मला बी जत्रंला येऊ द्या की रं....

Submitted by जिप्सी on 17 April, 2012 - 00:01

...अंथरूण पांघरूण, थंडीला कांगरून, फिरकीचा तांब्या, न्याहारीला दशम्या, तहानलाडू, भूकलाडू, कांदा अन् चटणी, चुलीसाठी सरपण, पेटवायाला फुकणी, चहापत्ती, साखरपुडा, तांब्या, भगुलं.....पाठिवरती बिर्‍हाड.....

"दे धक्का" चित्रपटातील हे गाणं ऐकलं आणि मन पार भूतकाळात गेलं. निमित्त होतं गावच्या वार्षिक जत्रौत्सवाच. पूर्वी गावी यात्रेला जायच म्हणजे हि सगळी तयारी दोन दिवस आधीच करावी लागायची. जत्रेच्या दोन दिवस आधी गावी जायचो. गावातील सगळी मंडळी आपली बैलगाडी सजवायचे, बैलांना न्हाऊमाखु घालुन पुरणावरणाचे जेवण द्यायचे. रानात जाऊन कावळीची वेल बैलगाडीला अर्धवर्तुळाकार लावून सावलीसाठी रंगीबेरंगी कपड्यांनी सजवली जायची. जत्रेच्या आदल्या दिवशी दुपारी किंवा त्याच दिवशी पहाटे गावातल्या सगळ्या सजवलेल्या बैलगाड्या घुंगराच्या तालात एकापाठोपाठ जत्रेला जायला निघायच्या. वाटेत घडीभर विसावा घेत, एखाद्या डेरेदार झाडाच्या खाली, सकाळीच बाधुंन आणलेलं पिठलं भाकर, कांदा खात, विहिरीच थंडगार गोड पाणी चाखत हा प्रवास चालायचा. जत्रेच्या ठिकाणी चुलीवरची गरमागरम ज्वारीची/बाजरीची भाकरी आणि रटरटणार्‍या कालवणाची चव काही न्यारीच. भर उन्हात विहिरीवर केलेली आंघोळ, पितळेच्या ताटातली गरमागरम न्याहारी, गुळाचा चहा, जत्रेत हट्टाने मागितलेली खेळणी, पत्र्याची शिट्टी, गर्दीत घुसुन देवाचे घेतलेले देवाचे दर्शन, कंदी पेढ्याचा प्रसाद सारं काही आठवताना नकळत डोळे पाणावतात.

कालांतराने बैलगाड्याची जागा लाल डब्याच्या यश्टीने घेतली, नंतर स्वत:च्या चारचाकी गाड्या आल्या, तीन दिवस जत्रेचा काहि वेळा एक दिवसच झाला, गुळाच्या चहाची जागा साखरेने घेतली, तांब्या-पितळेच्या जागी आता प्लास्टिक/स्टील आले. जग जसजसे पुढे जाते तसतसे हे बदल घडणारच. "बदल" हा असावा किंबहुना तो असलाच पाहिजे, पण काहि काही गोष्टी या मात्र नक्की कधीही बदलु नये असंच वाटतं. म्हणुन तर आजही जत्रेच्या या सर्व आठवणींची जागा बदलली नाही.....बदलणार नाही.

आमच्या गावची (जावली, तालुका फलटण, जिल्हा सातारा) यात्राही इतर गावांसारखीच असते, पण सार्‍या पंचक्रोशीत हि यात्रा प्रसिद्ध आहे ती धडका, बगाडं यासाठी.
धडका, बगाडं याबद्दल सविस्तर "ओढ लावती अशी जिवाला गावाकडची माती .... प्रचिलेख लिहिला आहे.

"सिद्धनाथाच्या नावान चांगभल....." या गजरात आमच्या कुलदैवताची यात्रा यावर्षी १५-१६ एप्रिल रोजी यथासांग पार पडली. त्याचीच हि एक चित्र झलकः

प्रचि ०१

प्रचि ०२
|| श्री सिद्धनाथ प्रसन्न||

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
देवाची पालखी (छबिना)

प्रचि ११

प्रचि १२
"बगाडं"
प्रचि १३
बगाड्याची तयारी
प्रचि १४

प्रचि १५
बगाडं घेताना
प्रचि १६

प्रचि १७
छोट्या लेकरासह बगाडं घेण्याच्या तयारीत असलेली हि माय
प्रचि १८
"सिद्धनाथाच्या नावानं चांगभल" म्हणत तान्ह्या लेकरासह बगाड घेताना
प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

दहिवडी (माण), फलटण तालुक्यातील काही परीसर तसा दुष्काळी भाग म्हणुनच प्रसिद्ध. या विहिरीची पाण्याची पातळी एप्रिल महिन्यातच खालावली होती.
प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३
आजही या भागातील जत्रेच आकर्षण असलेला तंबूतील चित्रपट.
प्रचि ३४
जत्रेतील गरमागरम गोल भजी, चुलीवरची बाजरीची भाकर आणि मसालेदार रस्सा
प्रचि ३५
पायलीभर कुरमुरे, गरमागरम जिलेबी, कंदी पेढे, शेवचिवडा, बुंदी Happy
प्रचि ३६

तटी: वरील सगळे प्रचि डिजीकॅमने काढले आहे. SLR कॅमेरा नेला नव्हता. Happy )

गुलमोहर: 

तटी: वरील सगळे प्रचि डिजीकॅमने काढले आहे. SLR कॅमेरा नेला नव्हता. >>> तरीही सर्व प्र.चि. उत्तम आले आहेत. Happy

सुंदर फोटो.
खादाडीचे मस्तच.
बगाडं प्रकार अगंबाई अरेच्च्या मधे पाहिलेला. डेंजरस वाटतय खरं.

छान फोटो

'मन उधाण वार्‍याचे' या गाण्यात ते बगाडं आहे का?

>>> नाही लले, त्या गाण्यात वाईजवळील बावधन गावातील बगाड आहे. ते बगाड गावभर मिरवत नेतात (बैलगाडीला जुंपून) तर हे बगाड एकाच जागी स्थिर आहे. अशी बगाडांची पध्धत सातारा जिल्ह्यातील बर्‍याच गावांमध्ये आहे. Happy

तो बगाडं प्रकार डेंजरस दिसतोय>>>>>नाही Happy लाजो, मानुषी, सस्मित, जेव्हढा डेंजरस वाटतोय तेव्हढा नाहीए. आवश्यक ती सगळी खबरदारी घेतली जात असल्याने आजवर येथे एकही अपघात घडला नाहीये. Happy

'मन उधाण वार्‍याचे' या गाण्यात ते बगाडं आहे का?
>>> नाही लले, त्या गाण्यात वाईजवळील बावधन गावातील बगाड आहे. ते बगाड गावभर मिरवत नेतात (बैलगाडीला जुंपून) तर हे बगाड एकाच जागी स्थिर आहे. अशी बगाडांची पध्धत सातारा जिल्ह्यातील बर्‍याच गावांमध्ये आहे>>>>>>अगदी अगदी. Happy

दुसरा फोटो सुंदर. ती कमान पूर्ण आली असती तर जास्त सुंदर दिसला असता पण हा पण भारीच दिसतोय.

देवा सिद्धनाथा हा जिप्सी जिकडे तिकडे फिरत असतो. फिरतो तर फिरतो वर जळवणारे फोटो टाकतो. टाकतो तर टाकतो पण त्यात शेवटी पोटात खड्डा पाडणारे फोटो असतातच असतात. देवा तूच आता त्याचा बंदोबस्त कर. त्याचं लग्न करून टाक Happy

व्वा. नेहमी प्रमाणेच मस्त!!!!
तु ते शेवटचे फोटो नको टाकत जाऊस रे. तोंडाला पाणि सुटत ऑफिस मधे बसल्या बसल्या. आणि हे सगळ मिळत पण नाही इथे Sad Wink

जिप्सी दहिवडी ला सातार्‍याहुन जायला खुप कमी वाहाने असतात का रे? लहानपणी मि सातार्‍याला गेले होते त्यावेळी मला वाट्त मी गेले होते दहिवडीला , नीट्स नाहि आठवत, तिथे शंकराच्या मोठ्या पिंड आहेत का?

माधव, अनुमोदन. मला हेच्च वाटतं नेहमी.
जिप्सी, खरं फार फार 'जे' वाटतं रे आम्हाला. Happy नेहमीप्रमाणेच मस्त प्रचि आहेत.

सर्व फोटो मस्त... Happy
हे बगाड म्हणजे बंजी त्र्याम्पोलीन सारखे आहे... Lol
बगाडला बाईला पण बांधतात?? Uhoh

सॉलीड..कसला भन्नाट अनुभव आहे...पुढच्या वेळी मला पण सांग रे...मला पण एकदा तरी गावाकडची जत्रा अनुभवायची आहे...

देवा सिद्धनाथा हा जिप्सी जिकडे तिकडे फिरत असतो. फिरतो तर फिरतो वर जळवणारे फोटो टाकतो. टाकतो तर टाकतो पण त्यात शेवटी पोटात खड्डा पाडणारे फोटो असतातच असतात. देवा तूच आता त्याचा बंदोबस्त कर. >> अनुमोदन Happy

फोटो अन वर्णन दोन्ही भारी. भाकरी अन रश्श्याचे फोटो टाकले नसते तर बरं झालं असतं Proud

प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स Happy

माधव, शागं Proud

जिप्सी दहिवडी ला सातार्‍याहुन जायला खुप कमी वाहाने असतात का रे? लहानपणी मि सातार्‍याला गेले होते त्यावेळी मला वाट्त मी गेले होते दहिवडीला , नीट्स नाहि आठवत, तिथे शंकराच्या मोठ्या पिंड आहेत का?>>>>हल्ली बरीच वाहने आहेत दहिवडीला जायला. शंकराची पिंड "शिखर शिंगणापूरला" आहेत. तेथेच पितळेचे सात मोठे नंदी सुद्धा आहेत. Happy

बगाडला बाईला पण बांधतात??>>>>>>रोहन, "या जत्रेचे आकर्षण म्हणजे "बगाडं". यात देवळाच्या मुख्यद्वाराच्या समोर एका उंच चौथर्‍यावर एका उंच सरळ लाकडाला दुसरे एक लाकुड आडवे लावुन, एका बाजुल नवस करणारे (यात जर एखाद्या महिलेने "मला मुल होऊ दे, मी बगाडं घेईन" असा जर नवस केला असेल तर तिला त्या लहान मुलासहित बगाडं घेऊन नवस फेडावं लागतो.) तर दुसर्‍या बाजुला मानकरी असतात. नवस फेडणार्‍यांचे हात त्या लाकडाला बांधुन त्यांना लोंबकळत देवळाच्या कळसाच्या जवळपास नेऊन एक चक्कर फिरवतात"

Pages