मायबोलीवरच्या गप्पागोष्टी या सुप्रसिद्ध धाग्याच होणार होणार म्हणुन एप्रिलपासुन गाजत असलेल गटग अधिक आषाढ कृ.११ शके १९३६, रवीवार दि. १२.०७.२०१५ रोजी सकाळी ११ वाजता (एकदाच) झाल. सुरुवातीला सर्वानुमते मंजुर करण्यात आलेल्या तारखेला ठरलेल गटग केवळ एका सभासदाच्या अनुपस्थितीच्या आगाउ सुचनेने पुढे ढकलल गेल. (कित्ती कित्ती चांगले आहेत नै पंत) गटग संयोजक/आयोजक बाळाजीपंत यांनी सुरुवातीला सर्वानुमते ठरलेली तारीख, नंतर पुढे ढकलेली तारीख आणि गटगच्या तारखेची प्रेमळ आठवण (मराठीत जेंटल रिमाईंडर) पाठवले. या गटगचे आमंत्रण जुन्या, नव्या अशा सर्व सभासदांना गेले होते. काहींनी आपली उपस्थिती निश्चित असल्याचे लग्गेच सांगितले तर ज्यांच्या मनात आपल्या उपस्थितीविषयी शंका होती त्यांनी मौन बाळगणे इष्ट समजले. होता होता गटगचा दिवस उजाडला..
रवीवार, १२ जुलै २०१५
सकाळी ११:०० वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. धाग्यावरील लाडक व्यक्तिमत्त्व रिया एकटीच बरोब्बर ११:०० वाजता हजर राहीली.. जसाजसा वेळ पुढे सरकत गेला तसेतसे एक एक सदस्य येत गेले. अस्मादिकांनी ई.स्टॅ.टा प्रमाणे ११:३० वाजता हजेरी लावली. त्यावेळी गटग संयोजक/आयोजक बाळाजीपंत, सांगलीचे संस्थानिक श्रीमान अतुल पटवर्धन उर्फ अतुलनीय, गगो पंप्र गिरीश खळदकर उर्फ गिरीकंद उपस्थित होते. मी पोचल्यावर अतुलनीय यांनी स्वतःची ओळख करुन दिली. गिरीला आधीच भेटल्याने त्याला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. रियाने मी कोण ओळख अस म्हणुन परिक्षा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु पहिल्याच प्रयत्नात तिला ओळखुन तो प्रयत्न हाणुन पाडला. (है का नै मी हुश्शार!) बराच वेळ बाहेर बोलत उभ राहील्याने कंटाळुन सर्वांनी शेवटी आत जाउन बसण्याचा निर्णय घेतला. हॉटेलच्या मॅनेजरने सर्वांना वेटींग रुममध्ये बसण्याची विनंती केली. तिथे बसुन गप्पांना सुरुवात झाल्यावर पियुची आठवण निघाली आणि त्याच क्षणी पियुची येंट्री झाली.. आल्या आल्या सर्वांना सुहास्यवदनाने अभिवादन करुन "मुग्गु" म्हणुन माझ्या गळ्यात पडली. तिला बसायला खुर्ची वगैरे उपलब्ध करुन देत सर्वांनी पुन्हा गप्पांना सुरुवात केली.
धाग्यावरील आदर्श सुनबाई "_हर्षा_" अजुन का आली नाही हा प्रश्न सर्वांनाच पडला तेव्हा ती घरुन गटगला येण्यासाठी निघाली असल्याचे तिने सांगितले. (वेळ साधारण ११:३०) शबरीमधील मॅनेजरने आतल्या बाजुस जागा उपलब्ध झाल्याचे सांगताच सर्वांनी तिकडे प्रस्थान केले. तिथे टेबल जोडुन, आवश्यक त्या खुर्च्या उपलब्ध करुन सर्व आपापल्या जागा घेउन बसले. पुन्हा गप्पांना सुरुवात झाली. काही वेळाने विश्याचे आगमन झाले. उपस्थित सर्व पुरुषमंडळींनी त्याला प्रामाणिकपणे आपली ओळख करुन दिली. आम्ही बायकांनी मात्र त्याची फिरकी घेण्याचे ठरवले. त्याने मला ओळखुन मला गप्प केले, परंतु रिया आणि पियुने त्याला अनुक्रमे _हर्षा_ आणि डिविनीता अशी नावे सांगुन गुंडाळले. रियाच नाव हर्षा आहे हे समजल्यावर विश्याच्या चेहर्यावर "ही होय हर्षा, मी वेगळच इमॅजिन केल होत" हे भाव स्पष्ट दिसत होते. कदाचित हे ओळखुनच शेवटी रियाने त्याची दया येउन आपापली खरी नावे त्याला सांगितली. नंतर गप्पांच्या ओघात अतुलनीय हे मुळचे सांगलीचे असुन नोकरिनिमित्त पुण्यात स्थाईक झाल्याचे समजले.
पुन्हा एकदा हर्षाची आठवण होउन शेवटी मी तिला फोन करायचा ठरवला. फोन केल्यावर समजल की फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आली आहे आणि शबरीच्या दिशेनेच येत आहे. (वेळ साधारण १२:१५) मी बाहेर येउन पहाते तर तिच्याबरोबर अजुन एक व्यक्ती येताना दिसली. जवळ आल्यावर समजल की खूप दिवसापासुन गायब असलेली मनीमाउ आज प्रत्यक्ष आलेली होती. (It was a big surprise for everyone) तोपर्यंत पियुला अतिशय भुक लागल्याने तिने तीन-चार वेळा मेन्युकार्ड उघडुन आता ऑर्डर देउया अस सुचवुन बघितल. पण कुणी तिच्याकडे लक्षच दिल नाही आणि आपापल्या गप्पांमध्येच गुंतुन राहीले. हर्षा आणि मनीच आगमन झाल्यावर शेवटी एकदाची ऑर्डर द्यायची अस ठरल. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार मिसळ, उत्तापा, डोसा असे पदार्थ मागवले. माझा उपास असल्याने आणि घरुन सा.वडे हादडुन आल्याने मी केवळ चिकु मिल्कशेक घेतला. ऑर्डर देउन पुन्हा गप्पा. सर्वांचे पदार्थ आल्यावर धाग्यावरील नवसभासद शब्दालीताईचे आगमन झाले. काही कारणांमुळे तिला यायला उशीर झाला.
सर्वांनी पदार्थांचा आस्वाद घेत घेत गप्पांचाही आस्वाद घेतला. दुसर्या राउंडला चहा, कॉफी यासारखे उत्तेजक पेय मागवुन सर्वांनी आपापली क्षुधाशांती केली, फक्त पियु तेवढी अर्धपोटी राहीली. बिच्चारी! बराच वेळ झाला तरी आमच्या गप्पा संपेनात आणि जागाही रिकाम्या होईनात हे बघुन हॉटेलवाल्यांनी नम्रपणे हाकलुन लावले. त्यांच्या नम्रतेचा मान राखत सर्वजण उठुन निघाले व बाहेरील फुटपाथवर येउन पुन्हा गप्पांना सुरुवात केली. तिथे आल्यावर गप्पांच्या ओघात असे समजले की अतुलनीय हे सांगलीच्या संस्थानिक पटवर्धनांपैकी एक आहेत. आपल्या संस्थानिक श्रीमंतीचा आब राखत मोठ्या मनाने TTMM घोषित केलेले गटगच बिल त्यांनीच भरले. बराचवेळ गप्पा झाल्यानंतर गटगचे आयोजक्/संयोजक बाळाजीपंत आणि पंतप्रधान उर्फ गिरीकंद यांनी काढता पाय घेतला. त्यांच्या या वागण्याचा उपस्थित सदस्यांनी हवा तसा अर्थ काढला, परंतु बाळाजीपंतांच्या या वागण्याचे खरे कारण कालच्या गप्पांच्या ओघात समजले. पंतप्रधानांनी काढता पाय घेण्याचे कारण अद्यापी समजले नाही.
असो. अशा रितीने गप्पागोष्टी धाग्याचे शबरी गटग पार पडले. सर्वजण या गटगच्या आठवणी घेउन आपापल्या घरी प्रस्थान करते झाले.
डिस्क्लेमर :- मला आठवेल तसा, जमेल तसा वृत्तांत लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. अनवधानाने काही उल्लेख, प्रसंग लिहायचे राहुन गेल्यास राग मानु नये.
गुड, चांगला जमलाय... नंतर
गुड, चांगला जमलाय... नंतर अॅडते माझा
झकास. बरेच दिवसात गटग आणि
झकास. बरेच दिवसात गटग आणि वृत्तांत दोन्हीही घडले नव्हते. ते घडलेले पाहून आम्हांस परमसंतोष जाहला आहे असे नोंदवतो.
मस्तच
मस्तच
लय भरि....
लय भरि....
निल्या पुढच्या वेळी नक्की
निल्या पुढच्या वेळी नक्की येणेचे करावे.
हो नक्कि..
हो नक्कि..
छान लिहिले आहेस मुग्धा.
छान लिहिले आहेस मुग्धा.
मुग्धे मस्तय त्या नव्या भावी
मुग्धे मस्तय
त्या नव्या भावी माबोकरणीचा का गं अनुल्लेख करतेस
किती वेळ बिचारी आपल्या गप्पांमधे घुसु पाहत होती
आठवली होती ती, पण तिला इथे
आठवली होती ती, पण तिला इथे आणायला नाही जमल मला.
महेश यांचाही उल्लेख
महेश यांचाही उल्लेख मिसलाय....
रिये, ती संस्थानिकांना कान देऊन ऐकत होती गं
पण मुग्धे , मी सगळीकडे ऑन
पण मुग्धे , मी सगळीकडे ऑन टाईम असते हे तू स्पष्टपणे नमुद केल्याबद्दल तुला माझ्याकडून आणखी एक चिक्कू मिल्कशेक भेट
जुन्या गटगटकरांनी इक्डे लक्ष द्या. एक गटगला काय उशीरा आले नुसते टोमणे मारून हैराण करता मला
रिया, तेंव्हा तु 'गगोबाळ'
रिया, तेंव्हा तु 'गगोबाळ' होतीस आता तुला 'लाडकं व्यक्तीमत्त्व' असा किताब वृत्तांत लेखिकेनं बहाल केलाय वर आता रिया थोडी मोठी झाल्याचा फील येतोय वै टाईप्स दोन कॉम्लिमेंटस ही मिळाल्या.... चल दे आता आम्हालाही चिकुमिल्कशेक घे गं!
चिक्कूमिल्कशेकसाठी काय काय
चिक्कूमिल्कशेकसाठी काय काय बोलतील लोक
ए शाण्या मी कसल्याही आमिषाने
ए शाण्या मी कसल्याही आमिषाने काहीही बोललेले नाहीये.
आता मिल्कशेक मिळायची खात्री
आता मिल्कशेक मिळायची खात्री झाल्यावर असं तुम्ही म्हणणं सहाजिकच आहे मुग्धा ताई
(No subject)
पंत, आम्ही चिकुमिल्कशेक साठी
पंत, आम्ही चिकुमिल्कशेक साठी नै कै बोलतं...आणि त्या दोन कॉम्प्लिमेंटपैकी एक मनीची होती हं!
बरं बरं
बरं बरं
मुळ्ळीच नाही रवी.. तुला
मुळ्ळीच नाही रवी.. तुला गगोवरच्या गप्पा आठवत नैत का? मी कोणाकडुन काही अपेक्षा करत नाही हे मी आधीच लिहील होत.
आदे, थोडी मोठी झाल्याचा फील
आदे, थोडी मोठी झाल्याचा फील येतोय वै नाही हं स्पष्टपणे मॅच्युअर हा शब्द वापरला गेलाय
त्यावर तू जे कारण दिलंस ते मला फार आणि अति आवडलं तरी मी त्याचा अनुल्लेख करत आहे
बाकी चिक्कूमिल्कशेक गटग करुयात परत एकदा
हाकानाका
आणि त्यात पियूला पोटभर खाऊ देऊयात
पंत , तुम्ही गप्प बसा
कै कारण दिलं गं मी?? तुला
कै कारण दिलं गं मी?? तुला आवडलयं म्हणुन सांगच!!!
फोटु?
फोटु?
रिये त्यादिवशी चिकुमिल्कशेक
रिये त्यादिवशी चिकुमिल्कशेक हे नाईलाज को क्या इलाज या मानसिकतेतुन घेतलेल होत. त्यामुळे यापुढील गटग हे वाराबरोबरच तिथ बघुनही करण्यात याव असा आदेश आहे पंतांसाठी.
आदे, आठवत नाहीये का तुला?
आदे, आठवत नाहीये का तुला?
रिये, स्वारी मला लग्गेच
रिये, स्वारी मला लग्गेच आठवलयं... तु खरचं मॅच्युअर्ड झालीयेस (झालीयेस हे नाईलाजाने घे, समझा करो)
आदे, जास्त बोललीस तर पुढच्या
आदे, जास्त बोललीस तर पुढच्या गटगला अजिबात सिट चेंज करू देणार नाही आम्ही तुला
जाहीर णिशेद. मी रविवारी
जाहीर णिशेद.
मी रविवारी पुण्यात १ दिवसिय दौर्यावर होते.
कोणीही मला कल्पना दिलि नाही.
परिक्षा ऐन तोंडावर असल्याने
परिक्षा ऐन तोंडावर असल्याने येऊ शकले नाही.
निदान खादाडीचे फोटो तरी टाका.
नावभगिनी तुमचा नंबर
नावभगिनी तुमचा नंबर गगोमालकांकडे आहे का? असता तर तुम्हाला नक्की कळवल गेल असत..
दक्षे मिस केल तुला.. गटगला आलेल्या सदस्यांनी कृपया दक्षीला सांगाव की मी दक्षीबद्दल काय बोलले ते.. स्पेशली रिया, शब्दाली, पियु.
हेच की दक्षी आणि सई मधे
हेच की दक्षी आणि सई मधे कित्ती फरक आहे
Pages