...अंथरूण पांघरूण, थंडीला कांगरून, फिरकीचा तांब्या, न्याहारीला दशम्या, तहानलाडू, भूकलाडू, कांदा अन् चटणी, चुलीसाठी सरपण, पेटवायाला फुकणी, चहापत्ती, साखरपुडा, तांब्या, भगुलं.....पाठिवरती बिर्हाड.....
"दे धक्का" चित्रपटातील हे गाणं ऐकलं आणि मन पार भूतकाळात गेलं. निमित्त होतं गावच्या वार्षिक जत्रौत्सवाच. पूर्वी गावी यात्रेला जायच म्हणजे हि सगळी तयारी दोन दिवस आधीच करावी लागायची. जत्रेच्या दोन दिवस आधी गावी जायचो. गावातील सगळी मंडळी आपली बैलगाडी सजवायचे, बैलांना न्हाऊमाखु घालुन पुरणावरणाचे जेवण द्यायचे. रानात जाऊन कावळीची वेल बैलगाडीला अर्धवर्तुळाकार लावून सावलीसाठी रंगीबेरंगी कपड्यांनी सजवली जायची. जत्रेच्या आदल्या दिवशी दुपारी किंवा त्याच दिवशी पहाटे गावातल्या सगळ्या सजवलेल्या बैलगाड्या घुंगराच्या तालात एकापाठोपाठ जत्रेला जायला निघायच्या. वाटेत घडीभर विसावा घेत, एखाद्या डेरेदार झाडाच्या खाली, सकाळीच बाधुंन आणलेलं पिठलं भाकर, कांदा खात, विहिरीच थंडगार गोड पाणी चाखत हा प्रवास चालायचा. जत्रेच्या ठिकाणी चुलीवरची गरमागरम ज्वारीची/बाजरीची भाकरी आणि रटरटणार्या कालवणाची चव काही न्यारीच. भर उन्हात विहिरीवर केलेली आंघोळ, पितळेच्या ताटातली गरमागरम न्याहारी, गुळाचा चहा, जत्रेत हट्टाने मागितलेली खेळणी, पत्र्याची शिट्टी, गर्दीत घुसुन देवाचे घेतलेले देवाचे दर्शन, कंदी पेढ्याचा प्रसाद सारं काही आठवताना नकळत डोळे पाणावतात.
कालांतराने बैलगाड्याची जागा लाल डब्याच्या यश्टीने घेतली, नंतर स्वत:च्या चारचाकी गाड्या आल्या, तीन दिवस जत्रेचा काहि वेळा एक दिवसच झाला, गुळाच्या चहाची जागा साखरेने घेतली, तांब्या-पितळेच्या जागी आता प्लास्टिक/स्टील आले. जग जसजसे पुढे जाते तसतसे हे बदल घडणारच. "बदल" हा असावा किंबहुना तो असलाच पाहिजे, पण काहि काही गोष्टी या मात्र नक्की कधीही बदलु नये असंच वाटतं. म्हणुन तर आजही जत्रेच्या या सर्व आठवणींची जागा बदलली नाही.....बदलणार नाही.
आमच्या गावची (जावली, तालुका फलटण, जिल्हा सातारा) यात्राही इतर गावांसारखीच असते, पण सार्या पंचक्रोशीत हि यात्रा प्रसिद्ध आहे ती धडका, बगाडं यासाठी.
धडका, बगाडं याबद्दल सविस्तर "ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती .... प्रचिलेख लिहिला आहे.
"सिद्धनाथाच्या नावान चांगभल....." या गजरात आमच्या कुलदैवताची यात्रा यावर्षी १५-१६ एप्रिल रोजी यथासांग पार पडली. त्याचीच हि एक चित्र झलकः
प्रचि ०१
प्रचि ०२
|| श्री सिद्धनाथ प्रसन्न||
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
देवाची पालखी (छबिना)
प्रचि ११
प्रचि १२
"बगाडं"
प्रचि १३
बगाड्याची तयारी
प्रचि १४
प्रचि १५
बगाडं घेताना
प्रचि १६
प्रचि १७
छोट्या लेकरासह बगाडं घेण्याच्या तयारीत असलेली हि माय
प्रचि १८
"सिद्धनाथाच्या नावानं चांगभल" म्हणत तान्ह्या लेकरासह बगाड घेताना
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
दहिवडी (माण), फलटण तालुक्यातील काही परीसर तसा दुष्काळी भाग म्हणुनच प्रसिद्ध. या विहिरीची पाण्याची पातळी एप्रिल महिन्यातच खालावली होती.
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
आजही या भागातील जत्रेच आकर्षण असलेला तंबूतील चित्रपट.
प्रचि ३४
जत्रेतील गरमागरम गोल भजी, चुलीवरची बाजरीची भाकर आणि मसालेदार रस्सा
प्रचि ३५
पायलीभर कुरमुरे, गरमागरम जिलेबी, कंदी पेढे, शेवचिवडा, बुंदी
प्रचि ३६
तटी: वरील सगळे प्रचि डिजीकॅमने काढले आहे. SLR कॅमेरा नेला नव्हता. )
जिप्सी, तू प्रूव्ह केलेस की
जिप्सी, तू प्रूव्ह केलेस की मस्त फोटो येण्यासाठी फोटोग्राफर चांगला पाहिजे, चांगला कॅमेरा नसला तरी चालतो. पुन्हा एकदा मस्त फोटो, खूप आवडले. लहान मुलांसोबत बगाड लावायला नको, अगदी आवश्यक ती सगळी खबरदारी घेतली असली तरी.
बगाडं प्रकार पहिल्यांदाच
बगाडं प्रकार पहिल्यांदाच बघितला!
छान आहेत फोटो! भजी, रस्सा वगैरे अफलातून!
फोटो मस्त आहेत. बगाडचा फोटो
फोटो मस्त आहेत.
बगाडचा फोटो पहिल्यांदाच पाहिला. नवस फेडण्यासाठी असतो हे तुझ्या प्रतिसादातुन कळाले आहेच.
किती वेळ बगाडला बांधुन ठेवतात?
मे कोरेगाव तालुक्यात एका गावात एका जत्रेला गेलो होतो (१९९४-९५ साली) पण त्या गावात तरी बगाड प्रथा दिसली नवह्ती.
पण खाउ मात्र तोच होता ज्याचे फोटो तु टाकलेत. त्या खाउचा त्यावेळी आनंद घेतला होताच.
जत्रेला जाउन आल्या सारखे
जत्रेला जाउन आल्या सारखे वाट्ले
कंसराज, वैद्यबुवा, झकास,
कंसराज, वैद्यबुवा, झकास, वैशाली प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!
किती वेळ बगाडला बांधुन ठेवतात? >>>>>अंदाजे २०-२५ सेकंद. एक राउंड पूर्ण होईपर्यंत. बगाड्याचा एक व्हिडियो काढण्याचा प्रयत्न केला एकुण वेळ २० सेकंद होतं.
पण त्या गावात तरी बगाड प्रथा दिसली नवह्ती.>>>>सगळ्याच गावात बगाडाची प्रथा नाही. काही गावातच आहे.
मला बी जत्रंला येऊ द्या की
मला बी जत्रंला येऊ द्या की रं.... >>>जिप्स्या माझी हि विनंती तुला पुढच्या जत्रेसाठी आतापासुनच
विसरु नकोस
(No subject)
सही फोटो शेवटचे २ टाकले
सही फोटो शेवटचे २ टाकले नसतेस तरी चाल्ल अस्त ...................>>>++११
बगाडं प्रकार पहिल्यांदाच बघितला!
मस्त रे मस्त जिप्स्या!! एकूण
मस्त रे मस्त जिप्स्या!! एकूण काय एस एल आर की डिजी याने फरक पडत नाही काढणार्याच्या हातातच कला पाहिजे
प्रचि ३६ चा कॉम्पोझिशन आवडलं.
नितीन, प्रसिक, सृष्टी, नीलू
नितीन, प्रसिक, सृष्टी, नीलू प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!
आमचं कुलदैवत श्री सिद्धनाथ.
आमचं कुलदैवत श्री सिद्धनाथ. मु.पो.जावली, ता. फलटण, जि. सातारा. Amhi ithe 5divas rahato haldi Pasoon Palkhi paryant . ( Jipsi Jithe Odha Ahe thithe Amhi Tent Bandhun rahato Ya Pudhalya Varshi Aamchya Palat khup Chan Majja yete.)
अफलातुनच...मला एकदा त्या
अफलातुनच...मला एकदा त्या बगाडाला जायची आणि अनुभवण्याची ईच्छा आहे...बघु कधी जमते ते...
पण खादाडी लैच भारी राव्...गावाकडचे बालपणि च्या बाजाराच्या आठवणि जाग्या झाल्या
बगाडं प्रकार काही कळला
बगाडं प्रकार काही कळला नाही.म्हणजे, वाचून वाटले, रोडगा वाहिन टाईप नवस असू शकतो. पण असाच का नवस फेडतात वरती टांगून तराजूसारखं? बगाडं म्हणजे तराजू का?
ह्यात काय दर्शवतात देवाला किंवा नक्की समजूत काय आहे?
मस्त फोटो आणि लेखनही. ३२ आणि
मस्त फोटो आणि लेखनही. ३२ आणि ३३ दिसत नाहीयेत.
बगाड, केदार शिंदेच्या एका चित्रपटात होतं.
Pages