खेडेगावातला तो तर शहरातली ती..

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 5 August, 2015 - 07:54

फ्रेंड लिस्ट मध्ये बरेच असतात ऑनलाईन, पण कोणाशीच बोलायची इच्छा नसते, बर्याच नवनवीन पोस्ट असतात पण नाही वाटत त्या वाचाव्या, कमेंट करावी.. होत अस कधी कधी ... कारण, वाटत असत ... फक्त आणि फक्त तिने किंवा त्याने रिप्लाय द्यावा. त्या एकाच व्यक्तीशी बोलायचं असत. खूप काही सांगायचं असत आणि बरच काही ऐकायचं असत. नेहमीच एका सारख्याच (विशिष्ट) वेळेला तीच ऑन लाईन येण हे माहित झालेलं असत त्याला, मग धडपड करून त्याच त्या वेळेला हजर होण आणि मग गप्पांच रंगत जाण... पाहिलेलं नसत दोघांनीही एकमेकांना पण तरीही विचारांचं जुळण जमलेलं असत. साधेसेच दररोजच्या आयुष्यातले तर विषय असायचे, कशाचाच कशाला ताळमेळ नाही.. त्याच शेतातल वार्यावर डोलणाऱ्या पिकाच केलेलं वर्णन तिला आवडायचं तर तीच गर्दीत एकमेकांना ढकलत ट्रेनला "क्याच" करण त्याला कौतुकास्पद वाटायचं. खेडेगावातला तो तर शहरातली ती.. तो डोंगराचे, नदीचे, पाटातल्या पाण्याचे फोटो तिला पाठवायचा तर ती रस्त्यावरच्या ट्राफिकचे, उंच इमारतींचे, फेसाळणार्या समुद्राचे फोटो त्याला पाठवायची. तो तिच्या नजरेतून शहर पाहायचा तर ती त्याच्या नजरेतून गाव अनुभवायची.

मस्त गट्टी जमलेली त्यांची. "आज धो धो पाऊस कोसळतोय इथे.. मी जातोय भिजायला... सॉरी... आज गप्पांना सुट्टी " हा त्याचा मेसेज आला कि ती लॉग ओउट करायची तर " आज भन्नाट काम आहे... तुझ्याशी बोलत राहिले तर नाईट शिफ्ट करावी लागेल.. बोलू नंतर " हा तिचा मेसेज वाचला कि तो ऑफ लाईन व्हायचा. ना कधी राग न कधी कडवटपणा. काहीही असो.. दोघ समजून घ्यायचे एकमेकांना.

पण आयुष्य म्हटल्यावर ते सरळ मार्गी नसणारच; नागमोडी, धोक्याची वळण नसतील तर ते आयुष्य कसलं. त्या दोघांचेही प्रश्न होतेच आणि तेही गाव आणि शहरातल्या समस्यानसारखेच.. एकदम वेगळे. खरतर भिन्न टोकांचे. तिने ज्यांचा कधी विचारच केला नव्हता तर त्याने हाही प्रश्न होऊ शकतो ? अशी काहीतरी भावना दर्शवलेली. तो पाणी नाही म्हणून पाण्याच्या ATM मधून, दूरवर जाऊन पाणी आणायचा अन वैतागायचा तर ती ब्यान्केच ATM नीट काम करत नाही म्हणून ब्यांकेत जाऊन गोंधळ घालून यायची. २४ तास घरात पाणी असणार्या तिला पाण्याच ATM माहित नव्हत तर काही किलोमीटर दूर असणार्या ब्यांकेत जाऊन धुमाकुळ घालता येतो हे त्याला पटतच नव्हत. घरात, शेजारी, मित्र मैत्रीण यांसोबत दोघांच बर्याचदा बिनसायच मग त्याचा परिणाम त्यांच्या बोलण्यावर व्हायचा पण भांडण नाही.. फक्त एकमेकांना समजावण, कधी कधी चर्चा करण.. कधी मत जुळायची कधी मतभेद व्हायचे. पण अबोला यायचं कारण नव्हतच कधी. त्या दोघांनीही बाजू एकदम सुरळीत सावरली होती. कधी स्वतःची तर कधी समोरच्याची.

कधी काळी एकमेकांना अनोळखी असलेले ते दोघ, आता स्वतःपेक्षा जास्त ओळखायला लागलेले असतात एकमेकांना. महिने जातात. त्यांचं अनोळखी नात घनिष्ठ होत जात. मैत्रीच्या थोड पलीकडे आणि प्रेमाच्या थोडस अलीकडे .. मग एक दिवस ती सांगते, "माझ लग्न ठरतंय.पहिलच स्थळ.एकदम जुळल…अचानकच” तो थोडावेळ शांत; मग उत्तरतो , "अभिनंदन, नवर्याला जास्त सतवू नकोस.." ती गप्प बसते.. तो हि काही बोलत नाही.. काही दिवस जातात मग आठवडे. संवाद थांबतो. अडखडत बोलण वाढत. एकमेकांशी बोलण्याची लागलेली सवय कि व्यसन तेही कमी होत जात. भावनांचा वाढलेला गोंधळ लक्षात आलेला असतो दोघांच्या पण त्यावर पर्याय नसतो किंवा जो होता तो मान्य नसतो. ती हि आता भावी नवर्याबरोबर स्वप्न रंगवण्यात गुंतलेली असते. तो हि कामात स्वतःला गुरफटवून घेतो. महिने जातात.

मग एक दिवस ती त्याला लग्नाच्या पत्रिकेचा फोटो पाठवते पण सोबत एक मेसेज देखील.. "पाहिलं प्रेम विसरता येत नाही म्हणतात, तुलाही नाही विसरू शकणार मी..." नकळत मनातल, अस्पष्टपणे सांगितलं जात. त्याचाही दोन दिवसांनी रिप्लाय येतो.."मी आर्मी जॉईन करतोय . तुझ्यावरच प्रेम व्यक्त नाही करू शकलो पण मातृभूमिवरच प्रेम सिद्ध करतोय. तुही नेहमीच असशील माझ्या आठवणीत. तूच पहिलं आणि तूच शेवटच प्रेम. काळजी घे. आनंदात राहा. मी नसेन तरीही असेन आठवतंय आपल आवडत वाक्य... "हसताना बरेच जण येतात सोबत द्यायला...पण रडताना कोणाची सोबत असेल तर बात बन जाये ... " फक्त आठवणी पुरेशा आहेत ग... अलविदा"

ती बोहल्यावर चढली नि तो आर्मीत ड्युटीवर रुजू झाला. तिने लग्नाचा शालू नेसला आणि त्याने वर्दी चढवली. तिचा संसार सुरु झाला अन त्याची लढाई. शहीद झाला तेव्हा मुखात वन्दे मातरम सोबत तीच नाव होत. तिनेही वर्तमानपत्रात त्याची बातमी वाचली. रडत राहिली बराच वेळ.. पण आजही जेव्हा तिला खूप खूप रडायचं असत तेव्हा ती त्याच्याशीच बोलते... रात्रीच्या चांदण्यात त्याला शोधत हितगुज साधते. आजही “तो” तिच्यासोबत आहे आणि राहील...

मयुरी चवाथे – शिंदे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली.

वाव मयुरी, खूप छान लिहिले आहेस. ह्रुदयाला भिडले.
खरच काही माणसे येतात अशी आयुश्यात की ती कधीच विसरू शकत नाहीत

khup chan

हसताना बरेच जण येतात सोबत द्यायला...पण रडताना कोणाची सोबत असेल तर बात बन जाये .>>>> हे वॉ अ स्टेट्स ठेऊ का??? तुझ्या नावासकट???

सर्वांचे मनापासून आभार .

राखी... एवढा प्रामाणिकपणा? छान वाटल . ... चालेल कि ग ...ठेव बिनधास्त

धन्स. ठेवलय. सध्या च्या माझ्या मनःस्थिती साठी परफेक्ट आहे म्हणुन. थँक्यु वन्स अगेन. आणि कथा खुप मस्त आहे.