तुम्हा सर्वांना 'ऑलिम्पिक्स' माहीत असेलच! जसं ऑलिम्पिक्समध्ये सर्व जगभरातून खेळाडूंसाठी वेगवेगळे क्रीडाप्रकार असतात, त्याच प्रमाणे 'स्पेशल ऑलिम्पिक्स' मध्ये सर्व जगभरातून 'इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी' असलेले खेळाडू , विविध क्रीडाप्रकारांमधले आपले प्राविण्य आजमावून पाहतात. इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी म्हणजे त्यात फ्रजाईल एक्स सिंड्रोम आला, डाउन्स सिंड्रोम आला तसेच ऑटीझमही. कोणाला खेळासाठीच्या इंस्ट्रक्शन्स फॉलो करणे अवघड जाईल, तर कोणाला धडपडायला होईल. इट डझन्ट मॅटर. कारण स्पेशल ऑलिम्पिक्सचा मोटो, स्लोगन आहे : Let me win, but if I cannot win, let me be brave in the attempt.
ह्यावेळेस स्पेशल ऑलिम्पिक्स २५ जुलै पासून १० दिवस, लॉस एंजिलीस येथे होणार आहेत. गेल्या वेळेस ते अथेन्स, ग्रीस येथे झाले होते. कितीतरी खेळाडू येऊन आपापले प्राविण्य आजमावून पाहत असतील, खेळाचा, स्पर्धात्मक वातावरणाचा आनंद घेत असतील व अनेक अविस्मरणिय आठवणी गोळा करत असतील.
आणि आता आनंदाची बातमी सांगते. ह्या वेळेसच्या स्पेशल ऑलिंपिक्समध्ये माझा मुलगा भाग घेणार आहे! 'जिम्नॅस्टीक्स' ह्या क्रीडाप्रकारात!
साधारण शाळेच्या सुरवातीला शाळेने आमच्याकडून एक परवानगीचा फॉर्म भरून घेतला होता. २.५ - ७ वर्षे वयाच्या मुलांसाठी असलेला स्पेशल ऑलिम्पिक्स - यंग अॅथलिट प्रोग्रॅमसाठी. ह्या मध्ये बॉलला किक मारणे, बॉल फेकणे, उड्या, बॅलन्सिंग बीमवर चालणे इत्यादी वेगवेगळे प्रकार आहेत. माझ्या मुलाला अजुन हमखास किक किंवा थ्रो करता येत नसल्याने त्याचे नाव आम्ही बॅलन्स बीमवर चालणे ह्यासाठी दिले. (आणि विसरून गेलो!)
पण गेल्या आठवड्यात मुलाची एंट्री कन्फर्म करण्यासाठी, तसेच त्याला देण्यात येणार्या ट्रेनिंगची माहिती देण्यासाठी फोन आला. आणि खरं सांगते - तेव्हा ट्युबलाईट पेटली. धिस इज रिअली हॅपनिंग! १ ऑगस्टला संध्याकाळी मुलाचा इव्हेंट आहे! फर्स्ट लेडी - मिशेल ओबामा ओपनिंग सेरेमनीला येणार आहेत. ऑलिंपिक्सची ज्योत लॉस एंजिलीसमधून कशी फिरवली.. वेगवेगळ्या बातम्या वाचून दिवसेंदिवस हे सगळं टू गुड टू बी ट्रू वाटू लागले आहे. अर्थात आमचा मुलगा तिथे काय नक्की करणार आहे कोण जाणे. कारण अशा इव्हेंट्समध्ये , कॉन्सर्ट्समध्ये आई बाबांच्या आठवणीने रडणे व अपेक्षित असलेली अॅक्टीव्हिटी न करणे हे तो नित्यनेमाने करतो! काही का असेना. ऑलिम्पिक्समध्ये भाग घ्यायला मिळतोय, त्याच्या आवडत्या गोष्टी करायला मिळातील - भरपूर दंगा व फिजिकल अॅक्टीव्हिटी. हारजीत तर लांबचीच गोष्ट आहे! आय अॅम रिअली रिअली हॅपी फॉर हीम!
मस्त बातमी ! पिल्लाला खूप खूप
मस्त बातमी ! पिल्लाला खूप खूप शुभेच्छा !
अपडेट करा, वाट पाहतो..>>>+१
छोट्या वॉरिअरला शुभेच्छा !
छोट्या वॉरिअरला शुभेच्छा !
अरे वा !! अभिनंदन आणि
अरे वा !! अभिनंदन आणि शुभेच्छा ..
सर्वांचे खूप आभार! आमची जमेल
सर्वांचे खूप आभार! आमची जमेल तशी प्रॅक्टीस झाली एकदा दोनदा. काय करणार आहे उद्या माहीत नाही!
इथे नक्की लिहीते मी २ दिवसात.
Great!!! Khup khup
Great!!! Khup khup shubhecchaa!
मस्त झाला इव्हेंट!! मुलाने
मस्त झाला इव्हेंट!! मुलाने एकदाही न रडता अतिशय एन्जॉय केले पूर्ण वेळ! जिम्नॅस्टीकसाठी शूज असून चालत नाहीत, ते शूज काढू दिले. ऑलिम्पिक्सची जर्सी दिली ती घालून घेतली! अगदीच गुणी बाळ होते त्या दिवशी!
मुलाचा इव्हेंट पावणे सातला होता. आम्हाला पावणे सहाला बोलवले होते. एक तास प्रॅक्टीससाठी दिला होता. ह्या अशा मोठ्या हॉलमध्ये सर्व देशाचे सर्व स्पर्धक प्रॅक्टीस करत होते.
बाहेर मेन जिम्नॅस्टीक स्टेडीयममध्ये भरपूर गर्दी जमा होत होती. सर्व देशांचे स्पर्धक ओळीने अभिवादन करून जात होते.
'टॉय्ज आर अस' ने स्पॉन्सर केलेला हा इव्हेंट असल्याने सगळीकडे तसे बॅनर लागले होते. '#मायफर्स्ट्स्पोर्ट्समोमेंट' असा हॅशटॅगही तयार करण्यात आला होता. आणि आम्ही आतमध्ये नाव पुकारण्याची वाट पाहात उभे होतो. यंग अॅथ्लिट्स, माय फर्स्ट स्पोर्ट्स मोमेंटमधील स्पर्धक असे पुकारल्याबरोबर आम्ही ६-७ स्पर्धक पालक व स्पर्धेतील प्रत्येक एक स्वयंसेवकांचा हात धरून जिम्नॅस्टीक अरिनामध्ये आलो. टाळ्यांचा कडकडाटात स्वागत झाले. माझ्याही नकळत डोळे पाण्याने भरून गेले. तेव्हा काय वाटले ते शब्दात सांगणे अवघड आहे.. पूर्ण फेरी मारताना 'आईस आईस बेबी' व तत्सम म्युझिक लावले होते. परिचितांचे हातवारे दिसत होते. चक्क म्हणजे एखादा अपवाद वगळता एव्हढ्या टाळ्यांचा कडकडाट, लाऊड म्युझिक, गर्दी ह्या सगळ्यांचा सेन्सरी ओव्हरलोड फारसा कोणाला झाला नाही. समहाऊ मुलांना ती व्हाईब, ते उत्साही वातावरण पोचले असावे. माझ्या मुलाने देखील म्युझिकवर नाचत , उड्या मारत फेरी पूर्ण केली. नंतर प्रत्येकाचे नाव घेतल्यावर इव्हेंट पूर्ण केला. माझ्या मुलाने देखील बीमवर चांगले चालून दाखवले. माझा हात धरूनच चालला, पण खरं तर ते महत्वाचे नव्हतेच! आपले नाव पुकारले जात आहे, लोकं त्यावर टाळ्या वाजवत आहेत हे समजत होते त्यांना. इव्हेंट झाल्यावर ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल मिळालेल्या विविध देशांच्या स्पर्धकांकडून प्रत्येकाला मेडल देण्यात आले. टॉय्ज आर अस कडून एक ब्लॉक्सचा गेम, बॅगपॅक, जेफरी जिराफ, फुटबॉल असा भरपूर खजिना मिळाला. ग्रुप फोटोज झाले. व सगळे स्पर्धक पेंगूळले अन पालकांच्या कुशीत जाऊन विसावले!
मुलाचे ऑलिम्पिक्सचे मेडल..
मुलाची जर्सी :
अन् हा माझा शर्टः
Yup! That's what I am.. A very Proud Parent!!
मस्त मस्त!! फोटो अगदी मस्त
मस्त मस्त!! फोटो अगदी मस्त आहेत...
आम्ही basketball आणी swimming मधे volunteering करत होतो...मुलांचा उत्साह अगदी टीपेला पोचला होता...
फार फार छान वाटलं वाचून. डोळे
फार फार छान वाटलं वाचून. डोळे भरुन आले वाचताना. अशीच पिल्लाची दिवसेंदिवस प्रगती होवो.
वाह! किती मस्त! खूप छान
वाह! किती मस्त! खूप छान लिहिलंयस मवॉ. पिल्लुनी enjoy केलं हे वाचून आनंद झालाय.
तुमचे, पिल्लू वॉरियरचे अन
तुमचे, पिल्लू वॉरियरचे अन बाबा वॉरियरचे अभिनंदन.
मेडल अन बॅग एकदम देखणे आहेत.
वा वा, मस्त पिल्लु, आई, बाबा
वा वा, मस्त
पिल्लु, आई, बाबा सगळ्यांचेच खूप खूप अभिनंदन !
म वॉ तुला एक कडक ___/ सॅल्युट
अरे वा! तुम्हा तिन्ही
अरे वा! तुम्हा तिन्ही वॉरिअर्सचे अभिनंदन!
फार फार छान वाटलं वाचून. डोळे
फार फार छान वाटलं वाचून. डोळे भरुन आले वाचताना. अशीच पिल्लाची दिवसेंदिवस प्रगती होवो. >>>>+१००
तुम्हा तिन्ही वॉरिअर्सचे
तुम्हा तिन्ही वॉरिअर्सचे अभिनंदन!!! > ख्ररच
फार फार छान वाटलं वाचून. डोळे
फार फार छान वाटलं वाचून. डोळे भरुन आले वाचताना. अशीच पिल्लाची दिवसेंदिवस प्रगती होवो>>> +१/
मदर वॉरीअर. हा खरंच आम्हा सर्वांसाठी ही प्राऊड मोमेंट आहे. पिल्लू वॉरीअरला खूप सार्या शुभेच्छा. जियो मेरे लाल.
फार फार छान वाटलं वाचून. डोळे
फार फार छान वाटलं वाचून. डोळे भरुन आले वाचताना. अशीच पिल्लाची दिवसेंदिवस प्रगती होवो. >>>> + १ देवीदेवतींना अनेक नावे असतात तशी तुला अनेक नांवे देता येतील ....त्यातलं एक
'प्रेरणा'.....
वॉव!! वाचताना माझ्या अंगावर
वॉव!! वाचताना माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं. तुम्ही प्रत्यक्ष त्याठिकाणी हजर होतात, तुमच्या भावना किती आणि कश्या उचंबळून आल्या असतील ह्याची मी कल्पना करू शकते... फोटो बघताना, गेम्सचं वर्णन वाचताना एकदम भारी वाटत होतं. मेडल आणि बाकी गिफ्ट्स मस्तच आहेत.. पिल्लाला अनेकानेक शुभेच्छा आणि गोड गोड पाप्या.
खुप खुप मस्त वाटले वाचुन....
खुप खुप मस्त वाटले वाचुन.... खुप शुभेच्छा
अभिनंदन !!! We are proud of
अभिनंदन !!!
We are proud of you !!
अभिनंदन ....
अभिनंदन ....
फार फार मस्त वाटल वाचून.
फार फार मस्त वाटल वाचून. तुमच लेकाच जोरदार अभिनंदन.
उत्तरोत्तर अश्याच टाळ्या मिळोत पिलू वॉरिअर अन मदर वॉरिअर ला
ग्रेट, ग्रेट. अभिनंदन, पिलू
ग्रेट, ग्रेट.
अभिनंदन, पिलू आणि आईबाबा तिघांचेही.
अभिनंदन
अभिनंदन
मस्तं. पिल्लु, आई, बाबा
मस्तं. पिल्लु, आई, बाबा सगळ्यांचेच खूप खूप अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन. मम्मा व बेबी
हार्दिक अभिनंदन. मम्मा व बेबी टीम रॉक्स.
मनापासून अभिनंदन !
मनापासून अभिनंदन !
वॉव!! वाचताना माझ्या अंगावर
वॉव!! वाचताना माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं. तुम्ही प्रत्यक्ष त्याठिकाणी हजर होतात, तुमच्या भावना किती आणि कश्या उचंबळून आल्या असतील ह्याची मी कल्पना करू शकते... फोटो बघताना, गेम्सचं वर्णन वाचताना एकदम भारी वाटत होतं. मेडल आणि बाकी गिफ्ट्स मस्तच आहेत.. पिल्लाला अनेकानेक शुभेच्छा आणि गोड गोड पाप्या. >> +१ अभिनंदन मवॉ आणि पिल्लुवॉ!!!!!
खूप छान वाटलं वाचून ...
खूप छान वाटलं वाचून ... अभिनंदन !! अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे पिल्लू ची ..
अभिनंदन! अशीच सदैव प्रगती
अभिनंदन! अशीच सदैव प्रगती होवो,.शुभेच्छा
आई-बाबा आणि बाळाचं मनःपूर्वक
आई-बाबा आणि बाळाचं मनःपूर्वक अभिनंदन!
>>चक्क म्हणजे एखादा अपवाद वगळता एव्हढ्या टाळ्यांचा कडकडाट, लाऊड म्युझिक, गर्दी ह्या सगळ्यांचा सेन्सरी ओव्हरलोड फारसा कोणाला झाला नाही. समहाऊ मुलांना ती व्हाईब, ते उत्साही वातावरण पोचले असावे. माझ्या मुलाने देखील म्युझिकवर नाचत , उड्या मारत फेरी पूर्ण केली
हे खरोखर अमेझिंग आहे!
Pages