तुम्हा सर्वांना 'ऑलिम्पिक्स' माहीत असेलच! जसं ऑलिम्पिक्समध्ये सर्व जगभरातून खेळाडूंसाठी वेगवेगळे क्रीडाप्रकार असतात, त्याच प्रमाणे 'स्पेशल ऑलिम्पिक्स' मध्ये सर्व जगभरातून 'इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी' असलेले खेळाडू , विविध क्रीडाप्रकारांमधले आपले प्राविण्य आजमावून पाहतात. इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी म्हणजे त्यात फ्रजाईल एक्स सिंड्रोम आला, डाउन्स सिंड्रोम आला तसेच ऑटीझमही. कोणाला खेळासाठीच्या इंस्ट्रक्शन्स फॉलो करणे अवघड जाईल, तर कोणाला धडपडायला होईल. इट डझन्ट मॅटर. कारण स्पेशल ऑलिम्पिक्सचा मोटो, स्लोगन आहे : Let me win, but if I cannot win, let me be brave in the attempt.
ह्यावेळेस स्पेशल ऑलिम्पिक्स २५ जुलै पासून १० दिवस, लॉस एंजिलीस येथे होणार आहेत. गेल्या वेळेस ते अथेन्स, ग्रीस येथे झाले होते. कितीतरी खेळाडू येऊन आपापले प्राविण्य आजमावून पाहत असतील, खेळाचा, स्पर्धात्मक वातावरणाचा आनंद घेत असतील व अनेक अविस्मरणिय आठवणी गोळा करत असतील.
आणि आता आनंदाची बातमी सांगते. ह्या वेळेसच्या स्पेशल ऑलिंपिक्समध्ये माझा मुलगा भाग घेणार आहे! 'जिम्नॅस्टीक्स' ह्या क्रीडाप्रकारात!
साधारण शाळेच्या सुरवातीला शाळेने आमच्याकडून एक परवानगीचा फॉर्म भरून घेतला होता. २.५ - ७ वर्षे वयाच्या मुलांसाठी असलेला स्पेशल ऑलिम्पिक्स - यंग अॅथलिट प्रोग्रॅमसाठी. ह्या मध्ये बॉलला किक मारणे, बॉल फेकणे, उड्या, बॅलन्सिंग बीमवर चालणे इत्यादी वेगवेगळे प्रकार आहेत. माझ्या मुलाला अजुन हमखास किक किंवा थ्रो करता येत नसल्याने त्याचे नाव आम्ही बॅलन्स बीमवर चालणे ह्यासाठी दिले. (आणि विसरून गेलो!)
पण गेल्या आठवड्यात मुलाची एंट्री कन्फर्म करण्यासाठी, तसेच त्याला देण्यात येणार्या ट्रेनिंगची माहिती देण्यासाठी फोन आला. आणि खरं सांगते - तेव्हा ट्युबलाईट पेटली. धिस इज रिअली हॅपनिंग! १ ऑगस्टला संध्याकाळी मुलाचा इव्हेंट आहे! फर्स्ट लेडी - मिशेल ओबामा ओपनिंग सेरेमनीला येणार आहेत. ऑलिंपिक्सची ज्योत लॉस एंजिलीसमधून कशी फिरवली.. वेगवेगळ्या बातम्या वाचून दिवसेंदिवस हे सगळं टू गुड टू बी ट्रू वाटू लागले आहे. अर्थात आमचा मुलगा तिथे काय नक्की करणार आहे कोण जाणे. कारण अशा इव्हेंट्समध्ये , कॉन्सर्ट्समध्ये आई बाबांच्या आठवणीने रडणे व अपेक्षित असलेली अॅक्टीव्हिटी न करणे हे तो नित्यनेमाने करतो! काही का असेना. ऑलिम्पिक्समध्ये भाग घ्यायला मिळतोय, त्याच्या आवडत्या गोष्टी करायला मिळातील - भरपूर दंगा व फिजिकल अॅक्टीव्हिटी. हारजीत तर लांबचीच गोष्ट आहे! आय अॅम रिअली रिअली हॅपी फॉर हीम!
भारीये!!! धमाल मजा करा,
भारीये!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धमाल मजा करा, शुभेच्छा
वॉव ! ग्रेट !!अभिनंदन तुमचं
वॉव ! ग्रेट !!अभिनंदन तुमचं अन लेकाचं पण !!
अरे वा वा. गुड न्युज.
अरे वा वा. गुड न्युज.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन आणि शुभेच्छा तुमच्या मुलाला आणि तुम्हाला.
छानच बातमी! अभिनंदन अणि
छानच बातमी! अभिनंदन अणि पिल्लू वॉरीयरला शुभेच्छा!
छान .... तुम्हाला आणि
छान .... तुम्हाला आणि लेकालाखुप मज्जा येउ दे.
मस्तच ! अभिनंदन आणि खूप
मस्तच !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !
अभिनंदन, आणि शुभेच्छा!
अभिनंदन, आणि शुभेच्छा!
ग्रेट!! अभिनन्दन आणि शुभेच्छा
ग्रेट!! अभिनन्दन आणि शुभेच्छा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चांगली बातमी आहे. शुभेच्छा
चांगली बातमी आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शुभेच्छा
ओ हो, किती सुर्रेख उपक्रम ...
ओ हो, किती सुर्रेख उपक्रम ...
अभिनंदन अणि पिल्लू वॉरीयरला शुभेच्छा! >>>>> +१००
हारजीत तर लांबचीच गोष्ट आहे! आय अॅम रिअली रिअली हॅपी फॉर हीम! >>>> किती नेमकं मांडलंत ....
आणि आता आनंदाची बातमी सांगते.
आणि आता आनंदाची बातमी सांगते. ह्या वेळेसच्या स्पेशल ऑलिंपिक्समध्ये माझा मुलगा भाग घेणार आहे! 'जिम्नॅस्टीक्स' ह्या क्रीडाप्रकारात!>>> अभिनंदन!!!!! अजुन पुढचे वाचायचे आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन अणि पिल्लू वॉरीयरला
अभिनंदन अणि पिल्लू वॉरीयरला शुभेच्छा!>>> +१००
हारजीत तर लांबचीच गोष्ट आहे! आय अॅम रिअली रिअली हॅपी फॉर हीम!>>> We too![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन. तुमच्या पिल्लाचं
अभिनंदन. तुमच्या पिल्लाचं खरंच कौतुक!!
तिथं जाऊन भरपूर् दंगामस्ती करू देत, आणि त्याला हे सग्ळेच इव्हेंट मनापासून इंजॉय करू देत अशी शुभेच्छा!!!
मस्तं मस्तं! अभिनंदन आणि खूप
मस्तं मस्तं!
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !!
Great !! happy for your
Great !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
happy for your family..
Best of luck for the event..
Slogan khupch aavdl Olympics ch ..
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
अरे वा! अभिनंदन अणि पिल्लू
अरे वा!
अभिनंदन अणि पिल्लू वॉरीयरला शुभेच्छा! >>>>> +१००
अभिनंदन.. खरं तर मन आनम्दाने
अभिनंदन.. खरं तर मन आनम्दाने भरून आलेय. एका शब्दात नाही सांगता येत !
अभिनंदन आणि शुभेच्छा मुलाला
अभिनंदन आणि शुभेच्छा मुलाला आणि तुम्हाला.....
मस्त!! अभिनंदन!!
मस्त!! अभिनंदन!!
अरे वा किती छान बातमी!
अरे वा किती छान बातमी! आम्हालाच इतकं छान वाटतंय तर तु आनंदाने किती भारावली असशील ... अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
खरंच आनंदाची बातमी. तुम्हा
खरंच आनंदाची बातमी. तुम्हा दोघा वॉरियर माय लेकरांना खूप खूप शुभेच्छा!
खूप आनंदाची बातमी आहे
खूप आनंदाची बातमी आहे
पिल्लूला खूप शुभेच्छा .
अभिनंदन!! सन वॉरियरला
अभिनंदन!! सन वॉरियरला शुभेच्छा.
अरे वा! अभिनंदन आणि छोट्याच
अरे वा! अभिनंदन आणि छोट्याच कौतुक.
Thank you so much everyone,
Thank you so much everyone, for your wishes!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान बातमी, तुमचे आणि
खूप छान बातमी, तुमचे आणि मुलाचे अभिनंदन!
मस्त!! अभिनंदन!!
मस्त!! अभिनंदन!!
मस्त बातमी. अभिनंदन!
मस्त बातमी. अभिनंदन!
Pages