http://www.dnaindia.com/india/report-after-beef-maharashtra-government-m...
या बातमीचा आशय खरा मानला , तर सरकार संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच संपूर्ण दारुबंदी लागू करण्याच्या विचारात आहे . मला वाटते असा कोणताही निर्णय घेणे अतिशय धोकादायक ठरू शकते .याची कारणे खालीलप्रमाणे -
१. जर कायदेशीर दारुबन्दी झाली ,तर बेकायदेशीर दारुधन्द्याला बरकत येईल ,कारण अट्टल बेवडे आणि विरन्गुळा म्हणून पिणारे आपली तहान कुठेतरी कशीतरी भागवणारच !
२. दारूतून मिळणारा प्रचंड महसूल बुडेल ,त्यामुळे सरकारी व प्रशासनिक खर्च चालवण्यास पैसे अपुरे पडू शकतात. याचे कारण अनधिकॄत आकडेवारी नुसार सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी ४०% उत्पन्न दारू व तंबाखूजन्य पदार्थान्च्या वरिल करांमधून येत असते. साहजिकच विकासकामाना निधिअभावी खीळ बसेल
३.महाराष्त्ट्रात येणार्या पर्यटकांच्याअ सन्ख्येवर विपरीत परिणाम होवून पर्यटन व्यवसायाला फटका बसेल.
४.राजकीय दॄष्ट्या भाजप लाअ हा निर्णय धोकादायक ठरेल कारण दारूबन्द्दी केल्यास पुढील निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसू शकतो.
आपली मते अपेक्षित
या बातमी नुसार, मुख्यमंत्री
या बातमी नुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दारूबंदीसाठी अनुकूल नाही. इतर राज्यामध्ये दारुबंदीची काय परिस्थिती आहे हे सर्व ज्ञात आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/liquor-ban/art...
देशद्रोही अफवा.
देशद्रोही अफवा.
दारुबंदी व्हायला हवी सरकारणे
दारुबंदी व्हायला हवी
सरकारणे उत्पन्नाचे दुसरे मार्ग शोधावेत.
सरकारणे जनतेला केलेले ५०% वादे जरी पुर्ण केले तरी पुढील निवडणुकीत त्याचा फटका भाजपला किंवा कुठल्याही सरकारला बसणार नाही.
हे सरकार बंदी घालण्यात
हे सरकार बंदी घालण्यात आघाडीवर आहे.
बंदीचा अर्थ स्पष्ट असतो... हप्ता गोळा करणे.
साईबाबा बंदी
गोमांसबंदी
गोहत्याबंदी
शिकवणीबंदी
दारुबंदी
.
.
इतिहास अस सांगतो की ही
इतिहास अस सांगतो की ही गोष्ट एकदा करुन झालेली आहे.
प्र. बा. जोग बंगल्याला मोरारजी कृपा अस नाव देणार होते. प्र के अत्रे यांनी तर विधानसभेत / परिषदेत बाटली आणुन हे अशक्य कसे आहे हे सरकारला दाखवुन दिले.
आता पुढची पिढी ( सोशल ड्रिंकिंग ) च्या आमला खाली आहे. एका बाजुला लायसन्स शिवाय किराणा मालाच्या दुकानात सुध्दा बियर्/वाईन विक्रीचे प्रयोग सुरु असताना दारु ब्ंदी हा कल्पना विलास आहे.