अडाण्याचा सयपाक

Submitted by टीना on 2 August, 2015 - 12:52

अडाणचोट म्हंजी एखाद्या पिवर शाकाहार घेणार्‍या माणसाले जपानच्या लोकायचा सयपाक बनवाले लावल तर त्याची कशी हालत होईन तशी..
अन लोकहो.. या शब्दाचे कितीबी अर्थ निंगत असले तरीबी पवित्रातला पवित्र अर्थच इथ इचारात घेतला जावा ही इनंती

मैत्रीदिनानिमित्त मी अन माया यकुलता यक मांसाहारी मित्र अश्या दोघानं मच्छी कराची ठरोली सोबतीले कडीसंग पोया असणारी मैतरनी बी होती.. आता दोघाले बी खाणं जमते पण सुंदरी अन बंदरी मधला फरक काई कळत नाय. म्हणुन मीच जाऊन मच्छी आण्णार होती ( वासरात लंगडी गाय शानी Wink ).. त्या दोघायच येण झाल कॅन्सल पण माया बनलेला मुड काई सुदरु देत नोता मंग मनल आज परत आपन यकटीनच पुर्रा सयपाक कराचा.. पुर्‍र्‍या सयपाकाचा मतलब पोया बी म्याच कराच्या Proud

मग लागली कामाले..
कोळीनीकड जाऊन मले सरनं अश्या दोन हातभर असलेल्या नदितल्या मासोया निवडून आणल्या..जागु तु सांगणारे मासोयीचं नाव..तेरे भरोसे मैने वो कोळीनी को बी नै पुछा..
तर मंग आनली मच्छी .. धुतली.. जागु ले दाखवाले फटू काल्ला..

पलिकडं कढई तापत ठेवली गॅसवर.. यका कांदा कापुन लालसर परतवल्यानंतर तो काढून उल्लीस तेल मिठ अन हळद टाकुन मच्छीचे तुकडे बी टाकले त्यात.. ५ ७ मिंट हालवहुलव करुन कढई उतरवली..

एक लानचुकली गंजुली घेउन त्यात तेल तापत ठेवलं. इकड कांदा लसुण अन अद्रक मिक्सर मदुन गर्र्गर्र फिरवुन घेतल.. तेल तापल्यावर त्यात मिक्सरमदला खिचडखेमा दुरुन गंजुलीत ओतला.. लालसर झाल्यावर त्यात तिखट, मिठ, हळद, घरी करते तो काळा मसाला, एवरेस्ट चिकन मसाला टाकुन मंग पाणी टाकलं अन दोन तिन उकळ्या आल्यावर त्यात तेलात परतवलेले मच्छीचे तुकडे दिले टाकुन.. थोड्यावेळ शिजुन सांभार टाकुन झाकण ठेवल अन गॅस बंद करुन दिला..

मंग जय भद्रकाली म्हणुन घेतल्या पोया कराले अन सपासप ५ ६ पोया टाकुन हाशहुश केल.. वाढुन ताटाचा तुमच्यासाटी फटू काल्ला.. पोटाले नैवेद्य दाखुन आता रेस्पी तुमच्यासमोर ठेवली.. तिखट मानुन घ्या..

अधिक टिपा :

१. शीर्षक देल्लय वर त कोन प्रमाण गिमान इचाराच्या फंदात पडू नये..

२. हो. पोळ्या गॅसवर असताना तेच्यातली हवा काडाची म्हणुन दोन हातात तिले जशी दाबली तशीच ताटात ठेवली.. तरी सांगतो आकार त्रिकोणी हाय.

३. हो. मी एवढच तिखट खाते..अन ते कश्मिरी लाल तिखट असल्यान दिसाले लाल अन आतुन.. जाऊद्या .. दिसते तेवढी तिखट भाजी नाई थे.

४. हो. अख्खा एक लिंबु मलेच पुरते तर एवढा का? अबब! असले शब्द तोंडातुन काडू नये..

एकटा जीव सदाशिव असल्यामुळं जिभेचे चोचले जास्त पुरोता येत नाई.. यकटीसाटी एवडा घाट मांडन्याचा लय्यच कंटाळा येते म्हणुन कदीकदीच लाटण्याले माया हात सहन करा लागते नै त पोया बाहेरुन आणुन घरी भाजि बनवाची..डेली रुटीन आपलं.. उद्या संकष्टी म्हणुन जपुन फोटो पायजा..आज रेस्पी पायनार्‍याची मज्जा उद्या पायनार्‍याची..आता ते मी कस सांगु राजेहो..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोन्याबापू, ईल मासा कसा लांब असतो तशीच असते..
आमच्या बजारात तरी आमी वायरच मनतो बा..दुसर नाव ठेवल असन एकाद्यान त का जाणे.

अनिरुद्ध, बाकी पुण्यात मी बी कदी खाल्ली नाई..घरी यवतमाळले गेली का असतेच असते Happy

टीना,

वायर उर्फ़ ईल सारख्या दिसणाऱ्या मासोई ले माया मतानं त बाम (प्रमाणित मराठीत वांब) म्हांतेत, थे मच्छी लंबी रायते कायटी कायटी रंगानं , हिरीत आम्ही पोट्टे तिराले कुदलो अन बाम दिसला का पोट्टे झुईझप हीरी भाईर निंगत, गावातले अडानी पोट्टे त्याले इशारी सरप समजत जात. मंग थो पकडून आगीवर भाजुन खाऊन दाखवा लागत जाय पोट्टयाइले Lol

बाम (प्रमाणित मराठीत वांब) >> इचारा लागन कोनाले तरी..आप्पाजीलेच फोन लावतो आज उद्या..
मंग थो पकडून आगीवर भाजुन खाऊन दाखवा लागत जाय पोट्टयाइले >> Biggrin सकाळ दुपारचा नाश्ता तितसाच होत असन मंग नै का ?

सकाळ दुपारचा नाश्ता तितसाच होत असन मंग नै का ?

नाई न बाप्पा , कुत्र्यागत २ २ घंटे तिरल्यावर एका बिल्लासभरच्या बाम न काय होते!! थो तटिसा खाऊन लंबा केला की घरी जाऊन चुली म्हावरे बसुन ३-४ भाकर खा लागत जाय तवा कुटी अकल वापस डोक्यात यत जाय, पोट्टे त म्हणत "हा सायचा तिरते अन मंग भुकी न म्याटावानी करते ह्याले पैले सरकेतीर ४ समोशे चारा नाई त घरी जाऊन भाकर खाऊ द्या, मंग येते हा लायनीवर"

Lol

Mast

बयो, नाव बदललस?

बेफी, अहो मी तुमच्या कुठल्याच कथा/कादंबर्‍या वाचल्या नाहित हो. मग कसं माहित होणार? Happy

सोन्याबापू आणि टीना, टाईमप्लीज, -
तुमच्या संभाषणातलं बाकी सगळं समजलं.
बिल्लासभर म्हणजे काय? वीतभर का?

तुमची भाषा वाचायला खूप गोड वाटत्येय.

सोन्याबापू आणि टीना, टाईमप्लीज, -
तुमच्या संभाषणातलं बाकी सगळं समजलं.
बिल्लासभर म्हणजे काय? वीतभर का?>>हो

Pages