अकोल्यातील खादाडी

Submitted by हर्ट on 27 May, 2009 - 09:41

अकोल्यातील खादाडीबद्दल मी इथे लवकरचं लिहिणार आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी,

अमरावती चा विकास व्हायला कारण म्हणजे जबरी नेतृत्व आहे तिथले, सुनील भाऊ देशमुख (गुटका बंदी फेम) काही प्रमाणात रवि राणा हे लोक काम करवुन घेतात
सुदैवाने आत्ता अकोल्यात ज़रा बरे नेतृत्व आहे (डॉक्टर रणजीत पाटील, पदवीधर मतदारसंघ) आधी फ़क्त गुंड नाही तर लालाजी असत नेते,
उसाच्या रसाबद्दल बोलता उस वेगळा म्हणजे काळा उस असतो बुलडाणा अन पातुर कडून येतो, बुलडाणा च्या मसलापपेन उखळीपेन गावचा उस विशेष प्रसिद्ध आहे

https://lh4.googleusercontent.com/proxy/BfDB_Ioz2tSaXvvV-w75wPPPzA8-Z01X...

हा खस्त्याचा फोटो, माफ़ करा मला इथे फोटो डकवता येत नाही ! Sad

बरीच वर्ष माझ्या रूमीज कडून अकोल्याच्या पाणीपुरीचं कौतुक ऐकुन आहे.. बघू कधी योग येतो..
पण चर्चा वाचून मज्जा येतेय.. Happy

खूप खूप पुर्वी ८० च्या दशकात आम्ही वसंत आणि रिगलमधे सिनेमा बघायला जायचो. तिथे ताजी गुळपट्टी मिळायची. आणि ती पातळ असायची. हल्ली तशी गुळपट्टी अर्थात चिक्कि मिळत नाही.

बी,

बरेच सीनियर दिसताय!! माझा जन्मच ८५ चा आहे !!! लास्ट चक्कर कधी झाली होती तुमची अकोल्यात म्हणे??

आत्मधून ,

नक्की येसान, आमच्या इकल्डला पावनचार जेव्याले, निसते फुग्गे नाही तर बाकी लै काही भेटन खायप्याले

इथे वाचून आता मला पनीर बटर मसाला खावीशी वाटायला लागली आहे Uhoh

सोन्याबापू, तुम्ही फोटो दिला आहे तिला मुंबईत खस्ता पुरी म्हणतात, किंवा मठरीही म्हणतात. गुजराथ्यांची मठरी निराळी असते. ठाण्यात आता सगळीकडे शेगावची कचोरी मिळू लागली आहे. गरमगरम खायला चांगली लागते, आतला मसाला चांगलाच झणझणीत असतो.

होय त्याला मठरी/मठडी सुद्धा म्हणतात , उत्तर भारतात मुग किंवा उड़दाचे मोगर (भरड़ पीठ) सारण घातलेल्या कचोरी असतात त्यांना खस्ता कचौड़ी म्हणतात, अन मठरी ला आमच्याकडे खस्ता म्हणतात नुसते, वरती विधी दिली आहे तशी बनते खस्ता चाट.

शेगाव कचोरी आमच्याकडे हॉटेल चेन सारखे झाले होते, ओरिजिनल मिळते का ठाण्यात? कारण लोक कॉपी करायला लागले तसे शेगाव कचोरी चे मुळ मालक शर्माजी ह्यांनी बहुतेक तिचे राइट्स घेतले आहेत, थेट ती कचोरी आता शेगाव रेलवेस्टेशन समोर "मेसर्स तिरथराम शर्मा एंड सन्स" मधे मिळते, आताश्या बहुदा त्यांनी फ्रैंचाइज़ी द्यायला सुद्धा सुरुवात केली आहे असे ऐकिवात आहे (ही माहिती ऐकिव अजुन वेरीफाई केले नाही मई)

सोन्याबापू: आम्हीबी ८५वालेच

शौकीनांसाठी :
आमच्या एका अकोल्याच्या परममित्राने पुण्यात अकोल्याच्या पाणीपुरीचा एक स्टॉल सुरू केला आहे. तो सगळं मटेरीयल अकोल्याहून त्याच्या खास लॉजिस्टिक्सद्वारे आयात करतो. पुण्यातलं काहीही विकत घेत नाही. लवकरच दुसरी ब्रॅन्चही उघडतोय.

पत्ता:
डीएसपी पाणीपुरी
पांचाली स्वीट्स, आसाराम बिल्डिंग, सर्वे नं 8/15
कमिन्स इंजिनीयरिंग कॉलेज रोड, कर्वे नगर पुणे
वेळ : सायं: ०४ ते १०
प्रोपा: स्वप्नील

प्रिमियम सर्वीससाठी माझे नाव सांगणे. Happy

सूचना: मी स्वत:च गेल्या वर्षभरात पुण्याला चक्कर न मारल्यामुळे चवीची हमी तूर्त घेऊ शकत नाही.

अवांतर: शेगावच्या ऑथेंटीक कचोरीचं (आता अकोल्यात माजलेल्या दगड उचलला की १०रू.त३ शेगाव कचोरीच्या दुकानांसारखं नव्हे) एक दुकान डेक्कनला आहे. झेड ब्रिजच्या डेक्कनकडच्या तोंडाशी. म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत तर होतं. आता माहीत नाही. पुण्यात इतरत्र मिळणार्‍या कचोरीच्या आणि येथे मिळणार्‍या कचोरीच्या चवीत नक्कीच फरक होता. इथे फक्त कचोर्‍याच मिळतात.

आता मी जिथे राहतेय तिथ पन जवळच एक शेगावच्या कचोरीच दुकान आहे..चांगल्या लागतात..
शिवाय डेक्कन कॉर्नर ला सुद्धा आहे.
फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आहे एक गुपचुप वाला जो आलु टाकलेले गुपचुप विकतो..बाकि ते रगडा टाकलेले गुपचुप म्हणजे तद्दन फालतु चव..मी राहते त्या कॉलनीमधे सुद्धा आहेत दोघ जण आलु टाकुन विकणारे.. त्यांच्याकडले गुपचुप काही तासात संपतात हे वेगळ सांगायला नकोच Proud
आयुष्यात पहिल्यांदा पुण्यातली पाणीपुरी खाल्ली होती रगडा टाकलेली..तेव्हापासुन हात वर रे बा..कधीच नै यानंतर..

यवतमाळ मधलं रानडे च श्रीखंड छानच लागत..
शहर पोलीस स्टेशन जवळच मथुरावासी नावाची गाडी असते गुपचुप ची..तिथले गुपचुप, दहिपुरी, भल्ला..खाच खाच कुणाच्या नशिबात यवतमाळ चक्कर लिहिली असेल तर..लांबुळक्या पुर्‍या असतात त्या आणि काय लागतात..आहाहा..कातील..मुझे दुवा दोगे Wink

कधी कुठ विदर्भात एखाद्या ठिकाणी नामदेव राईस मिळाला तर नक्की टेस्ट करा..क्लास चव असते..

मजा येतेय हा पळता धागा वाचायला. मला खस्ता कचोरी/मठर/, शेगाव कचोरी आणि राजस्थान कचोरीतला फरकच कळत नाहिये.

टीना
याला नामदेव खिचडी असेही म्हणतात.

विदर्भात विशेषत: विदर्भ-मराठवाडा बॉर्डरवर हा प्रकार विशेष लोकप्रिय आहे.

नागपूर-यवतमाळहून सुटलेल्या पुणे-औरंगाबादच्या बसेस मालेगावच्या ढाब्याबर रात्रीच्या वेळी थंडीत ११वानंतर थांबल्या की तिथल्या ढाब्यावर ही खिचडी खायची मजा काही औरच आहे.

आजकाल वर्‍हाडात बुफे पार्ट्यांमध्ये हा प्रकार फार चलतीत आहे.

मटरी आणि खस्ता कचोरी दोन्ही वेगळ्या आहेत. म्हणजे निदान मी खाल्लेली खस्ता कचोरी मटरी नव्हती.

कचोरीचा आणखी एक मस्त प्रकार म्हणजे प्याज कचोरी. इंदोरी उपहारगृहात मिळतो.

पाणीपुरी मध्ये आलू अन बुंदी टाकून खाणे पाप आहे.

नामदेव खिचडीचा पूर्वज म्हणजे मराठवाड्यातील वारंग्याची खिचडी. इथूनच तो तयार झाला असे म्हणण्यास वाव आहे असे दिसते. त्यावर वारंग्यात मस्त शिरवा (म्हणजे कांदे बटाटा रस्सा) पण जबरी लागतो. आणि सोबत बोंड (म्हणजे भजी) अहाहा.

मस्त चालल्यात गप्पा! मजा आली वाचताना.

रगडा-पाणीपुरीला नाव ठेवाल तर खबरदार! आपली आवडती आहे ती. काय?????

खस्ता म्हणजे खस्ता कचोरी की! हात्तिच्या. म्हटलं काय आहे हे एवढं? खस्ता म्हणजे खुसखुशीत. त्या वरच्या कव्हरमध्ये भरपूर तुपाचं मोहन घालतात. खस्ता न होऊन सांगते कोणाला बिचारी! Happy

वाघमारे भाई,

तिथलची एक ख़ास आठोन हाय आमची, कोथरूड ले बांदल कॅपिटल च्या म्हावरे आपल्या इकल्डल्या पोट्टे लोकाईचा रोजचा अड्डा जमे, पुण्यात फर्स्ट टाइम गेलो तवा तटीसा एक दोस्त घेऊन गेलता आमचा आमाले, तथुन आम्ही ८ पोट्टे कचोऱ्या खाले डेक्कन वर धसलो , थो मालक वयखीचा निघाला एकाच्या मंग पोट्टे भिडले खायले कचोऱ्या खाऊन झाल्यावर थो म्हने "फोकनीच्याहो अकोल्याचे लेकर कुटी न्यायच्या लायकी चे नाई बे हलकटहो!! मह्या दुकानातनी जितल्या मिर्च्या दिवस भर लागतेत तितल्या तुम्ही ८ पोट्याईन संपवल्या लेक!!"

तसेही म्हण अमर आहे ती "अकोल्याचे पोट्टे कुटी न्यायच्या लायकीचे नाहीत" सायचे बोलतेच तितके तिरपे!!

खस्ता कचोरी/मठर/, शेगाव कचोरी आणि राजस्थान कचोरीतला फरक स्पष्ट करा :

मठरी ही शंकरपाळ्यांसारखी फक्त खारी असते. गोड नसते. मैद्यात तुपाचं मोहन, ओवा, मीठ घालून करतात. छोट्या छोट्या गोल लाटून करतात त्या मठर्‍या. प्रवासात नेण्यास उत्तम. लोणच्याबरोबर खातात.

याच पिठांच्या छोट्या उभ्या सळ्या बनवून तळल्या की त्यांना (निदान उ.प्रदेशात) शाखें म्हणतात.

खस्ता कचोरी ही बेसिकली मैद्याची पोकळ, मोठी पुरी असते. आत वेगवेगळं पण थोडंच सारण भरतात. उदा, कांद्याचं सारण भरलं की प्याज कचोरी. आत मुगाच्या डाळीचं किंवा कधी साध्या गोल कचोरीत असतं ते ही सारण भरतात.

आमच्या सासरगावी सकाळी ब्रेकफास्टला बेडें नावाचा अफलातून प्रकार मिळतो. अशीच प्याज ची किंवा साधी कचोरी आणि बरोबर मसालेदार, पातळ बटाट्याचा रस्सा. काय चविष्ट लागतं म्हणून सांगू.

शेगावची कचोरी खाल्ली नाहीये. पण सारण काहीतरी वेगळं असेल.

<पाणीपुरी मध्ये आलू अन बुंदी टाकून खाणे पाप आहे.>
१००% सहमत. इव्हन पुरीमध्ये पाणी सोडून दुसरं काहीही टाकून खाणे कर्मठ शौकीनांना निषिद्ध आहे.

आणि ते शेवटी 'एक मीठी पुरी देना भैय्या' म्हणत मीठी पुरी मागणे म्हणजे आमच्या दृष्टीने डायरेक्ट नर्कातच एंट्री.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत.

मंजूडी, आता शेगावची कचोरी रविंद्र नाट्य मंदिरासमोर मिळायला लागली आहे. फॉयुइं.

अवांतराबद्दल क्षमस्व.

ह्या सगळ्या गोंधळात धागाकर्ते बी सर ह्यांचे अनेको अनेक आभार !!! सहज म्हणुन कपाट उघडावे अन जुने एल्बम सपडावे तसा योग आला!! आम्हा लेकरायले माजोन करायल हा धागा दिल्या बद्दल आभारी हाओ!!

यस पाणिपुरी अकोल्याचीच सर्वोत्तम असते. अरुण दिवेकर ह्यांच्या बंगला/आखाडा जिथे आहे तिथे एक 'सागर' म्हणुन दुकान होत तिथलि पाणिपुरी सगळ्यात ज्यास्त आवडली होती चवीला.

नातु डेअरीच्या श्रीखंडाच्या वड्या पण एक हळवी आठवण आहे अकोल्यातली. तसच जठारपेठेमधला एका गाडीवाल्या जवळ मिळणार गुलकंदाच्या स्वादाच आईस्क्रीम.

बर्‍याच लोकांनी शेगाव कचोरी म्हणजे वेगळ काय म्हणुन विचारलय त्यांच्यासाठी, ह्या कचोरीत वरच आवरण नेहमीसारखच पण आतल सारण म्हणुन उडदाच्या डाळीऐवजी चणाडाळ पीठ (बेसन) असत. चांगल झणझणीत असत आणि स्वादासाठी बडीशेप आवर्जुन वापरतात (१० वर्षापुर्वीपर्यंतच्यी आठवणी).

रमा तै,

आखाड्याजवळ घर होते त्याचे दुकान उत्सव मंगल कार्यालय किंवा ब्राह्मणसभेसमोर होते.

सोन्याबापु मला वाटलच तिथे काहितरी चुकलय म्हणुन. पण सागर ची पाणिपुरी मात्र अप्रतिम. तशी चव नंतर कुठेही मिळाली नाहि.

कुठली का असेना खादाडीचे बीबी भरून नवीन लेखनाचे पान पाहिलं की कसं भरून येतं!!!!

सोन्याबापूंची वर्णनं मस्त आहेत.

चर्चा मस्तच चालू आहे. त्या भागाकडे आजवर कधीच न फिरकलेली नाहिये. एक विदर्भ ट्रीप करावी का?

Pages