नातवाच्या बारश्यासाठी अगदी जोरात शिवण शिवायला घेतलं. तर आधी सुरकं शिवावं म्हट्लं....कारण तसं मी माझ्या कुंचीवरच्या लेखात प्रॉमिस केलं होतं. (http://www.maayboli.com/node/53217)
आणी सुरक्याला फार काही मापं घ्यायला लागत नाहीत. कारण याला अक्षरशः गळ्यासाठी एक कट आणि हातांसाठी दोन कट एवढंच बेतणं आहे. आणि गळ्यापाशी नेफा करून त्यात नाडी. असं अगदी सोपंसं हे सुरकं.
नाडी सुर्रकन ओढून बाळाच्या "बाळ्श्या"प्रमाणे हे वस्त्र बाळाला घालायचं.
पण शिवायला घेतल्यानंतर लक्षात आलं की इतक्या "सूक्ष्म" मापाचे कपडे बर्याच दिवसात शिवलेले नाहीत. त्यामुळे कापयला घेतलेलं कापड , बेतलं की जरा मनात गोंधळच उडायला लागला. आणि वाटायला लागलं की आपण फारच काहीतरी चुकीची मापं घेतोय? कारण जरी मैत्रिणी, नातेवाइकांच्या बाळांसाठी बाळंतविडे केले तरी ते .साधारण एक वर्षाच्या बाळाला बसतील या मापाचे शिवले. मग ते मुलीचे फ्रॉक असोत वा मुलांचे बाबा सूट्स.
मग शेवटी "मॉडेल" च्या मापाचं झबलं मागितलं. ते मिळालं आणि हुश्श्य झालं.
हे सुरकं कसं बेतलं हे साधारण कळावं म्हणून हा फोटो.
मग नाडी ओढून बाळाच्या मापाप्रमाणे अॅड्जस्ट करा.
बादवे.....इथल्या एका दुकानात हे असे तुकडे तुकडे जोडलेले तागेच मिळतात. मी फक्त त्यात थिकनेस साठी आतून एक जुनी चादर टाकून त्याला एक अस्तर व सॅटिन पट्टी शिवली.
हे तुकडे आतून छानपैकी इन्टरलॉकिंग केलेले असतात. तरुण मुली तर याचे स्वता:साठी टॉपही शिवू शकतील इतकी ही तुकडेजोड कापडं सुंदर आहेत. एस्पेश्यली रंगसंगती.
हे क्विल्ट माझ्या मैत्रिणीकडून करून घेतलं. ती ऑर्डर्स घेते आणि अप्रतीम क्विल्ट्स बनवून देते. हे ६०"बाय ३०" आहे. बाळ बरंच मोठं होईपर्यन्त त्याला वापरता येईल.
खुप गोड
खुप गोड
मस्त आहेत सगळ्या गोष्टी
मस्त आहेत सगळ्या गोष्टी
मस्त! आजी झाल्याबद्दल अभिनंदन
मस्त! आजी झाल्याबद्दल अभिनंदन आणि बाळाला शुभेच्छा
कीत्ती सुरेख केलय सगळं मानुषी
कीत्ती सुरेख केलय सगळं मानुषी ताई.. तुझ्या मायेची उब नक्की त्या बाळाल मिळेल..:)
आणि कीती सुरेख लिहलं देखिल.. व्वा!
कसलं गोड आहे सगळं !
कसलं गोड आहे सगळं !
मस्त!
मस्त!
खुप गोड आहे गं हे सगळं. मला
खुप गोड आहे गं हे सगळं. मला खुप आवडले. सुरकं हा शब्द माहित नव्हता. तोही आवडला.
फारच सुंदर झालंय सगळं! कुंची
फारच सुंदर झालंय सगळं! कुंची आणि क्विल्ट्स खूप आवडली.
सुरकं शब्द गोड वाटला.
अप्रतीम! प्रत्यक्ष हातात घेऊन
अप्रतीम! प्रत्यक्ष हातात घेऊन बघीतल्याचा फील आला. जबरी! कलर पण काय क्युट आहेत.
गोडम गोड
गोडम गोड
आजी झाल्याबद्दल अभिनंदन काय
आजी झाल्याबद्दल अभिनंदन
काय सुरेख झालंय सगळंच. पहिली दोन सुरकी आणि कुंची तर फार गोड.
मस्तच आहेत सर्व झबली.
मस्तच आहेत सर्व झबली. आज्जींचे हार्दिक अभिनंदन.
खूप सुंदर!!
खूप सुंदर!!
मस्तच.
मस्तच.
आज्जी झाल्याबद्दल अभिनंदन.गोड
आज्जी झाल्याबद्दल अभिनंदन.गोड नातवा साठी, आज्जीने मायेची पखरण घातलेली ,सुबक शिवलेली सुंदर झबली, कुंची आणि उबदार दुपटे खुपच सुरेख दिसते आहे,
मस्तं एकदम गोड आहेत सगळे
मस्तं एकदम गोड आहेत सगळे कपडे. तुमचे आजी झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.
मस्तच आहेत बाळलेणी. सुरर्र
मस्तच आहेत बाळलेणी.
सुरर्र करून नाडी ओढायची म्हणून का सुरकं ते!
बाबा सूटस फार आवडले.
सुरेख आणी निटस झालेत सगळे
सुरेख आणी निटस झालेत सगळे कपडे, सुरक शब्द पहिल्यादाच एकला, माझि आई पण हे सगळकरायची,आताशा होत नाही तिच्याकडुन,
आजि झाल्याबद्दल अभिनन्दन, दुधापेक्षा साय जास्त प्रिय असते.
खुपच गोड.
खुपच गोड.
खूपच सुंदर .. सुरक शब्द
खूपच सुंदर .. सुरक शब्द नव्यानेच कळला
सर्व मुली आणि दिनेश
सर्व मुली आणि दिनेश ......धन्यवाद!
सू क्यूटी.. वाह!! आजीबाई
सू क्यूटी.. वाह!! आजीबाई जोरात आहेत
मानु तुझ्यामुळे दोन शब्द नवीन कळ्ळलेत्,सुरकं आणी कुंची'!!! सुर्रेख शिवल्यात गं.
खूपच सुबक आहे क्विल्ट ही.
सुरेख ! अभिनंदन मानुषीताई .
सुरेख ! अभिनंदन मानुषीताई .
सुबक शिवणकाम आणि सुर्रेख
सुबक शिवणकाम आणि सुर्रेख रंगसंगती .......
iZabla बेस्ट आहे!
iZabla बेस्ट आहे!
कसल गोडुल झबल आहे !! आजी
कसल गोडुल झबल आहे !!
आजी झाल्याबद्दल अभिनंदन आणि बाळाला शुभेच्छा
कित्ती गोडुली आहेत ती सुरकी.
कित्ती गोडुली आहेत ती सुरकी. ब्लु नाईट ड्रेस मस्त आहे. कुंची आणि क्विल्ट्सचे पॅटर्न एकदम कलरफूल.. अभिनंदन मानुषीताई!! इतकी गोड आ़ज्जी असल्यावर बाळ पण एकदम हॅप्पी असेल
रच्याकने, या सुरक्यांसारखे टॉप्स सुद्धा शिवता येतील ना मोठयांसाठी
वा वा जोरात आहे तयारी.़ खूपच
वा वा जोरात आहे तयारी.़
खूपच मस्त झालंय सगळं
मस्त. त्यात गुरफटून झोपलेलं
मस्त. त्यात गुरफटून झोपलेलं बाळच आलं डोळ्यासमोर. मेरा नातु आएगा.
जळगावकडे कापडाच्या तुकड्याला
जळगावकडे कापडाच्या तुकड्याला सुडकं म्हणतात ते आठवलं. सुरकं खुप च छान.
Pages