्र. जस्ट इमॅजिन. तिला आधीच काही लोकांनी प्रश्न विचारून सतावल्याचे तिने सांगीतले होते.
काय शिकलो?
५. समजा गेलोच आणि परत एखाद्या मुलीला कंपनी देण्याची वेळ आली (रात्री) तर नाही म्हणायचे नाही, स्लो असली तरी कंपनी द्यायची कारण गरज फक्त तिलाच नाही, तर चांगले पुरूष अजूनी भारतात आहेत हा विश्वास येणे महत्वाचे आहे. (अर्थात तो मक्ता माझाच आहे का हा वादाचा विषय, पण जेवढे मला शक्य तेवढे मी करीन)
--------------------------------------------------------------------------------------------------
आणखीनही खूप काही केलं आहे / करता येईल पण एखाद्या पर पुरूषाबद्दल एखाद्या पर स्त्री / मुलीला केवळ विश्वास वाटावा एवढेच केले तरी बस असे मला वाटते.
जिज्ञासा, लिम्बुजी... कृपया
जिज्ञासा, लिम्बुजी... कृपया रागावु नका.
काय आहे...सगळ्यान्ची मते १९-२० आहेत (थोडी फ़ार इकडे तिकडे) पण तुमचा उद्देश तर एकच आहे ना?
अशी अत्याचारची नुसती बातमी वाचुन तुम्ही पुरुष असलात तरिही तुमचा जीव हळहळतो ना? मग झाले तर. ती संवेदना जिवंत आहे.
त्याचाच उपयोग करुन समाजात ही संवेदना कशी जागवीता येईल? हा मुख्य प्रश्न आहे. यासठी पुरुष -मुलगे च जर अधारस्तंभ बनतील तर आम्हा स्त्रियांना जो काही किळसवाणा अनुभव येतो तो कमी होईल. एखादा मुलगा अश्या नरधमांना विरोध करण्याची हिम्मत दाखवेल.
स्त्रियांनी काय करावे काय करु नये हे खुपदा झालेय, पण पुरुषानी काय करावे-करु नये या साठी हा धागा आहे. (मामी- चु.भु.दे.घे)
तर कृपया भांडु नका, मते मांडा, पटले नाही ते चुकीचेच असे नसते...'मला पटले नाही कारण दृष्टिकोन वेगळा असतो. तोही समजुन घ्या. कसय.. हा मुद्दाच असा आहे की इथे स्त्रि व पुरुष यांच्या शिवाय काहीही होणार नाहिये.
हि तरी चर्चा आपण निखळ पणे करुया.
इथे कायदा तज्ञ पण आहेत..कोण जाणे यातुन काही योग्या मुद्धे उचलले जावुन त्याच विधायक काही होईल.
माधुरी दिक्षित्,सोनाली
माधुरी दिक्षित्,सोनाली बेद्रे,अश्विनी भावे,उर्मिला मातोंडकर्,ममता कुलकर्णी या हिंदी सिनेमातिल नट्यांमुळे मध्यमवर्गिय मराठी मुली फॅशन करायला शिकल्या.
या नट्यांचे काही सिनेमातिल सिन अश्लिलतेची परिसीमा गाठणार्या आहेत.
Nira सुयोग्य समतोल पोस्ट.
Nira सुयोग्य समतोल पोस्ट. सहमत.
फॅशन्+प्रोव्होकेटिव्ह कपडे इन
फॅशन्+प्रोव्होकेटिव्ह कपडे इन सिनेमा=== बलात्कार वाढणे?
ठिक आहे बॉलीवूड मध्ये या सगळ्यावर बंदी घातली, आणि दाक्षिणात्त्य सिनेमा आणी हॉलीवूड ने भावना चाळवल्या तर?
('उत्प्रेरक' म्हणून पटते पण 'रुट कॉज' म्हणून पटत नाही.)
या (फॅशन , कपडे) विषयावर
या (फॅशन , कपडे) विषयावर चर्चा झालेली आहे, आणि धागाकर्तीला त्या दिशेने धागा न्यायचा नाही आहे आणि मला ते येथे योग्य वाटते.
माझ्यापुरते - मी स्वत: समोरच्या व्यक्तीचा (स्त्री किव्वा पुरुष - आजकाल दोन्ही चा उल्लेख करायला हवा) सन्मान करतो. कुणाही पर-स्त्रीला माझ्या कडुन त्रास होणार नाही याची काळजी घेतो.
पुढच्या पिढीला शिक्षण देण्याचा माझ्यापरिने प्रयत्न करतो. माझ्या आसपास, माझ्या सतर्कतेमुळे, अशा घटना होणार नाही इतपत काळजी घेतो.
ऋन्मेऽऽष पोस्ट पटली.
ऋन्मेऽऽष पोस्ट पटली. स्वतःकडून अन्याय-अत्याचार होणार नाही ह्याची काळजी घेणे हे मुख्य. त्यापुढे जाऊन मगच इतरांवरील अन्यायाला वाचा फोडणे, त्याचा विरोध करणे ह्या गोष्टी येतात.
मी वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की: मला सर्व समस्यांची माहिती आहे अशा भ्रमात न राहता, ज्या गोष्टी पुरुषाला समस्या वाटत नाहीत त्या स्त्रियांकरिता खूप मोठ्या समस्या असू शकतात हे मुळातच पटायला हवे. त्या समस्या कोणत्या हे समजत नसेल तर आपल्या वर्तनातून अन्याय होतोय की नाही हे तरी कसे कळणार?? त्या समस्या पुरुषांनी समजून घेणे हे फार महत्वाचे आहे. स्त्रियांनी कसे वागावे हे प्रत्येक वेळा सांगितले जातेच!!! पण कमीत कमी पुरुषांनी "त्यात काय मोठेसे??" म्हणून स्त्रियांच्या लहानमोठ्या समस्यांकडे दुर्लक्ष करता कामा नये एवढी अपेक्षा स्त्रियांनी ठेवली तर त्यात काहीच गैर नाही.
कोणत्याही समस्यांचे (स्त्रीच्या अथवा पुरुषांच्या) निराकरण चर्चेने आणि एकमेकांना समजून घेतल्यानेच शक्य आहे. Generalization आणि assumptions हे दोन्ही बाजूनी टाळता आले तर उत्तम.
कोणीतरी आत्तापर्यंतची चर्चा
कोणीतरी आत्तापर्यंतची चर्चा कन्क्ल्यूड करू शकेल का?
बेफी तुम्हीच करा ना. तुम्ही
बेफी तुम्हीच करा ना. तुम्ही ते चांगल्या प्रकारे करू शकाल.
ज्या गोष्टी पुरुषाला समस्या
ज्या गोष्टी पुरुषाला समस्या वाटत नाहीत त्या स्त्रियांकरिता खूप मोठ्या समस्या असू शकतात हे मुळातच पटायला हवे.
>>>
हो, हे मला अनुभवाने समजले आहेच, पण मगाशीच थोडीशी ज्ञानात भर माझ्या आणखी एका मेल कलीगच्याही पडली.
चर्चा याच विषयावर जी आम्ही दोघे पुरुष व दोन सहकर्मचारी स्त्रियांमध्ये चालली होती.
त्यातील एक मुलगी सांगत होती की कसे तरुण मुलांपेक्षाही मध्यमवयीन वा वय उलटलेले घातक असतात. बसमध्ये २०-२५ ची कॉलेजची तरुण मुले शिस्तीत बसतील, पण ४०-४५ चे स्पर्शाला हपापलेले असतात. शेजारी बसलेले असताना झोप आल्याचे नाटक करत अंगावर घसरतात, हळूच बोटाची टोके खांद्याला रुतवायला बघतात. माझ्याबरोबरच्याला हे पचनी पडायला जड जात होते, तर मला आधीही काही मैत्रीणींकडून असे किस्से ऐकल्याने कल्पना होती.
दिवसभरात एकही अनवॉन्टेड धक्का न खाता सुखरूप प्रवास करणे हि कित्येक जणींसाठी एक रोजचीच समस्या असते.
यातून मी एक पुरुष म्हणून एखाद्या सहकर्मचारी मैत्रीणीची ढाल बनू शकतो, जसे गर्दीच्या सार्वजनिक जागी माझ्या गर्लफ्रेंडबाबत जागरूक असतो अगदी तसेच. पण मला ढाल म्हणून कोणी वापरावे म्हणून आधी मला त्या मैत्रीणीचा विश्वास संपादन करायला हवा, जे कुंपणच तर शेत नाही ना खाणार ही भिती तिच्या मनातून नाहीशी होईल.
माझ्या मागच्या पोस्टमध्येही मी तेच लिहिले होते, जर स्वताची प्रतिमा उंचावलीत तरच कोणी तुमच्याकडे मदतीची अपेक्षा धरेन आणि तरच तुम्हाला ती मदत करता येईन.
आणखी एक गोष्ट सोशलसाईट तसेच
आणखी एक गोष्ट सोशलसाईट तसेच वैयक्तिक अनुभवांवरूनही समजलोय, जो पुरुषांसाठी सल्ला म्हणून सांगू इच्छितो,
जेव्हा एखादी स्त्री या विषयावर बोलत असते तेव्हा चुकूनही तिला आर्ग्यू करू नका.
मग ते हल्लीच्या मुलींच्या पोशाखाबद्दल टिप्पणी असो, वा काही स्त्रियाही कश्या लबाड असतात आणि पुरुषांना अडकवतात अशी अपवादात्मक उदाहरणे असोत.
भले तुमच्या मनात तिला खोटे ठरवायचे नसले तरीही त्या क्षणाला, जेव्हा ती आपले मन मोकळे करत असते त्या मनस्थितीत, तो एक घावच असतो.
त्यातील एक मुलगी सांगत होती
त्यातील एक मुलगी सांगत होती की कसे तरुण मुलांपेक्षाही मध्यमवयीन वा वय उलटलेले घातक असतात. बसमध्ये २०-२५ ची कॉलेजची तरुण मुले शिस्तीत बसतील, पण ४०-४५ चे स्पर्शाला हपापलेले असतात. >>>>>> हे अगदी ऑल्मोस्ट ह्याच शब्दात मी सुद्धा एकलय अणि मलाही खरं नाही वाटलं आधी एकलं तेव्हा. मलाही वाटायचं की कॉलेजची मुलं जास्त त्रास देत असतील.
Pages