एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी?

Submitted by मामी on 11 August, 2015 - 09:24

रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्‍याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.

पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?

या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अ‍ॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...

HeForShe : KEY MESSAGES

* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world

* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality

* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.

ABOUT THE CAMPAIGN

HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.

अधिक माहिती :

https://en.wikipedia.org/wiki/HeForShe

http://www.heforshe.org/

***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी

पुरूषांची सामाजिक जबाबदारी -

१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.

२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.

३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.

४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.

५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.

६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.

७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.

८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.

९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.

***********************************************************************************************************

अंजली

बर्‍याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.

१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?

एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबू.. जर चर्चेत पॉझिटीव्ह सहभाग देता येत नसेल किंवा द्यायचा नसेल तर देऊ नकोस.. पण उगाच फाटे नको फोडू.. धागाकर्तीनं स्पष्ट लिहिलं आहे काय अपेक्षा आहे प्रतिसादातून.. कळत नसेल तर सगळीकडं स्वतः सर्वज्ञ असलेलं सांगणं गरजेचं नाही..

लिंबूभाऊ,

मीही तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो.

१. पॉर्नसंदर्भात पुरुषांनी संयमीपणे वागून आपले स्त्रीकडे पाहणे, स्त्रीबरोबरचे वर्तन गढूळ होणार नाही हे बघणे, हे शक्य आहे का?

२. कंपनीत, सार्वजनिक ठिकाणी स्त्रीसंदर्भातील दृष्टिकोन बदलावा ह्यासाठी इतर पुरुषांना संघटित करणे शक्य आहे का?

३. मी वर दिली तशी एखादी प्रतिज्ञा रोज आपापल्या ग्रूपमध्ये उच्चारणे शक्य आहे का?

४. घरातील स्त्रियांना (बायको, बहिण, मुलगी किंवा इतर) मारणे, स्त्री आहेस म्हणून स्वातंत्र्य नाकारणे, बंधनात ठेवणे, फक्त मुलींवरच संस्कार करणे (मुलांना मोकळीक देणे) हे सगळे टाळणे पुरुषाला शक्य आहे का?

जर हे सगळे शक्य असेल तर ह्या लेखाची ती काही उत्तरे आहेत. ही उत्तरे देताना तुम्ही मिसळवलेत तसे विषय एकमेकांत मिसळावे लागत नाही आहेत. (असे मला वाटते).

मनीष, बेफी धन्यवाद.

विचित्र कल्पना बाळगणाऱ्या पुरुषांना पुरुषांनीच कसं कंट्रोल करावम हे उदाहरणानं दाखवून दिल्याबद्दल.

पुरुषांची मानसीकता कधीच बदलणार नाही,बहुतांश पुरुष हे लैगिकतेच्या बाबतीत नेहमीच ' स्टॅण्ड बाय 'मोडमध्ये असतात.यातले काहीजण सार्वजनिक ठिकाणी स्त्रीयांशी नेहमीच लगट करतात,काही क्रिमिनल टेंडंन्सीचे लोक बलात्कारापर्यंत मजल मारतात.त्यामुळे पुरुषांकडून अपेक्ष व्यक्त करणे म्हणजे कसायाकडुन 'तो कधीतरी शाकाहारी होईल व भूतदयेवर भाषण ठोकेल ,अशी अपेक्षा करण्यासारखे आहे.
यावर स्त्रीयांनीच स्वत:मध्ये बदल केले पाहीजेत,मी काही सुचवतो
१.स्त्रीयांनी आपला पेहराव व्यवस्थीत अंग झाकेल असा ठेवावा,साडी किंवा सलवार कमीज वापरावे.
२.रात्री सातनंतर शक्यतो घराबाहेर पडू नये,फार निकड असल्यास पुरुष सहकारी बरोबर असावा.
३.निर्जन स्थळं,झोपडपट्टी एरीया ईत्यादी टाळावेत.
४.आपल्या जवळच्या नातातल्या पुरुषांशीच फक्त इंटरॲक्ट व्हावे,इतर पुरुषांशी कामापेक्षा जास्त संबंध ठेऊ नये.
५.पुरुष स्त्रीयांचे चांगले मित्र होऊ शकतात या मोठ्या गैरसमजातून बाहेर यावे.
६.फक्त मुलींसाठी असलेल्या शाळेत आपल्या मुलींना घालावे,तेथील स्टाफ प्रामुख्याने स्त्री असावा हे बघावे.
७.पाश्च्यात्यांच्या खुळचट स्त्रीवादाकडे फारसे लक्ष देऊ नये,दे आर डीफरंट स्पेसीज दॅन अस.
८.स्त्री पुरुष समानता प्रत्यक्षात येणे शक्या नाहि हे आता विज्ञानाने सिद्ध केले आहे ,त्यामुळे ती संकल्पना डोक्यातून काढून टाकावी.

>>> लिंबू.. जर चर्चेत पॉझिटीव्ह सहभाग देता येत नसेल किंवा द्यायचा नसेल तर देऊ नकोस.. पण उगाच फाटे नको फोडू.. <<<<<<
माफ करा पण पॉझिटीव सहभाग घेत नाही असे कशावरुन ठरतय? कोण ठरवतय? तीच बाब फाटे फोडण्याबद्दल.
>>>>> धागाकर्तीनं स्पष्ट लिहिलं आहे काय अपेक्षा आहे प्रतिसादातून.. कळत नसेल तर सगळीकडं स्वतः सर्वज्ञ असलेलं सांगणं गरजेचं नाही.. <<<<<<
वैयक्तिक गुणावगुणाच्या कॉमेण्ट ला दुर्लक्शतोय. मी देखिल स्पष्टपणेच विचारतोय.

>>>>> १. पॉर्नसंदर्भात पुरुषांनी संयमीपणे वागून आपले स्त्रीकडे पाहणे, स्त्रीबरोबरचे वर्तन गढूळ होणार नाही हे बघणे, हे शक्य आहे का? <<<<<<
पॉर्न बघुन भावना व शरीर पुरेसे चाळविल्यावर तरीही संयमी वागणे कसे शक्य होते ते कुणी सांगेल काय? तसे शक्य होते याचा कुनाचा स्वानुभव आहे काय? याबाबत मानसोपचार तज्ञांचे काय मत आहे?

>>>>>> २. कंपनीत, सार्वजनिक ठिकाणी स्त्रीसंदर्भातील दृष्टिकोन बदलावा ह्यासाठी इतर पुरुषांना संघटित करणे शक्य आहे का? <<<<<< कंपनी व सार्वजनिक ठिकाणांकरता स्त्रीबरोबर वागण्याबोलण्याबाबत अतिशय कडक कायदे आहेत. तिथे बाकि पुरुषांना "पोलिस" बनविण्यामागचा हेतू लक्षात येत नाही.

>>>>> ३. मी वर दिली तशी एखादी प्रतिज्ञा रोज आपापल्या ग्रूपमध्ये उच्चारणे शक्य आहे का? <<<<<<<
आधी आपण "भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे "बांधव" आहेत....." हे रोज म्हणून अंमलात आणले तर?

>>>>> ४. घरातील स्त्रियांना (बायको, बहिण, मुलगी किंवा इतर) मारणे, स्त्री आहेस म्हणून स्वातंत्र्य नाकारणे, बंधनात ठेवणे, फक्त मुलींवरच संस्कार करणे (मुलांना मोकळीक देणे) हे सगळे टाळणे पुरुषाला शक्य आहे का? <<<<< हा फारच मोघम प्रश्न झाला...... "सातच्या आत घरात (येणे भाग)" अशी सामाजिक परिस्थिती असेल, तर मुलिला एकटीला सात नंतर बाहेर पाठविणे शक्यच होणार नाही, त्यास "पुरुषाने" घातलेले बंधन असे समजायचे असेल तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर "अशक्य " असे आहे. बाकि प्रश्न मोघम व एकतर्फी असल्याने उत्तर देणे अशक्य.

>>> यावर स्त्रीयांनीच स्वत:मध्ये बदल केले पाहीजेत,मी काही सुचवतो <<<<
अहो धाग्याच्या सुरवातीलच सांगितलय ना की स्त्रीयांनी काय करावे यावर खूप चर्चा झाल्यात, त्या इथे नकोत.
इथे निव्वळ पुरुष काय करु शकतील याचे नमुने हवेत.

माझा अनुभव लिहिते, सुमारे १८-१९ वर्षांपूर्वीचा. अगदी शेपटाच्या टोकावर म्हणावा असा निभावलेला.

मी अडनिड्या वयात. एका मे महिन्याच्या दुपारी दुकानातून घरी येत होते. बिनागर्दीची निवांत वेळ, मी माझ्या घराला लागून असलेल्या बोळाशी पोहोचले होते. अर्ध्या मिनिटावर घर. तितक्यात मला मागून कुणीतरी पकडायचा प्रयत्न करतंय असं वाटताक्षणी मी जोरात किंचाळले. शेजारीपाजारी दुसर्‍या मिनिटाला धावून आले. दुपार असल्यामुळे लहान मुलं आणि ज्येना होते शेजारच्या सगळ्या घरात, आमच्याकडेही माझी आजी होती. तो जो कुणी होता तो तत्क्षणी पळून गेला. सगळा मिळून अवघा ३ मिनिटांचा प्रकार, पण मी भयानक घाबरले!! घरी आले आणी खूप खूप खूप रडले. शेजारच्या अजोबांनी आई-बाबांनी बोलावलं, तेही आले लगेच. एव्हाना मी जरा सावरले होते. बाबांनी तडक जाऊन पोलीस कंप्लेंट नोंदवली. लगोलग पळून गेल्यामुळे तो कोण माणूस होता, दिसायला कसा वगैरे मला काहीही समजलं नव्हतं.
संध्याकाळी एक जेन्ट्स कॉन्स्टेबल, लेडी कॉ. आमच्याकडे प्राथमिक चौकशीला आले. "हे सगळं नको, माझंच नाव खराब होईल" ही भीती होती मला, बाबा ठामपणे पाठीशी होते. "काही होत नाही, आम्ही आहोत ना! घाबरू नको बरं अजिबात!" असं म्हणाले. पुढे प्रकरण लवकरच निवळलं. पण सगळ्या प्रकारात अर्थातच बाबा, शेजारचे काका-आजोबा वयाचे लोक आणि ते पोलीस प्रचंड समंजसपणे आणि जबाबदारीने वागत होते. "तुझीच काही चूक असेल" असं वागण्या-बोलण्या-टोमण्यातून अजिबात नव्हतं. किंवा चौकशीला सुद्धा शेजार्‍यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला. "आम्ही तिच्या आजोबांच्या वयाचे आहोत, आम्हाला काय प्रश्न विचारता" असा पवित्रा घेतला नाही. नंतरही कधी मला किंवा अन्य कोणत्याही मुलीला उगीच बोधामृत पाजलं नाही.

ही खूप मोठी गोष्ट आहे असं आज विचार केला की वाटतं. शारीरिक सामर्थ्य आणि वय बघता कोणी तिथे जाऊन दोन हात करू शकत नव्हतं. पण नंतर जी आश्वासकता वागण्यातून दिसली ती महत्त्वाची आहे.माझं लहान वय बाजूला ठेवून, एक माणूस आणि एक स्त्री म्हणून माझा कम्फर्ट झोन त्यावेळी जपला गेला.

( अस्थानी वाटल्यास ही पोस्ट नंतर एडीट केली जाईल.)

प्रज्ञा९

तुमच्या प्रकरणात तुमचे नातेवाई़क, शेजारचे काका-आजोबा, पोलिस जसे वागले तसे पुरषानी वागणे अपेक्षित आहे.

बाकी आपण काही करु शकत नाही. पण कायदे कडक केल्यास बराच फरक पडु शकतो. सिंगापुर मध्ये एकटी मुलगी मॅरेथॉन चा सराव करायला रात्री १२ वाजता निघुन शहर पालथ घालुन सकाळी ६ वाजता सुखरुप घरी येते. ( दिवसा खुप उन असल्याने सिंगापुरे मध्ये मॅरेथॉन चा सराव रात्री केला जातो). आणि सिंगापुर मध्ये ९८% लोक आशियातील आहेत आणि १०% भारतिय आहेत तरी सेफ आहे. हे कठोर कायद्यामुळे शक्य आहे. जर कोणी मुलीची छेड काढली आणि कोर्टात सिध्ध झाले की त्याला २ ते २४ पोकळ बांबुचे फटके दिली जातात. कोर्टाचा निकाल पण २-३ दिवसात येतो. कारण नसताना अपिल केले तर सजेत वाढ होउ शकते. दोन फटक्यामध्ये २ महिन्याचे आंतर असते जखम भरुन येण्यासाठी. त्यामुळे कोणी पुरुष वाईट नजरेने बघत नाही.

तर मुद्दा असा की, अशा पोर्न वगैरे व तत्सम सेक्स्युअली उद्दीपीत करणार्‍या जाहिराती वगैरे चा विषय निघतो, तेव्हा त्यावरील बंदीबाबत पोर्नचे आधीन शौकिन पुरुषवर्गाचे खान्द्याला खान्दा लावुन व्यक्तिस्वातंत्र्याचे नावाखाली बहुसंख्येने सुशिक्षित स्त्रीवर्गही उभा राहिलेला दिसतो तेव्हा मला प्रश्न पडतो की आधी "पुरुषांची नजर" बदलायला हवी, पुरुषांची कर्तव्ये काय ते उगाळायला हवय की आधी स्त्रीयांनीच आपापसातले "मतभेद" दूर सारुन विशिष्ट विषयांवर ठाम कोणती भुमिका घ्यायची ते ठरवायला हवे?>>>>>
तुझे मुद्दे आणि गोंधळ दोन्ही लक्षात आले लिंबू. कसं आहे, व्यक्तीस्वातंत्र्य ह्या मुद्द्यावरुन जी लोकं पॉर्नबंदीच्या विरोधात आहेत किंवा नग्नता टॅबू समजू नका म्हणत आहेत ती लोकं तू सांगतोयस ती पॉर्न बघून आणखिन चेकाळणारी, पुढे जाऊन एखादा गुन्हा करणार्या मंडळींपेक्षा वेगळी आहेत. हे दोन स्वतंत्र गृप आहेत लोकांचे.

व्यक्तीस्वातंत्र्य वाल्यांचा (जे सहसा सुशिक्षित असतात) मुद्दा असा आहे की आम्ही आमच्या घराच्या ४ भिंतींमध्ये काय करतो, काय बघतो हे सरकार किंवा इतर कोणी मॉरल पोलिस लोकांना ठरवायचा हक्क नाही. तू ह्या लोकांमध्ये आणि तुला दिसणारे सो कॉल्ड पांढरपेश्या लोकांमध्ये गल्लत करु नकोस. ती लोकं तुला सुशिक्षित वाटली तरी ती ह्या वरच्या व्यक्तीस्वतंत्र्य वाल्या गृप मधल्या लोकांसारखा विचार करत नाहीत.

पॉर्न बाबत म्हणशील तर तो प्रश्न मलाही आहे कारण सध्या मिळालेल्या अनलिमिटेड पॉर्न अ‍ॅक्सेसमुळे लोकं चेकाळली आहेत हे खरय पण तो अ‍ॅक्सेस बंद करुन ही समस्या किती सॉल्व होईल हे माहित नाही. सॉल्व हा माझ्यामते खुप मोठा शब्द किंवा खुप मोठा गोल आहे ह्या समस्येबाबत. काही प्रॅक्टिकल गोष्टी करुन कदाचित काही गुन्हे होण्यापासून थांबवता येतिल. लहान मुलांना आधी पासून ह्या सगळ्याची कल्पना देऊन, पुढे असं काही हाती लागल्यावर ते हँडल कसं करायचं ह्याची कल्पना देणे, बायका/मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेकडे जरा जास्त लक्ष देणे. व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे मी सगळं मानतो पण त्यापेक्षाही काही मोठं असेल तर माणसाचा जीव. मी पुर्वी एकदा (मला वाटतं स्त्रियांच्या पोषाखाबद्दल बाफं होता) लिहिलं होतं की पुरुषांच्या वाईट नजरा नीट होतील तेव्हा होतील पण व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करत असताना तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात टाकत आहात का हे नक्की पडताळून बघा.

तुमच्या प्रकरणात तुमचे नातेवाई़क, शेजारचे काका-आजोबा, पोलिस जसे वागले तसे पुरषानी वागणे अपेक्षित आहे. >>>>+१

"जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? " - रस्त्यात कुणीही कुणाला अकारण त्रास देत असेल, तर पुरूष म्हणूनच काय, एक माणूस म्हणून देखील अस्वस्थच वाटतं. त्यातून मदत करता येत नसेल, तर येणारी हतबलता अधिक वाईट.

एका देवळाच्या रांगेत ऊभं असताना, एक बाई मधे घुसत होती. तिला एका पुरूषाने विरोध (शब्दिक) केल्यावर, तिने 'त्यानं मला हात लावला' असा कांगावा करून रान ऊठवलं आणी त्या पुरूषाला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. तेव्हा स्त्री / पुरूष असा भेद न बाळगता केवळ अस्वस्थच वाटलं होतं. जर खरच त्या बाईला त्या पुरूषाने त्रास दिला असता, तरी वाईटच वाटलं असतं. पण असं गर्दीत काही करणं दर वेळी शक्य होत नाही, हे दुर्दैव.

आम्हाला स्त्री म्हणून किळसवाणे अनुभव येतात हे सत्य आहे आणि त्याबद्दल काय करावं आम्हाला लक्षात येत नाहीये. म्हणून सभ्य आणि समंजस पुरुषांकडे मदत मागत आहोत. त्यांनी आम्हाला कशी आणि काय मदत करावी, घाणेरड्या मनोवृत्तीच्या पुरुषांना सुधारण्या बाबतीत त्यांना काही करता येईल का? असा प्रश्न विचारला आहे.

आता समंजसपणे प्रश्नच समजून घेता येत नसेल आणि त्याच त्याच मुद्द्यांमध्ये विचार अडकत असतील तर इथे लिहिण्याची गरज नाही, लिंबू.

sarcosuchus imp... तुम्ही सर्कास्टिक लिहिलंय असं समजावं का? कारण ज्या मुद्द्यांवर चर्चा नको असं सांगितलं आहे तेच मुद्दे तुम्ही मांडले आहेत.

पाश्च्यात्यांच्या खुळचट स्त्रीवादाकडे फारसे लक्ष देऊ नये,दे आर डीफरंट स्पेसीज दॅन अस........
भारतात 'स्त्रीयांनी' ने राहूच नये..... हेच खर............
पुरुषांनीच रहाव.............. कस??

हे पोर्नफार्न उचभ्रु समाजाचे फॅड आहे. या सगळ्या सुविधा व बघण्यासाठीचा एकांत त्यांनाच मिळतो.
लिंबुभौ सारखे हे समाजासाठी किती घातक आहे म्हणुन बघत असावेत. तर काही आंबटशौकिन असावेत.

The way this BB is being steered it is pretty clear why there are so few posts on this thread by male members.
पुरुषांकडून किंवा एकूण समाजाकडून बदलाची अपेक्षा ठेवणं हा केवळ मूर्खपणा आहे. कारण माझ्या ह्या जन्मात मी ते बदल बघू शकेन असं मला वाटत नाही. एक स्त्री म्हणून माझी लढाई मला स्वतःलाच लढावी लागेल हे मी माझ्यापुरतं मान्य केलं आहे. कारण हजारो स्त्रियांमधली एक स्त्री उलटून बोलली किंवा तिने गैरफायदा घेतला तर ते व्यवस्थित पोस्ट करकरून सांगितलं जातं! (आणि लगेच त्यावर इतर स्त्रियांकडून explanation च्या पोस्ट्स देखील येतात.) Sad
जबाबदारी घेणे ही फार दूरची गोष्ट आहे! पण आज दररोज सर्वत्र स्त्रियांवर इतके अत्याचार होत असण्याबाबत as a male I feel sorry and guilty असं ह्या धाग्यावर कबूल करण्याची हिम्मत कालपासून किती जणांनी दाखवली?
जे घडतंय त्या बाबत शरम वाटते आणि होय ही जबाबदारी आता आम्ही घ्यायलाच हवी आहे ह्या अर्थाचं एकतरी वाक्य अपेक्षित होतं मला! जे फक्त बेफिकीर यांनी लिहिलं पण इतर सगळ्या धाग्यांवर चांगल्या प्रतिसादाला/वाक्यांना क्वोट करून +१ करतात तसं इथे आजीबात झालं नाही! जसं समाजात वागताना ignore मारतो तसं ह्या धाग्याला पण ignore मारलं सगळ्यांनी!
Yes, I am judging every one of you! And why shouldn't I?
Thank you Mami for this thread!

भावनाउद्रेक समजू शकतो पण इतर पुरुषांनी फक्त पुरुष आहेत म्हणून बाकी अत्याचारी पुरुषांच्या वतीनं माफी मागायचा किंवा जबाबदारी घ्यायचा काय संबंध? धाग्याच्या मुख्य विषयाशी त्याचा काय संबंध?

संपादित. समजलं मामी.
बरं, असं कोणी करत असेल तर थांबवायचा (शारीरिक क्षमता आड येते म्हणून) ते ओरडून सांगायचा प्रयत्न करतो, रादर एकदा केलेल्या प्रयत्नात मला भीती वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आणि रस्त्यातील एका वयस्क व्यक्तीने अशा लोकांच्या वाटेला जाऊ नको असा सल्ला दिला, काय करावं असं खरंच वाटलं तेव्हा. आजूबाजूचे गम्मत बघतात, हा अनुभव आहे. त्या व्यक्तीने पुढाकार घेतला तर मात्र आवर्जून बाजू घेतो. मूळ समस्या अशी असते की कोण बरोबर कोण चूक हे तिऱ्हाईत नाही ठरवू शकत. (कायम टोकाची बलात्कार सिच्युएशन नसते)
(परदेशात) सार्वजनिक ठिकाणी कोणी नर्सिंग करत असेल (अशी वेळ येते हे सत्य आहे) तर साउथ एशियन लोक जवळ मुद्दाम घुटमळतात हा अनुभव घेतलेला आहे, तिकडे अगदी शांतपणे जाऊन सागतो इथून दूर जाल का?

पोर्न बघून कोणी असं करत असेल असं खरंच वाटतं नाही मला. पोर्न जेव्हा सहज उपलब्ध न्हवतं तेव्हा ही अशा गोष्टी होतचं असतील. सेक्स सहज उपलब्ध झालं तर काही सुधारेल असं काही काळापूर्वी वाटायचं, पण वर्चस्ववादी वृत्ती, अहंगंड, कोणी माझं काही बिघडवू शकत नाही ह्या पण मोठ्या समस्या आहेत.

ह्या प्रश्नाचे उत्तर घरातुनच योग्य संस्कार करून, संवाद साधुन, योग्य वर्तनाचे उदाहरण घालुन दिल्यास सापडेल ह्याविषयी दुमत नाही. आमच्या घरात मुला मुलींना समान वागणुक दिली जाते. मुलांनाही जेवण झाल्यावर आपापले ताट वाटी उचलणे; धुवून ठेवणे, कामवाल्या बाई न आल्यास केर काढणे इ. कामे करायला लावली वातात. थोडक्यात "बायकी कामे" असा शिक्का मारला जात नाही. घरात निर्णय घेताना आई वडील चर्चा करून निर्णय घेतात (वडिलांनी सांगायचे व आई ने मान डोलवायची असे होत नाही). एखाद्या चुकीबद्दल आई रागावल्यास वडील तिचीच बाजू घेतात व मुलांना जसा वडिलांना जाब द्यावा लागतो तसाच आईलाही द्यावा लागतो. माझ्या किशोरवयीन भावाला मी पुढील गोष्टी कशा समजावू?
१. शीला, मुन्नी, चमेली इ. दररोज दाखविल्या जाणार्‍या व दर महिन्याला अजुन अजुन येणार्‍या आयटम गर्ल्स व त्यांची आयटम साँग, ही गाणी पुरुषांच्या भावना उत्तेजित करायलाच दाखविली जातात. ती बघण्यावर घरात बंदी केली तरी बाहेर गेल्यावर काय?
२. कॉलेज मधे / रस्त्यावर हिंडणार्‍या अनेक मुली तंग कपडे घालतात ज्यातुन त्यांच्या अंगाप्रत्यांगाचे दर्शन होत असते. मोठ्या गळ्याचे टॉप्स, कमरेखाली जाणार्‍या जीन्स असे कपडे मुली का घालतात? ह्यांच्याकडे दुर्लक्ष कसे करायचे?

चर्चेचा रोख मुलींच्या वर्तनावर वळवण्याचा उद्देश नाही उलट पुरुषांनी कसे वागावे ह्यावर चर्चा चालू असल्यामुळे कोणी ह्या प्रश्नांवर प्रकाश टाकू शकल्यास मदत होईल.

कायम टोकाची बलात्कार सिच्युएशन नसते >>> Uhoh

रस्त्यानं जाताना, बसनं-ट्रेननं प्रवास करताना भारतात स्त्री किती दडपणखाली असते याची कल्पना सुद्धा तुम्हाला येणार नाही. लहान मुलगी बरोबर असेल तर आपल्याबरोबर आणि आपल्यापेक्षाही तिचं कसं रक्षण करायचं हे आणखी दडपण असतं. आपलं शिक्षण, आपला सामाजिक दर्जा, आपली मोठ्या पदावरची नोकरी असे सगळे मुकुट उतरवून निव्वळ आपलं मादीपण जाणवून दिलं जातं पदोपदी. ही अशी ऐर्‍यागैर्‍याकडून होणारी मानहानी मनावर किती ओरखडे उमटवते हे कळायला स्त्रीच व्हायला हवं. प्रत्येक पुरुषाला त्याच्या आयुष्यातले काही महिने तरी स्त्री म्हणून जगून बघायला हवं.

भावनाउद्रेक समजू शकतो पण इतर पुरुषांनी फक्त पुरुष आहेत म्हणून बाकी अत्याचारी पुरुषांच्या वतीनं माफी मागायचा किंवा जबाबदारी घ्यायचा काय संबंध? >>

त्यापुढे जाऊन मी लिहीन की आमच्यासारख्या पुरूषांना देखील तसे पुरूष अपराधी वाटतात, तर त्या पिंजर्‍यात आम्ही स्वतःला का बसवावे?

The way this BB is being steered it is pretty clear why there are so few posts on this thread by male members >>

जीज्ञासा अश्या बर्‍याच चर्चा आधी झाल्या आहेत हे ही कारण असू शकते ना?

मुलींकडे दुर्लक्ष कशाला करायचे?
वखवखलेल्या नजरेने बघणे आणि दुर्लक्ष याच्या मध्ये काही करावे. आणि नजरा हा एक भाग असावा, त्याच्या पुढे संमती नसताना काही करणे हा गुन्हा आहे. आणि त्याचे परिणाम काय असतील आणि ते ज्याला त्याला भोगावे लागतील हे सांगावे.
या नजरावर उपाय म्हणून सहज आणि मुक्त (संमती असलीतरच) संबंध उपलब्ध असले तर परिस्थिती बदलेले असं कधीकधी वाटतं, पण मग खरंच काही बदलेल का? का परत वर्चस्ववादी वृत्ती, अहंगंड इ. मुळे काहीच फरक पडणार नाही असंही वाटतं.
एखाद्या वेळ गृम्ड मुलानी तंग कपडे घातले ज्यातुन त्यांच्या अंगाप्रत्यांगाचे दर्शन होतंय तर मुलीही बघत असतीलच की. लिमिट समजली की झालं.

शीला, मुन्नी, चमेली वर घरात बंदीची गरज नाही. घरात, बाहेर आवडेल तिथे त्यांना बघावे पण त्यावरून दैनंदिन व्यवहारात सर्वच मुली दारू पिणार्‍या आणि डार्लिंग साठी बदनाम व्हायला तयार असतील हा समज नसावा. जसे मुलींना पण जॉन अब्राहिमने बाईक उधळलेली आवडते पण प्रत्यक्षात प्रत्येक स्ट्रीट लाईटला थांबणारा व्यक्ती आवडतो. थोडक्यात सिनेमा, गेमिंग, ऑन-लाईन साईट्स वरचे जग व प्रत्यक्ष जग ह्यातला फरक समजला पाहिजे.

अंगाप्रत्यांगाचे दर्शन हा मुद्दा अनेक वेळा अनेक धाग्यांवर झाला आहे, तेव्हा त्या प्रश्नाला माझा पास.

वैद्यबुवा, I am sorry असं म्हटलं नाहीये I feel sorry असं म्हटलं आहे. मला वाटत ह्या दोन्हीच्या अर्थात बराच फरक आहे. दुसऱ्याच्या गुन्ह्यासाठी तुम्ही माफी मागावी अशी अपेक्षा नाही. आज भारतीय पुरुषांबद्दल जी प्रतिमा जगात/समाजात आहे त्याबद्दल एक भारतीय म्हणून मला नक्कीच sorry आणि guilty दोन्ही वाटते.
चौकट राजा, उत्तान गाण्यांबाबत सहमत पण त्याचे खापर कृपया केवळ त्या नाचणाऱ्या "स्त्रीवर" फोडू नये! आणि कपड्यांचे काही नसते हो! सलवार-कमीज आणि वर ओढणी अशा संपूर्ण कव्हर्ड वेषात हिंडताना अत्यंत किळसवाण्या नजरा अनेकदा झेलल्या आहेत Angry
I am not a guy but I know for sure that there is something terribly wrong with you guys. Now since I am not a guy, I can't figure it out. You got to do that yourself! (you= plural you)

२. कॉलेज मधे / रस्त्यावर हिंडणार्‍या अनेक मुली तंग कपडे घालतात ज्यातुन त्यांच्या अंगाप्रत्यांगाचे दर्शन होत असते. मोठ्या गळ्याचे टॉप्स, कमरेखाली जाणार्‍या जीन्स असे कपडे मुली का घालतात? ह्यांच्याकडे दुर्लक्ष कसे करायचे?>>>>>>

असे कपडे घालणार्‍या मुली मी जुहू,बांद्रा इथे बघितल्या आहेत.यांच्या पालकांवर व यांच्यावर पाश्चात संस्कॄतीचा प्रभाव असतो. दुर्लक्ष करण्या पेक्षा बघु द्यावे नजर मरुन जाते.मी जुहू जवळ राहिली आहे.मुम्बईला आल्यावर हे बघण खुप आश्चर्य करणारे होते नंतर नजर मेली. वयात आलेल्या माझ्या मुलांची पण मेली असेल.काम धाम अभ्यास सोडुन किती वेळ बघणार

जिज्ञासाच्या पोष्टीकडे दुर्लक्ष करून आणि मामींनी त्यांची पोस्ट संपादित केल्यामुळे ---

इथे एक गोष्ट लिहावीशी वाटते ते म्हणजे ऑफिसमध्ये स्त्री कलिग्जबद्दलचे पुरूषांचे बोलणे आणि वर्तन. आयटीसारख्या क्षेत्रात जिथे सगळेजण शिकलेले असतात, तरीही स्त्री कलिग्ज किंवा बॉसेसबद्दल अतिशय अर्वाच्च म्हणता येतील अश्या कमेंट्स ऐकलेलया आहेत. मानसिकता बदलण्यासाठी काय केलं आहे किंवा करता येईल हे सांगायचं तर :
-अश्या कमेंट्स किंवा ज्योक करणार्‍याला ते चुकीचे आहे हे सांगणं. इथे कोणी अंगावर यायचा प्रश्न नसतो कारण सगळं ऑफिसच्या मर्यादेत सुरू असतं.
-जर हे स्पष्ट सांगणं शक्य नसेल तर तश्या कमेंट्स किंवा ज्योक्सवर न हसणं किंवा त्या चर्चेत अजिबात सहभाग न घेणं जेणेकरून आपल्याला ते आवडत नाहीये ह्याची समोरच्याला जाणीव होईल (हे मुख्यतः सिनियर्न्सच्या बाबतीत).
-वेळप्रसंगी एच आर कडे तक्रार करायची धमकी देणं. नुसत्या धमकीवर काम भागलं होतं, त्यामुळे प्रत्यक्ष तक्रार करायची अजून वेळ आलेली नाही.

अर्थात हे कधीकधी पुरूष कलिग्ज किंवा सिनिसर्स/सबोर्डीनेट्सना आवडत नाही पण ठिक आहे! बाकीचे काही मुद्दे अमित आणि बेफिकिरांनी लिहिले आहेतच.

किती एडीट कराल सगळेजण!

केदार, लिंक्स प्लीज! मला आवडेल माझा गैरसमज दूर करायला!

<<जिज्ञासाच्या पोष्टीकडे दुर्लक्ष करून आणि मामींनी त्यांची पोस्ट संपादित केल्यामुळे --->> पराग, धन्यवाद, इग्नोर करतोय असं लिहिण्याची तसदी घेऊन माझी पोस्ट इग्नोर केलेली नाही असं कळवण्यासाठी Happy

anyway, माझ्या दोन्ही पोस्ट्स मी एडीट करणार नाहीये कारण मला जे म्हणायचे आहे ते मी नीट मांडले आहे. हा धागा जिथे जायचा तिथे जाऊ दे! हेमाशेपो

Pages