व्हॉट्स अॅपची उपयुक्तता आणि उपद्रवमूल्य ह्या दोन्हींशी आता बहुतेकांचा परिचय झालेला आहे.
व्हॉट्स अॅपबाबत माझी मते:
१. मी फॉर्म केलेले ग्रूप्स -
मी तीन ग्रूप्स तयार केलेले आहेत. त्यातील दोन ग्रूप हे अनुक्रमे नातेवाईक व मित्र ह्यांचे असल्यामुळे तिथे मी कोणतीही विशेष नियमावली बनवलेली नाही. फक्त आणखी एकाला अॅडमीन बनवून ठेवलेले आहे. तिसरा ग्रूप हा विविध भागातील कवींचा ग्रूप आहे. त्या ग्रूपला मी व्यवस्थित नियमावली दिलेली आहे. तेढ वाढवणार्या पोस्ट्स नकोत, राजकीय किंवा इतर कल दर्शवणार्या पोस्ट्स नकोत, अश्लील विनोद नकोत, रोज किमान दोन स्वरचित ओळी तरी पोस्ट कराव्यात, महिन्यातून एक प्रत्यक्ष चर्चासत्र व्हावे, प्रताधिकार संदर्भातील अटींची जाण ठेवावी, वगैरे! ह्या ग्रूपचे अल्पावधीत चार उपक्रमही झाले. तसेच आज पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर मी स्वतः बनवलेल्या व इतर ठिकाणचे सदस्यत्व असलेल्या सर्व ग्रूप्सवर 'पंजाब हल्ल्याबाबत पोस्ट टाकू नये' अशी विनवणी पोस्ट केली. मी सदस्याला ग्रूपवर घेण्यापूर्वी एक स्टँडर्ड विनंतीची पोस्ट त्या सदस्याला स्वतंत्रपणे पाठवतो. त्याने होकार दिल्यावर त्याची एक किंवा दोन कविता त्याचे नांव न लिहिता ग्रूपवर पोस्ट करून मत मागवतो. काव्याचा किमान दर्जा अबाधित राहावा ह्यासाठी असे करतो. किमान चार सदस्यांनी त्या सदस्याच्या प्रवेशाला मंजूरी दिली की मग त्या सदस्याला प्रवेश देतो. नवीन सदस्याचा प्रवेश झाला की लगेच पुन्हा एकदा नियमावलीची पोस्ट अपलोड करतो जी त्या सदस्याला व इतरांनाही त्यामुळे पुन्हा एकदा वाचता येते. उपक्रमांअंतर्गत असलेल्या जबाबदार्या दरवेळी वेगवेगळ्या नावांना स्वीकारायला लावतो ह्यामुळे इगो-इश्यूज होऊ शकत नाहीत. सदस्यांपैकी कोणाचे एखाद्या दिवशी काही खास असेल तर ग्रूपचे नांव व आयकॉन त्या दिवसापुरता बदलून त्या सदस्याचा गौरव करतो.
२. मला सदस्य म्हणून समाविष्ट केलेले ग्रूप्स -
असे चार, सहा ग्रूप्स आहेत. ऑफिस, कविता, मित्र, नातेवाईक वगैरे प्रकारचे! त्या ग्रूप्सचा उपयोग नेटवर्किंगसाठी चांगला होतो. अनेकदा खूप पोस्ट्स येतात. नकोसे होते. अनेकदा काही जण एकमेकांशी चर्चा करतात पण बाकीच्या सगळ्यांना वाचायला लागते. ग्रूप म्यूट करता येतो व करावा लागतो वगैरे! पण अनेकदा नवीन विनोद, व्हिडिओज, बातम्या वगैरे चटकन समजते. माझाच एखादा कार्यक्रम असेल तर लगे हाथ त्याची जाहिरातही होऊन जाते. मी रोज माझे एखादी स्वरचित गझल / कविता अपलोड करतो आणि मेंबर्स ती त्यांच्या स्वतंत्र ग्रूप्सनाही (मला विचारून व माझ्या नावासकट) पाठवतात. (एकदा तर मी मायबोलीवर लिहिलेली 'सून; ही कथा माझ्या नावासकट भलतीकडेच फिरत असल्याचे समजले व आनंद झाला).
३. वन टू वन चॅटिंग - मी सध्या करत असलेल्या कामासंदर्भातील सर्वांना मी ह्या प्रकारात सेव्ह करून ठेवलेले आहे व त्यांच्याशी स्वतःहून संपर्क करतो. त्याचा परिणाम मला असा जाणवतो की त्यांच्याबरोबर माझा आपोआप सुसंवाद राहतो. संपर्क म्हणजे काय तर येईल ती पोस्ट फॉरवर्ड न करता मी जे इतर ग्रूपवर माझे काव्यलेखन पोस्ट करतो तेच पोस्ट करतो आणि दिवसातून एकदाच! त्यातील काही जण फारच मान्यवर असल्यामुळे ते काही प्रतिसाद देत नाहीत. पण काहीजण चक्क देतातही! तेवढेच बरे वाटते.
उपद्रवी बाबी -
१. न विचारता एखाद्या ग्रूपमध्ये समाविष्ट करून घेण्याचा तीव्र संताप येतो. पण मी लगेच बाहेर पडत नाही. त्या ग्रूपमध्ये असल्यामुळे काही नवीन घडू शकणार आहे का ह्याचा अंदाज घेतो. नवीन होणार नसले तरीही बाहेर पडतच नाही. म्यूट करून अधूनमधून वाचत राहतो. ग्रूपमधून बाहेर पडून संबंध बिघडवण्यापेक्षा हे बरे वाटते. मात्र एखादेवेळी काही वादग्रस्त मुद्दा निघाला आणि आपल्याशी कोणी वाद घालू लागले तर मी थेट अॅडमीनना सांगतो की मला न विचारता तुम्ही ग्रूपवर घेतलेले आहेत, आता मी बाहेर पडलो तर का पडलो हे स्वतंत्र चॅटिंगमध्ये येऊन विचारत बसू नका.
२. अजिबात विचार न करता येईल ती पोस्ट कुठेही फॉरवर्ड करणार्यांचा अतिशय राग येतो. मग ती पोस्ट रीपीट होते, काही वेळा त्यांनी स्वतःच वाचलेली नसते. लोक असे का करतात समजत नाही.
३. सुप्रभात आणि शुभरात्रीचे मेसेजेस म्हणजे एक त्रासदायक प्रकार होऊ लागतो. येणार्या इमेजेस कितीही सुंदर असल्या तरी दरवेळी फोन वाजला की ते बघा आणि वैतागून बाजूला ठेवा हे नको होते.
४. सण-वार, विशेष दिवस आणि वाराप्रमाणे देवतांच्या तस्वीरींचे फॉरवर्ड्स धुमाकूळ घालतात.
५. संता-बंता, बंडू-गुरुजी, आलिया भट, काहीही हं श्री असे विनोद सतत रीपीटही होतात आणि सगळीकडून येऊन आदळत असतात.
६. काही विद्वानांनी तयार केलेले बेलाच्या पानाची उपयुक्तता, पिंपळाचे उपयोग, वगैरे पोस्ट्स लंब्याचौड्या असतात. काही कोडीही डोक्यात जातात. वाट्टेल त्या ओळी हरिवंशराय बच्चन ह्यांच्या कविता म्हणून फिरतात. पु.ल. आणि व.पू. तर रोज आपल्याबरोबर गप्पा मारायचे अश्या थाटातील पोस्ट्स येतात. 'क्या खूब कहां है गालिबने' म्हणत कंप्लीट भंक्स उर्दू ओळी गालिबच्या नावावर खपवल्या जातात.
७. तद्दन फालतू पोस्ट्ससाठी फोन ऑन करून बघावे लागते. म्हणजे कोणीतरी कुठलीतरी गुडमॉर्निंगची इमेज टाकली असेल तर त्या इमेजची स्तुती करणारा नुसता एक अंगठाच कोणीतरी तिसराच पाठवतो. तेही बघावे लागते. (अर्थात अश्या ह्या उपद्रवांवर ग्रूप म्यूट करणे किंवा बाहेर पडणे हे उपाय आहेतच म्हणा).
८. काही जणांची चॅटिंगची भाषा अत्यंत दळभद्री असते. इंग्रजी 'जे' हे अक्षर आणि पुढे '१' हा आकडा काढून विचारतात जेवण झाले का म्हणून! तसेच मी विचार करते ह्यातील विचार हा शब्द इंग्रजी व्ही आणि नंतर '४' हा आकडा काढून लिहिला जातो. हे फारच डोक्यात जाते.
९. काही जण चार चार दिवस ऑनलाईनच नसतात आणि चार दिवसांपूर्वी आपण त्यांना केलेल्या अनेक मेसेजेसला ते चार दिवसांनी बावळटासारखे एक 'हाय' असे प्रत्युत्तर देतात. त्यावेळी आपण प्रचंड ट्रॅफीकमध्ये वगैरे असूनही त्यांचे ते उत्तर बघून चवताळतो आणि फोन खिशात ठेवतो. तर दोन मिनिटांनी त्यांचा प्रश्न येतो. 'बिझी?'! 'अरे गाढवा माझे मेसेजेस तू चार दिवसांनी बघतोयस ते बघ आधी' असे पुटपुटत आपण अनुल्लेख करतो.
उपयुक्त बाबी -
ह्याही बर्याच आहेत.
१. अनेक फोटो पाठवता येतात. इतरही काय काय पाठवता येते.
२. फोनचे कव्हरेज नसले पण इन्टरनेट असले तर संपर्कात राहता येते. ह्याचा उपयोग मला नुकत्याच केलेल्या परदेशवारीत झाला.
३. त्याच परदेशवारीत पुण्यातील एका मित्राला कार्डिऑलॉजिस्टची अपॉईंटमेन्ट मिळवून देण्याची इमर्जन्सी आली होती तेव्हाही व्हॉट्स अॅप देवासारखे धावले.
४. अपडेटेड राहायला सोपे जाते.
मात्र एक निरिक्षण असे आहे की व्हॉट्स अॅप हे साधन छानपैकी आणि उपद्रवी ठरू न देता कसे वापरावे ह्याबाबत बहुतेक लोक अजाणच असावेत. अडाणीपणे वापर करत असतात ते व्हॉट्स अॅपचा!
पण हळूहळू व्हॉट्स अॅप (व तत्सम किंवा अधिक प्रगत अॅप्स) मानवी जीवनाला पूर्णच व्यापून टाकतील असे वाटते.
आपली मते, अनुभव अवश्य नोंदवावेत.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
कोणत्याही ग्रूपात प्रत्येक
कोणत्याही ग्रूपात प्रत्येक मेंबरला अॅडमिन बनवायची सोय व्हॉट्सॅपात आहे. वापरून पहा.
आजकालच्या व्हॉट्सॅप अॅडमिनवर खापर फोडायच्या जमान्यात बरे पडते.
बेफिकीरजी , आपण व्हॉटस् अॅप
बेफिकीरजी ,
आपण व्हॉटस् अॅप गूप मध्ये राबवत असलेले उपक्रम स्तुत्य आहेत. व्हॉटस् अॅप चे उपयोग आणि उपद्रव.. अगदी सहमत.
उपद्रव क्रमांक २,३,४ तर खरच चीड आणणारे आहेत.
रिपीट पोस्ट्स आणि इमेजेस , विशेष सण किंवा ग्रूप मधील एखाद्या चा वाढदिवस असेल तर तेच तेच मेसेजेस अक्षरशः वैताग आणतात.
अशा वेळी ,आॅप्शनस मध्ये जाऊन क्लिअर चॅट करण्याशिवाय दुसरे काही अॉप्शन उरत नाही.!
सगळ्यात आवडणारा एक उपयोग म्हणजे आपल्या शाळा किंवा कॉलेज च्या फ्रेंड्स सोबत टच मध्ये रहाता येतं. फेसबुक वर सगळे असले तरीही फक्त शाळा किंवा फक्त कॉलेज असे वेगवेगळे ग्रूप असल्याने पुन्हा ते दिवस,आठवणी जागवल्या जातात.
त्यावेळी आपण प्रचंड
त्यावेळी आपण प्रचंड ट्रॅफीकमध्ये वगैरे असूनही त्यांचे ते उत्तर बघून चवताळतो आणि फोन खिशात ठेवतो. तर दोन मिनिटांनी त्यांचा प्रश्न येतो. 'बिझी?'!
तुम्ही वाहन चालवत असाल तर व्हाट्स अॅप का बघता? अपघात होऊन मराल! किंवा दुसर्याला माराल.
त्याहिपेक्षा तुमचे काम महत्वाचे असते का? असल्यास वाहनच्र रस्त्याच्या कडेला घेऊन थांबा, व्हाट्स अॅप बघा नि चार शिव्या पण हाणा असल्या लोकांना.
असे चवताळणे बरे नाही. रक्तदाब वाढतो.
बेफी, तुमचे उपक्रम चांगले
बेफी, तुमचे उपक्रम चांगले आहेत. पण मग ते मेन्टेन करणं आलं. ती भाषा माझ्या पण डोक्यात जाते.
हे घ्या आणखी शब्द,
kले. (केले)
जाin (जाईन)
shd(शूड)
2t(dont)
v4run (विचारून)
2t no? ( dont know)
k (ओके)
hru?( how are you?)
--------------------
१)नातेवाईक ग्रूप : सहन होत नाही आणि सांगता येत नाही.
(उगाच काही तरी आठवू नका). काही बिलंदर नातेवाईक भांडून घेतात जुने विषय काढून. 
२)मित्र मंडळी पण नकोसाच होत.पण कधीतरी चांगली माहिती मिळते.
३) संस्कार ग्रूप : एका भटजीने( मित्राने जो भटगिरी करतो श्रावणात, इतर वेळी आयटीगिरी) वीट आणलेला. आपले संस्कार, चाली रीती, ब्राम्हण कसे जन्मले ई ई पाठवून वैताग आणलेला. बरं, जबरदस्ती अॅड करून. आधी वाटलं , जावू दे. पण त्या फालतु पोस्टस आणि आधार नसलेले कांगावे वाचून नकोसे झाले.
४) साडी/अलंकार ग्रूपः बराय कधी कधी.
लोकं हजारदा आपला फोटो बदलत बसतात. मोठया मोठया विडीओ फाईल्स, इमेजेस ... फार वैताग. गपचूप बाहेर पडणे बेस्ट. आधी चांगल्या मैत्रीणीने काढलाय, कसे वाटेल , कसं दिसेल. मग म्हटलं मरो... ते डिलीट करणं.
देवाचे फोटो, करुण कहाण्या नकोसे असतात. मी तरी उत्तर लगेच द्यायचे नाही हा नियम ठेवलाय. काही काही चिपकु 'फ्री' आहेस ना? विचारतात.
मी ऑटो डाऊनलोड पूर्णपणे बंद
मी ऑटो डाऊनलोड पूर्णपणे बंद ठेवलेल आहे.
नाहीतर अक्षरशः काहीही येऊन बसते फोन मधे.. मी अतिशय क्वचित् काहीतरी डाऊनलोड करतो..
मधे एक भानगड़ आली होती, तो एक अति मोठा मेसेज पाठवून दुसऱ्याचा फ़ोन हैंग करायचा .. अतिशय इरिटेटिंग प्रकार होता तो.. दुसऱ्याला त्रास देण्यात कसली मजा येते कुणास ठाऊक..
एक उपयोग म्हणजे लिंक्ड इन वरुन नम्बर घेऊन जॉब व्हेकन्सीज शेयर करणारे ग्रुप बनवतात. त्यांचा पण कधीकधी उपयोग होतो..
सर्व अगोदरच माहिती असल्याने
सर्व अगोदरच माहिती असल्याने व्हाटसअप घेतलेच नाहियै.
फोन नं आधारीत संस्थळ =विहिरीतील बेडुक आणि त्यांचे डराँव डराँव.( त्यांची नियमावली ,अॅडमिन वगैरे अगदी कहर आहे.)
ज्यांच्याशी वर्षांतून एकदाही फोनवरून संपर्क करत नव्हतो त्यांचे जोक्स आणि फोटो पाहण्याची शिक्षा आपलेच पैसे खर्च करून का भोगायची?
रोज सुप्रभात व शुभरात्री ची
रोज सुप्रभात व शुभरात्री ची चित्रे टाकणारे वैताग देतात. काहीजण तर नेमाने फक्त हे दोनच संदेश भल्या मोठ्या चित्रासह देत बसतात. ई मेल नवे होते तेव्हा FW: RE: FW: FW: FW: FW: अशा ई मेल्स नी वात आणला होता. काही दिवसांनी लोक यालाही कंटाळतील. सनी लिऑन चे जोक बास आता !
अगदी अगदी अगदी बेफि . कित्ती
अगदी अगदी अगदी बेफि . कित्ती मनातल बोललात .
बराच काळ "कस्काय" टाळलं .
मित्र मैत्रिणी,नातेवाईक याना पहिल्यान्दा फार आश्चर्य वाटायच , नंतर नंतर सवय झाली .
आता लेकाच्या शाळेसाठी वापरते .
पालकान्चा ग्रुप आहे , त्यावर अभ्यास , रोजच्या घडामोडी , शाळा चालु बन्द ई. गोष्टी चटकन समजतात . केवळ आणि केवळ त्यासाठीच व्हॉआ वर आले .
अजूनही बर्याच लोकाना माहित नाही त्यामुळे ईतर कोणत्याच ग्रुप मध्ये कोणी स्वतःहून अॅड केलं नाहीये , नशिब माझं .
पण शाळेच्या ग्रुप्वरही काही महाभाग आहेतच , रोज सकाळी गुमॉ आणि रात्री गुना न चुकता नेमाने करणारे.
फालतु नवरा बायकोचे जोक पुढे सरकवणारे .
आणखी एक अति वाईट प्रकार म्हणजे क्स्काय वर येणारी कार्यक्रमाची आमन्त्रणे .
लोक फोन करून आमंत्रण द्यायचा कण्टाळा करतात .
ठीक आहे , घरी येउन बोलवू नका , पण काहितरी मोठा समारंभ असला तर भले निमंत्रण पत्रिका व्हॉअ वर पाठवा पण एक फोन करून बोला तरी किन्वा पेर्सोनल मेसेज तरी टाका . ते पण नाही .
पण पटकन कोणाच्या संपर्कात रहाण हा फायदा , फोटोज लगेच पाठवता येतात .
हे जोक्स , फॉरवर्ड प्रकरण बन्द झाल तर फार फायदा होईल
ह्या लेखामुळे म्युट हा ऑप्शन
ह्या लेखामुळे म्युट हा ऑप्शन कळला, काल ऑफीसमधे असताना एका ग्रुपवर जोरात गप्पा चालू होत्या तेव्हा शेवटी फोन सायलेंट्वर टाकला आता म्युट ऑप्शन वापरेन, धन्यवाद बेफिकीर
आणि १ जोक कुणी टाकला तर
आणि १ जोक कुणी टाकला तर त्यावर हाहा करणारी २० टाळकी

आणि आता सद्ध्या तर ऑफिसचे
आणि आता सद्ध्या तर ऑफिसचे सतराशे साठ ग्रूप्स. आदल्या रात्री वाचला असेल मेसेज तर दुसर्या दिवशी सकाळी लगेच म्हणणार, झालं का ते काम? रात्रीच पाठवला होता मेसेज

आणि १ जोक कुणी टाकला तर
आणि १ जोक कुणी टाकला तर त्यावर हाहा करणारी २० टाळकी >> आणि अन्गठे दाखिवणारी १०
आणि ते 'सुंदर' वगैरे
आणि ते 'सुंदर' वगैरे चिन्हं...
नवीन ग्रुप फॉर्म झाल्यावर आपन ज्या हेतूने जवळ आलो ते बाजुलाच रहते फक्त फॉरवर्ड्स चा रतिब लावतात लोक
बरेच ग्रुप म्यूट करून ठेवले..मध्यंतरी काही सोडले तर एडमिन महाशयांनी परत ऐड केले..
आणि ते आई वडील किती ग्रेट, मुलगी किती छान, भावाबहिनीच नात किती ग्रेट असले फॉरवर्ड्स तर वाट आंटात...
रोज च्या धकाधकीच्या आणि
रोज च्या धकाधकीच्या आणि कामाच्या व्यापात सुरवातीला वाट्स अप त्रासदायक वाटत होते. काही काळानंतर सवय झाली. जवळ पास १०-१२ वर्षापासुन गाव सोडुन झाले होते. मोजकेच असे कधीतरी फोन करुन संभाषण करणारे गावतली मंड्ळी होती. पंरतु या वाटस च्या माध्यमातुन आम्ही जवळपास एकाच वयाचे पुन्हा एकदा या ऑनलाईन जगात रमलो... सुरवातीला विनोद, एकमेकांची टर उडवत जमा होत राहीलो...नंतर वयानुसार आलेल्या शहाणपणा मुळे काही तरी सामाजिक बाधलकी वा गावाचे देणे म्हणुन एक स्तुथ असा उपक्रम ३ महीण्याचा अथक प्ररीश्रमातुन यशस्वी रीत्या पार पाडला. मस्त आहे वाटस अप... फक्त त्यांचा सदु उपोयोग करता आला पाहीजे.
कन्सल्टन्टला एक्स रे ,
कन्सल्टन्टला एक्स रे , रिपोर्ट पाठवता येतात.
कधी कधी हे फॉरवर्ड्स ईतके
कधी कधी हे फॉरवर्ड्स ईतके निरर्थक असतात ...
आत्तच एक येउन पडलाय
"A great muslim died on auspious day of Hindu in Christian city .
He maintained secularism and integrity in death also "
बादरायण संबंद्ध काय म्हणतात तो हाच
.
उगाचच आपली प्रतिभा सिद्ध करायचा फुकाचा अट्टाहास
स्वस्ति तीन महिन्यांपूर्वी
स्वस्ति
तीन महिन्यांपूर्वी बायकोच्या मैत्रिणीचा इसीजी कार्डिऑलॉजिस्टला व्हॉट्स अॅपवर पाठवला आणि त्याने सांगितले तिला अॅटॅक येऊन गेलाय, अॅडमीट करा. थँक्स टू व्हॉट्स अॅप!
विकु - सनी लिऑनचे जोक्स -
रोज सुप्रभात व शुभरात्री ची
रोज सुप्रभात व शुभरात्री ची चित्रे टाकणारे वैताग देतात>> +१
माझी मैत्रिण लिहीताना तर vowels वापरतच नाही ...english असो वा मराठी ... अती त्रासदायक
सुप्रभात व शुभरात्री तर न
सुप्रभात व शुभरात्री तर न बघताच डिलीट.
नवरा बायकोचे जोक्स तर डोक फिरवतात . स्पष्ट सांगून पण तेच
नात्याचे उमाळे आणणारे फोरवर्ड . -
( इतके दिवस मला वाटायचे कि मीच पाषाणहृदय आहे कि काय )
नात्याचे उमाळे आणणारे फोरवर्ड
नात्याचे उमाळे आणणारे फोरवर्ड . -
( इतके दिवस मला वाटायचे कि मीच पाषाणहृदय आहे कि काय )>>> मलाही असच वाटायच गं
(म्हणजे अजूनही वाटत )
>>>नात्याचे उमाळे आणणारे
>>>नात्याचे उमाळे आणणारे फोरवर्ड <<<
व्हॉटसअॅप वर एखाद्या
व्हॉटसअॅप वर एखाद्या चांगल्या पोस्टला बाकी काहीच प्रतिसाद न लिहिता फक्त टाळ्या वाजवण्याचा इमोटिकॉन टाकला की का कुणास ठाऊक कुचकटपणे किंवा उपहासाने वापरल्यासारखाच वाटतो. म्हणजे टाळ्या,टाळ्या,टाळ्या ! किंवा एजोटाझापा सारखा !! पण थंब्ज अप किंवा हाताने छान आहे दाखवणे खटकत नाही.
हे फक्त मलाच वाटतं की अजून लोकांनाही वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल.
त्यापेक्षा कुठलीच स्माईली न वापरता नुसतं वा, मस्त, सुंदर असा काहीही एक शब्द टाईप केला तरी बरे वाटते
अत्यंत उपयोगी पण सूज्ञपणे न वापरल्यामुळे महाउपद्रवी अशी गत झाली आहे ह्याच्याशी सहमत.
सध्या लोक ओवेसीला शिव्या
सध्या लोक ओवेसीला शिव्या देतायत, की म्हणे बघ, सगळा देश एका मुसलमानासाठी रडतोय.
छान लिहिले आहे. व्हॉटस अपचे
छान लिहिले आहे.
व्हॉटस अपचे उपयोग आणि उपद्रव दोन्ही समसमान आहेत.
शाळेसंबंधीत घडामोडी पालकांच्या ग्रुपमुळे त्वरित समजतात.
तसेच शाळेचे मित्र-मैत्रिणी, दूरस्थ नातेवाईक कनेक्टेड असतात. एरव्ही धकाधकीच्या जीवनात फोन उचलून एकमेकांचे क्षेमकुशल विचारणे अंमळ कमीच होत होते. पण या अॅपमुळे ताबडतोब फोटो पाठवू शकण्याची सुविधा असल्यामुळे आपापल्या मुलांच्या लहान- सहान करामतीही शेअर केल्या जातात. उदा. चित्र, निबंध, कविता, हस्तकला इ. आणि मुलांनाही आपले कौतुक झाले की प्रोत्साहन मिळत असते.
इमर्जंसीच्या वेळेस एक पोस्ट टाकून मदत मागता/मिळवता येते.
उपद्रवही बरेच अधोरेखित झालेले आहेतच.
मी काही भर टाकू इच्छिते. ग्रुपवरील काही महाभाग अगदी कुत्र्याच्या छत्रीसारखे अचानक उगवतात व आपले अस्तित्व जाणवून देण्यासाठी धडाधड फॉर्वर्डस पाठवण्याचा सपाटा लावतात. आधी हा जोक/इमेज/व्हिडिओ या ग्रुपवर कुणीतरी आधीच पाठवले नाहीये ना याची शहानिशा न करताच. मला या अशा महाभागांची भयंकर चीड येते.फोनची स्पेस आणि नेटपॅक दोन्ही आघाडींवर आपण नुकसानीत जात रहातो.
त्याचप्रमाणे कधी एखाद्या ग्रुपवर काही गंभीर चर्चा चालू असते. त्यावेळीस असे लोक्स आधीचे काहीही न वाचता वेळ-काळाचे भान न ठेवत असेच आचरट विनोद वगैरे पाठवत बसतात, तेव्हाही हसावे की रडावे ते कळत नाही. जणू काही ग्रुप फक्त इकडचे तिकडे व तिकडचे इकडे चिकटवण्यासाठीच आहे. त्यावर सदस्यांनी इतर काहीही बोलणे/चर्चा करणे आक्षेपार्ह असल्यासारखे.
वैयक्तिक सूडही बराचा उगवला
वैयक्तिक सूडही बराचा उगवला जात असावा... शाळेच्या ग्रुपमध्ये एक वर्गमैत्रिण (क्लासमेट ला चपखल शब्दच नाही, मैत्रिण नसूनही वापरावाच लागतो) मी कुठलीही पोस्ट टाकली की किमान A4 पाने दोन तरी भरतील इतके काहीही रिपिट आणि भयानक बोअर पाठवते. मी तिला वर्गात उभी राहून हमखास चुकीची उत्तरे द्यायची म्हणून शाळेत असताना बरेच पिडलेले आहे त्याचा सूड....
पण पोस्ट्स मुळे अनेक स्वभावदेखील कळून येतात... हरवलेली नाती थोडी तरी जोडली जातात
अधिक उणे सगळेच घडते
ऑटोडाऊनलोड मी पन बंदच करुन
ऑटोडाऊनलोड मी पन बंदच करुन ठेवलय..
उठसुठ विडिओ पाठवणारे सुद्धा जीवावर येतात मला..
गुड मॉर्निंग नाईट वाले तर इतके किर्र करतात कि बस रे बस..
सर्वात कहर म्हणजे मॅसेज खाली ' इतक्यांना पाठवा ', 'आईवर प्रेम असेल तर तितक्यांना पाठवा' ,'पाठवला तर चांगली बातमी मिळेल नाही तर वाईट घडेल' असे मॅसेजेस.. खोट नाही पण पाठवणार्या एकेकाला धरुन अस्सा झोडावस वाटत ना कि बस रे बस..दलिंदर लेकाचे.
Parden my language but खुप चिड येते अश्या गोष्टींनी
वर्गमैत्रिण (क्लासमेट ला चपखल
वर्गमैत्रिण (क्लासमेट ला चपखल शब्दच नाही, मैत्रिण नसूनही वापरावाच लागतो)
<<
शाळासोबती.
आजकाल शाळांत 'व्हॉट्स अॅप
आजकाल शाळांत 'व्हॉट्स अॅप शाप की वरदान' असा निबंध देतात का?
आजकाल शाळांत 'व्हॉट्स अॅप
आजकाल शाळांत 'व्हॉट्स अॅप शाप की वरदान' असा निबंध देतात का? >>> अजून्तरी देत नाही आहेत , बहुतेक लवकरच देतिल
अजून्तरी देत नाही आहेत,
अजून्तरी देत नाही आहेत, बहुतेक लवकरच देतिल
<<
ज्योक कल्ला नाय तुमाला.
थे वर्ती लिवलंय थे काये?
तेलाच मंतेत शालकरी निबंद.
Pages