अडाणचोट म्हंजी एखाद्या पिवर शाकाहार घेणार्या माणसाले जपानच्या लोकायचा सयपाक बनवाले लावल तर त्याची कशी हालत होईन तशी..
अन लोकहो.. या शब्दाचे कितीबी अर्थ निंगत असले तरीबी पवित्रातला पवित्र अर्थच इथ इचारात घेतला जावा ही इनंती
मैत्रीदिनानिमित्त मी अन माया यकुलता यक मांसाहारी मित्र अश्या दोघानं मच्छी कराची ठरोली सोबतीले कडीसंग पोया असणारी मैतरनी बी होती.. आता दोघाले बी खाणं जमते पण सुंदरी अन बंदरी मधला फरक काई कळत नाय. म्हणुन मीच जाऊन मच्छी आण्णार होती ( वासरात लंगडी गाय शानी ).. त्या दोघायच येण झाल कॅन्सल पण माया बनलेला मुड काई सुदरु देत नोता मंग मनल आज परत आपन यकटीनच पुर्रा सयपाक कराचा.. पुर्र्या सयपाकाचा मतलब पोया बी म्याच कराच्या
मग लागली कामाले..
कोळीनीकड जाऊन मले सरनं अश्या दोन हातभर असलेल्या नदितल्या मासोया निवडून आणल्या..जागु तु सांगणारे मासोयीचं नाव..तेरे भरोसे मैने वो कोळीनी को बी नै पुछा..
तर मंग आनली मच्छी .. धुतली.. जागु ले दाखवाले फटू काल्ला..
पलिकडं कढई तापत ठेवली गॅसवर.. यका कांदा कापुन लालसर परतवल्यानंतर तो काढून उल्लीस तेल मिठ अन हळद टाकुन मच्छीचे तुकडे बी टाकले त्यात.. ५ ७ मिंट हालवहुलव करुन कढई उतरवली..
एक लानचुकली गंजुली घेउन त्यात तेल तापत ठेवलं. इकड कांदा लसुण अन अद्रक मिक्सर मदुन गर्र्गर्र फिरवुन घेतल.. तेल तापल्यावर त्यात मिक्सरमदला खिचडखेमा दुरुन गंजुलीत ओतला.. लालसर झाल्यावर त्यात तिखट, मिठ, हळद, घरी करते तो काळा मसाला, एवरेस्ट चिकन मसाला टाकुन मंग पाणी टाकलं अन दोन तिन उकळ्या आल्यावर त्यात तेलात परतवलेले मच्छीचे तुकडे दिले टाकुन.. थोड्यावेळ शिजुन सांभार टाकुन झाकण ठेवल अन गॅस बंद करुन दिला..
मंग जय भद्रकाली म्हणुन घेतल्या पोया कराले अन सपासप ५ ६ पोया टाकुन हाशहुश केल.. वाढुन ताटाचा तुमच्यासाटी फटू काल्ला.. पोटाले नैवेद्य दाखुन आता रेस्पी तुमच्यासमोर ठेवली.. तिखट मानुन घ्या..
अधिक टिपा :
१. शीर्षक देल्लय वर त कोन प्रमाण गिमान इचाराच्या फंदात पडू नये..
२. हो. पोळ्या गॅसवर असताना तेच्यातली हवा काडाची म्हणुन दोन हातात तिले जशी दाबली तशीच ताटात ठेवली.. तरी सांगतो आकार त्रिकोणी हाय.
३. हो. मी एवढच तिखट खाते..अन ते कश्मिरी लाल तिखट असल्यान दिसाले लाल अन आतुन.. जाऊद्या .. दिसते तेवढी तिखट भाजी नाई थे.
४. हो. अख्खा एक लिंबु मलेच पुरते तर एवढा का? अबब! असले शब्द तोंडातुन काडू नये..
एकटा जीव सदाशिव असल्यामुळं जिभेचे चोचले जास्त पुरोता येत नाई.. यकटीसाटी एवडा घाट मांडन्याचा लय्यच कंटाळा येते म्हणुन कदीकदीच लाटण्याले माया हात सहन करा लागते नै त पोया बाहेरुन आणुन घरी भाजि बनवाची..डेली रुटीन आपलं.. उद्या संकष्टी म्हणुन जपुन फोटो पायजा..आज रेस्पी पायनार्याची मज्जा उद्या पायनार्याची..आता ते मी कस सांगु राजेहो..
लोल मस्त लिवलय! मी भिकार**
लोल मस्त लिवलय!
मी भिकार** एकलेले. हा आताच एकला इथे.
कोनती मच्छी बे ते लिव की..
सुपर पाकृ टीना! भारी! >>>मी
सुपर पाकृ टीना! भारी!
>>>मी भिकार** एकलेले. हा आताच एकला इथे.<<<
इथे चार वर्षे बेचाळीस आठवडे असून तुम्हाला हा शब्द आज कळला हे नवलच.
मी भिकार** एकलेले. हा आताच
मी भिकार** एकलेले. हा आताच एकला इथे. >> आमी तिकडचे नसुनही आमाला दोनी माहीत्याय.
माशाऐवजी भटाटे वापरुन करीन.
माशाऐवजी भटाटे वापरुन करीन.
झंपी..नाव ओळखाले जागुले साद
झंपी..नाव ओळखाले जागुले साद घातलीये नं..मच्छी ओळखता येत नाही म्हणुनच त अडाणचोट मनल मी
बेफि .. ठांकु ठांकु
एरवी मी नॉनवेज पदार्थ बघुन
एरवी मी नॉनवेज पदार्थ बघुन वाचले नसते पण टीनाबायने लिवलं, तर भन्नाट असणार लिवलेलं म्हणून वाचलं.
लय भारी.
बिचारे मासे मात्र बघवत नाहीयेत मला.
बिचारे मासे मात्र बघवत
बिचारे मासे मात्र बघवत नाहीयेत मला. >> अन्जू तेरे जैसे शाकाहारी लोगो का विचार करकेही मैने बडे दिलसे उस मच्छी को पेट मे डालदिया .. लय डेरिंगबाज हाय मी सांगते काय .. आणि समाजसेवा म्हणजे..जाऊदे आता काय सोताच सोताची तारिफ कराची म्हणुन राह्यलं..
काय ग तु आत्ताच नवऱ्याला
काय ग तु
आत्ताच नवऱ्याला तुझी वऱ्हाडी ठेच्याची पाकृ वाचायला लावली, तो पण
अगो बाय हेला बोईट म्हणतात.
अगो बाय हेला बोईट म्हणतात.
जल्ला काय ती भाषा.. काय तो
जल्ला काय ती भाषा.. काय तो मासा.. काय ते फोटू.. काय ती पाकृ.. भारी तोंपासु
टिना , सॅालिड लिवलयसं ग. मासे
टिना , सॅालिड लिवलयसं ग. मासे तर मी खात नाही पण लिहीलयं खासच.
जागु..चालती फिरती डिक्शनरी गो
जागु..चालती फिरती डिक्शनरी गो बया खरच.. _/\_ स्विकारावा..
Yo.Rocks .. ठांकु
ममो.. तु कौतुक नै करणार तर कोन करणार गं..
लई झ्याक रेस्पी लिव्हली अन्
लई झ्याक रेस्पी लिव्हली अन् काय..
खायाले पन तशीच झ्याक लागली काय ते भी सांगून टाका..
वारलो रे वारलो हसून हसून!
वारलो रे वारलो हसून हसून!
काय खतरनाक लिवलय... यांव राम राम राम .. नामा'पासून काम तमाम!
@आता दोघाले बी खाणं जमते पण सुंदरी अन बंदरी मधला फरक काई कळत नाय. >>
आता दोघाले बी खाणं जमते पण
आता दोघाले बी खाणं जमते पण सुंदरी अन बंदरी मधला फरक काई कळत नाय. >>>>
भन्न्नाट!
भन्न्नाट!
टीने, लय झंगाट लिवलयसा तू. पर
टीने,
लय झंगाट लिवलयसा तू. पर चिकन मसाल्याजागी फिश मसाला का घाल्ला नाय?
(No subject)
दिसायला चिकन करी सारखे
दिसायला चिकन करी सारखे दिसतेय, झकास लिहलय.
भन्नाट लिहिता टीना. रेसिपी
भन्नाट लिहिता टीना. रेसिपी तोंडाला पाणि आणणार्^या आणि भाषा डोळ्यात पाणी (हसून)
अग्गोबाई टिने काय गं हे? तो
अग्गोबाई टिने काय गं हे? तो शब्द तर कधीच ऐकलेला नाही. आणि भिकार....काय तरी लिवत्यात नव्हं बाकीचे..........झंपी वगैरे..........त्योबी नाय!
आता रेस्पी बरी असणारच बहुतेक!
>>मी भिकार** एकलेले. हा आताच
>>मी भिकार** एकलेले. हा आताच एकला इथे<< +१
टिने.. लय झ्याक दिसतेय प्लेट..!! आन तुझ्या लिवन्याच्या इस्टाईल ला माया दंडवत!
अग बाबौ! तू काय काय करशीला अन
अग बाबौ! तू काय काय करशीला अन काय नाय त्ये बी कळना झालया.:फिदी: तुज्या लिहीण्याची इस्टाईल लय बुन्गाट हाय. पण काय गो चिकन मसाला काहुन घातलास? जागुला विचारायचे ना बाय. म्होरल्या टायमाला जरा तिरफळे घालुन कर गो.
फिश मसाला घरचा:- थोडा कच्चा कान्दा, हळद, थोडे आले, उलुशी चिन्च, ५-६ लाल किन्वा हिरव्या मिर्च्या आणी नारळाचे ताजे खोबरे ( चव) एकत्र वाटुन कर गो बाय.:स्मित: बान्गडा मिळाला तर तू बी भान्गडा करशील बघ.:खोखो:
टीना.. लव युअर युनिक स्टाईल..
टीना.. लव युअर युनिक स्टाईल.. मस्त..
प्रत्येक वाक्यागणिक हहपुवा होतेय..
छान रेसिपी, लिहिलेयही भारी
छान रेसिपी, लिहिलेयही भारी खुसखुशीत पद्धतीने. तर्रीचा रंग झकासच.
बाकीचे हसताबिसताहेत हे ठीकच पण अडाणचोट हा शब्द तितका निखळ विनोदी नाही, हेही सांगावेसे वाटते.
अडाणचोट हा शब्द तितका निखळ
अडाणचोट हा शब्द तितका निखळ विनोदी नाही, हेही सांगावेसे वाटते<<< +१. शब्दाचा संधिविग्रह केल्यास अतिभयंकर अर्थ निघतो, अर्थात वैदर्भीय भाषेत वेगळा अर्थ असला तर माहित नाही.
पाककृती भारी लिहिली आहे.
लिखाना ची रेसिपी नाहीनाही
लिखाना ची रेसिपी नाहीनाही रेसिपी चे लिखान भारी हाय.
टीना भारी लिवलयस गं! श्टाईल
टीना भारी लिवलयस गं!
श्टाईल लई आवडली!
फक्स्त भारी लिवतीस ते वाचाय
फक्स्त भारी लिवतीस ते वाचाय म्हणुन आली.. बाकी रेशिपी आमी करत नै! पास!
टिना म्हणजे माबोची भरत
टिना म्हणजे माबोची भरत गणेशपुरेच
भारी लिहिलय :).
Pages