विंबल्डन - २०१५

Submitted by Adm on 27 June, 2015 - 08:14

स्लॅमाबादप्रमाणे यंदाच्या विंबल्डनबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.

ज्योकोला तुलनेने सोपा ड्रॉ आहे. अंतिम फेरीपर्यंत त्याची नदाल, फेडरर किंवा मरेशी गाठ पडणार नाही.
नदालला ह्याही स्पर्धेत अवघड ड्रॉ आहे. चौथ्या फेरीत फेरर, उपांत्य पूर्व फेरीत मरे, उपांत्य फेरीत फेडरर तर अंतिम फेरीत ज्योको अश्या लढती तो खेळण्याची शक्यता आहे.

महिलांच्या ड्रॉमध्ये विल्यम्स भगिनी एकाच हाफमध्ये आहे. बाकी सगळं नेहमीप्रमाणे बेभरवशी.

महिला दुहेरीत मार्टीना हिंगीस आणि सानिया मिर्झा ह्यांना अग्रमानांकन आहे. त्यांची कामगिरी कशी होते हे बघण्याची उत्सुकता आहे.

स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html
वेबसाईट रोलँगॅरोस पेक्षा बरी आहे पण मधे मधे हँग होतेच आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेनिसपंढरीची वारी.
मजा येणार.
बाकी महिला टेनिस बेभरवशी झालंय हे खरंच. सेरेना बाहेर पडली तर स्पर्धा कोण जिंकेल हा अंदाज करणं अवघड होऊन जातं कुठल्याही स्पर्धेत.

सेरेना बाहेर पडली तर>> ती कधी बाहेर पडते? Happy सध्या तर ती ट्रॉफी घेऊनच जाते आहे घरी!

बिचारा नदाल Sad सध्या सर्व आशा वावरिंकावर.

फेडरर.. फेडरर.. फेडरर... Happy

पुरुष एकेरीतील उपांत्यपूर्व सामने असे असु शकतील.

ज्योको आणि निशिकोरी/चिलीच
वावरिंका आणि डिमिट्रोव्ह/राओनिक
फेडरर आणि मॉनफिल्स/बर्डिच
मरे/त्सोंगा आणि नदाल/फेरर

महिला एकेरीतील उपांत्यपूर्व सामने असे असु शकतील.

सेरेना/व्हिनस आणि इव्हानोविच/आझारेंका
शारापोव्हा आणि साफारोव्हा
वोझियांकी आणि हालेप्/लिसिकी
माकारोव्हा/बुचार्ड आणि क्विटोव्हा

पराग, ज्योकोला बाकी ड्रॉ जरी सोपा असला तरी पहिली मॅच टफ आहे. Happy फेडीला उपांत्य फेरीपर्यंत तरी प्रॉब्लेम येणार नाही अशी अपेक्षा आहे त्याचा ड्रॉ आणि हॅलेमधला त्याचा खेळ पहाता.

पराग. इथे फोटो टाकू का?. ट्रॉफी, सेंटर कोर्ट, प्रेस ब्रीफींग रूम.

जोकोला हेविट आणि बर्डीच मधले काटे आहेत. जोको वॉरविंका सेमी. तीही टफ असेलच.
फेडरर वि मरे सेमी फायनल. नदाल मधेच कुठून आला. Happy

फेडरर जिंकावा अस वाटतय पण ??. सँप्रासच रेकॉर्ड मोडू नये असही वाटतय.
माझ्यामते पुन्हा एकदा टॉप फोर व्यतिरिक्त कोणी इतर जिंकेल अस वाटत नाही.

रॅलीज व्हाव्यात म्हणून गवताचा प्रकार काही वर्षांपूर्वी बदलला होता. त्याचा परिणाम म्हणून विंबल्डन आता फक्त सर्व अँड व्हाली वाल्यांची मक्तेदारी राहिली नाही.

अवांतर माहिती : गवताची उंची ८ मिमी ठेवतात. कमी नाही जास्त नाही.

पराग. इथे फोटो टाकू का?. ट्रॉफी, सेंटर कोर्ट, प्रेस ब्रीफींग रूम. >>>> हो हो टाका !!!!

हेविट हरला पहिल्या फेरीत. त्याचं हे शेवटचं विंबल्डन होतं. 3-6 6-3 4-6 6-0 11-9. शेवटचा सेट जोरदार झालेला दिसतोय.

आज नादालच्या मॅचचा पहिला सेट बघितला. पहिल्या १-२ गेममध्ये प्रचंड ढेपाळलेला वाटत होता नादाल. पण नंतरचा खेळ बघून फॉर्ममध्ये आहे असं वाटलं.

फेडररच्या मॅचचा एक सेट हापिसात बघितला. फेडरर एक्झिबिशन मॅचेस खेळतात तेवढा रिलॅक्स वाटला.

आता ही पोस्ट लिहितेय तोपर्यंत दोघं पण आपापल्या मॅचेस जिंकलेले दिसताहेत. एकुणात आमच्या दोन्ही घोड्यांनी दिवस एकदम चांगला सुरू करून दिला Happy

गेल्या वर्षीच्या फायनलचा स्कोअर बोर्ड दिसत आहे. >>>> जबरी ! तो तसाच ठेवतात पुढच्यावर्षीची स्पर्धा सुरू होईपर्यंत??

बुचर्ड आणि हालेप हरल्या काल !
बुचार्ड गेल्यावर्षी उपविजेती आणि यंदा पहिल्या फेरीत बाहेर.. एकूणात ह्यावर्षी फार चांगली नाही खेळली ती.

john M_0.jpg

जॉन मॅकेन्रोची डिजिटल इमेज असलेल प्रेझेंटेशन अप्रतीम. तो खर खुरा काचे आडून आपल्याशी बोलतोय अस वाटत.
आणि त्यातले कंटेंटही खूप भारी.

नोंद वाचता येत नाही ह्या फोटोत ..

उलट की सुलट ते कळेलच दोन आठवड्यात .. आणि हेच दोघं की आणखी कोणी (जसं की स्टॅन दा मॅन असणार फायनल मध्ये ते ही? Happy

द बॉडी इश्यू कोणीच बघितलेला/त्याबद्दल ऐकलेलं दिसत नाही .. Happy

तो तसाच ठेवतात पुढच्यावर्षीची स्पर्धा सुरू होईपर्यंत?? >> पण मॅच किती क्लोज झाली होती बघ.

बुचर्ड आणि हालेप हरल्या काल !>> महिला मंडळ विंबल्डन मधे सुद्धा फारच अन प्रेडिक्टेबल असत. Happy
एका वर्षी चार ग्रँड स्लॅम मध्ये आठ फायनलिस्ट होत्या.

बॉडी इश्यू काय आहे:?.

त्यावरची नोंद वाचण्यासारखी आहे >> विजेता जर परदेशी असेल तर त्याने जाताना ट्रॉफी बँक ऑफ इग्लंड मध्ये जमा करून मगच जावे. Happy

व्हिनस आत्ता पुढे गेली. दुसरा सेट पाहिला. मानलं तिच्या स्टॅमिनाला. पुढच्या राउंडमध्ये मोस्टली इराणी बरोबर खेळेल आणि जिंकली तर सरीना.

पहिल्या फोटोतला स्कोरबोर्ड जर मागच्या फायनलचा असेल तर , पुढच्या फायनल पर्यंत तो बदलायचा नाही अशी काही ब्रिटीश परंपरा आहे का? जसं की पांढरे कपडे, राजघराण्यातल्या लोकांना बाव वगैरे..

कुणाला माहित असेल तर जरुर सांगा.

पुढच्या विम्बल्डन पर्यंत असं काही असल्यास असेल ..

कारण पुढचं विम्बल्डन सुरू झालं की मग सेन्टर कोर्ट वर नव्या मॅचेस सुरू होतात ना .. त्या अधे मधे सेन्टर कोर्ट वापरतात की नाही ते मात्र माहित नाही .. वाचावं लागेल ..

पुढच्या फायनल पर्यंत तो बदलायचा नाही अशी काही ब्रिटीश परंपरा आहे का? >>>> हां तेच म्हणूनच विचारलं..

सशल.. हे नव्हतं पाहिलं.

व्हिनस चांगली जिंकली म्हणे आज..

कारण पुढचं विम्बल्डन सुरू झालं की मग सेन्टर कोर्ट वर नव्या मॅचेस सुरू होतात ना .. त्या अधे मधे सेन्टर कोर्ट वापरतात की नाही ते मात्र माहित नाही .. वाचावं लागेल ..>>.

पुढच्या वर्षीची पहिली मॅच सुरू होई पर्यंत स्कोअर बोर्ड तसाच असतो.
विंबल्डन लंडन ऑलिंपिक्स साठी वापरल होत. अपवाद म्हणून.
दोन टूर्नामेंटमधे गवत संम्पूर्ण बदलतात. त्यामुळे सेंटरकोर्ट, कोर्ट्नंबर १,२ बंदच असतात.
बाकीची प्रॅक्टिस कोर्ट चालू असतात मेंबर्स साठी.

Pages

Back to top