Submitted by pravintherider on 1 August, 2015 - 20:44
सालाबाद प्रमाणेयावर्षी पण 15 August ला एका गडावर जायचे आहे. रायगडा जवळिल ठिकाणे सूचवाल का ??? इगतपुरी - रायगड - गणपतीपुले . 14 Aug पासुन 17 aug
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१. चंद्रगड - मंगळगड २. तोरणा
१. चंद्रगड - मंगळगड
२. तोरणा करुन तोरण्यावरुन निघा - बोराट्याच्या नाळीने खाली को़कणात उतरा. वेळ असल्यास लिंगाणा करु शकता.
हो वेळ तर आहे
हो वेळ तर आहे
दुसरा ऑप्शन - रतन्गड -
दुसरा ऑप्शन - रतन्गड - कात्राबाईची खिंड - हरिश्चंद्रगड
अर्थात रायगडाजवळ नाहीये.
रतनगड जवळ आहे मला. one day
रतनगड जवळ आहे मला. one day return 45 km from home
नासिक आणि पूणे मधील बरेच
नासिक आणि पूणे मधील बरेच किल्ले बघितले आहेत. या वर्षा पासुन कोकण विभागात फिरायचे आहे.
को़कणात जायचं तर ठाणे
को़कणात जायचं तर ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेपासून सुरवात करा आणि खाली येत जा.
रात्री राहण्याचा प्लान असेल तर सुधागड हा आणखीन एक ऑप्शन आहे. गडावर ऐसपैस वाड्यात राहण्याची सोय होते. पहिल्या दिवशी सरसगड चढून-उतरून रात्री सुधागडावर राहता येतं. त्याबरोबरच तैलबैलाही करता येईल. कष्टाची तयारी असल्यास सवाष्णीचा घाट चढणं हादेखील एक अनुभव आहे.
दुसरा आणखीन एक ऑप्शन म्हणजे राजमाची आणि ढाक एका खेपेत करणे.
एक विशेष करता येण्यासारखा ट्रेक जर तुमची तयारी असेल तर -
चंद्रगड - बहिरीची घुमटी - गाढवाचा माळ - आर्थरसीट (महाबळेश्वर) - किमान १२ तास आणि कठीण चढाई, पण एकदा जरुर करण्यासारखा. याची अधिक माहिती हवी असल्यास संपर्कातून मेल करा.
धन्यवाद
धन्यवाद