Special Olympics World Summer Games - LA 2015

Submitted by Mother Warrior on 3 July, 2015 - 16:18

980x420REACHUP-USC_WEBBANNERS_red-08-lamcsa-980x420.jpg

तुम्हा सर्वांना 'ऑलिम्पिक्स' माहीत असेलच! जसं ऑलिम्पिक्समध्ये सर्व जगभरातून खेळाडूंसाठी वेगवेगळे क्रीडाप्रकार असतात, त्याच प्रमाणे 'स्पेशल ऑलिम्पिक्स' मध्ये सर्व जगभरातून 'इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी' असलेले खेळाडू , विविध क्रीडाप्रकारांमधले आपले प्राविण्य आजमावून पाहतात. इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी म्हणजे त्यात फ्रजाईल एक्स सिंड्रोम आला, डाउन्स सिंड्रोम आला तसेच ऑटीझमही. कोणाला खेळासाठीच्या इंस्ट्रक्शन्स फॉलो करणे अवघड जाईल, तर कोणाला धडपडायला होईल. इट डझन्ट मॅटर. कारण स्पेशल ऑलिम्पिक्सचा मोटो, स्लोगन आहे : Let me win, but if I cannot win, let me be brave in the attempt. Happy

ह्यावेळेस स्पेशल ऑलिम्पिक्स २५ जुलै पासून १० दिवस, लॉस एंजिलीस येथे होणार आहेत. गेल्या वेळेस ते अथेन्स, ग्रीस येथे झाले होते. कितीतरी खेळाडू येऊन आपापले प्राविण्य आजमावून पाहत असतील, खेळाचा, स्पर्धात्मक वातावरणाचा आनंद घेत असतील व अनेक अविस्मरणिय आठवणी गोळा करत असतील.

YoungAthllogo1.jpg

आणि आता आनंदाची बातमी सांगते. ह्या वेळेसच्या स्पेशल ऑलिंपिक्समध्ये माझा मुलगा भाग घेणार आहे! 'जिम्नॅस्टीक्स' ह्या क्रीडाप्रकारात! Happy
साधारण शाळेच्या सुरवातीला शाळेने आमच्याकडून एक परवानगीचा फॉर्म भरून घेतला होता. २.५ - ७ वर्षे वयाच्या मुलांसाठी असलेला स्पेशल ऑलिम्पिक्स - यंग अ‍ॅथलिट प्रोग्रॅमसाठी. ह्या मध्ये बॉलला किक मारणे, बॉल फेकणे, उड्या, बॅलन्सिंग बीमवर चालणे इत्यादी वेगवेगळे प्रकार आहेत. माझ्या मुलाला अजुन हमखास किक किंवा थ्रो करता येत नसल्याने त्याचे नाव आम्ही बॅलन्स बीमवर चालणे ह्यासाठी दिले. (आणि विसरून गेलो!)

पण गेल्या आठवड्यात मुलाची एंट्री कन्फर्म करण्यासाठी, तसेच त्याला देण्यात येणार्‍या ट्रेनिंगची माहिती देण्यासाठी फोन आला. आणि खरं सांगते - तेव्हा ट्युबलाईट पेटली. धिस इज रिअली हॅपनिंग! १ ऑगस्टला संध्याकाळी मुलाचा इव्हेंट आहे! फर्स्ट लेडी - मिशेल ओबामा ओपनिंग सेरेमनीला येणार आहेत. ऑलिंपिक्सची ज्योत लॉस एंजिलीसमधून कशी फिरवली.. वेगवेगळ्या बातम्या वाचून दिवसेंदिवस हे सगळं टू गुड टू बी ट्रू वाटू लागले आहे. अर्थात आमचा मुलगा तिथे काय नक्की करणार आहे कोण जाणे. कारण अशा इव्हेंट्समध्ये , कॉन्सर्ट्समध्ये आई बाबांच्या आठवणीने रडणे व अपेक्षित असलेली अ‍ॅक्टीव्हिटी न करणे हे तो नित्यनेमाने करतो! Happy काही का असेना. ऑलिम्पिक्समध्ये भाग घ्यायला मिळतोय, त्याच्या आवडत्या गोष्टी करायला मिळातील - भरपूर दंगा व फिजिकल अ‍ॅक्टीव्हिटी. हारजीत तर लांबचीच गोष्ट आहे! आय अ‍ॅम रिअली रिअली हॅपी फॉर हीम!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा वा. गुड न्युज. Happy

अभिनंदन आणि शुभेच्छा तुमच्या मुलाला आणि तुम्हाला.

ओ हो, किती सुर्रेख उपक्रम ...

अभिनंदन अणि पिल्लू वॉरीयरला शुभेच्छा! >>>>> +१००

हारजीत तर लांबचीच गोष्ट आहे! आय अ‍ॅम रिअली रिअली हॅपी फॉर हीम! >>>> किती नेमकं मांडलंत ....

आणि आता आनंदाची बातमी सांगते. ह्या वेळेसच्या स्पेशल ऑलिंपिक्समध्ये माझा मुलगा भाग घेणार आहे! 'जिम्नॅस्टीक्स' ह्या क्रीडाप्रकारात!>>> अभिनंदन!!!!! अजुन पुढचे वाचायचे आहे Happy

अभिनंदन अणि पिल्लू वॉरीयरला शुभेच्छा!>>> +१००

हारजीत तर लांबचीच गोष्ट आहे! आय अ‍ॅम रिअली रिअली हॅपी फॉर हीम!>>> We too Happy

अभिनंदन. तुमच्या पिल्लाचं खरंच कौतुक!!

तिथं जाऊन भरपूर् दंगामस्ती करू देत, आणि त्याला हे सग्ळेच इव्हेंट मनापासून इंजॉय करू देत अशी शुभेच्छा!!!

Great !!
happy for your family.. Happy
Best of luck for the event.. Happy

Slogan khupch aavdl Olympics ch ..

अरे वा किती छान बातमी! आम्हालाच इतकं छान वाटतंय तर तु आनंदाने किती भारावली असशील ... अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा !

Pages