अडाणचोट म्हंजी एखाद्या पिवर शाकाहार घेणार्या माणसाले जपानच्या लोकायचा सयपाक बनवाले लावल तर त्याची कशी हालत होईन तशी..
अन लोकहो.. या शब्दाचे कितीबी अर्थ निंगत असले तरीबी पवित्रातला पवित्र अर्थच इथ इचारात घेतला जावा ही इनंती
मैत्रीदिनानिमित्त मी अन माया यकुलता यक मांसाहारी मित्र अश्या दोघानं मच्छी कराची ठरोली सोबतीले कडीसंग पोया असणारी मैतरनी बी होती.. आता दोघाले बी खाणं जमते पण सुंदरी अन बंदरी मधला फरक काई कळत नाय. म्हणुन मीच जाऊन मच्छी आण्णार होती ( वासरात लंगडी गाय शानी ).. त्या दोघायच येण झाल कॅन्सल पण माया बनलेला मुड काई सुदरु देत नोता मंग मनल आज परत आपन यकटीनच पुर्रा सयपाक कराचा.. पुर्र्या सयपाकाचा मतलब पोया बी म्याच कराच्या
मग लागली कामाले..
कोळीनीकड जाऊन मले सरनं अश्या दोन हातभर असलेल्या नदितल्या मासोया निवडून आणल्या..जागु तु सांगणारे मासोयीचं नाव..तेरे भरोसे मैने वो कोळीनी को बी नै पुछा..
तर मंग आनली मच्छी .. धुतली.. जागु ले दाखवाले फटू काल्ला..
पलिकडं कढई तापत ठेवली गॅसवर.. यका कांदा कापुन लालसर परतवल्यानंतर तो काढून उल्लीस तेल मिठ अन हळद टाकुन मच्छीचे तुकडे बी टाकले त्यात.. ५ ७ मिंट हालवहुलव करुन कढई उतरवली..
एक लानचुकली गंजुली घेउन त्यात तेल तापत ठेवलं. इकड कांदा लसुण अन अद्रक मिक्सर मदुन गर्र्गर्र फिरवुन घेतल.. तेल तापल्यावर त्यात मिक्सरमदला खिचडखेमा दुरुन गंजुलीत ओतला.. लालसर झाल्यावर त्यात तिखट, मिठ, हळद, घरी करते तो काळा मसाला, एवरेस्ट चिकन मसाला टाकुन मंग पाणी टाकलं अन दोन तिन उकळ्या आल्यावर त्यात तेलात परतवलेले मच्छीचे तुकडे दिले टाकुन.. थोड्यावेळ शिजुन सांभार टाकुन झाकण ठेवल अन गॅस बंद करुन दिला..
मंग जय भद्रकाली म्हणुन घेतल्या पोया कराले अन सपासप ५ ६ पोया टाकुन हाशहुश केल.. वाढुन ताटाचा तुमच्यासाटी फटू काल्ला.. पोटाले नैवेद्य दाखुन आता रेस्पी तुमच्यासमोर ठेवली.. तिखट मानुन घ्या..
अधिक टिपा :
१. शीर्षक देल्लय वर त कोन प्रमाण गिमान इचाराच्या फंदात पडू नये..
२. हो. पोळ्या गॅसवर असताना तेच्यातली हवा काडाची म्हणुन दोन हातात तिले जशी दाबली तशीच ताटात ठेवली.. तरी सांगतो आकार त्रिकोणी हाय.
३. हो. मी एवढच तिखट खाते..अन ते कश्मिरी लाल तिखट असल्यान दिसाले लाल अन आतुन.. जाऊद्या .. दिसते तेवढी तिखट भाजी नाई थे.
४. हो. अख्खा एक लिंबु मलेच पुरते तर एवढा का? अबब! असले शब्द तोंडातुन काडू नये..
एकटा जीव सदाशिव असल्यामुळं जिभेचे चोचले जास्त पुरोता येत नाई.. यकटीसाटी एवडा घाट मांडन्याचा लय्यच कंटाळा येते म्हणुन कदीकदीच लाटण्याले माया हात सहन करा लागते नै त पोया बाहेरुन आणुन घरी भाजि बनवाची..डेली रुटीन आपलं.. उद्या संकष्टी म्हणुन जपुन फोटो पायजा..आज रेस्पी पायनार्याची मज्जा उद्या पायनार्याची..आता ते मी कस सांगु राजेहो..
लैच भारी लिवलेय...
लैच भारी लिवलेय...
रेसिपी लिहिण्याची पद्धत
रेसिपी लिहिण्याची पद्धत नेहमीप्रमाणे मस्तच.
टिना म्हणजे माबोची भरत
टिना म्हणजे माबोची भरत गणेशपुरेच >>>>>+१ झकासरावाना अनुमोदन.
लै भारी तोंपासु
लै भारी तोंपासु
हेहे.. नै विदर्भात आम्ही याचा
हेहे..
नै विदर्भात आम्ही याचा संधीविग्रह करायच्या भानगडीत पडत नाई
हाती होत ते घातल यात...
अडाणीपणाच आणखी एक उदाहरण द्यायच म्हटल तर मच्छी करतो म्हणुन फिश करी मसाला आणायच कदी म्हणजे कदीच डोसक्यात पन आल नाई
<<टिना म्हणजे माबोची भरत
<<टिना म्हणजे माबोची भरत गणेशपुरेच<< अगदी अग्दी!
लई झ्याक लिव्हतेस बायो...रेसिपीइतकच तर्रीदार!
बाय द वे, अडाणचोट.. भिकारचोट हे शब्द खान्देशात पण आहेत. आणि अडाणचोट म्हणजे 'अडाणीपणाचा कळस' या अर्थीच मला आतापर्यन्त माहित होता.
टीने बाये भारी लिवलस...
टीने बाये भारी लिवलस... गणेशपुरे + १
जबरा खतरनाक लिखाण, पण ह्यात
जबरा खतरनाक लिखाण, पण ह्यात मला ओलं खोब्रं हवंच
आणि अडाणचोट म्हणजे
आणि अडाणचोट म्हणजे 'अडाणीपणाचा कळस' या अर्थीच मला आतापर्यन्त माहित होता. >> आर्या, इथ पण याच अर्थी वापरल्या जातो अजुनही..
नन्दिनी इज राईट. टीनाबाय
नन्दिनी इज राईट.
टीनाबाय कमीतकमी हा शबुद पुण्यात किन्वा मुम्बईत मुलान्समोर्/पुरुषान्समोर बोलु नकोस.:फिदी: एकदा मी चूकुन नवर्यासमोर बोलले तर नवरा म्हणाला माझ्यासमोर उच्चारलास, ओके! पण इतर लोकान्समोर बोलु नकोस. विचीत्र अर्थ होतो त्याचा. ( नवर्याने सान्गीतला नाही आणी मला माहीत नाही) प्रान्तानुसार भाषा बदलली जाते गो माय.:स्मित:
मस्त धमाल पाक्रु
मस्त धमाल पाक्रु
मस्तच लिहिलंय !
मस्तच लिहिलंय !
येस्स, वर हेडिंगम्धेही
येस्स,
वर हेडिंगम्धेही अडाणपनाचा कळस म्हणा हवं तर.
आहाहा!!! तै थे तर्री तर टोटल
आहाहा!!! तै थे तर्री तर टोटल सिग्नेचर दिसू राहली आपल्याइकळे रायते तशी!! ह्या तर्रीतनी काई बी घाला !! तुफान लागाची गारंटी वह्य!! बाकी जागु ताई न ख़ासच नाव सांगतले थ्या मच्छी चे!!!! आपन तर बापा मच्छी च्या इशयातनी अडानचोट गंवार हाओ, आपल्याले ३ मच्छी समजते फ़क्त १ रोहू २ मरल ३ बाम (वांब) बाकी झिंग्याइले मच्छी नाही म्हणत आमच्याइकळे कोनीच!! थ्याइले शिकेल लोक झींगे म्हांतेत अन अडानी लोक कीड़े म्हांतेत!!
टीना तै, एकडाव आपल्या वांगेआलू रस्सा ची रेशिपी बी टाकसान अटिसा जमीन तर!! पर थो रोडग्याईचा रस्सा असते ते रेसिपी टाकजा हओ!!
कीडे!!!! नको हो नको. माझा
कीडे!!!!
नको हो नको.
माझा अत्यंत आवडता पदार्थं आहे तो.
प्लीज त्याला कीडे म्हणू नका.
अहो कोलंबी दिसते तशी म्हणुन
अहो कोलंबी दिसते तशी म्हणुन !! मुद्दाम अपमानस्पद म्हणुन नाही! _/\_
अडाणचोट म्हणजे 'अडाणीपणाचा
अडाणचोट म्हणजे 'अडाणीपणाचा कळस', मला असंच वाटलं. मला दुसरा अर्थ नाही माहीती.
टिना शीर्षकात बदल कर थोडा.
टिना शीर्षकात बदल कर थोडा. >>
टिना शीर्षकात बदल कर थोडा. >>
सबके मनमे पाप है..जा बा.. करते आता थांबा..मला वाटल माबो म्हंजी संतांची भुई हय पन जाउद्या आता का म्हणावं..बाकी मला अजुनही सबके मन मे असनेवाला अर्थ समजला नाई..राहुद्या पण समजावण्याच्या भानगडीत बी नका पडू..
ऐसा नही है जी, मगर संतोकी
ऐसा नही है जी,
मगर संतोकी जमीन पे उनकोच फतरा मारने वालो की कमी नय.
टीना, एखादा शब्द
टीना, एखादा शब्द वापरण्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण तो शब्द वापरताना जर अर्थाचा अनर्थ होत असेल तर तो अनर्थदेखील आपल्याला माहित हवा असे माझे मत आहे. शिव्या देताना शिव्यांचा अर्थ माहित असला पाहिजे, मगच ती शिवी वापरायची की नाही हे आपल्याल ठरवता येतं.
आणि हो. आधीचे शीर्षक ही बहुसंख्यांच्या अर्थाप्रमाणे शिवी आहे. याचे र्हायमिंग वर्डस असलेल्या शिव्या आठवून पहा.
शीर्षक बदललेलं आहेच त्यामुळे आता विषय बंद.
अशाच खुसखुशीत रेस्प्या (आणि इतर लेखाण येत राहूदे)
बिल्कुल नंदिनी.. हरेकाच्या
बिल्कुल नंदिनी..
हरेकाच्या मताप्रमाणे बघायला गेलो तर एखादा शब्द दुसर्यासाठी शिवी असु शकते..
माझ्या बाजुला हि शिवी इथ लोक ज्या अर्थाने घेत आहे त्या अर्थाने नक्कीच नाही वापरत पण सर्वांच मत लक्षात घेता म्हटल चला एका शब्दावर किल्ला लढवायला त्यान लगे वाईट वाटण्यासारखं कै होत नै आहे .. टाकला बदलुन ..
आता पाकृ करा एंजॉय
नद्यांमधले मासे खाउन वर्ष
नद्यांमधले मासे खाउन वर्ष झाली! झकास लेख! गावाची आठवण आली नागपुरात गेल की रोहू / कटला खाउन याव लागेल आता
अवांतर :
आता दोघाले बी खाणं जमते पण सुंदरी अन बंदरी मधला फरक काई कळत नाय >> बंदरी खातात ? सुंदरी खाल्लीय सावजीमध्ये
शीर्षकातला पहिला शब्द फार
शीर्षकातला पहिला शब्द फार लाडका...पुढे दोन फुल्या रेखतात हे कळेपर्यंत! चुलत भावंडंही बर्याचदा वापरलं गेलंय!!
रेसिपी झक्कास तोंपासु!!
जागूतै खरंच कोलीवाडा डिक्शनरी हाय हो!!
बोईटाचं कालवण ओलं खोबरं व हिरवं वाटण वापरून अप्रतिम होतं!! स्लर्प स्लर्प!! तूप भरला मऊसर शिजवलेला भात आणि वाडगाभर कालवण ओरपायचं!!
लिहिण्याची स्टाईल आवडली. मासे
लिहिण्याची स्टाईल आवडली. मासे मस्तच बनवलेत.
अडाणचोट मित्रमंडळीमधे बिनधास्त वापरला जातो फक्त इतरठिकाणी वापरता येत नाही.
सई लिव्हलय सैपाक सुद्धा
सई लिव्हलय
सैपाक सुद्धा अडाण्याचा नाही वाटत, तर मासा पाणी काढतोय तोंडातून.. नसेना नाव माहीत, काय त्याचे श्राद्ध घालायचेय आता
मोबाईल वर असल्याने रिप्लाय देता आला नव्हता आधी, पण आधीचे शीर्षक बदललेले दिसतेय..
अडाणचोट म्हणजे 'अडाणीपणाचा कळस', .... हाच कर्रेक्ट अर्थ आहे / असावा.. बस्स यातल्या काही अक्षरांना आमच्याईथे म्हणजे मुंबईत वगैरे दुर्दैवाने खराब अर्थ आहे म्हणून पुर्ण शब्दच खराब होतो..
पण आपण आपल्या अर्थाबद्दल ठाम असल्यास नाही बदलायचा शब्द असे माझे वैयक्तिक मत
ऋन्मेऽऽष , आता पुरे कर.
ऋन्मेऽऽष , आता पुरे कर.
अनिरुद्ध, जमल तर एखादवेळी
अनिरुद्ध, जमल तर एखादवेळी वायर मच्छी पन ट्राय करा.. मधला एकच काटा असतो बाकी कुठच नै..मस्त लागते
ऋन्मेऽऽष, मी दिलय वर का बदलला तो शब्द म्हणुन
सर्वांचे आभार..
वायर , हे कोणची मच्छी वह्य
वायर , हे कोणची मच्छी वह्य जी?? नाव त खासच हाय!!
टीना, ही मच्छी कुठे मिळेल?
टीना,
ही मच्छी कुठे मिळेल? नाव तर मस्त वाटतंय! पण इकडे अशी आपण विकत घेऊन कोण बनवून देईल, इकडे हॉटेले फक्त पापलेट सुरमई पापलेट सुरमई ... कधी मधी खाडीतला बांगडा ...
मस्त लिहिण्याची स्टाईल! फोटो
मस्त लिहिण्याची स्टाईल! फोटो बघुन तोंडाला पाणी सुटले.
Pages