मायबोलीवरचे साहित्य इतरत्र प्रकाशित करता येईल का?

Submitted by webmaster on 4 May, 2008 - 01:41

काही अपवाद वगळता, मायबोलीवर लिहिलेल्या लेखनाचे पूर्ण मालकीहक्क ते लेखन/कलाकृती करणार्‍या साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील. मायबोलीवर लेखन करून तुम्ही मायबोली प्रशासनाला maayboli.com वर प्रसिद्ध करण्याचा किंवा maayboli.inc ला त्या लेखनाचा/कलाकृतीचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात.

याचा अर्थः

* लेखनाचे पूर्ण मालकीहक्क लेखकाचे असतील व लेखक ते लेखन्/कलाकृती इतरत्र प्रसिद्ध करु अथवा वैयक्तिक आर्थिक नफ्यासाठी विकू शकतात. त्यासाठी मायबोलीची पूर्वपरवानगी घ्यायची आवश्यकता नाही.

* परंतु मायबोली प्रशासन ते लेखन/कलाकृती मायबोलीवर अथवा मायबोलीशी संबंधीत इतर वेबसाईट किंवा इतर कुठल्याही माध्यमांमधे अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना)

* भविष्यात ते लेखन मायबोलीवरुन अथवा इतर माध्यमांमधून काढून टाकावे असे तुम्हाला वाटले तरी मायबोली तसे करण्यासाठी बांधिल राहणार नाही. (कायमस्वरुपी परवाना)

* तुम्ही तुमचे लेखन्/कलाकृती इतर कोणाला विकली, तरी नवीन मालक ते लेखन मायबोलीवरून काढून टाकण्याविषयी असमर्थ असेल. (रद्द न करता येणारा परवाना)

मालकी हक्क लेखकाकडेच असल्यामुळे, लेखकाच्या परवानगीशिवाय इतर कुणाला, मायबोलीवर प्रसिद्ध झालेले लिखाण, इतरत्र प्रकाशित करता येणार नाही.

यासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया support at maayboli dot com येथे ईमेलद्वारे संपर्क साधावा. धन्यवाद.

अपवादः
१. "संवाद" या खास मायबोलीसाठी असलेल्या लेखन विभागाचे पूर्ण हक्क मायबोलीकडे आहेत आणि मायबोलीच्या परवानगीशिवाय ते इतरत्र वापरता येणार नाही.

Copyright remains with respective author and artists. But by submitting your work, you are giving unlimited, perpetual and irrevocable license to maayboli to publish on maayboli.com or where ever maayboli.inc wants to use it in any media.

What it means:
* The copyright and ownership remains with author / artist and they can use it however they want such as sell, publish their work etc.
* The Author/artist has given the license to maayboli to publish on maayboli or any affiliated site or any other media such as PDF, CD etc in future. (unlimited)
* Maayboli is not obligated to remove the work from maayboli or other media if author wants in future. (perpetual)
* If author sells his/her copyright to a new owner, the new owner can not ask maayboli to remove the work from maayboli. (irrevocable)

Since copyright belongs to original author, nobody is allowed to re-publish (previously work on maayboli) without author's permission

Exception:
1. Copyrights of all work published under "sanvad" belongs to maayboli.

माननीय webmaster साहेब ,
सप्रेम नमस्कार
आपल्या सूचनेनुसार मला आपल्याला नम्रता पूर्वक विनंती करून हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ,
येथे फक्त स्वत:चे च साहित्य टाकावे लागते हे मला माहित नव्हते पण दुसर्या कोणा व्यक्तीचे साहित्य मी टाकावे असे मला कधी वाटले नाही वाटत नाही मी टाकले हि नाही मात्र संत साहित्य हे सर्वांसाठीच असते आणि येथे संतांचे साहित्य बरेच उपलब्ध दिसले त्या नुसार मी हि ज्यांचे आहे त्यांचे नाव घेऊंच टाकले आहे
(१) मी टाकलेले संत साहित्य आहे आणि मी http://www.maayboli.com/node/54852 येथे स्पष्ट उल्लेख हि केला आहे आणि कुठले उचलून जसेच्या तसे पेष्ट केले नसून प.पु. महाराजांनी त्यांच्या प्रवचनातून जे वेगवेगळे विषय मांडले आहेत ते मी चाळून एकत्र करून वाचले तेव्हा मला जो आनद मिळाला तो आपल्या माय बोलीवरील अध्यात्म प्रेमी मंडळीस हि वाचनास द्यावा असे वाटले त्यांना हि प्रत्येक विषय ज्याला त्याला आपापल्या परीने समजण्यास सोपा वाटेल आणि अध्यात्मिक भाव वाढीस लागेल असे वाटत होते हि माझी शुद्ध भावना होती व आज हि आहे
(२) मायबोलीकरांच्या प्रतिक्रिया बरोबरच आहेत की अनेक धागे काढण्या पेक्षा एक लिंक दिली असती तर बरे झाले असते मला हि तेच तर करायचे होते पण मला असे वाटत होते की जर आपल्या साहित्याला कुठलाही ग्रुप जोडला नाही तर ते आपल्या स्वताच्या खाजगी जागेत node तयार होऊन रक्षित (save) रहाते आणि त्या लिंक आपल्याला देता येतील जेणे करून आपल्या वाचकाला तेवढीच लिंक टिचकी मारून वाचता येईल परंतु असे करताना जेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या तेव्हा मी तेथील सुचना वाचल्यावर माझ्या लक्षात आले की हे आपल्या खाजगी जागेत रक्षित होत नसून सार्वजनिक झाले आहे आणि त्या स्थितीला मधेच बंद करणे हि मला उचित वाटत नव्हते कारण माझा हेतू काही अनेक धागे काढणे हा नव्हता हि माझी चूक झाली आहे ती मी प्रांजळ पणे कबुल करत आहे
(३) तेव्हा मा.webmaster सर आपल्याला नम्र विनंती आहे की याच्या मुळे समस्त माय बोलीकरांना व आपल्याला जो त्रास होत आहे त्या साठी आपण माझे जे टाकलेले आहे ते आपल्या नियमा नुसार नसेल तर कृपया काढून टाकावे कारण मला ते काढता येत नाही

आभारी आहे ,

तसदी बद्दल क्षमस्व
आपला ,
विनायक. दि. पत्की

मा. वेबमास्टर महोदय...

मायबोलीवर लेखन करून तुम्ही मायबोली प्रशासनाला maayboli.com वर प्रसिद्ध करण्याचा किंवा maayboli.inc ला त्या लेखनाचा/कलाकृतीचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात.

हा क्लॉज नवीन समाविष्ट केला आहे का? तसे असल्यास भविष्यात इतर प्रकाशनाद्वारे / माध्यमातून पुस्तकरूपाने लिखाण प्रसिद्ध करताना अडचणी येवू शकतील ...

सर्वानी नोन्द घेण्याजोगा हा मुद्दा आहे, असे वाटते.

कात्रेसाहेबांशी सहमत आहे. महत्वाचे म्हणजे ....

<< तुम्ही तुमचे लेखन्/कलाकृती इतर कोणाला विकली, तरी नवीन मालक ते लेखन मायबोलीवरून काढून टाकण्याविषयी असमर्थ असेल. (रद्द न करता येणारा परवाना) >>>>>

हे ही थोडेसे खटकण्यासारखेच आहे. अशाने मग एखाद्याने जर स्वतःचे पुस्तक काढले, आणि पुस्तकातील सर्व कथा इथे मोफत वाचण्यासाठी उपलब्ध असतील तर ते पुस्तक विकत घेवून कोण वाचेल. आणि मुळात असे काही बंधन आहे म्हटल्यावर कुठला प्रकाशक एखाद्याचे पुस्तक छापण्यास तयार होइल?

यातुन अजुन एक मुद्दा असा आहे..

की एखादा खरोखर उत्कृष्ट लिहीणारा लेखक/कवि , जर पुढेमागे आपले पुस्तक काढणार असेल तर आपले 'मास्टरपिसेस' मायबोलीवर पोस्ट करणारच नाही. अशाने मायबोलीकर त्याच्या उत्कृष्ट लेखनाला मुकतील.

मालकी हक्क लेखकाकडेच असल्यामुळे, लेखकाच्या परवानगीशिवाय इतर कुणाला, मायबोलीवर प्रसिद्ध झालेले लिखाण, इतरत्र प्रकाशित करता येणार नाही >>

यात "इतर कुणाला" हा जो शब्द आहे तो खटकत आहे. इतर कोणी म्हणजे यात मायबोली देखील आहे का? असल्यास मग वरील ३ही परवाने आपसुक रद्द होतात. आणि जर ते परवाने बरोबर आहेत तर "इतर कुणाला" यामधे मायबोली समाविष्ट होत नाही असा अर्थ निघतो

विशालशी सहमत

आमचं इंटरप्रिटेशन चुकत असेल तर कृपया तसही कळवा इथे

>>>परंतु मायबोली प्रशासन ते लेखन/कलाकृती मायबोलीवर अथवा मायबोलीशी संबंधीत इतर वेबसाईट किंवा इतर कुठल्याही माध्यमांमधे अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना) >>>

म्हणजे मायबोली लेखकाची ही परवानगी घेणार नाही का? त्याला सुचित करणार नाही का?

बहुतेक नंदिनी यांचे रेहान हे पुस्तक जर या नियमांमुळे ईंपॅ़क्ट होत असेल तर ते प्रकाशक आक्षेप नाही का घेऊ शकत?

हे उदाहरण मला माहित आहे म्हणून विचारतोय, कदाचित अजूनही असतील जे मला माहित नसेल

मित्रो,
आपण आपल्या लेखन सूचि मधे जाऊन कधीही आपण लिहिलेले लिखाण खोडून टाकू शकतो ना..
तो अधिकार नेहमीच लेखकाला राहील नाही का.?
तसे असल्यास वरील नियम/अटी मला फार काही त्रासदायक वाटत नाही..
कि आपण खोडले तरी ओरिजिनल लेखनाचि एक प्रत माबो कड़े असणारच आहे .? चूकत असेल काहि तर कृपया अप्डेटावे..

मला हे दोन पॉइंट्स थोडे खटकताहेत, नीड्स सम एक्स्प्लनेशन..

* भविष्यात ते लेखन मायबोलीवरुन अथवा इतर माध्यमांमधून काढून टाकावे असे तुम्हाला वाटले तरी मायबोली तसे करण्यासाठी बांधिल राहणार नाही. (कायमस्वरुपी परवाना)

* तुम्ही तुमचे लेखन्/कलाकृती इतर कोणाला विकली, तरी नवीन मालक ते लेखन मायबोलीवरून काढून टाकण्याविषयी असमर्थ असेल. (रद्द न करता येणारा परवाना)

विकु आणी नी शी सहमत!!!

माझी मते:

१. २००८ च्या सूचनेवर काही निमित्ताने सात वर्षांनी चर्चा होत आहे. इतके दिवस सगळे बेसावध होते असे प्रतिसाददात्यांना म्हणायचे आहे काय?

२. मायबोली प्रशासनाने हे अधिकार स्वतःकडे घेतले नाहीत तर उद्या कोणीही उठेल आणि संस्थळाला गोत्यात आणू शकेल हे मान्य होऊ शकत आहे की नाही? असे पावला-पावलाला गोत्यात येणे आणि त्यातून निष्कलंकपणे बाहेर पडणे ह्यासाठी काही यंत्रणा वगैरे उभारली जावी अशी अपेक्षा आहे का? (जे पूर्णतः असंभव आहे).

३. मायबोलीवर हिट्स, सदस्यसंख्या वगैरे वाढाव्यात ह्या दृष्टीने मायबोली प्रशासनाने जर काही लेखन मायबोलीशी संबंधीत इतर शाखांवर पोस्ट केले तर ते मायबोली कुटुंबातच राहत आहे ना? त्याचा प्रशासन व्यावसायिक कारणांसाठी विनियोग करत नाही आहे हे पटत आहे ना?

४. आज एखादा लेखक प्रकाशकांकडे गेला तर आधी प्रकाशित न झालेले लेखनच प्रकाशक स्वीकारतात हा मुद्दा बरोबर आहे. पण त्यांनी लेखन स्वीकारल्यानंतर ते प्रकाशित करायला ते किती वेळ लावतात, त्याचे मार्केटिंग कसे करतात, बातम्या येतात की नाही, वितरण कितपत प्रभावीपणे होते ह्यावर लेखकाचे काही नियंत्रण असते का? त्या तुलनेत इथे एका क्लिकमध्ये लेखकाचे लेखन जर जगभरात पोचत असेल तर लेखकालाही एक प्रकारे अमर्याद अधिकार मिळत नाही आहेत का? (बाकी मायबोलीवर असे किती लेखक / कवी आहेत हे अलाहिदाच, ज्यांचे लेखन विकत घ्यायला बाहेर उड्या पडत असतील. ह्या विधानातील कृपया फक्त मुद्दा नोंदवून घ्यावात. विधान आक्रमक झाले आहे ह्याची नम्र जाणीव आहे, पण ते सौम्य करायचे असते तर एक पॅरा लिहावा लागला असता).

५. ह्या कारणांसाठी आपल्याच मते आपलेच जरा कमी दर्जेदार लेखन काय ते इथे प्रकाशित करावे आणि उत्तम लेखन स्वतःजवळ साठवून ठेवावे अशी पॉलिसी आखून कोणी लिहू शकेल का?

चु भु द्या घ्या

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

<५. ह्या कारणांसाठी आपल्याच मते आपलेच जरा कमी दर्जेदार लेखन काय ते इथे प्रकाशित करावे आणि उत्तम लेखन स्वतःजवळ साठवून ठेवावे अशी पॉलिसी आखून कोणी लिहू शकेल का?>

प्रामाणिकपणे सांगायचं तर बर्‍याच विचारांती आम्ही हीच पॉलिसी वापरायचं ठरवलं आणि अमलात आणलं.

प्रामाणिकपणे सांगायचं तर बर्‍याच विचारांती आम्ही हीच पॉलिसी वापरायचं ठरवलं आणि अमलात आणलं.>>> Happy शिवाय ठराविक काळानंतर लेखन काढून टाकणेदेखील.

२००८ साली आलेला बीबी आहे. दिवाळी अंकाच्य एका बीबीवर या संदर्भात् बरीच चर्चा झालेली आहे.

http://www.maayboli.com/node/12233 ही मोरपिसेची माय्बोलीवरील सद्यस्थिती.

माझे सदस्यत्व जोवर आहे तोवर ते वापरून मी लिहिलेले सगळेच साहित्य मला डिलीट करता येत नाही. एखादा बाफ दोनदा पोस्ट झाला टार तो डिलीट करायला एडमिन ला सांगावे लागते. सम्पादन करून आत लिहिलेले मात्र पुसता येते.

पण असे पुसल्यावर ही मायबोली कड़े ते असू शकते का कसे याबाबत माहिती हवी.

ज्याना भविष्यात लेखन प्रसिद्द करायचे नाही किंवा तशा संधि मिळनार नाहित याव्ही खात्री आहे त्यांना काही त्रास असू नये. त्यांनी लगेच आपले लेखन उड़वायला नको. ज्यांना लेखक म्हणून कारकीर्द कराय्चीय त्यानी आपले लेखन खरेतर कुठेही प्रसिद्ध करायला नको. कारण प्रकाशकहि पूर्व प्रसिद्ध लेखन घेणार नाहित. नंदिनिची पुस्तकातली रेहान माबोपेक्षा थोड़ी वेगळी आहे असे तिने कुठेतरी लिहिल्याचे स्मरते.

भूषणजी, तुमच्या मुद्दा क्र. ३ चा विचार करायचा झाल्यास...

<<<परंतु मायबोली प्रशासन ते लेखन/कलाकृती मायबोलीवर अथवा मायबोलीशी संबंधीत इतर वेबसाईट किंवा इतर कुठल्याही माध्यमांमधे अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना)>>>>
यातील इतर कुठल्याही माध्यमामध्ये यातील 'माध्यम' स्पष्ट होत नाही. ते स्पष्ट झाल्यावर पुढे बोलू.

<< बाकी मायबोलीवर असे किती लेखक / कवी आहेत हे अलाहिदाच, ज्यांचे लेखन विकत घ्यायला बाहेर उड्या पडत असतील.>>>

हां प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते ठरवणारे तुम्ही किंवा मी कोण? ते ज्याचे त्याला आणि लोकांना ठरवू देणे जास्त योग्य नाही का?

<<< मायबोली प्रशासनाने हे अधिकार स्वतःकडे घेतले नाहीत तर उद्या कोणीही उठेल आणि संस्थळाला गोत्यात आणू शकेल हे मान्य होऊ शकत आहे की नाही? असे पावला-पावलाला गोत्यात येणे आणि त्यातून निष्कलंकपणे बाहेर पडणे ह्यासाठी काही यंत्रणा वगैरे उभारली जावी अशी अपेक्षा आहे का? (जे पूर्णतः असंभव आहे).>>>

केवळ हां एकच हेतु असेल तर संबंधित सदस्याने विनंती केल्यावर ते साहित्य मायबोलीवरून काढायला काय हरकत आहे?

विशाल,

मी 'माझी मते' असे लिहून प्रतिसाद दिला व पुढे चुभुद्याघ्या असेही लिहिले. Happy

>>>यातील इतर कुठल्याही माध्यमामध्ये यातील 'माध्यम' स्पष्ट होत नाही. ते स्पष्ट झाल्यावर पुढे बोलू.<<<

इथे स्पष्ट होत नाही. पण वर एक लिंक देण्यात आली आहे त्यावर अ‍ॅडमीन-टीमने त्याबाबतचा खुलासा केलेला दिसत आहे. त्या बेसिसवर माझे विधान उचित वाटत आहे मला तरी.

>>>हां प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते ठरवणारे तुम्ही किंवा मी कोण? ते ज्याचे त्याला आणि लोकांना ठरवू देणे जास्त योग्य नाही का?<<<

अगदीच! म्हणूनच मी म्हंटले की हे विधान आक्रमक रीतीने लिहिल्यासारखे झाले ह्याची नम्र जाणीव आहे.

>>>केवळ हां एकच हेतु असेल तर संबंधित सदस्याने विनंती केल्यावर ते साहित्य मायबोलीवरून काढायला काय हरकत आहे?<<<

आता मी उत्तर दिले तर काहीजण म्हणतील हा जबाबदारीचा प्रश्न आहे, नाही ते लोक का बोलतायत! पण ह्याचे उत्तर माझ्याकडे आहे.

समजा एखाद्याने तेढ पसरवणारा लेख लिहिला. प्रशासनाकडे कोणी तक्रार केली नाही आणि कोणी त्यावर प्रतिसादही दिला नाही. लेख मागे मागे पडत गेला. कधीतरी अचानक कोणीतरी संस्थळावर असा लेख प्रकाशित झाला म्हणून तक्रारी सुरू केल्या. आता मूळ लेखक म्हणाला की माझे लेखन नष्ट करा. तर करायचे का? तो लेख त्या व्यक्तीने लिहिलेला होता हा पुरावा संस्थळाला सादर करावा लागला तर? हे फक्त तेढ वाढवणार्‍या लेखांपुरतेच मर्यादीत आहे असे नाही. तुम्ही इथे माझ्या आधीपासून आहात. उद्या माझी एक गझल अगदी तुमच्यासारखी झाली आणि तुम्ही तक्रार केलीत तर निवाडा कसा करणार? तुमचे लेखन इथे असले तरच तो करता येईल ना? आपण फक्त मायबोलीकर-मायबोली प्रशासन एवढेच नाते गृहीत धरून मुद्दे मांडतो आहोत. मायबोली प्रशासन आणि प्रत्यक्ष सरकार दरबार ह्यांचेही नाते असू शकते. ते विचारात घेतले तर 'लेखन नष्ट करा' हे न ऐकले जाणे योग्य वाटते. डुप्लिकेट लेखन नष्ट करा हे ठीक आहे.

पुन्हा

चु भु द्या घ्या

अप्रकाशित न करणे याबद्दलचा आग्रह मला समजू शकतो. पटतो.
त्याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही.
तसेही सध्या विशेषांकातले सोडून स्वतःचे लिखाण संपादन करून उडवायची सोय आहेच.
विशेषांकाला लिखाण दिल्यावर ते त्या अंकाचा भाग म्हणून प्रसिद्ध झाल्यावर काढून टाकायची विनंती करणे म्हणजे दिवाळी अंकात एखादी कथा छापून आल्यावर १० वर्षांनी प्रकाशकाला तेव्हाच्या सगळ्या प्रतींमधून ती पाने फाडून टाका म्हणण्यासारखे आहे.

माझा आक्षेप तेव्हाही आणि आजही 'इतर माध्यमांच्यातला अमर्याद परवाना' या शब्दप्रयोगाला आहे.
तिथेही वेमांनी त्याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. ते ज्या अर्थाने म्हणतायत त्यात अमान्य करण्यासारखे काहीच नाही. 'नियत पे शक' वगैरे पण नाही. पण ते जो अर्थ नमूद करतायत त्यापलिकडे जाऊनही त्या शब्दप्रयोगाचा अर्थ काढता येऊ शकतो.
ज्या भविष्यासाठी(विविध प्लॅटफॉर्म्स निर्माण होणे वगैरे) हा कडेकोट बंदोबस्त आहे त्याच भविष्यात वेगळा अर्थ काढता येणे हे ही शक्य आहे त्यामुळे ती संदिग्धता धोक्याची ठरू शकते लेखकासाठी इतकेच मला वाटते.

जर अव्यावसायिक सिनेमा (असा कुठेच नसतो) वा नाटक (असू शकतेच!) असेल तर हो कारण इतर माध्यमांच्यातला अमर्याद परवाना दिलेला आहे. पण तो सिनेमा वा नाटक काढणारी प्रोड्यूसर एन्टिटी ही मायबोली.कॉम किंवा मायबोली INC असायला हवी.

हे ते करतीलच असा आरोप नाही. पण उदाहरणार्थ २० वर्षांनी माबो आय एन सी चे स्वरूप काय असेल आणि माबो कुणाच्या हातात असेल हे आत्ता माहित नाही तर खात्री कशी बाळगावी?

>>> साती | 1 August, 2015 - 16:59 नवीन

म्हणजे उद्या इथल्या कथेवर मायबोली स्वतः सिनेमा/ नाटक काढू शकते का?
(माध्यम बदल)
<<<

ह्या प्रश्नाची अपेक्षा होती मला तरी.

असे का झाले? तर हे खालचे विधान इनअ‍ॅडिक्वेट आहे असे नम्रपणे म्हणतो:

>>>मालकी हक्क लेखकाकडेच असल्यामुळे, लेखकाच्या परवानगीशिवाय इतर कुणाला, मायबोलीवर प्रसिद्ध झालेले लिखाण, इतरत्र प्रकाशित करता येणार नाही.<<<

ह्यात इतर कुणाला ह्या शब्दप्रयोगापुढे 'अगदी मायबोलीलाही' असे असायला हवे होते बहुधा.

'माध्यम बदल' चा अर्थ त्या लिंकवर अ‍ॅडमीन टीमने पुरेसा स्पष्ट केलेला दिसतो. (उदाहरणार्थ 'मोबाईल नवे पान' वगैरे). माध्यम बदल म्हणजे 'साहित्याचा व्यावसायिक वापर करण्याची शक्यता' हा काहींचा समज मात्र पूर्ण दूर झालेला दिसत नाही आहे त्या चर्चेतही!

व्हाईल ऑन धिसः (इथे लिहिण्याची पॉलिसी ठरवण्यापूर्वीचे माझे एक दोन अनुभव)

मला दोन जणांनी शांतपणे संपर्क करून दोन कथानके चित्रपटासाठी वापरायची आहेत म्हणून गाठ घ्यायची आहे असे कळवले. एक गाठभेट झाली आणि चर्चा सुरू आहे. दुसरी भेट पुढे ढकलली गेली. पण तिसरी ईमेल नागपूरहून आलेली होती. त्यात ते म्हणाले होते की आम्हाला 'तुम्हे याद हो के न याद हो' ह्यावर चित्रपट बनवायचा आहे आणि हे आम्ही तुम्हाला कळवतो आहोत. बास! आता मी कुठे बोंब मारू? पिक्चर तर निघालेला नाही. मायबोलीवर विचारले तर मायबोली तुमच्या लेखनाचे संरक्षण करू शकणार नाही अश्या अर्थाचे उत्तर आले. (नेमके शब्द इतके कर्ट नव्हतेच, व्यवस्थित सांगण्यात आलेले होते).

गझल परिचय ह्या लेखाने गेल्या महिन्याभरात तर मला प्रचंड त्रासदायक अडचणी आणल्या. कोणीही उठते आणि फेसबूक मेसेजमध्ये विचारते, त्या लेखातले हे आम्ही आमच्या पुस्तकात छापले तर चालेल का?

(पार्डन मी - पण बापाचा माल आहे का असे विचारायची इच्छा होत होती. शेवटी 'विचारलेत म्हणून आभारी आहे, पण त्यातून काहीही घेऊ नका' असे लिहून आणि संबंध संपवून मोकळा झालो).

म्हणजे थोडक्यातः

१. मायबोलीवरील आपल्या लेखनाची सुरक्षितता दैवाधीन आहे.
२. पण मायबोली स्वतः मात्र त्या लेखनाचा व्यावसायिक कारणांसाठी कधीच वापर करणार नाही ह्याची गॅरंटी आहे.

असे दोन अर्थ काढून मी पुढचे लेखन करत आहे.

चोराला चोरी करायचे तर तो कसेही करू शकतो. त्यामुळे त्या शक्यतांचा उहापोह या संदर्भात करण्यात काहीही अर्थ नाही.

प्रश्न शब्दप्रयोगात असलेल्या संदिग्धतेतून निर्माण होणार्‍या शक्यतांचा आहे केवळ.

कृपया हे सर्व मी माझे लिखाण डोक्यात ठेवून लिहित आहे असे समजू नये. मी लिहिते ते अजिबात लायकीचे नाही हे मायबोलीकरांनी वेळोवेळी समजावून दिल्यामुळे मला पटलेले आहे. पण असे अनेक साहित्य आहे माबोवर ज्याचा या संदिग्धतेचा आडोसा घेऊन वापर केला जाऊ शकतो. त्यांच्याबद्दल म्हणते आहे.

आम्हाला 'तुम्हे याद हो के न याद हो' ह्यावर चित्रपट बनवायचा आहे आणि हे आम्ही तुम्हाला कळवतो आहोत. बास! आता मी कुठे बोंब मारू? <<<<चित्रा्पट निर्माते असोसिएशन अथवा स्क्रीन्प्ले रायटर असोसिएशनकडे रीतसर तक्रार करता येईल. नुकत्याच एका छोट्या गावामधल्या लेखिकेने एका बॉलीवूड स्टारला कोर्टात इंगा दाखवलेला आहे.

या विषयावर माझे मत : माझे जे लिखाण मी व्यावसायिक कारणांसाठी इतरत्र वापरलेले आहे, ते आधीच माबोवरून काढलेले आहे, यापुढेही मीच काढत जाईन. मायबोली तसे लिखाण काढायला "बांधील" नाही याची पूर्वकल्पना आहे. मायबोलीवर कुठले लिखाण टाकायचे आणि कुठले नाही हे ठरवणे अखेर माझ्या हाती आहे.

आतापर्यंत तरी मायबोली.कॉमच्या हेतूंबद्दल एक लेखिका म्हणून माझ्या मनात संदेह उत्पन्न झालेला नाही. जर माझ्या लेखनाचा व्यावसायिक वापर झालाच तर माझे नाव आणि मोबदला (आर्थिकच असे नाही) मला दिला जाईल अशी खात्री आहे. ज्या दिवशी मायबोलीबद्दल असलेल्या या खात्रीलाच तडा पोहोचेल त्या दिवशी सगळे लिखाण अवश्य काढून टाकले जाईल.

खरं आहे.
मागे मी एका परिचितांचे लेखन मायबोलीवरून सध्या काढून टाका अशी त्यांच्यातर्फे विनंती केल्यावर( त्यांना त्यावेळी नेट अ‍ॅक्सेस नव्हता ) त्याप्रमाणे लगेच व्यवस्थापनाने कार्यवाही केली आणि तस्व कळवलेही.
म्हणून तर मायबोलीविषयी आदर आहे.
मी फक्तं शंका विचारली.

Pages