तुम्हा सर्वांना 'ऑलिम्पिक्स' माहीत असेलच! जसं ऑलिम्पिक्समध्ये सर्व जगभरातून खेळाडूंसाठी वेगवेगळे क्रीडाप्रकार असतात, त्याच प्रमाणे 'स्पेशल ऑलिम्पिक्स' मध्ये सर्व जगभरातून 'इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी' असलेले खेळाडू , विविध क्रीडाप्रकारांमधले आपले प्राविण्य आजमावून पाहतात. इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी म्हणजे त्यात फ्रजाईल एक्स सिंड्रोम आला, डाउन्स सिंड्रोम आला तसेच ऑटीझमही. कोणाला खेळासाठीच्या इंस्ट्रक्शन्स फॉलो करणे अवघड जाईल, तर कोणाला धडपडायला होईल. इट डझन्ट मॅटर. कारण स्पेशल ऑलिम्पिक्सचा मोटो, स्लोगन आहे : Let me win, but if I cannot win, let me be brave in the attempt.
ह्यावेळेस स्पेशल ऑलिम्पिक्स २५ जुलै पासून १० दिवस, लॉस एंजिलीस येथे होणार आहेत. गेल्या वेळेस ते अथेन्स, ग्रीस येथे झाले होते. कितीतरी खेळाडू येऊन आपापले प्राविण्य आजमावून पाहत असतील, खेळाचा, स्पर्धात्मक वातावरणाचा आनंद घेत असतील व अनेक अविस्मरणिय आठवणी गोळा करत असतील.
आणि आता आनंदाची बातमी सांगते. ह्या वेळेसच्या स्पेशल ऑलिंपिक्समध्ये माझा मुलगा भाग घेणार आहे! 'जिम्नॅस्टीक्स' ह्या क्रीडाप्रकारात!
साधारण शाळेच्या सुरवातीला शाळेने आमच्याकडून एक परवानगीचा फॉर्म भरून घेतला होता. २.५ - ७ वर्षे वयाच्या मुलांसाठी असलेला स्पेशल ऑलिम्पिक्स - यंग अॅथलिट प्रोग्रॅमसाठी. ह्या मध्ये बॉलला किक मारणे, बॉल फेकणे, उड्या, बॅलन्सिंग बीमवर चालणे इत्यादी वेगवेगळे प्रकार आहेत. माझ्या मुलाला अजुन हमखास किक किंवा थ्रो करता येत नसल्याने त्याचे नाव आम्ही बॅलन्स बीमवर चालणे ह्यासाठी दिले. (आणि विसरून गेलो!)
पण गेल्या आठवड्यात मुलाची एंट्री कन्फर्म करण्यासाठी, तसेच त्याला देण्यात येणार्या ट्रेनिंगची माहिती देण्यासाठी फोन आला. आणि खरं सांगते - तेव्हा ट्युबलाईट पेटली. धिस इज रिअली हॅपनिंग! १ ऑगस्टला संध्याकाळी मुलाचा इव्हेंट आहे! फर्स्ट लेडी - मिशेल ओबामा ओपनिंग सेरेमनीला येणार आहेत. ऑलिंपिक्सची ज्योत लॉस एंजिलीसमधून कशी फिरवली.. वेगवेगळ्या बातम्या वाचून दिवसेंदिवस हे सगळं टू गुड टू बी ट्रू वाटू लागले आहे. अर्थात आमचा मुलगा तिथे काय नक्की करणार आहे कोण जाणे. कारण अशा इव्हेंट्समध्ये , कॉन्सर्ट्समध्ये आई बाबांच्या आठवणीने रडणे व अपेक्षित असलेली अॅक्टीव्हिटी न करणे हे तो नित्यनेमाने करतो! काही का असेना. ऑलिम्पिक्समध्ये भाग घ्यायला मिळतोय, त्याच्या आवडत्या गोष्टी करायला मिळातील - भरपूर दंगा व फिजिकल अॅक्टीव्हिटी. हारजीत तर लांबचीच गोष्ट आहे! आय अॅम रिअली रिअली हॅपी फॉर हीम!
फार छान बातमी. बेबी वॉरिअर
फार छान बातमी. बेबी वॉरिअर आणि त्याच्या आई-बाबांचं अभिनंदन! मनःपूर्वक शुभेच्छा!
वा ! अभिनंदन आणी शुभेच्छा !!!
वा ! अभिनंदन आणी शुभेच्छा !!!
अभिनंदन, आणि शुभेच्छा
अभिनंदन, आणि शुभेच्छा
अरे वा. बार्क्याचे अभिनंदन अन
अरे वा. बार्क्याचे अभिनंदन अन शुभेच्छा .
आमचा बार्क्या पण ऑलिम्पिक मधे जिम्नॅस्टिक्स साठी भाग घ्यायची स्वप्ने पाहतोय ...
आजचे डूडल बघताच तुमची आणि
आजचे डूडल बघताच तुमची आणि छोट्या वॉरियरची आठवण आली.
Wishing him all the best!!!!!!!!
अरे हो की! आजपासून सुरू आहेत
अरे हो की! आजपासून सुरू आहेत ना स्पर्धा? बेबी वॉरियरला खूप खूप शुभेच्छा!
अभिनंदन अन शुभेच्छा!
अभिनंदन अन शुभेच्छा!
आजचे डूडल बघताच तुमची आणि
आजचे डूडल बघताच तुमची आणि छोट्या वॉरियरची आठवण आली. - मलापण
Wishing him all the best!!!!!!!!
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
मवॉ...१ ऑगस्टला आहे ना मुलाचा
मवॉ...१ ऑगस्टला आहे ना मुलाचा ईव्हेंट? खूप शुभेच्छा! इथे अपडेट नक्की लिही!
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
छान बातमी. तुमचे आणि मुलाचे
छान बातमी.
तुमचे आणि मुलाचे अभिनंदन!
मस्त.. तुमच्या मुलाला हार्दिक
मस्त.. तुमच्या मुलाला हार्दिक शुभेच्छा..
हे खूप प्रशंसनीय आहे....
हे खूप प्रशंसनीय आहे.... मनापासून खूप खूप शुभेच्छा. Go little warrior.... !!
मी परवा पासून.. भारताची टीम
मी परवा पासून.. भारताची टीम शोधत होतो India म्हणून... पण आश्चर्य म्हणजे भारत अश्या नावाखाली भारताची टीम आहे...
वा ! तुमच्या कुटुंबाला
वा ! तुमच्या कुटुंबाला अभिनंदन व शुभेच्छा !
इथे अपडेट करालच.
अभिनंदन अणि पिल्लू वॉरीयरला
अभिनंदन अणि पिल्लू वॉरीयरला शुभेच्छा!>>+१११
छोट्या वॉरियरला खूप खूप
छोट्या वॉरियरला खूप खूप शुभेच्छा!!!
इथे जमल्यास वृत्तांत टाका.
Mother Warrior तुम्हाला आणी
Mother Warrior
तुम्हाला आणी तुमच्या मुलाला खुप खुप शुभेच्छा !!
अभिनंदन! मी volunteer आहे
अभिनंदन!
मी volunteer आहे तिथे..मस्त वाटतय..:)
मस्त,अभिनंदन, आणि शुभेच्छा!
मस्त,अभिनंदन, आणि शुभेच्छा!
ग्रेट! मस्त अनुभव असेल
ग्रेट! मस्त अनुभव असेल हा!
थ्री चियर्स फॉर एव्हरीबडी पार्टिसिपेटिंग!
मस्त,अभिनंदन, आणि शुभेच्छा!
मस्त,अभिनंदन, आणि शुभेच्छा! >>> + १००००
अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा
अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा
भारी!! स्लोगन फार मस्त
भारी!! स्लोगन फार मस्त आहे!
छोट्याला खूप शुभेच्छा!!!
पिल्लू वॉरियरला उद्याच्या
पिल्लू वॉरियरला उद्याच्या इव्हेण्ट साठी शुभेच्छा.
मवॉ, छोटुला खूप खूप शुभेच्छा!
मवॉ, छोटुला खूप खूप शुभेच्छा!
अरे वा, मस्तच की . छोटु, धमाल
अरे वा, मस्तच की . छोटु, धमाल कर रे . आईसारखे मस्त फाईट कर
आरे आजच आहे का.? खुप खुप
आरे आजच आहे का.? खुप खुप लाखभर शुभेच्छा !!
अपडेट करा, वाट पाहतो..
छोट्या वॉरिअरला शुभेच्छा!
छोट्या वॉरिअरला शुभेच्छा!
Pages