मॅक्/लिनक्स/क्रोम वर देवनागरीत लिहिण्याची सोय.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

प्रत्येक पानावर दिसणार्‍या प्रतिसादाच्या खिडकीत (आणि नवीन लेखन करताना दिसणार्‍या खिडकीत) सुधारणा केल्या आहेत.
१. मॅक आणि लिनक्स (आणि क्रोम सारखे काही Browsers) वापरणार्‍या मायबोलीकराना थेट देवनागरीत लिहायला अडचण येत होती. त्यांच्यासाठी नवीन बटन दिले आहे. प्रश्नचिन्हाच्या अगोदर हे बटन आहे.
त्यावर टिचकी मारल्यावर जुन्या मायबोलीत असल्याप्रमाणे खिडकी उघडून एका भागात रोमनमधे लिहून दुसरीकडे देवनागरीत दिसेल. लेखन संपल्यावर "copy message" वर टिचकी मारली की देवनागरीत युनिकोड मधे असलेला मजकूर खाली असलेल्या मूळ खिडकीत स्थलांतरीत होईल.

ज्याना जुन्या मायबोलीत Dev टॅग वापरून लिहिलेले इथे पुन्हा प्रसिद्ध करायचे असेल त्यानाही copy+paste करून ही सुविधा वापरता येईल.

२. "?" बटनावर टिचकी मारल्यावर पूर्वीप्रमाणे देवनागरीकरण करण्याचा तक्ता उपलब्ध आहे.
३. देवनागरी(मराठी)/रोमन (इंग्रजी) अदलाबदल करण्यासाठी पूर्वीसारखे बटन उपलब्ध आहे.

प्रकार: 

उत्तम सुविधा. धन्यवाद!
या नवीन उघडणार्‍या खिडकीत एक गडबड आहे (आधीपासूनच होती)
जर डावीकडच्या भागात काहिही न लिहिता Backspace दिली किंवा लिहिलेले सगळे Delete केले तर ITRANS_CODE_ERROR नावाची JavaScript Error दिसते.
ही न दिसेल असं काही करता येईल का? iPhone वर टाईप करताना चुकून असे झाले तर फोन पूर्ण Reset करावा लागतो Sad

@ksha
तुम्ही सुचवलेली दुरुस्ती केली आहे. अडचण आली तर पान ताजेतवाने (Refresh) करून पहा.