मागच्याच आठवड्यामध्ये जागतिक वडील दिन साजरा झाला (२३ जून फादर्स डे झाला ) त्या निमित्ताने वडिलांबद्दल काही ४ गोष्ठी मांडत आहे अर्थात या सगळ्या गोष्टी मी झी मराठीवरील एक कार्यक्रमात एक मुलीने सांगितलेल्या आहेत पण मला हि खूप आवडल्या आणि पटल्या हि आणि त्या अनुषंगानेच इथे मांडत आहे .
बाबा , पप्पा ड्याडी , बोलायला , ऐकायला किती छान वाटतंय नै ! पण आपण कधी कधी मुद्दामहून , जाणून बुजून त्यांना बाप या नावानेच संबोधतो (माघारी) . आज अश्याच एका बापाची कहाणी , आई घराचे मांगल्ये असते तर वडील घराचे अस्तित्व असतात , पण आपण या अस्तित्वाला आपण कधी समजून घेतले आहे , त्यांच्या विषयी अजून तरी फारसे चांगले बोलले जात आहे ,,,,,,,,,,नाही .
" लोकांनी वडील रेखाटलेले आहेत ते हि तापट, व्यसनी , चिडखोर , भांडखोर , मारझोड करणारे ,, नाही असे वडील असतील हि १ ते २ % पण बाकीच्या चांगल्या वडिलांबद्दल काय ?
आई कडे अश्रुंचे पाठ असतात ती रडून मोकळी होते , पण सांत्वन वडिलांनाच करावे लागते , आणि रडणाऱ्या पेक्ष्या सांत्वन करणार्यावरच जास्त तान पडत असतो कारण ज्योती पेक्षा समईच जास्त तापत असते , आणि श्रेय !! श्रेय मात्र ज्योती घेऊन जाते . रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते , पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहज विसरून जातो . आई सर्वासमोर मोकळेपणाने रडून दुख व्यक्त करते पण रात्री उशीत तोंड खुपसून मुस्मुस्तात ते आपले वडिलच असतात , स्वताचे वडील जरी वारले तरी त्यांना रडता येत नाही कारण लहान भावंडाना धीर देणे , कुटुंबाला आधार देणारे पण तेच असतात , पत्नीने अर्धावासात सोडले तरी स्वताला अवर घालत मुलांच्या अश्रुना आवर घालणारे वडिलच असतात.
" जिजाऊ नि शिवबाना घडवले असे अवश्य म्हणता येईल , पण त्याच वेळी शहाजीराजांची ओढाताण लक्षात घ्यावी" , " देवकी यशोदेचे कौतुक अवश्य करावे पण त्याच वेळी भर पुरात डोक्यावरून पुत्राला घेऊन जाणारा वासुदेव आठवावा " ," राम हा कौसल्या पुत्र अवश्य आहे पण पुत्र वियोगाने तडफडून मारणारा बाप राजा दशरथच होता ".
वडिलांच्या टाचा झिजलेली चप्पल आणि फाटलेले बनियन पहिले कि कळते कि नशिबाची भोक त्यांच्या बनियन ला पडली आहेत , त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो , मुलांना कपडे घेतील , बायकोला साडी घेतील , पण स्वत मात्र जुनेच कपडे वापरतील . मुलगा सलून मध्ये ५० एक रुपये खर्चतो , मुलगी पार्लर मध्ये १०० एक रुपये खर्चेल , पण त्याच घरातील बाप मात्र दाढीचा साबण संपला तर अंघोळीच्या साबणाने दाढी करतील , कधी कधी तो हि नसेल तर पाणी लाऊन दाढी खरवडतिल . बाबा कधी आजारी पडले तर कधी डॉक्टर कडे जात नाहीत , मुळात ते आजारपणाला घाबरत नसतातच , त्यांना काळजी असते ती , डॉक्टरांनी महिनाभरासाठी आराम करायला लावण्याची , कारण मुलीचे लग्न , मुलांचे शिक्षण , घरातील सर्व खर्च याची काळजी असते कारण घरात उत्पनाचे साधन हि फक्त तेच असतात .
ऐपत नसली तरी सर्व खर्चात काटकसर करून मुलाला मेडिकल , इंजिनीरिंग , या सारख्या महागड्या शिक्षणाचा खर्च सोसतात , महिन्याचा पगार झाला कि सर्व खर्चात बचत करून , काटकसर करून पहिला मुलाला त्याच्या शिक्षणासाठी पैसे पाठवतात , खरे तर सर्वच मुले नसले तरी बरीच मुले या पैस्यातून शिक्षण कमी आणि मौज मजाच जास्त करतात , मित्रांना पार्ट्या देणे , सिनेमे पाहणे, या सगळ्यात आपल्याला पैसे पाठवणार्या वडिलांचीच टिंगल टवाळी करत असतात , हीच मुले एकमेकांना वडिलांच्या नावाने हाक मारणे , त्यांच्या स्वभावाची टर उडवणे असले प्रकार चालू असतात
" ज्या घरात वडील आहेत त्या घराकडे कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत होत नाही ,कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो , तो जरी काही करत नसला तरी तो त्या पदावर असतो . आई असण्याला अथवा आई होण्याला वडिलांमुळेच अर्थ प्राप्त होतो .
कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला कि जवळी वाटते ती आई , कारण ती जवळ घेते , कौतुक करते, प्रेम करते , गोंजारते , पण गुपचूप जाऊन पेढे आणणारा , अभिमानाने सर्वाना सांगणारा बाप कोणालाच दिसत नाही .
चटका बसला , ठेच लागली , फटका बसला तरं तोंडातून आपसूकच आई हाच शब्द बाहेर पडतो , पण एकादा मोठा रस्ता ओलांडताना अचानक जर एकाद्या ट्रक ने जोरात ब्रेक मारून मोठे संकट टाळले तरं त्यावेळी आपण बाप रे ........! असेच म्हणतो , छोटी छोटी संकटे आई सोसती हो , पण मोठी मोठी वादळे पेलताना बापच आठवतो , .......... काय पटतंय काय ??????
काद्या मंगल प्रसंगी अखंड कुटुंब सहभागी होत असते , पण जर एकादा मयत झाला तरं बापालाच जावे लागते . मुलाच्या नोकरी साठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप , मुलीच्या स्थळासाठी उम्भरे झिजवणारा बाप , घरच्यासाठी स्वताच्या व्यथा दडपणारा बाप , खरच किती ग्रेट असतो बाप .
वडिलांचे खरे महत्व त्यांनाच कळते ज्यांचे वडील लहानपणीच जातात आणि घराच्या सर्व जबाबदार्या पेलाव्या लागतात , एकेक गोष्टीसाठी त्यांना तरसाव लागत तेच वडिलांचे महत्व समजतात .
वडिलांना समजून घेणारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे त्यांची मुलगी , सासरी गेल्यावरही अथवा घरापासून दूर असताना हि फक्त फोनवर बोलताना वडिलांचा आवाज जरी बदलेला असला तरी त्यावरून सतरा प्रश्न विचारेल , त्यांची विचारपूस करेल .
वडिलांना खर्या अर्थाने ओळखते ती त्यांची मुलगीच असते आणि वडिलांना जपणारी , त्यांची काळजी करणारी हि मुलगीच असते आणि एवढीच अपेक्षा एक वडील सर्वापासून करत असतो .
धन्यवाद
आपला वि. भो .
लेख आवडला
लेख आवडला
लेख आवडला >>>>>>>धन्यवाद बे
लेख आवडला >>>>>>>धन्यवाद बे त
झी मराठीवरील एक कार्यक्रमात
झी मराठीवरील एक कार्यक्रमात एक मुलीने सांगितलेल्या आहेत पण मला हि खूप आवडल्या आणि पटल्या हि आणि त्या अनुषंगानेच इथे मांडत आहे .>> त्या मुलीने खुप छान अॅक्टींग केली होती, हे सागताना.
तुम्ही ती कल्पना मस्त फुलवली आहे. लेख खुपच आवडला.
मस्त आवडला
मस्त आवडला
चांगले लिहीलय. बहुतेक गोष्टी
चांगले लिहीलय. बहुतेक गोष्टी पटल्या.
वडिल गेल्याला आता पंचवीस वर्षे होऊन गेलीत. पण आजही, कठीण परिस्थिती/प्रश्न सामोरे आले असता, मन एक विचार असेही करते की या परिस्थितीत/प्रश्नास वडील कसे सामोरे गेले असते? आपण कसे जातोय? काय चूकतय का आपले?
परिस्थिति आत्यंतिक विरोधी व क्रूर असेल, तर तिच्याशी तिच्याही पेक्षा जास्त क्रुर होऊन तिला सामोरे जाण्यासाठी लागणारे खंबीर मन मला तरी माझ्या वडिलांकडूनच/त्यांच्या उदाहरणातूनच मिळाले आहे.
लेख खुपच आवडला आणि पटलाही.
लेख खुपच आवडला आणि पटलाही. वाटतय धावत जाऊन बाबांना मिठी मारावी पण या जन्मी शक्य नाही
miss u baba
वडिलांना समजून घेणारी एकमेव
वडिलांना समजून घेणारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे त्यांची मुलगी , सासरी गेल्यावरही अथवा घरापासून दूर असताना हि फक्त फोनवर बोलताना वडिलांचा आवाज जरी बदलेला असला तरी त्यावरून सतरा प्रश्न विचारेल , त्यांची विचारपूस करेल .
वडिलांना खर्या अर्थाने ओळखते ती त्यांची मुलगीच असते आणि वडिलांना जपणारी , त्यांची काळजी करणारी हि मुलगीच असते आणि एवढीच अपेक्षा एक वडील सर्वापासून करत असतो
>>>>
हे फार्रच पटले,
आणि म्हणूनच मला मुलगी हवी
आणि म्हणूनच मला मुलगी हवी
आणि म्हणूनच मला मुलगी हवी स्मित >>>>>>>>> मला पहिलिच मुलगि आहे
मस्त लिहिलंय!!! लेख आवडला.
मस्त लिहिलंय!!! लेख आवडला.
लेख आवडला
लेख आवडला
मला पहिलिच मुलगि आहे>>>>>>>>>
मला पहिलिच मुलगि आहे>>>>>>>>> तुम्ही खुपच नशीबवान आहात...
हा लेख इथे टाकण्या पूर्वी आपण
हा लेख इथे टाकण्या पूर्वी आपण मूळ लेखकाची परवानगी घेणे आवशक होतो किंवा कमीतकमी मूळ लेखकाचे नाव देणे अपेक्षित होते
Kanth daatla vachun,, avdhach
Kanth daatla vachun,,
avdhach mhanen ki majh majhya pappanvar khuuuuuuuuuuuuuuuuup prem aahe..
धन्यवाद मित्र हो .
धन्यवाद मित्र हो .
तुम्ही खुपच नशीबवान आहात...
तुम्ही खुपच नशीबवान आहात... >>>>>> हो नक्कीच
बाप रे... खूप सिरिअस अस
बाप रे...
खूप सिरिअस अस काहीतरी वाचल्यासारख वाटतंय ...
लेख आवडला!
लेख आवडला!
लेख आवडला! <<< धन्यवाद
लेख आवडला! <<< धन्यवाद मंजूताई
too good
too good
हा लेख इथे टाकण्या पूर्वी आपण
हा लेख इथे टाकण्या पूर्वी आपण मूळ लेखकाची परवानगी घेणे आवशक होते किंवा कमीतकमी मूळ लेखकाचे नाव देणे अपेक्षित होते.आपण प्रतिसादाला साधे उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही असो या वरून कळले आहे . असेच करत राहा शुभेछा.
महेन्द्र ढवाण साहेब ,,
महेन्द्र ढवाण साहेब ,, तुमच्या मताशी मी सहमत आहे कि मूळ लेखकाचे नाव टाकले पाहिजे पण याचे उत्तर माझ्याकडे पण नाही कारण (मूळ लेखक कोण आहेत हे मलाच नाही माहित ) मी एक कार्यक्रम बघितला होता जानेवारी -१५ मध्ये त्यामध्ये एका मुलीने दिलेली स्पीच मी जशीच्या तशी लिहून काढली ,,,,,,,(कारण खूप छान वाटली त्यामुळे ) आणि मग इथे पोस्टली .
(No subject)
.
.. झी मराठीवरील एक
.. झी मराठीवरील एक कार्यक्रमात एक मुलीने सांगितलेल्या आहेत पण मला हि खूप आवडल्या आणि पटल्या हि आणि त्या अनुषंगानेच इथे मांडत आहे... >>>> मला वाटतं एवढे पुरेसे असावे !!