Submitted by हर्ट on 8 July, 2015 - 02:28
रोजच्या जेवणात नक्की कुठले मीठ वापरावे ह्याबद्दल कुणी माहिती मिळेल का? मी आयोडाईज्ड मीठ वापरुण पाहिले पण मला त्याची एकतर चव फारशी आवडली नाही आणि कितीही टाकले तरी ती किंचित खारट चव लागत नाही.
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! धागा, जाणकारांच्या अधिक
मस्त! धागा,
जाणकारांच्या अधिक माहीतीच्या प्रतिक्षेत.
जास्त मिठ आरोग्यास हानिकारक
जास्त मिठ आरोग्यास हानिकारक आहे.
सो कमीच खाणे ठिक
सगळ्यात बेस्ट म्हणजे खडेमीठ
सगळ्यात बेस्ट म्हणजे खडेमीठ वापरावे (सी-सॉल्ट). दोराबजी मध्ये नाममात्र किमतीत हे मिळालं होतं
पण कोरडे प्रकार करतांना हे नीट विरघळत नाही त्यामुळे साधं मीठ वापरावं लागतं.
योकु, खडे मीठ अर्थात सी साल्ट
योकु, खडे मीठ अर्थात सी साल्ट समुद्र मीठ हे मीही वापरतो. त्याचे काही खास फायदे आहेत का?
तसेच हिमालयचे रॉक साल्टहीए मी वापरतो. थोडे अबोली रंगाचे असते.
आयोडाइज्ड मीठाचे काही खास फायदे आहेत का?
हे वाचा..
हे वाचा.. http://goaskalice.columbia.edu/whats-iodized-salt-it-better-you-regular-...
मला वाटले की इथे आयोडाइज्ड
मला वाटले की इथे आयोडाइज्ड मीठाची पाकृ दिलीय/ विचारली आहे.
(No subject)
माझा एक प्रश्न. आयोडाईज्ड
माझा एक प्रश्न.
आयोडाईज्ड मीठांने दात घासणे चांगले की कोळश्याने.
मेनका का माहेरला लेख आला होता
मेनका का माहेरला लेख आला होता मीठाबद्दल. जे बाजारात फ्रि फ्लोलिंग, ' व्हॅक्युम इव्हापोरेटेड,दाना दाना एक समान' असलेले मीठ मिळते वापरु नका सांगितले होते. असे मीठ हे बरेचदा साबण बनवण्याच्या प्रक्रियेतले बाय प्रोडक्ट असते. समुद्री मीठ वापरा सांगितले होते.
आयोडाईज्ड मीठांने दात घासणे
आयोडाईज्ड मीठांने दात घासणे चांगले की कोळश्याने.
<<
बी,
तुमच्या पुढच्या धाग्याच्या "शिर्षका"साठी चांगला प्रश्न होईल हा, विचार करा.
मित्रांनो प्लीज धाग्याला
मित्रांनो प्लीज धाग्याला अनुसरुनच लिहा. विनोद आणि उपहास टाळा. धन्यवाद.
मराठी विज्ञान परिषदेच्या विनय
मराठी विज्ञान परिषदेच्या विनय र.र. सरांनी खडेमीठ आणि आयोडाईज्ड मीठ यावर लिहिलेला लेखः
http://meethkitikhave.blogspot.in/2013/03/natural-sea-salt-is-also-good....
"बारीक भुरभुरणारं मीठ बाजारात आलं त्याच सुमारास आयोडीनच्या कमतरतेविषयी जाहिराती व्हायला लागल्या हाही एक विलक्षण योगायोग मानता येईल. आणि आयोडीनयुक्त मीठ वापरण्याच्या आग्रहातून खडेमीठ मग मागे पडत गेलं."
बाजारात मिळणारं बारीक, आयोडाईज्ड मीठ नको असेल तर खडेमीठ थोडं गरम करून (कोरडं होण्यासाठी), मिक्सरमध्ये बारीक दळून वापरता येतं. मी वापरते.
आयोडाईज्ड मीठ आणि थॉयरॉईड
आयोडाईज्ड मीठ आणि थॉयरॉईड याबद्दल देखील लिहा
शक्य तेवढं खडे मीठ स्वयंपाकात
शक्य तेवढं खडे मीठ स्वयंपाकात वापरावं. मी सगळ्या... पातळ आणि सेमी पातळ पदार्थात खडे मीठ वापरते.
त्यात ते संपूर्णपणे विरघळते. आमट्या, उसळी, पातळ पालेभाज्या, रस्से इ.इ.
माझी आई असंच करायची ... तीच सवय मलाही लागली.
सगळीकडे बारीक मीठ वापरण्यापेक्षा जिथे शक्य आहे तिथे रिफाइन्ड नसलेलं खडे मीठ वापरावे. ते जास्ती "हेल्दी" असतं. हा या मागचा विचार . अर्थातच मिठाचा वापर अति नको.
आयोडाइज्ड मिठात टिंचर आयोडीन
आयोडाइज्ड मिठात टिंचर आयोडीन असते का?
केपी, प्लीज हा धागा
केपी, प्लीज हा धागा विनोदासाठी नाही आहे. वर मी लिहिले आहे की इथे धाग्याला अनुसरुन लिहा. मला माहिती आहे तुला हलके फुलके विनोद आवडतात पण प्लीज हे जरा कमी कर. कारण एकदा तू सुरवात केलीस की तुझे फॉलोवर्स सुद्धा तेच करतात. तेंव्हा प्रेमानी परत एकदा सांगतो सर्वांना जो तो धागा त्याच कारणासाठी वापरा. विनोद आणि वैर दोन्ही टाळा. धन्यवाद.
बाजारात मिळणारं बारीक,
बाजारात मिळणारं बारीक, आयोडाईज्ड मीठ नको असेल तर खडेमीठ थोडं गरम करून (कोरडं होण्यासाठी), मिक्सरमध्ये बारीक दळून वापरता येतं. मी वापरते.>>>> मी पण.
बी, भारतातल्या काही भागातल्या
बी, भारतातल्या काही भागातल्या लोकांच्या आहारात मूळातच आयोडीनची कमतरता आढळली होती. अत्यंत सूक्ष्म प्रमाणात लागणारे हे द्रव्य जर आहारात नसेल तर मात्र मोठ्या आजाराला कारणीभूत ठरते. त्यांच्यासाठी हि सोय झाली. अर्थात मग त्यात पुढे व्यवसायाचा भाग आलाच. मीठ खायचे तर आयोडाइज्ड वगैरे.. त्यामूळे तूला जर तशी गरज नसेल तर खास करून हे मीठ वापरायला नको. फ्लोराईड बद्दलही तसेच झाले.
यातही एक मजा आहे, आमच्या प्लांटमधे तयार झाले अशी जाहीरात होत असली तरी बहुतेक मीठ हे गुजराथमधे पारंपरिक रितीनेच बनते. या कंपन्या ते खरेदी करून थोडेफार शुद्ध करतात आणि पॅक करतात.
तुला का हे विनोदी वाटले बी??
तुला का हे विनोदी वाटले बी?? दुसरे म्हणजे हे रंगीबेरंगी पान नाहीये ना तुझे?? मग? आणी तुला जसे प्रश्न पडतात तसे दुसर्याला पडुच शकत नाहीत असे तुझे म्हणणे आहे का? माझे फॉलोअर्स वगैरे कुणीही नाहीत. मुख्य म्हणजे तुला जर हे विनोदी वाटत असेल तर खरच कमाल आहे.
नैसर्गिक मीठातही केवळ सोडीयम
नैसर्गिक मीठातही केवळ सोडीयम क्लोराईड नसते त्यात इतर क्षार असतातच आणि ते माणसाला उपकारकही असतात. फक्त त्या मीठाला पावसाळ्यात पाणी सुटते आणि ते सॉल्ट शेकरमधून भुरुभुरु बाहेर पडत नाही म्हणून टेबल सॉल्ट वगैरे प्रकार आले. ते तसे कोरडे राहण्यासाठी त्यात अनेक घटक ( स्टार्च देखील ) मिसळावा लागतो.
तसले मीठ पाण्यात टाकले तर दूधाळ रंगाचे मिश्रण तयार होते ते या घटकांमूळेच.
बी, आयोडाइज्ड मीठ म्हणजे काय?
बी, आयोडाइज्ड मीठ म्हणजे काय? ते कमी खारट असते का?
हर्पेन, हे खरे आहे काही काही
हर्पेन, हे खरे आहे काही काही ठिकाणची मीठं ( ) खारटपणात कमीजास्त असू शकतात. रोज रांधणार्याचा अंदाज वेगळ्या प्रकारचे ( ब्रँडचे, देशाचे ) मीठ वापरताना चुकू शकतो.
हर्पेन, मला इतके माहिती नाही.
हर्पेन, मला इतके माहिती नाही. मी फक्त वापरुण पाहिले आहे. त्यामागचे विज्ञान मला माहिती नाही पण आता वाचेन. धन्यवाद.
केपी: मला जे प्रश्न पडतात ते पडतात म्हणून मी विचारतो. ते अकारण आणि विनोद म्हणून विचारलेले नसतात. इथे माझे पान.. माझा धागा हा भाव मुळीच नाही. ही मायबोलि जे चालवतात त्यांचे हे सगळे काही आहे. मी फक्त इथे एक सभासद आहे. असो केपी.
दिनेशदा, छान माहिती. तुम्ही कुठले मीठ वापरतात.
सर्वांना : समुद्र मीठात निसर्गतःच आयोडीन असते का?
धन्यवाद दिनेश, मीठ खारटपणात
धन्यवाद दिनेश, मीठ खारटपणात कमी जास्त असू शकते हे मला माहीत आहे पण मला म्हणायचे आहे की आयोडाईस्ड केल्याने मीठ कमी खारट बनते का ?
आयोडाइज्ड मीठ म्हणजे नक्की काय
बी, मी इथले स्थानिक सी सॉल्ट
बी, मी इथले स्थानिक सी सॉल्ट वापरतो. काही समुद्री वनस्पतिमधे, काही शेलफिशमधे आयोडीन असते.
ओके, बी, वाचलंस की कळव. कृपया
ओके, बी, वाचलंस की कळव. कृपया धन्यवाद
आयोडीन मिसळून मिठाचा खारटपणा
आयोडीन मिसळून मिठाचा खारटपणा कमी होत नाही पण ते कारखान्यात बनत असल्याने त्यात इतर घटक मिसळल्याने, नेहमी साधे मीठ वापरणार्यांना ते कमी खारट ( जर तेवढ्याच प्रमाणात वापरले तर ) वाटू शकते.
म्हणजे बी ची शंका खरी आहे पण ते आयोडीनमूळेच झाले असेल, याची शक्यता कमी आहे.
मला जे प्रश्न पडतात ते पडतात
मला जे प्रश्न पडतात ते पडतात म्हणून मी विचारतो.>> मग दुसर्याने तुझ्याचसारखे अडणचोट प्रश्न विचारले तर ते विनोद करण्याकरताच आहेत असे म्हणायचे काय कारण. का असे टुकार प्रश्न विचारण्याचा मक्ता फक्त तूच घेतला आहेस?
असो. समुद्रातुन मीठ काढुन घेणे फार म्हणजे फारच चुकीचे वाटते मला. अशाने समुद्रातील जलचरांना मीठ कमी पडून त्यांना काही त्रास होईल का?
मला जे प्रश्न पडतात ते पडतात
मला जे प्रश्न पडतात ते पडतात म्हणून मी विचारतो>>> इथे विचारण्याआधी तुम्ही इंटरनेट अथवा तत्सम साधनांवर त्याची उत्तरे शोधन्याचा प्रयत्न करता का? सहज विचारतोय, डोण्ट टेक इट wrong वे.
http://www.misalpav.com/node/28520
प्रशु तो त्यांचा प्रश्न आहे.
प्रशु तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना मायबोलीवरच विचारायचे असेल तर तुमची काय हरकत?? ते गेले अनेक वर्ष आयटी इंडस्ट्रीमधे आहेत, त्यांना गुगल वापरता येते. त्यांना अनेक बीबी उघडणे, फुकटचे सल्ले मागणे, अनेक प्रश्न विचारणे अशा कामाच्यामधे व्यस्त असल्याने गुगल करायला वेळ मिळत नाही. तुमच्यासारखी लोक लगेच इथे लिंक देतात की. असे जरी असले तरी प्रशासक जोवर हरकत घेत नाहीत तोवर तुम्ही कोण त्यांना इथेच का विचारता म्हणुन बोलणारे?? फक्त हेच गृहीतक इतर लोकांच्या बाबतीत लागु होत नाही. तसे केले की तो मात्र विनोद होतो, कंपुगीरी होते. त्यामुळे विषयाला धरुन बोला.
Pages