अकोल्यातील खादाडी

Submitted by हर्ट on 27 May, 2009 - 09:41

अकोल्यातील खादाडीबद्दल मी इथे लवकरचं लिहिणार आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोन्याबापू , मी कोकणातले पदार्थ सांगू शकते. Happy
खादाडी खान्देशाची (जळगावची) दिसली नाही माबो वर म्हणून विचारलं. कामानिमित्त जाणं होणारे आता तिथे.

मस्त चाललाय धागा.
सोन्याबापु, टीना, योकु मज्जा आणलीत यार.

बाकी, गुरुवर्य मंजुडी.... ठाण्यात त्यातल्या त्यात ओरिजिनल चविचि शेगाव कचोरि कुठे मिळेल.?

इन्ना धुळ्याला जाताना आग्रा रोडवर मालेगावचा आसपास हायवेला लागून एक धाबा आहे, तिथे अप्रतिम चविच खानदेशी प्रकार मिळतात. मी बाबांना विचारून हवतर नक्की पत्ता इथे लिहिते. धुळ्याहून घरी नासिकला येताना तिथे हमखास जेवण घेतलाच जात.

@चिनूक्स
यादवरावांबद्दल +१. मस्त आचारी होते ते. ते गजानन महाराजांचा प्रकट दीन साजरा करायचे स्टेशन जवळ त्यांच्या रहत्या घरी. झुणका भाकरी चा नैवेद्य.. खूप मस्त चव होती त्यांच्या स्वयंपाकाला..

इथे वैदर्भिय पदार्थांचं वर्णन चाललय म्हणून लिहितेय. प्रचंड तेल, तिखट, मीठ, गरम मसाला घातलेले पदार्थ पाहूनच मला धडकी भरते. भाजीवरच्या तेलाचा तवंग दिसला पाहिजे असा अट्टाहास असतो. माझे सासर वैदर्भिय. तिथे गेले की मी सरळ माझ्यासाठी वेगळी भाजी बनवते. पण ते पदार्थ मी खाऊ शकत नाही. इथे माझ्या घरी मी इतके तेल, तिखट, मीठ घालायला बंदि घातलीय. माझ्या सासरी हाय कॉलेस्ट्रोल, डायबेटीस आणि कमी वयात ह्रुदय विकाराचा झटका येण्याची परंपरा आहे. निदान नवर्याला या परंपरेतून वाचवावं हे प्रयत्न सुरु आहेत.

ठाण्यात त्यातल्या त्यात ओरिजिनल चविचि शेगाव कचोरि कुठे मिळेल.?>>> मला तरी आलोकच्या मागे जो बस स्टॉप आहे तिथली त्यातल्या त्यात जास्त चांगली वाटते. एक गजानन वडापाव च्या रांगेत पण आहे. पण स्टेशनजवळच्या त्या कचोरीत मसाला जरा प्रेमाने भरलेला असतो.

मी अमि,

खरे आहे तुमचे ही ! अर्थात खाणेपिणे ह्याबाबतीत विदर्भाची थिंकिंग थोड़ी लखनवी थोड़ी इंदौरी अशी आहे "मरायचेच आहे तर खाऊन मरा" ही वृत्ती आहे ती! शिवाय ह्या वृत्तीचे उत्तम विश्लेषण वाघमारे साहेबांनी उत्तम केले आहे मागच्या एका प्रतिसादात! , माझ्यापूर्ते बोलायचे झाल्यास मी अंगमेहनत भरपूर करतो त्याकारणाने मला पार तेल तर्री ते नागा चिली अन सिक्किम ची डले खुरसानी सुद्धा पचुन जाते

आग्रा रोडवर मालेगावचा आसपास हायवेला लागून एक धाबा आहे>>
एकुणच त्या आग्रा रोडचे ढाबे बघीतले की धाबे दणाणते. ४-५०० खुर्च्या, ३०-४० खाटा. अप्रतिम पण स्वस्त जेवण. आहाहा.

सध्या राजारम पुलाजवळच्या डीपीरोडला (पुणे) (रॉहु म. गांधी रोड व आनंदनगरसारखे डीपीरोडपण गल्लोगल्ली झालेत आता. Proud ) एक शेगाव कचोरीची गाडी असते. तिथे कुणी खाल्लीय का कचोरी? कशी असते?

बाकी ढाबे प्रकार मी फक्त विदर्भातच पाहिलेय..
खाटी वगैरे टाकुन मस्त.
>> काहीही हं. पार सोलापूर पासून पुढे हैद्राबाद परेन्त हायवेला ढाबे आहेत. पुण्याचया आउट स्कर्ट स वर पण आहेत. तुम्ही इंडिया किती फिरला आहात? धाबा कल्चर इज एव्हरीव्हेअर. वैष्णव धाब्यावर कमी तिखट पण चविष्ट पण मिळते.

खरच कि काय..
मी तर पार पुणे मुंबई , पुणे विदर्भ असा केलेला आहे प्रवास कित्येकवेळा पण मला कसे नै दिसले..
आणि अमा, मी मुळात भारताची गोष्ट केलीच नाही..मी इथल बोलत होती..please do not misinterprit my post.. त्यान उगा अस म्हणायच होत तस नै अस सुरु होत गं म्हणुन Happy

<<धाबा कल्चर इज एव्हरीव्हेअर.>>

---- सहमत.... सगळी कडे आहेत. बहुतेक खाटा, किव्वा आता प्लॅस्टिकच्या खुर्च्या...

बाकी ढाबे प्रकार मी फक्त विदर्भातच पाहिलेय..>>> आं? गुजरात राजस्थान पंजाब वगैरे तिकडे ढाबे आहेतच की. तमिळनाडूत ढीगानं ढाबे आहेत.

महाराष्ट्रात पुणे- सोलापूर रोडला आहेत ढाबे. पुणे- नाशिक रोडला आहेत. (पुणे नाशिक रोडवरचा एक ढाबा आमचा फार आवडता आहे)

मुळात ढाबा हे शहरी प्रकरण नाही, ते हायवे स्पेसिफिक प्रकरण आहे. विदर्भाच्या आजूबाजूनं दळणवळणाचे बरेच महत्त्वाचे रस्ते जात असल्यानं त्या भागात ढाबे आणि रोड कल्चर असणारच.

कुणाला एखाद्या धाब्याचा फटू डकवता आला तर बघा न..
मला सर्वात आवडायच ते चिकन रस्सा..दाल तडका आणि सोबतीला मागवलेला एक्स्ट्रा तडका..
कसले देतात ते मस्त..बाहेरगावी गेलो कुठ कि हमखास रात्री येताना धाब्यावर जेवण व्हायचं Happy तिथ कधी पिय्यक्कड पन नै दिसायचे बसलेले..म्हणुन फॅमिली आरामात बसायची..ते सगळे पंजाबी लोक ओनर पासुन शेफ पर्यंत..
क्या लावु दिदी..क्या खाओगे जनाब वगैरे अदबीन बोलणारे..
मेनु कार्ड अस्तित्वातच नव्हते..सगळ काही तोंडपाठ..
तेव्हा जिभेचे अग्गाऊ चोचले पन नव्हते म्हणा..मज्जा यायची..
घरी गेल्यावर जाईल आता परत एकदा..

तेव्हा जिभेचे अग्गाऊ चोचले पन नव्हते म्हणा..मज्जा यायची.. >>> कुठतरी जन्मसाल ८९ वाचले. ते १९८९ आहे की १८८९? म्हणजे तेंव्हा हा शब्द अन जिभेचे चोचले वगैरे म्हणून.

अगं बाई तुझ्या एका भेंडीला लागणार्‍या अर्धा किलो तेलाला जिभेचे आगाऊ चोचलेल्च म्हणतात. Lol

खरे आहे!! ढाबा कल्चर सगळीकडे आहेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पेशलिटी असतात अन प्रवाश्यांच्या आवडी ही , आमच्याकडे फेमस म्हणजे वर्हाड़ी नॉनवेज सोबत वांगी (काटेरी गावठी) शिवाय तुरीच्या डाळीचे तड़का अन फ्राय अजुन शेवभाजी गट्टे वगैरे राजस्थानी आइटम अकोल्यातुन नॅशनल हाईवे सिक्स (हाजिरा ते कलकत्ता) जातो इकडे बनारसी, राजस्थानी अन लोकल लोकं आहेत भरपूर माझ्या पाहिल्या प्रतिसादात मी मेंशन केलेले बशीर भाई हा सर्वोत्तम ढाबा आहे आमच्याकडे

अवांतर

पुण्याला देहु रोड ला गुरुद्वारा शेजारी एक ढाबा आहे (बहुतेक बॉबी नाव आहे का भजनसिंह हे कंफ्यूज होते आहे) त्याच्याकडचा राजमा अन अजवाइन रोटी म्हणजे खल्लास अप्रतिम प्रकार

भजनसिंग हे नाव आहे त्याच. मला आवडतो तो. खूप लोकांना (पक्षी घरचे) आवडत नाही.

अजून थोडे समोर गेले की थंडा मामला. तो व्हेजी आहे बेष्ट आहे. त्या पुढे अजून थके पर्यंत गाडी चालवली की टोनी वगैरे.

ढाबे प्रकार मी फक्त विदर्भातच पाहिले
>>

मराठी मुलुखाचा त्यातल्या त्यात पुण्याच्या आसपासचा स्कोप ठेवून लिहिलंय का? तस असेल तर सहमत! पुण्याच्या आजूबाजूस खाटा टाकून निवांत जेवता येतील असे ढाबे नाहीतच! आणि जे आहेत, त्याचं बिल बघता त्यांना ढाब्याऐवजी २ ३ स्टार हॉटेल म्हणावे Lol

महाराष्ट्रात NH6वर चिक्कार पंजाबी, काठीयावाडी अन मराठी ढाबे आहेत!

विदर्भात गावकुसाबाहेर कितीतरी ढाबे सापडतात. बस या आणि गावाबाहेर जा. शरद ऋतु मधे तर ढाब्यावर जाऊन जेवायची मस्त मजा असते. गरम गरम चुलीवरचे अन्न आणि शीतल समीरन लहरी.

कुठतरी जन्मसाल ८९ वाचले. ते १९८९ आहे की १८८९? म्हणजे तेंव्हा हा शब्द अन जिभेचे चोचले वगैरे म्हणून.
अगं बाई तुझ्या एका भेंडीला लागणार्‍या अर्धा किलो तेलाला जिभेचे आगाऊ चोचलेल्च म्हणतात. >>

काढाल तसा अर्थ निघतो.. ज्याला जसे घ्यायचे आहे तसे त्यान घ्यावे..
एक भेंडी अर्धा किलो तेल..हे तर माझ्या पण ध्यानात नै आल कधी..बर आहे..

प्रत्येक वाक्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण जिवावर येत..नै अस नै तस म्हणायच होत वगैरे त्यामुळे जाऊ दे या विषयावर हे मा शे पो Happy

नविन कै पदार्थ आला कि सांगा..
अकोल्याला जाणे फक्त शेगावला होती तेव्हा व्हायचे आतापन शेगाव जायचे असल्यासच होते..फुरसतीन्न गेल्यावर इथ चर्चिलेल्या पत्त्यावर भेटी द्याव्या लागेल..

प्रत्येक वाक्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण जिवावर येत. >> अहो त्या भेंडीवाल्या पोस्टला आमच्या पुणेरी भाषेत खेचणे म्हणतात.. ते विनोदाचा अंगाने म्हणलेले आहे आणि तसेच घ्यायचे असते. आणि उत्तरही तसेच द्यायचे असते. त्यावर हेमाशेपो उपाय नाही.

पुण्यात जास्त राहाल की शिकाल आपोआप.

विदर्भात कुणी कुणाची खेचत नाहीत का? Uhoh

केदार थंडा मामला च्या सब्जी लसूनी चे आम्ही फार मोठे पंखे होतो म्हणे, पुण्यात आल्यावर पाहिले एक वर्ष तळेगाव मेडिकल कॉलेज च्या होस्टेल ला पैरासाइट होतो तस्मात् ही सगळी ठिकाणे आम्हाला घर आंगन होती (२ दिवसाआड़ एक दिवस एखाद डॉक्टर सोबत बियर अन जेवण होतच असे)

अवांतर समाप्त

अकोल्याच्या आजुबाजुला असलेल्या काही उत्कृष्ट ढाब्याची जंत्री
१ कलकत्ता - बाळापुर रोड
२ बशीर भाई- पातुर रोड
३ राजहंस- बाभुळगाव
४ बनारसी- बाभुळगाव
५ योगी - गायगाव जवळ
६ जैसवाल - अकोट रोड (बार सुविधा उपलब्ध)
७ शिवनेरी - कौलखेड
८ अजिंक्य - बार्शीटाकळी
९ तंदूरनाइट्स - मुर्तिजापुर जवळ
१० मॅडम गार्डन - बाभुळगाव
(जैसवाल वगळता प्रत्येक ढाब्यावर फॅमिली नेऊ शकता)

जरा सोफेस्टिकटेड वातावरणात फॅमिली सोबत पंजाबी खायचे असल्यास काही फाइनडाइन ऑप्शन
१ आनंद थाळी, रेलवे स्टेशन
२ हॉटेल जसनागरा, रेलवे स्टेशन रोड रामदास पेठ
३ हॉटेल वेलकम इन, रेलवे स्टेशन रोड रामदास पेठ
४ संस्कृती वेज , लक्ष्मीबाई राधकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालया मागे
५ मौज, रतनलाल प्लॉट्स अकोला
६ राठी रेस्टोरेंट , कॉन्वेंट रोड
७ हॉटेल तुषार, रामलता बिज़नस पार्क शेजारी नॅशनल हाईवे सिक्स
८ हॉटेल वैभव , इनकम टॅक्स चौक

Pages