"खाड्ड…",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं. गालावर हात ठेवून समोर बघितलं तर कोमल त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होती. हिने माझ्या गालावर हाताचा ठसा उमटवला बहुतेक,दिपेशने मनातल्या मनात ओळखलं. काजलला तो शोधू लागला. तर ती कोमलच्या मागे उभी राहून पाहत होती. बरं, ती काही एकटीच नव्हती बघणारी. संपूर्ण ऑफिस तो scene पाहत होता. एव्हाना कुजबुज सुरु झालेली. दिपेशला काय बोलावं ते कळत नव्हतं. गालावर हात ठेवून तो तसाच त्या दोघींकडे पाहत होता.
"काय रे…. बोल आता… काय बोलायचं आहे ते." दिपेश गप्प.
" बोल कि आता, कि दातखिळी बसली तुझी…नालायक माणसा… " कोमल रागातच होती.
" हे बघ कोमल… काहीतरी misunderstanding झाली… ",
" misunderstanding ? ", त्याचं बोलणं मधेच तोडत कोमल बोलली. " ती काही बोलत नाही म्हणून चालून जाते सगळं, अस वाटते का तुला… पण तसं नाही आहे आणि misunderstanding कशी रे … ? मला काय दिसत नाही, काय चालू आहे ते… एक- दोनदा ठीक आहे. पुन्हा पुन्हा तेच चालू तुझं… ",
"sorry बाबा…. पुन्हा नाही होणार… ",
" पुन्हा करशीलच कसा… जीव घेईन तुझा मी." कोमल तर भलतीच भडकली होती.
" पाया पड तिच्या…. आणि माफी माग तिची… " ,दिपेशला काय करावं ते कळत नव्हतं.
" जाऊ दे ना कोमल… ", काजल हळू आवाजात बोलली.
" जाऊ दे कसं… या पुरुषांना " मुलगी " म्हणजे काय खेळणं वाटते का… कसही वापरा, खेळून झालं कि फेकून द्या… मग नवीन खेळणं. " तशी काजल गप्प झाली. " हा माणूस… रोज तुझी छेड काढतो. ऑफिसमध्ये येताना, घरी जाताना. ऑफिसच्या बस मध्ये… आणि जाऊ दे त्याला…. या अश्या नालायक माणसांना धडा शिकवायलाच पाहिजे.… पाया पड दिपेश… लवकर.", दिपेश थोडावेळ तसाच उभा राहिला. सगळ्या नजरा त्याच्याकडेच होत्या." तुझ्याकडे २ मिनिटे आहेत. पाया पड तिच्या, नाहीतर बघ पुढे काय करते मी.", दिपेश चूपचाप खाली वाकला , काजलच्या पायाला हात लावला,
" Sorry… पुन्हा कधीच होणार नाही असं… ", दिपेशला मेल्याहून मेल्यासारखं झालं. तो निघण्यासाठी वळला. तशी त्याची कॉलर पकडली कोमलने.
" हे बघ… आता तुला या ऑफिसमध्ये सुद्धा रहायची गरज नाही. पप्पांना सांगितलं आहे मी… आज दुपारपर्यंत तुझं " Resignation letter " तुझ्या टेबलवर येईल. तोपर्यंत तुझं सामान आवरायला घे."
ते ऐकून दिपेश उडालाच. " असं करू नकोस कोमल… तुझ्या पाया पडतो. आणि एवढ्या लवकर कूठे शोधू मी जॉब… प्लीज… असं नको करूस… माझं घर चालते माझ्यावर… प्लीज… प्लीज… प्लीज…" ,
" याचा आधी विचार करायला हवा होतास…. काजलला त्रास देण्याआधी…तुझं " Resignation letter " येईल ते घे आणि चालता हो…तुमच्या सारख्या माणसांना हेच पाहिजे. म्हणजे पुन्हा कोणा मुलीवर नजर नाही पडणार तुमची." दिपेश चुपचाप जागेवर बसला.
" काजल…. जा कॅबिनमध्ये… " काजल कॅबिनमध्ये गेली. कोमल अजून काजलकडे पाहत होती. सर्व ऑफिस अजून तसंच उभं होतं.
" सगळ्यांना आताच बजावून ठेवते. काजलला एकटी समजू नका. तिची बहिण आहे इकडे, समजलं ना सगळ्यांना.… चला, आता कामाला लागा सगळे." तसे सगळे कामाला लागले.
दुपारी दिपेशला त्याचं लेटर मिळालं आणि तो निघून गेला. आजच्या गडबडीमुळे ऑफिसमध्ये कमालीची शांतता होती. कोणीच कोणाशी बोलत नव्हते. ऑफिस सुटल्यावर काजल, बाहेर उभी राहून कोमलची वाट पाहत होती. तेव्हा कोमलची ऑफिस मधली friend स्वाती बाहेर आली," Hi काजल… ठीक आहेस ना." काजलने होकारार्थी मान हलवली.
" बरं… पण हे तू आधी का नाही सांगितलं, कि तो दिपेश तुला त्रास देतो ते.",
"कसं सांगू आणि कोणाला सांगू… मला भीती वाटायची त्याची.",
"मग कोमलला कसं कळलं ते.",
" त्या दिवशी त्याने माझी bag ओढली घरी जाताना आणि ती तुटली. कोमलने विचारलं तेव्हा मला सांगावं लागलं. त्यादिवसापासून ती दिपेशवर नजर ठेवून होती. आज त्याने हात पकडला तेव्हाच कोमल आत आली आणि पुढचं तर सगळ्यांनी पाहिलं. ",
"जाऊ दे , पण चांगलं झालं तो गेला ते. मी कोमलला काही बोलली नाही, तिचा राग शांत झाला नसेल अजून. पण तुला सांगते. तो चांगला माणूस नाही. 'कोमलला बघून घेईन' असं म्हणत गेला तो. त्याच्या शेजारी बसतो ना त्याने सांगितलं मला. तिला जरा सांभाळून राहायला सांग.",
"ठीक आहे, सांगते. ",
"चल bye… and happy weekend…. see you on Monday… " म्हणत स्वाती निघून गेली.
१० मिनिटांनी कोमल आली. काजलकडे न बघताच ती parking lot मध्ये गेली. गाडी चालवत गेटजवळ आणली आणि थांबवली. काजल गाडीकडे पाहत होती." आता काय श्रीफळ आणि शाल देऊ तुला. बस गाडीत." कोमल बोलली, तशी काजल पटकन गाडीत बसली. कोमल काही न बोलता गाडी चालवत राहिली. ३० मिनिटांनी घरी पोहोचल्या दोघी. काजल निमूटपणे गाडीतून उतरली आणि तिच्या रूममध्ये गेली. गाडी पार्क करून कोमलसुद्धा आली. काजलकडे न पाहताच ती तिच्या कामाला लागली. काजल पुढे होऊन कोमलला sorry म्हणाली. तशी कोमल वळली. काजलकडे कितीतरी वेळ पाहत होती. डोक्यावर टपली मारली तिच्या.
" मूर्ख… गाढव… " बोलता बोलता कोमल थांबली. " असं समजू नकोस कि मला शिव्या देता येत नाहीत, आणि तुला पण माहित आहे ते. बहिण आहेस म्हणून. नाहीतर मला किती प्रकारच्या शिव्या देता येतात ते तुला कळलं असतं." कोमल अजून रागात होती.
"Sorry कोमल… " म्हणत काजल तिच्या बेडवर जाऊन बसली आणि रडायला लागली.
" अरे… रडूबाई… रडतेस काय… मस्करी केली मी. sorry…sorry…" काजलला मिठी मारली कोमलने. " डोळे पूस पहिले… नाहीतर आज जेवणार नाही मी." तसं काजल रडायची थांबली.
" तू कशाला मारलस त्याला, राग आला आहे तुझा त्याला…. वाईट माणूस आहे तो.",
" हे बघ… तू त्याचं tension नको घेऊस… तसे खूप बघितले आहेत मी, आणि तो पुन्हा माझ्यासमोर येणार नाही हे नक्की. तू पण आता धीट हो… अशी राहत जाऊ नकोस.… "अरे" ला " का रे" बोलायला पाहिजे. नाहीतर जग आपल्याला घाबरट समजते. समजलं का काकूबाई…. " कोमल हसत म्हणाली.
" कोण आहे काकूबाई ?", त्या दोघींची आई आत येत म्हणाली.
" हि काय, बसली आहे… " कोमल हसत बोलली. तशी आईने तिच्या पाठीवर चापटी मारली.
" कशाला चिडवतेस तिला…. काही बोलत नाही म्हणून काहीपण बोलायचे का… काजल, हीच आहे काकूबाई… " तशा तिघी हसू लागल्या.
"बरं, मम्मी…. पप्पा आले का ?",
"नाही… येतील आता. on the way आहेत. ते आले कि सगळे एकत्र जेवायला बसू. "
अर्ध्या तासाने पप्पा आले. " Hi Dad… " कोमलने पप्पांना मिठी मारली. " कशी झाली ट्रीप ? " ,
"मस्त एकदम… आणि माझं ऑफिस कसं आहे ? ",
" हा हा हा " , कोमल हसू लागली.
" काय गं … काय झालं आणि काजल कूठे आहे ? ","
Hi पप्पा… कसे आहात आणि कसं आहे बंगलोरचं ऑफिस ? ",
" मस्त चालू आहे तिथे… very nice… ",
"अरे !! आलात तुम्ही. ",
"हे बघ…. आतच आलो आणि या दोघींनी पकडलं मला. ",
" अगं त्यांना आत तर येऊ दे आधी. ",
" OK , पप्पा…. तुम्ही फ्रेश होऊन या… जेवणाच्या टेबलवर गप्पा-गोष्टी करू. " म्हणत कोमल बाहेर निघून गेली. रात्री जेवणाच्या टेबलवर गप्पा सुरु झाल्या.
" OK… ऐका सगळ्यांनी… आपली तिन्ही ऑफिस चांगली चालू आहेत. दोन्ही नवीन ठिकाणी आता चांगला जम बसला आहे. तर मी काहीतरी विचार केला आहे.",
"कोणता विचार ?", काजल बोलली.
" मला काही जमत नाही दोन्ही ठिकाणी जायला. आता तुम्ही मोठया झाला आहात. का नाही तुम्हाला पाठवू तिथे." ,
" Brilliant idea पप्पा. " कोमल आनंदाने ओरडलीच.
" गप्प बस कोमल… " मम्मी ओरडली.
( पुढे वाचा.
http://vinitdhanawade.blogspot.in/2015/06/blog-post.html
आवडली तर नक्की share करा. )
भरपुर प्रेडिक्टेबल वाततेय
भरपुर प्रेडिक्टेबल वाततेय कथा..
बाकी दोन बहिणींमधे ४ महिन्याच अंतर कसकाय असु शकत ?
>>बाकी दोन बहिणींमधे ४
>>बाकी दोन बहिणींमधे ४ महिन्याच अंतर कसकाय असु शकत ?
टीना कथा वाचल्याबद्दल आभारी आहे. आणि ते अंतर मुद्दाम लिहिलं आहे. It is part of a story.
मुद्दाम.. माफ करा पण तो एक
मुद्दाम..
माफ करा पण तो एक फ्लॉ वाटतो वाचताना.. तुम्ही इथे सांगितल म्हणुन त्या सावत्र अथवा त्यातली एक दत्तक घेतलेली अथवा आणखी काही विचार येईल तरी नाही तर तो फ्लॉ आहे लेखनातला असच वाटत राहिल सर्वांना.. निदान ते ४ महिने लिहायचे तरी नाही कथेत एखाद गुढ ठेवायच असेल तर..
बाकी कथा तुमची.. ठरवा तुम्हीच..
thanks टीना, तुम्ही सुचवलेलं
thanks टीना, तुम्ही सुचवलेलं कळलं आहे मला. आणि तसा बदल सुद्धा मी केलेला आहे, तुमची कल्पना मला आवडली. त्याबद्दल खूप आभारी आहे तुमचा.
पुढचा भाग लवकर येऊ देत
पुढचा भाग लवकर येऊ देत
छान पु.ले.शु
छान पु.ले.शु
मस्त
मस्त
तुमच्या ब्लोग वर
तुमच्या ब्लोग वर वाचले....खूपच उत्कंठावर्धक आहे....पु.ले.शु.पुढील भाग लवकर येउ द्यात...
चांगली चालली आहे
चांगली चालली आहे कथा...पु.ले.शु.
थोडे हिंदीकरण टाळा फक्त वाक्यांचे जसे >>का नाही तुम्हाला पाठवू तिथे.<< हे हिंदी..क्यु ना तुम दोनो को भेजू वहा पे चे सरळ सरळ रुपांतर वाटते...बाकी छान
सर्व प्रतिक्रियांसाठी आभारी
सर्व प्रतिक्रियांसाठी आभारी आहे. आणि प्रसन्न हरणखेडकर तुम्ही सुचवलेल्या गोष्टीवर नक्की लक्ष देईन.
छान आहे. उत्कंठा वाढली आहे.
छान आहे. उत्कंठा वाढली आहे. पुढील भाग लवकर येऊद्या.......
पुढील भाग?????????????
पुढील भाग?????????????
पुढील भाग येऊ देत लवकर
पुढील भाग येऊ देत लवकर
काजलचा एकतर्फी प्रेम असणार
काजलचा एकतर्फी प्रेम असणार त्या राहूलवर !
किती घिसापिटा प्लॉट !
भरपुर प्रेडिक्टेबल वाततेय
भरपुर प्रेडिक्टेबल वाततेय कथा..पुढील भाग येऊ देत लवकर
kiti vat pahayachi. lavakar
kiti vat pahayachi. lavakar dusara bhag yevu de
सूड… ( भाग दुसरा
सूड… ( भाग दुसरा )
http://www.maayboli.com/node/55992
.
.
Resignation letter or
Resignation letter or termination letter
Difference: When somebody quit his/her own job then he/she gives resignation letter
When company fires someone.. company gives termination letter
This is technical mistake
Sorry marathit type karata yet nahiye mala